मेडिटेशन म्हणजे काय? Meditation Meaning and useful benefits

ध्यान करणे म्हणजे (Meditation Meaning) हा एक सराव आहे जो हजारो वर्षापासून आपले पूर्वज करत आलेले आहेत. परंतु बऱ्याच लोकांमध्ये ध्यान धारणा करण्यामध्ये काहीतरी चुकीची समजूत असते. बऱ्याच लोकांची अशी समजूत असते कि ध्यान म्हणजे डोंगर किंवा पर्वतावर जावून केलेली तपस्या किंवा साधू लोकांसारखे एका निर्जन ठिकाणी जावून बसने अशा चुकीच्या समजुती असतात. एका पायावर उभे राहून तपस्या करने असे सुद्धा काही लोकांना वाटते परंतु असे काही नाही ध्यान धारणा कोणीही करू शकते. शेकडो अभ्यासातून असे लक्षात आले आहे कि ध्यान केल्याने प्रत्येकाला याचा फायदा होतो. आपण रोज ध्यान करण्याबद्दल विचार करत असतो परंतु आपण हा फक्त विचारच करत राहतो आणि प्रत्यक्षात तसे काही घडत नाही. जेंव्हा तुम्ही ध्यान करत असता म्हणजे (Meditation Meaning) तेव्हा तुमचे विचार बदलतात.

Benefits of Meditation along Meditation meaning

वृद्धत्व कमी करण्यासाठी ध्यान – तुमचे शरीर वेळेच्या आधी वृद्धत्वाची लक्षणे दर्शवत असेल तर ध्यान केल्याने तुमचे शरीर वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करते. ध्यान केल्यामुळे मेंदूचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते आणि परिणामी मेंदूचे आयुष्य सुद्धा वाढते. खूप जास्त काळ जे लोक ध्यान करतात त्या लोकांचा मेंदू हा ध्यान न करणाऱ्या लोकांपेक्षा अधिक निरोगी असतो. मेंदूच्या वजनामध्ये सुद्धा खूप जास्त फरक दिसून येतो. मेंदूचा आकार सुद्धा नियंत्रित झाल्याचे दिसून आले आहे. वय वाढन्यासोबत मेंदूचे जे विकार होत असतात त्या विकारांचा प्रभाव कमी करण्याचे कार्य ध्यान केल्यामुळे होत असते. अधिक कार्यक्षम आणि निरोगी मेंदूसाठी ध्यान करणे (Meditation Meaning) महत्वाचे ठरते.

संरचनात्मक परिवर्तन – ध्यान करणे म्हणजे (Meditation Meaning) मेंदूला कार्यक्षम बनविण्यासोबत प्रत्यक्ष मेंदूचा आकार सुद्धा बदलण्यास ध्यान केल्यामुळे मदत होते. मेंदूमधील हिप्पोकाम्प्स आणि टेम्पोरल हि एक छोटी संरचना असते. या छोट्या संरचनेशिवाय हिप्पोकाम्प्स महत्वपूर्ण मेंदूच्या कार्यामध्ये प्रमुख भूमिका बजावते जसे कि तुमची नवीन गोष्टी शिकण्याची कला आणि स्मृती या गोष्टी सुधारण्यामध्ये महत्वाचे असते. याशिवाय तुम्ही तुमचे स्वतःचे नाव सुद्धा आठवू शकत नाही.

ज्या लोकांचे हिप्पोकाम्प्स मोठे असते ते लोक अधिक कुशल असतात तसेच त्यांची स्मरणशक्ती अधिक चांगली असते. यामधील जे एमिग्डेला असते ते मेंदूचे भावनिक केंद्र असते जे बदाम सारख्या आकाराचे असते. एमिग्डेला हे भीती आणि चिंता अशा भावनांचे नियंत्रण करण्यास मदत करत असते. ध्यान केल्यामुळे तुमच्या मधील नकारात्मकता कमी होण्यास मदत होते त्यासोबत ताणतणाव आणि हानिकारक भावना यापासून सुटका होते. अधिक काळ शयन केल्याने तुमच्या मेंदूचा आकार सुद्धा बदलतो आणि तुमच्या जीवनामध्ये बदल घडू शकतो.

नेटवर्क – तुमचा मेंदू हा विविध प्रकारच्या संदेशानी आणि नेटवर्क नी भरलेला असतो. या काही तांत्रिक संरचना तुमच्या मेंदूच्या अधिकांश भागात पोहोचलेल्या असतात. आणि या तांत्रिक संरचना तुमची स्मरणशक्ती तसेच संज्ञात्मक कार्यांचे नियंत्रण करत असतात. तुमचे मन जेंव्हा भटकत असते तेव्हा या तांत्रिक संरचना तुम्हाला जागरूक करण्यासमदत करतात. जास्त प्रमाणात विचार केल्याने तुमचा मेंदू दुखी आणि अकेंद्रित बनू शकतो. तांत्रिका तुम्हाला तुमच्या वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच तुमच्या भूतकाळात घडणाऱ्या आणि भविष्यात येणाऱ्या चिंता कमी करण्यासाठी प्रोत्साहित करतात. ध्यान करणे (Meditation Meaning) तुमचा मूड चांगला करण्यासाठी फायदेशीर आहे.

Meditation Meaning

शरीरातील दुखणे कमी करण्यास मदत – ध्यान केल्यामुळे (Meditation Meaning) तुमच्या शरीरातील मानसिक तसेच शारीरिक दुखणे अक्मी होण्यास मदत होते. समजा तुम्ही एखादी लांब पायी यात्रा करत असाल आणि तुमच्या पायांमध्ये वेदना होत असतील तर ती वेदना कमी करण्यासाठी तुम्ही काहीतरी उपाय शोधत असता. परंतु अभ्यासानुसार असे लक्षात आले आहे कि ध्यान केल्याने तुमच्या तुमच्या वेदनेशी निगडीत मेंदूमधील तंत्रावर थेट परिणाम होत असतो. कारण वेदना हि तुमच्या मेंदूशी निगडीत प्रक्रिया आहे तुमच्या शरीराला होणारी वेदना हि मेंदूच्या संदेशाद्वारे जाणवत असते आणि नियंत्रित केली जात असते. जेंव्हा तुम्ही तुमचा मेंदू नियंत्रित करत असता तेव्हा तुमची वेदना सुद्धा अपोआपच नियंत्रित होत असते.

तुमची तल्लीन होण्याची स्थिती – तुम्ही तुमच्या कामामध्ये इतके तल्लीन असता कि तुम्ही बाहेरचे जग विसरून जात असता अशा मनस्थितीला विविध नावाने ओळखले जाते. काही परिस्थितीत तुम्ही विशिष्ट गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. ध्यान केल्यामुळे तुम्ही स्वतःला कोणत्याही वातावरणात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रेरित करू शकता. यामुळे तुमची विशिष्ट कार्याकडे लक्ष केंद्रित करण्याची शक्ती वाढण्यास मदत होते. यासोबत नेहमी आनंदी राहण्यास फायदा होतो.

आनंदी राहणे – ध्यान केल्याने तुम्ही विचार करता त्यापेक्षा अधिक आनंदी राहता. तुमच्या मूड मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होते.तुमची जीवनशैली सुधारण्यासाठी सुद्धा ध्यान केल्याचा (Meditation Meaning) फायदा होतो.

https://fityourself.in/healthy-tips-to-wake-up-early-in-the-morning/

https://linktr.ee/thebareminimum.medic?fbclid=PAZXh0bgNhZW0CMTEAAaZpNqXRO-2H-7N-2Zs55rjSACj-fWB38uFNaxkdAd1QRx7DEdZF7eveLjQ_aem_bxUp2Ufd4TQ68dnJUsQ8DA