
Diabetes (मधुमेहाचा परिचय) – कोणतेही काम करण्यासाठी ऊर्जा लागते.शरीरालाही ऊर्जेची गरज असते आणि शरीरात उपलब्ध असलेल्या ग्लुकोजमधून शरीर त्याचा पुरवठा करते. रक्तातील ग्लुकोज इन्सुलिन नावाच्या संप्रेरकाद्वारे पेशींमध्ये पोहोचते आणि ऊर्जा प्रदान करते.स्वादुपिंडाद्वारे शरीरात इन्सुलिन तयार होते.अन्न शरीरात गेल्यावर त्याचे रुपांतर ग्लुकोजमध्ये होते आणि ग्लुकोज रक्तामध्ये मिसळते.मधुमेहाचा रुग्ण शरीरात उपलब्ध असलेल्या ग्लुकोजचा पूर्णपणे वापर करू शकत नाहो.
मधुमेह (Diabetes) एक चयापचय विकार आहे.रक्तातील वाढलेल्या ग्लुकोजच्या प्रमाणावर योग्य वेळी उपचार न केल्यास ते शरीरातील महत्वाच्या अवयवांसाठी अत्यंत हानिकारक असते.
मधुमेह प्रकार -१ (Diabetes Type -1)- हा एक स्वयंप्रतिकार विकार आहे,ज्यामध्ये शरीरातील पांढऱ्या पेशी स्वादुपिंडाच्या इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी नष्ट करतात.
मधुमेह प्रकार -२ (Diabetes Type-2) – मधुमेहात शरीरात तयार होणारे इन्सुलिन योग्य प्रकारे वापरले जात नाही.शरीरात इन्सुलिनचे प्रमाण जास्त असल्याने स्वादुपिंड इन्सुलिन तयार करत नाही.
1.1 मधुमेहाची कारणे (Reasons of Diabetes)
- लठ्ठपणा (लठ्ठपणामुळे होणारा मधुमेह) – लठ्ठपणा हे प्रकार २ मधुमेहाचे सर्वात मोठे कारण आहे.
- अनुवांशिकता – याला अनुवांशिक रोग असेही म्हणतात.जर कुटुंबातील कोणाला प्रकार २ चा मधुमेह असेल तर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
- गर्भधारणेदरम्यान साखरेची उच्च पातळी उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रोल पातळी.
- पूर्व मधुमेह किंवा दृष्टीदोष.
1.2 मधुमेहाची लक्षणे (Symptoms of Diabetes)
- जास्त तहान लागणे आणि वारंवार लघवी होणे हि तीव्र मधुमेहाची लक्षणे आहेत.
- जखमा लवकर बऱ्या न होत नाहीत आणि वारंवार संसार्गामुळे प्रभावित होतात (स्लो हिलिंग सोर्स आणि रिकरंट इन्फेक्शन).
- आळस वाटणे – पेशींमध्ये ग्लुकोजच्या कमतरतेमुळे शरीराला ऊर्जा पुरवठा पूर्ण होत नाहीत आणि मधुमेहाच्या रुग्णाला नेहमी थकवा जाणवतो.
- अंधुक दृष्टी- रक्तात जास्त साखर असल्यामुळे डोळ्यांच्या पेशींना होणारा रक्तपुरवठा प्रभावित होतो आणि हळूहळू डोळ्यांवर परिणाम होऊ लागतो.
- हात आणि पायांना मुंग्या येणे- रक्तातील अतिरिक्त साखर आपल्या मज्जासंस्थेला हानी पोहोचवू शकते.
- सुजलेल्या हिरड्या- मधुमेहामुळे हिरड्यांचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
- रक्तामध्ये अतिरिक्त साखर असल्यामुळे किडनी रक्त स्वच्छ करण्यासाठी आणि शरीरातील अतिरिक्त साखर लघविद्वारे बाहेर काढण्यासाठी अधिक मेहनत करू लागते.यामुळे वारंवार लघवी आणि जास्त तहान लागते.
- वजन कमी होणे- जेंव्हा आपल्या शरीरातील पेशींना ग्लुकोज मिळत नाही,तेव्हा शरीरातील चरबी आणि स्नायूमधुन त्याचा पुरवठा होतो.त्यामुळे शरीरात साठलेली चरबी आणि स्नायू कमी होतात आणि वजन लवकर कमी होते.
1.3 मधुमेहावरील (Diabetes) आयुर्वेदिक उपचार व उपाय योजना
- २ चमचे कारल्याचा रस दिवसातून एकदा सेवन करा.
- दिवसातून दोनदा.एक चमचा मेथी पावडर पाण्यासोबत अवश्य सेवन करा.
- दररोज एक तास व्यायाम करा.
- तुमच्या घरी दररोज मधुमेहाची चाचणी करा.रक्तातील साखरेच्या प्रमाणावर लक्ष ठेवा.
- इन्सुलिन इंजेक्शन स्वतः कसे घ्यावे आणि त्याचे व्यवस्थापन कसे करावे याची माहिती असली पाहिजे.
- इन्सुलिन पंप सोबत ठेवा.
- कार्बोहायड्रेटची गणना लक्षात ठेवा.
- रक्तदाब कमी असताना महत्वाची माहिती लक्षात ठेवणे.
- प्राणयाम,सेतुबंधासन,बलासना,वज्रासन,सर्वांगासन या प्रकारचे व्यायाम करणे गरजेचे आहे.
2.Diabetic retina therapy
डायबेटिक (Diabetes) रेटीनोथेरपी हा एक आजार आहे.जो मधुमेहाने (Diabetes) ग्रस्त असलेल्या व्यक्तीचा डोळ्यातील पडदा ( डोळ्यातील पडदा जेथे प्रतिमा तयार केली जाते) प्रभावित करतो.डोळ्यातील पडद्याला रक्तपुरवठा करणाऱ्या बारीक वाहिन्यांच्या नुकसानीमुळे असे घडते,त्यावर वेळीच उपचार न केल्यास पिडीत व्यक्ती अंधत्वाचा बळी पडू शकतो.डायबेटिक रेटीनोथेरपी हे जगातील अंधत्वाचे प्रमुख करण आहे,ज्याची प्रकरणे दरवर्षी वाढत आहेत.
डोळ्यातील पडदा म्हणजे काय? डोळ्यातील पडदा हा डोळ्याच्या आतील भागात स्थित एक नाजूक प्रकाशसंवेदनशील थर आहे.जो एखाद्या वस्तूतून परावर्तीत होणाऱ्या प्रकाशाच्या मदतीने वस्तूची प्रतिमा तयार करण्यास जबाबदार असतो.रेतीनाला झालेल्या नुकसानीमुळे retinopathy होतो.
मधुमेहाचा (Diabetes) रेटीनावर होणारा परिणाम –

मधुमेहाच्या बाबतीत,रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते,परिणामी रक्तवाहिन्यांमधून रक्तस्त्राव होतो.ज्यामुळे डोळ्यातील पडदा सुजतो.रक्तवाहिन्यांमधील बिघाडामुळे डोळ्यातील पडदा निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक पोषक आणि oxygen चा पुरवठा विस्कळीत होतो.सुरुवातीच्या टप्प्यात वर नमूद केलेल्या कारणांमुळे अंधुक दृष्टीची लक्षणे दिसतात.रोग जसाजसा वाढत जातो तसे तसे रेटीनाल भागात अस्मानी रक्तवाहिन्या वाढू लागतात ज्यामुळे oxygen पुरवठ्यात अडथळा येतो.या रक्तवाहिन्या मधुमेहामुळे केव्हाही फुटू शकतात.परिणामी डोळ्यातील पडदाभोवती रक्तस्त्राव होऊन डोळ्यांमध्ये अंधळे चट्टे तयार होतात किंवा अचानक दृष्टी कमी होऊन दृष्टी कमकुवत होऊ शकते.
कारणे-
मधुमेह,दीर्घकाळ टिकून राहिल्यास शरीराच्या इतर भागांवर परिणाम होतो आणि प्रभावित अवयव डोळे देखील असू शकतात.मधुमेहामुळे रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर परिणाम होतो.ज्यामुळे रेटीनाला नुकसान होते.मेंदूपर्यंत oxygen वाहून नेणाऱ्या नसा (ज्यावर प्रतिमा तयार होते) कमकुवत होतात.मधुमेही रुग्णांमध्ये साखरेचे प्रमाण नियंत्रणात न राहिल्यास त्यांना डायबेटिक retinopathy चा त्रास होऊ शकतो.रोग गम्हीर झाल्यावर समस्या कळते.
diabetic retinopathy हे देखील अंधत्वाचे प्रमुख कारण आहे.diabetic retinopathy चे दोन प्रमुख टप्पे आहेत. सुरुवातीच्या टप्प्याला Non-Proliferative diabetic retinopathy (NPDR) म्हणतात. या अवस्थेत रेटीनल क्षेत्राच्या नळ्या खराब होतात.सामन्यतः हा रोगाचा प्रारंभिक टप्पा असतो,ज्यामध्ये लक्षणे आढळत नाहीत.
काही प्रकरणामध्ये खराब झालेल्या रक्तवाहिन्या फुटल्यामुळे रेटीनाच्या मध्यभागी रक्त सांडते या स्थितीला डायबेटिक maculopathy म्हणतात,ज्यामुळे दृष्टी प्रभावित होते आणि दृष्टी धूसर होते. त्याच्या प्रगत आणि विकसित अवस्थेला Proliferative diabetic retinopathy (PDR) म्हणतात.diabetic retinopathy हा सर्वात गंभीर टप्पा आहे.या अवस्थेला डोळ्यातील पडदा कमकुवत,आणि रक्तवाहिन्या वेगाने वाढू लागतात,ज्यामुळे डोळ्यातील पडदा खराब होतो.मधुमेह असलेल्या सुमारे २० टक्के लोकांना PDR मुले गंभीर दृष्टीदोष निर्माण होऊ शकतो,ज्यामुळे अंधत्व येते.
लक्षणे –
- वारंवार डोळ्यांचे संक्रमण.
- चष्म्याचा नंबर वारंवार बदलणे.
- डोळ्यातील पडद्यामधून रक्तस्त्राव.
- पांढरा मोतीबिंदू किंवा काळा मोतीबिंदू.
- डोकेदुखी किंवा अचानक दृष्टी कमी होणे.
- सकाळी उठल्यानंतर दृश्यमानता कमी असणे.
काही उपाय योजना –
- वेळोवेळी डोळे तपासा,मुलामध्ये हि तपासणी आवश्यक आहे.
- रक्तातील कोलेस्ट्रोल आणि साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवा.
- डोळ्यात दुखणे,अंधार येणे अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- मधुमेही रुग्णाने वर्षातून एकदा तरी डोळे तपासून घ्यावेत.
- मधुमेहाच्या रुग्णांनी दर वर्षांनी दर तीन महिन्यांनी डोळे तपासा.
- गर्भवती महिलेला मधुमेह असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.
- व्हिटामिन ए असलेल्या पदार्थांचे अधिक सेवन करावे.
- तुमच्या आहारात पालकचा समावेश करा.
- काळ्या द्राक्षांच्या बियांचा रस प्या.
- भरपूर कोशिंबीर खा.
मधुमेह (Diabetes) कमी करण्याचे उपाय –
- गव्हाची छोटी छोटी झाडे यांमध्ये रोगनाशक गुण असतात.त्यांचा रस काढून त्येचे सेवन केल्यास मधुमेह नियंत्रणासाठी मदत होते.
- मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांसाठी भुकेपेक्षा कमी खाण्याचा सल्ला दिला जातो.अशा अवस्थेत काकडी आणि लिंबू खावून भूक कमी करण्याचा सल्ला दिला जातो.
- मधुमेहाच्या रुग्णांसाठी भोपळा,पडवळ,पालक,पपई या भाज्यांचा वापर जास्त प्रमाणात करावा.
- अलीकडच्या काही संशोधनात आले मधुमेहाच्या आजारात अत्यंत गुणकारी सिद्ध झाले आहे. एका संशोधनानुसार आल्याचा रस शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते.उपाशी पोटी आल्याचा रस अत्यंत फायदेशीर आहे.
- मधुमेहासाठी सोयाबीन च्या पिठाची रोटी खाण्याचा सल्ला दिला जातो.सोयाबीन मध्ये स्टार्च आणि कार्बोहायड्रेट कमी प्रमाणात असतात.या गोष्टी मधुमेहासाठी हानिकारक असतात.सोयाबीन रोटीच्या पिठामध्ये मिसळून खाल्याने मधुमेह नियंत्रित राहतो.
- मधुमेही (Diabetes) व्यक्तींसाठी एलो वेरा अत्यंत गुणकारी आहे.एलो वेरा चा ज्यूस घेतल्यामुळे त्यामधील विविध विटामिन्स,मिनरल्स,खनिजे शरीराच्या अंतस्तरामध्ये काम करतात.यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते आणि व्यक्ती तंदुरुस्त राहते.
- मधुमेहाच्या(Diabetes) आजारात पेरू नियमित खाण्याचा सल्ला दिला जातो. पेरू कापून त्यावर सैंधव मीठ किंवा काळे मीठ आणि काळी मिरी पावडर टाकून खावे यामुळे मधुमेहापासून आराम मिळतो.
- मेथी दाणे रात्रभर एक कप पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी मेथी दाणे गाळून बाजूला करा व पाणी प्या. अथवा मेथी दाणे भाजी मह्द्ये,चूर्ण किंवा चटणी मध्ये वापरून आपण घेऊ शकतो.मेथीचा वापर दररोज केल्याने शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित होते.
- आंब्याची पाने चावून खाल्याने किंव चूर्ण स्वरूपात घेतल्याने साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते.याचे चूर्ण उपाशी पोटी घेणे फायदेशीर ठरते.
आजच्या व्यस्त जीवनशैलीत केवळ भारतातच नाही तर जगभरात मधुमेहाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत व त्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.याचा प्रकार-१ आणि प्रकार-२ असे दोन प्रकार आहेत.या आजारावर वेळीच उपचार केले नाहीत तर त्याचे शरीरावर गंभीर परिणाम दिसू शकतात.मधुमेहावर नियंत्रणासाठी त्याची लक्षणे ओळखायला हवीत.हाताला किंवा पायाला येणाऱ्या मुंग्या- रक्तातील साखरेची पातळी शरीरातील रक्ताभिसरणात बिघाड करू शकते,मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये हात आणि पाय यांना मुंग्या येणे आणि ते सुन्द होणे अशा समस्या उदभवू शकतात.त्वचेवर काळे डाग पडणे ,मान पाठ,किवा कमरेवर काळे डाग पडणे हे याचा धोका दर्शवू शकतात.त्वचेला खाज आणि संक्रमण होऊ शकते,रक्त किंवा लघवीमध्ये साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे संसर्ग वाढू शक्ती.
काही संक्रमणे तुम्हाला होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.तुम्हाला सतत तहान लागू शकते.रक्तातील साखर काढून टाकण्यासाठी वारंवार लघवी करणे आवश्यक असते.परंतु यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते.कालांतराने शरीराचे निर्जलीकरण होऊन जास्त प्रमाणात तहान लागू शकते.सतत भूक लागते,मधुमेहाच्या व्यक्तींना वारंवार भूक लागते.मधुमेह असलेल्या लोकांना ग्लुकोज पुरेशा प्रमाणात शरीराला पोहोचत नाही.
थकवा जाणवणे- व्यक्तीच्या ऊर्जा पातळीवर परिणाम होऊन थकवा जाणवू शकतो हा थकवा शरीराच्या पेशींच्या साखरेच्या अपर्याप्त कारणामुळे येतो.तसेच रक्तवाहिन्यांचे अधिक गंभीर नुकसान होते.जखमा सुद्धा हळूहळू बऱ्या होतात.आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान देखील होते ज्यामुळे रक्तपरीसंचय बिघडू शकते.परिणामी जखमा बऱ्या होण्यासाठी आठवडे किंवा महिने सुद्धा लागू शकतात.
