यकृताचे आजार | Harmful Liver Disease

liver Sirois हि एक अशी स्थिती आहे यामुळे तुमचे यकृत बऱ्याच काळापासून होत आलेल्या नुकसानीपासून खराब होते.यकृत काही कारणामुळे छोटे होते आणि कडक बनते.त्यामुळे त्याचे कामकाज ठीकपणे चालत नाही व शेवटी काम थांबवते. हि अशी स्थिती यकृताला होणाऱ्या रक्त पुरवठ्याला देखील परिणाम करते.व हायपरटेन्शन होते.सिरोईस हा पसरणारा आजार मानला जातो आणि निरोगी टिश्यू फायबर bands णे बदलले जातात.नैसर्गिक अडचणीशी सामना करायला यकृतात गाठी तयार होतात.व सर्व पृष्ठभाग व्यापतात.हे स्कार टिश्यू रक्तप्रवाह यकृतापर्यंत पोहोचू देत नाही ज्यामुळे यकृताचे काम पूर्ण बंद होऊन मृत्यूचा धोका संभवतो.

 Harmful Liver Disease

(liver Sirois) लिव्हर सिरोईस ची प्रमुख चिन्हे आणि लक्षणे सुरुवातीची पुढीलप्रमाणे आहेत.

  • पोटावर रक्ताच्या कॅपिलरीज दिसून येणे.
  • थकवा जाणवणे.
  • निद्रानाश होणे.
  • भूक कमी लागणे.
  • मळमळ व उलट्या होणे.
  • खाज सुटणे.
  • कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणे.
  • यकृत दुखणे आणि खाजवणे.

पुढच्या काही टप्प्यांमध्ये खालील लक्षणे दिसतात. (Liver Sirois Symptoms)

  • हिरड्यांमधून रक्त येणे.
  • चक्कर येणे.
  • ह्रदयाचे ठोके वाढणे.
  • पायावर आणि पोटावर सूज येणे.
  • कावीळ होणे-डोळे व त्वचा पिवळी होणे.
  • स्मृतीभ्रंश होणे.
  • स्नायूंमध्ये वेदना होणे.
  • उलटी मध्ये रक्त दिसणे.
  • प्रोटीनची कमी ,ज्यामुळे केस गळती होणे,सूज,अशक्तपणा दिसून येतो.

लिव्हर सिरोईस ची मुख्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत.(Reasons of Liver Sirois)

  • हिपाटीटीस बी किंवा हिपाटीटीस सी सारखे व्हायरल इन्फेक्शन.
  • निरंतर दारूचे सेवन केल्याने.
  • fatty liver आजार.
  • लठ्ठपणा वाढणे.
  • सिस्तिक फायब्रोसीस.
  • उच्च रक्तदाब.
  • ऑटो इम्यून आजार.
  • अन्ननलिकेत अडथळा.
  • हर्बल प्रिपरेशन मुळे यकृताला धोका मनिर्माण होतो.
  • केमिकल्स चा संपर्क.
  • ह्रदयाचे काम बंद पडणे.
  • यकृतामध्ये फंगस चा संसर्ग.
  • यकृताचे अनुवांशिक आजार.
  • शरीरात कॉपर आणि आयर्नचे प्रमाण जास्त असणे.

लिव्हर सिरोईस चे उपचार आणि निदान (liver Sirois diagnose and Treatment)

  • यकृताचे कार्य तपासण्यासाठी रक्ताच्या काही तपासण्या.
  • लिव्हरची बायोप्सी.
  • एम आर आय स्कॅन.
  • अन्ननलिकेच्या वरच्या भागाची इंडोस्कोपी .
  • सी.टी स्कॅन.
  • अल्ट्रासाउंड.

वरील पध्तीमधून अडचणी लक्षात घेतां आणि चाइल्ड पगचे स्कोर वरून स्थितीचे वर्गीकरण केले जाते.

गंभीर,मध्यम आणि सौम्य.

संतुलित आहाराचे सेवन.जास्त सोडियम चे सेवन,हिपाटीटीस व्हायरस चा उपचार .आयर्न व कॉपर कमी प्रमाणात सेवन.

गंभीर लिव्हर ट्रांसप्लांट हा शेवट चा उपाय असतो.जर हा उपचार केला नाही तर कॉम्पलीकेशन वाढू शकते.

यामुळे यकृत कर्करोग,कोमा,मृत्यू,टाईप २ डायबेटीस हायपरटेन्शन होऊ शकते.

liver disease (यकृत आजार)

liver disease (यकृत आजार)

यकृत मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आणि शरीरांतर्गत असलेला मोठा अवयव आहे. यकृत खूप मोठ्या क्रिया करते.जसे कि अन्नाचे पचन,पौष्टिक तत्वांचे पचन आणि साठवणूक,चयापचयाच्या वेळी निर्माण होणारे घातक रासायनिक पदार्थ आणि औषधे व अल्कोहोल पासूनच्या विषाणूपासून सुरक्षित ठेवणे.यकृताच्या कार्यातील व संरचनेतील कोणत्याही विसंगतीला यकृताचे आजार म्हणतात.यकृताचे आजार हे परजीवी जंतू,रोगजंतू,अल्कोहोल,लठ्ठपणा,सूक्ष्मजंतू आणि ठराविक औषधे आणि विषाणूमुळे होतात.

यकृत अनेक कार्ये करत असल्याने त्याच्या आजारांमध्ये लक्षणामध्ये विविधता आढळून येते.परंतु यकृताच्या आजारामधील एक आजार आहे कावीळ.कावीळ या आजारात डोळे मलीन कातडे पिवळे होतात.आणि लघवीसुद्धा गडद पिवळी होते. काविळीचे निदान करण्यासाठी मुख्यतः रक्ताच्या तपासण्या,अल्ट्रासोनोग्राफी किंवा सी.टी.स्कॅन आणि लिव्हरची बायोप्सी करतात. मुलभूत कारणांमध्ये यकृतावरील उपचार ठरविले जातात. लिव्हर सिरोईसमध्ये यकृतावर तीव्र व्रण उमटतात.याचे शेवटी लिव्हर बंद पडण्यात पर्यावसन होते.जी यकृताच्या आजारातील अंतिम अवस्था आहे.असे होणे साधारणपणे पूर्वनिदान न होणे यामुळे होते.

लिव्हरच्या आजाराची लक्षणे (liver disease Symptoms)

यकृताच्या आजाराच्या सुरुवातीला लक्षणे अस्पष्ट असतात.आणि टी असली तरीही संदिग्ध किंवा अनिश्चित असतात.तरी यकृतावरील पेशींच्या इजेच्या किंवा दुरुस्तीच्या वेळी सामान्य आजारांची लक्षणे दिसतात.

यकृताला झालेली तीव्र क्षति किंवा हेपायटीसमध्ये काही लक्षणे दिसतात.

  • प्रचंड ताप येणे.
  • मळमळ होणे.
  • उलटी होणे.
  • कावीळ.
  • त्वचेची खाज सुटणे.
  • गडद पिवळी लघवी.
  • डोळ्याच्या पांढऱ्या भागाचे पिवळे होणे.

यकृताचा आजार सिहोर्तिक टप्यात असेल तर आणखी काही लक्षणे दिसतात.

  • रक्ताच्या उलट्या.
  • गुदद्वारातून रक्त येणे.
  • पोटात द्रव्यांचे साठणे.
  • संभ्रम निर्माण होणे.

यकृताच्या (liver)काही आजारांमध्ये विशिष्ट परिस्थितीशी जुळत असलेली लक्षणे दिसतात,तर कधी वर सांगितली तशी चिन्हे दिसतात. हा तसाच उपचार न करता राहिल्यास यकृत बंद पडते.जी आपत्कालीन स्थिती आहे.चक्कर,कोमा दिशाभूल आणि संभ्रम स्थिती तोंडाची दुर्गंधी असल्या लक्षणामधून समोर येते.

लिव्हर रोगाचा उपचार कसा केला जातो. (Treatment Of Liver Disease)

यकृताच्या आजारावर निदानावरून उपचार करतात.काही वेळा हे गुणकारक नसतात तेव्हा परिहारक उपचार करतात.त्याने तीव्रता कमी होते किंवा अधिक बिघाडामुळे मृत्यू होण्याची वेळ येत नाही.वारंवार काही उपचार केल्या जातात.

  • विषाणूविरोधी उपचार – दीर्घकालीन हेपाटायटीस बी आणि सी याचा उपचार दीर्घ काळासाठी विषाणूविरोधी औषधे देवून उपचार केला जातो.
  • प्रतिजैविक उपचार- यकृताच्या फोडांना पोटातून प्रतीजैवके देवून बरे करतात.परंतु काही अवस्थामध्ये पस काढला जातो आणि नलीकांमधून दिली जातात.ज्यामुळे रुग्ण लवकर बरा होतो.
  • संयुक्त उपचार- ऑटोइम्यून प्रकरणांमध्ये हि पद्धत अवलंबतात. या उपचारामध्ये कोर्टीकोस्टेरोईड, इम्युनोस्प्रेसिव्ह आणि दाहविरोधी औषधे संयुक्तपणे दिली जातात.हि औषधे रोग प्रतिकारशक्तीची अतिक्रियाशीलता कमी करतात आणि यकृतावरील सूज कमी करते.
  • चीलेशन उपचार- या आजरांच्या प्रकरणांमध्ये पेनिसिलामाईन वर्गातील औषधांसोबत बांधले जाऊन लघविद्वारे निघून जाते.कमी दुष्परीनामासाठी अलीकडे ट्रायेनटीन वापरतात.
  • वारंवरची फ्लेबोटोमी – अनुवांशिक हेमोक्रोमटोसीसमध्ये रक्त काढून घेतात. ज्यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण कमी केले जाते.
  • आधारभूत उपचार – यकृतातील काही एन्झाइम किंवा प्रथिने,यकृताच्या पेशींवरील भर कमी करतात,आधारसाठीची औषधे म्हणून दिली जातात.
  • शस्त्रक्रिया किंवा यकृत प्रत्यारोपण – आजार घटक आणि गंभीर असेल तर यकृत प्रत्यारोपण करतात.संपूर्ण यकृत प्रत्यारोपित करतात किंवा जिवंत दात्याकडून यकृताचे तंतू प्रत्यारोपित करतात.बहुतेक काही प्रकरणामध्ये संयुक्त उपचारांसोबत जीवनशैली परिवर्तन उपयोगी पडते.यकृताच्या कामावर सतत आणि काळजीपूर्वक देखरेख ठेवणे आणि अल्ट्रासाउंड चाचणी करणे आवश्यक असते.
  • जीवनशैली व्यवस्थापन- यकृताचे आजार व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव करत असतात. काही अवस्थामध्ये तक्रार निवारणाकरिता जीवनशैलीमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता असते.त्यामुळे आजाराची वाढ मंदावते आणि गुंतागुंत वाढत नाही.जीवनशैली आणि आहार बदल म्हणजे जसे मद्यपान न करणे,वजन कमी करणे,आणि ideal BMI ठेवून नियंत्रणात आणले जातात.

जीवनशैलीतील बदल करून आजार नियंत्रणात आणण्यासाठी काही गोष्टी-

मद्यपान कमी करा- यकृताचे (liver) आजार वाढण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे मद्यपान आहे म्हणून या आजारात मद्यपान कमी करण्याचा आणि बंद करण्याचा सल्ला नेहमी दिला जातो.

आहाराचे नियोजन- कमी आहार आणि दिवसातून अनेक वेळा आहार घ्यायचा प्रयत्न करा.चरबीयुक्त आणि अधिक अधिक आहार यकृताला (liver) हानी पोहोचवू शकतो.

आहारातील फेरबदल- यकृत प्रथिनांच्या चयापचयाच्या कामाशी संबंधित आहे. आणि यकृताची क्षति या कामात अडथळा आणते. म्हणूनच जास्त कर्बोदके असलेला आहार घ्यायला हवा जेणेकरून दीर्घ काळासाठी शक्ती मिळत राहते.यकृत प्रथिनांचे पचन करू शकत नसल्याने आहारात प्रथिने घेणे टाळा.त्यामुळे काही विषारी उत्पादन होऊन मेंदूला धोका होण्याचा संभव असतो.काही लोकांना व्हिटामिन सी घेण्याचा सल्ला दिला जातो. ज्याने आहारातील लोह अधिक प्रमाणात शोषले जाते.

वेदनाशामकांचा वापर- बहुतेक सर्व वेदनाशामक औषधींचे यकृतात चयापचय होते.आणि बहुतेक ते विषारी असतात.(त्याचे यकृतावर हनिकारक परीनाम होतात) म्हणून वेदनाशामक औषधे टाळावीत आणि गरजेची असल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

धुम्रपान सोडा- यकृतावर विपरीत परिणाम करणारे प्रमुख कारण म्हणजे धुम्रपान,त्यामुळे यकृताला हानी होण्यापासून वाचवायचे असेल तर धुम्रपान सोडायला हवे.

वजन नियंत्रित करायला हवे- वजन कमी केल्याने आणि BMI राखल्यामुळे संचय कमी होऊन यकृताला पुढील नुकसान होण्यापासून वाचविते.त्याच वेळी यामुळे होणारी गुंतागुंत टळते.

लसीकरण- यकृत हे हेपाटीटीस विषाणूमुळे अधिक प्रभावित होण्याची शक्यता असते आणि विषाणूजन्य संक्रमणामुळे यकृतात कर्करोगाकडे नेणारे बदल होऊ शकतात,म्हणूनच या विषाणूविरुद्ध लस घेणे आणि संबंधित गुतागुंत टाळणे महत्वाचे ठरते.

यकृत (liver) खराब होणे – यकृत बरीच कामे करते. ते रक्ताचे शुद्धीकरण करते अन्नाला वापरण्यायोग्य शक्तीमध्ये बदलते आणि ह्यामध्ये बचावात्मक कार्य करते.जेंव्हा यकृत यातील काही किंवा सर्व एकमे करू शकत नाही त्याला यकृत खराब होणे असे म्हणतात.

यकृत खराब होण्याचे दोन प्रकार आहेत. (Liver Damage)

यकृत खराब होण्याचे दोन प्रकार आहेत. (Liver Damage)

acute and chronic liver damage – acute स्थितीमध्ये काही दिवस किंवा काही आठवडे यामध्ये यकृत खराब होते.

  • त्वचेवर व डोळ्यांमध्ये पिवळा रंग
  • मळमळ आणि उलट्या.
  • थकवा व गोंधळ.
  • यकृत खराब झाल्यास मेंदूवर सुद्धा परिणाम होतो.ज्यामुळे वेळ आणि जागेचे संतुलन बिघडते.

chronic स्थितीमध्ये लक्षणे दिसायला काही महिने किंवा काही वर्षांचा कालवधी लागू शकतो.वरील लक्षणाव्यतिरिक्त काही जास्तीची लक्षणे दिसून येत्तात.

  • पायांमध्ये द्रव पदार्थांचे वाहन पूर्णपणे होऊ शकत नाही,ज्यामुळे पाय सुजतात.
  • पोटात द्रवपदार्थ साठून राहतात.
  • वजन कमी होते.
  • रक्तस्त्राव सतत होतो.

तिसरा प्रकार ज्यामध्ये यकृत (liver) खराब होते.ज्यामध्ये यकृताची कार्यप्रणाली बिघडल्यामुळे यकृत खराब होण्याची शक्यता असते.

यकृत खराब होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.(Liver Damage Reasons)

  • काही औषधे जसे कि antiepileptics चे दुष्परिणाम.
  • व्हायरल संसर्ग.
  • विषारी पदार्थांचे सेवन.
  • कर्करोगामुळे सुद्धा यकृत खराब होऊ शकते.
  • हर्बल प्रिपरेशन्स.
  • दारूचे बराच काळ सेवन.
  • हेपोटिक सिरोसीस.
  • जनुकीय आजार.
  • कुपोषण

यकृत खराबिचे निदान व उपचार (Liver damage Diagnose and Treatment)

ज्यावेळेस लक्षणे दिसतात तेव्हा औषधाचा इतिहास,दारू चे सेवन,जनुकीय आजार याचा अभ्यास केला जातो.

रक्ताची तपासणी आणि बायोप्सीद्वारे यकृताचा निकामिपना चे योग्य निदान करता येते. पोटाचा अल्ट्रासाउंड,सी.टी स्कॅन,एम आर आय या तपासण्या मुळे यकृताचे आरोग्य कळते.

जर औषधामध्ये खाराबिचे कारण असेल तर औषध बदलले जाते.जर यकृताचा थोडा भाग निकामी झाला असेल तर तो काढून परत बनू शकतो.काही वेळा निकामी झाले असेल तर प्रत्यारोपण शिवाय पर्याय नसतो.उपचारासोबत आहार व जीवनशैली मध्ये देखील बदल करावे लागतात.

https://fityourself.in/1-hair-fall-and-baldness-caution/

https://ig.me/j/Abaa1lK5byvYth8N