उपयोगी आयुर्वेदिक वनस्पती | Useful Ayurveda plants Always

आयुर्वेदिक उपयोगी वनस्पती (Useful Ayurveda plants) व पदार्थ आपल्या घरामध्ये किंवा आजूबाजूला खूप आढळतात पण आपल्याला त्याचे फायदे माहित नसतात.आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी वनस्पती आणि पदार्थांची आपण माहिती घेऊया.

१.Useful Ayurveda plants Which are easily available

१.१ ओवा

ओवा
  • आपल्याला अपचन झालय.पोटात gas झाला तर ओवा ख. आपल्याला तात्काळ आराम पडतो.पाचक ओवा अनेक तक्रारी दूर करीत असल्याने औषधांमध्ये त्याला महत्वाचे स्थान आहे.
  • वात,तसेच कफ दोषाचे शमन करतो,पोटात वायू,धरणे,उदररोग,जंत आदींवर रामबाण ठरतो.
  • ओव्याच्या सेवनाने भूक वाढते,त्यामुळे जेवणामध्ये याचा वापर नियमितपणे करावा.
  • कफ कमी करण्यासाठी ओवा उपयोगी पडतो.पाणी उकळून ओव्याचा रस घ्यावा. मात्र तो थंड झाल्यावर सेवन करावे.यामध्ये तुम्ही साखरही मिसळू शकता.
  • छातीत कफ तयार झाल्यास भाजलेला ओवा मधातून घेतल्याने आपल्याला आराम मिळतो.
  • दात दुखीमध्ये ओवा हितकारक असतो.दात दुखी थांबवण्यासाठी लवंग तेलात ओव्याचे तेल मिसळून वेदना होत असलेल्या दातावर एक-दोन थेंब टाकावे.
  • पोटात gas तयार झाल्यामुळे होणाऱ्या वेदनांपासून सुटका करून घेण्यासाठी ओव्याला हलक्या आचेवर तव्यावर भाजून घ्यावे .नंतर भाजलेला ओवा एखाद्या कपड्यात किंवा विद्याच्या पानावर टाकून पोटावर ठेवावे किंवा पोटाला बांधावे.यामुळे पोटदुखीचा त्रास कमी होतो.
  • तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असेल तर ओवा फायदेशीर असतो.डोकेदुखी किंवा मायग्रेनचा झटका आल्यावर ओव्यापासून तयार केलेल्या पावडरचा वास घेतल्याने रुग्णाला आराम मिळतो.
  • ज्यांना दम्याचा त्रास असेल तर त्यांनी ओवा गरम करून एका छोट्याशा कापडात बांधावा आणि छातीवर ठेवावा.यामुळे रुग्णाला उष्णता मिळेल आणि छातीवर ठेवावा. यामुळे रुग्णाला उष्णता मिळेल आणि थंडीपासुन्ही बचाव होईल.
  • पोटाशीच्या बाबतीत काही समस्या असल्यास रुग्णाला चहामध्ये ओवा टाकून पिण्यास द्यावा,यामुळे रुग्णाचा त्रास कमी होतो.
  • ओव्याचे सेवन केल्याने छातीतील जळजळ,डायरिया,मळमळणे,उलटी येणे आणि असिडीटी पासून सुटका होते.
  • अर्थ्राय्तीसमध्ये गुडघा किंवा शरीराच्या इतर सांध्यात होणाऱ्या वेदनेतून सुटका करून घेण्यासाठी ओव्याचे तेल त्या भागावर लावल्यास उत्तम आराम मिळतो.
  • पोटात मुर्द येऊन कळ येत असेल तर ओवा चमचाभर घेऊन त्यात थोडे मीठ घालून गरम पाण्याबरोबर प्यावे.
  • तान्ह्या बाळाचे पोट दुखत असेल तर आपण ओवा पूड खून बेंबीवर व तोंडात फुंकर मारावी.
  • भजी करताना त्यात ओव्वा पूड घालावी.
  • ओव्यामुळे कफ सुटतो,ओकारी थांबते,आव थांबते.

१.२ गोकर्णी (Useful Ayurveda plants):

  • डोकेदुखीमध्ये गोकर्णीच्या शेंगाचा ८ ते १० थेंब रस सेवन किंवा मुळच्या रसाचे सेवन रोज अंशपोटी करावे असे केल्याने डोकेदुखी नष्ट होते. लहान मुलांना कानाला बांधल्यानेही कान दुखी थांबते.
  • अर्ध शी शी – गोकर्णीच्या बियांची ४-४ थेंब रस काढून नाकात टाकल्यास अर्ध शी शी दूर होते.
  • गोकर्णीच्या बिया या थंड व विषयुक्त आहे. या बिया व मुळा समप्रमाणात घासून त्याचे चारण पाण्यासोबत घेतल्यास अथवा सेवन केल्यास अर्ध शी शी दूर होते.
  • कासश्वास – गोकर्णीच्या मुळांचा काढा तयार करून त्याचे चाटण दोन वेळा घेतल्यास कास,श्वास तसेच लहान मुलांचा डांग्या खोकल्यास लाभदायक ठरते.
  • गलगंड – पांढऱ्या रंगाच्या गोकर्णीच्या मुळाच्या दोन ग्राम चूर्ण मिसळून पिल्यास तसेच कडून फळांच्या चुर्नास गळ्यात आतल्या भागास घासल्यास गलगंड हा आजार बरा होतो.
  • टान्सील – १० ग्राम ,५००ग्राम पाणी मिसळून अर्धे मिश्रण शिल्लक राहीपर्यंत सकाळी आणि संध्याकाळी घेतल्यास गळ्यातील व्रण तसेच आवाज कंप पावल्यास फायदा होतो.
  • जलोदर – लहान मुलांना होणारा जलोदर गोकर्णीच्या भाजलेल्या बिया १/२ ग्राम चुने कमीत कमी दिवसातून दोन वेळा सेवन केल्यास फायदा होतो.
  • गोकर्णी अर्थात कमला मुळांचे ३-६ ग्राम चूर्ण दही-ताकासोबत सेवन केल्यास लाभ होतो.

१.३ अडुळसा (Useful Ayurveda plants):

अडुळसा (आयुर्वेदिक उपयोगी वनस्पती व पदार्थ)
  • दोन-तीन मीटर उंच असणारा वर्षभर हिरवागार असणारा, अडुळसा कुंपण म्हणून लावता येतो.
  • दमट,उष्ण हवामानात तसेच समुद्रकाठच्या प्रदेशात या वनस्पतीची वाढ चांगली होते.व्यवस्थित पाणी दिले तर हि वनस्पती कोठेही वाढते.
  • पावसाळ्याच्या सुरुवातीला दीड वीत लांबीच्या काड्या किंचित तिरक्या करून जमिनीत लावाव्यात किंवा अगोदर छोटी रोपे तयार करून मग साधारणपणे एक मीटर अंतरावर लावावीत.साधारणतः दोन ते तीन आठवड्यात कडी रुजते,पूर्ण वाढ व्हायला दीड ते तीन वर्षे लागतात. रोपांची चांगली वाढ झाली,कि त्यापासून भरपूर पिवळी पाने मिळतात.
  • आडूळशाचा उपयोग –
  • आडूळशाची पिकलेली पाने औषधात वापरली जातात.
  • पाने व फुलात व्हासिनीन नावाचे द्रव्य असते.हे द्रव्य सर्व प्रकारच्या खोकल्यावर,घशाच्या आजारांवर,दम्यावर उपयोगी असते.
  • खोकल्यासाठीच्या सिरपमध्ये अडुळसा असतोच.
  • कोरडा खोकला असल्यास आडूळसहाच्या पिकलेल्या पानांचा रस चमचाभर मधाबरोबर घेतल्यास आराम मिळतो.
  • आडूळसहाच्या पिकलेल्या पानांचा काढा कोणत्याही प्रकारच्या खोकल्यावर उपयोगी पडतो.

१.४ अश्वगंधा (Useful Ayurveda plants):

1.Useful Ayurveda plants Always
  • सदैव हिरवेगार असणारे अश्वगंधा हे झाड अर्धा ते एक मीटर उंचीचे असते.
  • दमटपावसाळी वातावरणात व पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत याची चांगली वाढ होते.पावसाळ्यामध्ये बियांपासून याची लागवड करावी.साधारणतः १५-२० दिवसांनी बी उगवते.लागवडीनंतर १८ महिन्यानी अश्वगंधाचे मूळ व्यवस्थित तयार होते.झाडाची पाने पिकू लागली व फळे तांबडी झाली कि मुळ्या काढल्या जातात.

अश्वगंधाचे उपयोग

  • अश्वगंधाचे मूळ वातरोगांमध्ये,तसेच शक्ती वाढविण्यासाठी उपयोगी असते.
  • शुक्राणू कमी असणे,सांधेदुखी,अशक्तता,मांसक्षय,रक्तविकार वगैरे रोगांमध्ये अश्वगंधा मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.
  • वजन वाढविण्यासाठी विशेषतः मांसधातूचे पोषण होण्यासाठी अश्वगंधा मुळाचे चूर्ण तुप-साखरेसह किंवा लोणी-साखरेश घेता येते.
  • अश्वगंधा क्षीरपाक म्हणजे अश्वगंधा,दुध वा पाणी एकत्र उकळून तयार केलेळे सिद्ध दुध्सुधा मांसधातू,शुक्र्धातुच्या पोषणासाठी उत्तम असते.

१.५ कालमेघ (Useful Ayurveda plants):

  • दमट वातावरणात व निचरा होणाऱ्या जमिनीत चांगली वाढणारी हि वनस्पती आहे.याची वाढ दोन-तीन फुट एवढीच उंच आहे.
  • साधारणपणे हि वनस्पती चार ते सहा महिन्यातच तयार होते,त्यामुळे फळझाडे,धान्य पिकांमध्ये आंतरपीक म्हणून लावता येते.
  • जुलै-ऑगस्ट महिन्यात बियाणे मातीत मिसळून पेरणी केली जाते.
  • बियाणे फार खोलवर पेरल्यास कमी रोपे तयार होतात.वनस्पतीला फुले येऊन शेंगा धरल्या व पिकायला लागल्या,कि मुळासकट काढून वळवले जाते.
  • उपयोग – यकृताच्या विकारांवर ,सूज,जंत,ताप,अपचन वगैरे त्रासात कालमेघ वनस्पती वापरली जाते.

१.६ कुडा (Useful Ayurveda plants):

  • जंगलात,डोंगरात कुडा वनस्पती दिसून येते,त्यामुळे सहसा कुठल्याही जमिनीत याची लागवड करता येते.याची सहसा कुठल्याही जमिनीत लागवड करता येते.याची वाढ १० -११ मीटर इतकी उंच होते.पांढऱ्या रंगाची सुगंधी फुले येतात व बारीक लांब शेंगा येतात.शेंगामधले बी इंद्र्जव म्हणून ओळखले जाते.
  • औषधात कुड्याची साल,मूळ व बीज वापरले जाते.
  • आव,जुलाब,जंत,विविध त्वचारोगामध्ये कुडा मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.
  • कुडा-सांडगा कुड्याच्या फुलांपासून बनवला जातो.
  • आव,मुर्द येऊन थोडी थोडी शौचाल होणे वगैरे तक्रारींवर कुद्याच्या मुळाची साल उगाळून,लोखंडाच्या पळीत गरम करून घेण्याचा उपयोग होतो.

१.७ धायटी (Useful Ayurveda plants):

  • नैसर्गिकरीत्या डोंगराळ भागात उगवणारी वनस्पती म्हणजे धायटी. याची लागवड बहुतेक सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते.
  • फांदी लावली असता अनेक फांद्यांचे छोटे झुडूप तयार होते.धाय्तीचे साधारणतः एक-दोन मीटर उंचीचे झुडूप असते.फेब्रुवारी-मार्च महिन्यात लाल रंगाची छोटी छोटी फुले येतात.
  • औषधात फुले वापरली जातात.
  • गर्भाशयाच्या विकारात,तसेच आसवारिष्ट बनवाताना नैसर्गिक संधांद्र्व्य म्हणून धायटीची (Useful Ayurveda plants) फुले वापरली जातात.
  • पाळीच्या दिवसात अधिक रक्तस्त्राव होत असल्यास धायटीच्या फुलांचे चूर्ण तुप-मधासह घेतले जाते.

१.८ पुनर्नवा (Useful Ayurveda plants):

  • जमिनीलगत पसरणारी हि वनस्पती समुद्रकिनाऱ्याजवळच्या जमिनीत आपोआप उगवते.बी किंवा फांद्या लावून लागवड करता येते.
  • औषधात या पुनर्नावाचे संपूर्ण झाड वापरले जाते.
  • बी लावल्यावर दोन ते तीन वर्षात पुनर्नावाचे झाड पूर्णपणे तयार हहोते.
  • हे झाड मुळासकट काढून घेता येते.
  • उपयोग – मूत्रविकार,यकृत विकार,सूज,वातरोग वगैरेमध्ये पुनर्नवा मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.
  • सुजेवर पुनर्नवा पोटातून तसेच बाहेरून वापरता येतो.
  • पुनर्नवयाचा काढा करून घेता येतो.
  • तसेच पुनर्नवा वाटून,जरा गरम करून सूज आलेल्या जागी लावल्यास सूज कमी होते.

१.९ शतावरी (Useful Ayurveda plants):

  • शतावरीच्या मुळ्या औषधात वापरल्या जातात.
  • पाण्याचा नीट निचरा होनाऱ्या सुपीक जमिनीत शतावरी चांगली वाढते.शतावरीची लागवड कंदापासून वा बियांपासून रोपे तयार केली जाते. पावसाळ्यामध्ये १५ से.मी. अंतर ठेवून रोपे लावली जातात. फळबागांमध्ये आंतरपीक म्हणून शतावरी लावता येते.२० महिन्यांनी कंद काढले असता चांगले उत्पादन मिळते.कंद काढण्यासाठी नोवेंबर -डिसेंबर महिना योग्य समजला जातो.
  • उपयोग – शतावरीच्या (Useful Ayurveda plants) मुळांचा रस लघवी साफ होण्यास उत्तम असतो.
  • लघवी होताना आग होत असल्यास किंवा लाघवी थांबून थांबून होत असल्यास शतावरीचा रस दुधाश घेता येतो.
  • शतावरीचा काढा करून घेणेसुद्धा ताकद वाढविण्यासाठी,बुद्धी-स्मृती व्यवस्थित राहण्यासाठी उपयोगी असते.

१.१० सागरगोटा (Useful Ayurveda plants):

  • सागरगोट्यासारखे दुसरे कोणतेही उत्तम झाड कुंपणासाठी नाही.याला काटे असतात.फळही काटेरी असते.
  • एका फळातून चार-पाच सागरगोट्याच्या बिया निघतात.बियांपासून सागरगोट्याची लागवड करता येते.
  • बिया रात्रभर पाण्यात भिजत घालाव्यात.दुसऱ्या दिवशी कुंपणाच्या जमिनीत चांगले कुजलेले शेणखत मिसळून या बियांची लागवड करावी.साधारणपणे दीड-दोन वर्षात पक्के कुंपण तयार होते.
  • उपयोग – औषधात सागरगोट्याचे बी व पाने वापरली जातात
  • मधुमेह,पोटदुखी,जंत,गर्भाशयाची सूज वगैरे विकारांमध्ये सागरगोट्या चे बी वापरले जातात.
  • लहान मुलांच्या बाळगुटटीत सागरगोटा असतो.
  • वायुने पोट फुगते,दुखते त्यावर सागरगोटा भाजून,आतला मगज काढून,त्यात समभाग काळे मीठ टाकून घेण्याचा उपयोग होतो.
  • सुजेवर सागरगोटा उगाळून लेप लावल्यास सूज कमी होते.

१.११ पिंपळी (Useful Ayurveda plants):

भरपूर पाणी,दमट हवामान या ठिकाणी पिंपळीचे वेल चांगले येते.मोठ्या झाडांवर वेळ चढवता येतात. वेलीच्या काड्यांपासून लागवड करता येते. लावणीपासून १२ महिन्यांनी पिंपळीची फळे तोडता येतात. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पिंपळीची फळे तोडता येतात. तोडलेली फळे योग्य प्रकारे वाळवून औषधात वापरली जातात.

क्षय,दमा,खोकला,अपचन वगैरे विकारात पिंपळी उपयोगी असते.पिंपळीचे चूर्ण मधात मिसळून थोडे थोडे चाटल्याने खोकला,दमा कमी होतो.

https://fityourself.in/तंदुरुस्ती-fitness/

https://ig.me/j/Abaa1lK5byvYth8N