पित्त अन्ननलिकेत येण्यामुळे (Acid Reflux )अनेक अडचणी निर्माण होतात. गळ्यामध्ये काही अडकल्यासारखे वाटते किंवा खोकला येतो तसेच काही तरल पदार्थ घशात येतात. या सर्व गोष्टी आपल्या पोटातील निर्माण होणाऱ्या पित्तामुळे होत असतात. पित्त नैसर्गिकरीत्या शरीरात तयार होत असते परंतु काही व्यक्तींना प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात पित्ताचा त्रास होत असतो याचे कारण आहार सुद्धा असू शकतो जसे कि काही जणांना तेलकट, आंबट, मसालेदार पदार्थ खाण्याने पित्ताचा त्रास होतो. प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात खाण्याने अपचन होऊन पित्त तयार होते यामुळे वाढलेले पित्त अन्ननलिकेत येते आणि त्रास होतो. यासाठी आपण काही पदार्थ पाहणार आहोत ज्यामुळे आपल्याला आराम मिळू शकतो.
![](https://fityourself.in/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Image-2024-11-24-at-22.55.00-1024x669.jpeg)
Foods for lower the Acid Reflux
(Acid Reflux Food 1) केळी – केळी हि विज्ञानानुसार पित्तविरोधी पदार्थ म्हणून ओळखले जातात. केळीमध्ये Potassium असते जे आपल्या शरीरातील Ph ची पातळी नियंत्रित करते आणि पित्ताला निष्क्रिय करते. केळी पोटाची सुरक्षा करणाऱ्या चिकट द्रवाला अधिक घट्ट बनविते ज्यामुळे पित्ताची होणारी जळजळ थांबविली जावू शकते. केळीमध्ये प्रीबायोटिक फायबर असते जे सूजविरोधी आणि आतड्यामधील जंतुना पोषण देणारे असतात. केळीमध्ये असणारे प्रोतीज हे पोटातील पित्ताच्या उत्पादनास कमी करत असतात. केळी हि निवडताना पिकलेली असावीत परंतु जास्त प्रमाणात काळे डाग असलेली केळी हि अधिक पिकल्यामुळे त्यांच्यामध्ये अधिक प्रमाणात पित्तविरोधी गुण असतात.
घ्यावयाची काळजी – जर तुम्हाला किडनीचे विकार असतील किंवा डायलिसीस इत्यादी समस्या असतील तर तुम्हाला Potassium चे प्रमाण नियंत्रित ठेवायला हवे.
(Acid Reflux Food 2) ओट्स – दिवसाच्या सुरुवातीला ओट्स खाणे हे उपाशीपोटी खाल्याने तुमच्या पोटातील पित्त वरच्या दिशेने म्हणजे अन्ननलीकेच्या दिशेने येण्यापासून वाचवू शकते. कारण ओट्स मध्ये शोषित होणारे फायबर असतात आणि ते पोटातील पित्त वरच्या दिशेने वहन होण्यापासून रोखतात. शोषित होणाऱ्या फायबर मुळे तुम्हाला नियमित मल होण्यास मदत होते. रात्री ओट्स खाण्याने रात्री पोटास अतिरिक्त वेळ मिळत असतो. तसेच ओट्स आपल्या जठराची सूज कमी करण्यास सुद्धा मदत करते.
घ्यावयाची काळजी – जर तुम्हाला पचनाचे विकार असतील किंवा सिलीआक सारखे विकार असतील तर हे टाळावे कारण यामध्ये ग्लुटेन असते.
(Acid Reflux Food 3) प्रोबायोटिक पदार्थ – दही, ताक यांसारखे पदार्थ खाल्याने खूप फायदा होतो कारण यामध्ये आतड्यातील जंतूंचे आरोग्य सुधारते. असे पदार्थ खाल्याने पित्ताचे वहन होण्यास प्रतिबंध होतो, पचनास मदत होते. प्रोबायोटिक आपल्या शरीरातील पचनाच्या समस्या ५२ % पर्यंत कमी करतात.
(Acid Reflux Food 4) कलिंगड किंवा टरबूज – पित्ताच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी हे उत्कृष्ट पदार्थ आहेत कारण कलिंगड आणि टरबूज मध्ये पाण्याचे भरपूर प्रमाण असते. Magnesium आणि Potassium यांचा उच्च स्त्रोत असल्याने हे पित्त कमी करण्यासाठी अतिशय चांगले असतात. कलिंगड आणि टरबूज मध्ये विटामिन सी, बीटा केरोटीन आणि लायकोपीन सारखे घटक असतात जे पित्त कमी करण्यास मदत करतात. जेवणाच्या आधी २०० मिली टरबूज किंवा कलिंगड चा रस प्यायल्याने पित्त कमी करण्यास मदत होते.
घ्यावयाची काळजी – काही लोकांना टरबूज आणि कलिंगड खाल्याने पोटाच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे याविषयी काळजी घ्यायला हवी.
![Acid Reflux](https://fityourself.in/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Image-2024-11-24-at-22.55.07-1-2-1024x714.jpeg)
(Acid Reflux Food 5) हिरवी पाने असलेल्या भाज्या – पालक, मेथी, अलुगुरा आणि इतर काही भाज्यांमध्ये पित्त उदासीन करण्याचे गुणधर्म असतात. पित्त अन्ननलिकेत परत जाण्याच्या क्रियेमध्ये बचावासाठी भाज्या अतिशय महत्वाच्या असतात. भाज्यांमध्ये फायबर सुद्धा भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या पोटातील पीत वाढण्यापासून रोखतात. आपल्या दुपारच्या जेवणात तसेच रात्रीच्या जेवणात सुद्धा सलाड मध्ये तुम्ही भाज्यांचा वापर करू शकता. कच्या भाज्या पचनासाठी कठीण असतात त्यामुळे तुम्ही या भाज्या शिजवून किंवा भाजून खाऊ शकता.
घ्यावयाची काळजी – काही भाज्यांमध्ये विटामिन के अधिक प्रमाणात असते म्हणून ज्या लोकांना याची समस्या असते त्यांनी काळजीपूर्वक यांचा वापर केला पाहिजे.
(Acid Reflux Food 6) बटाटा – बटाटा शिजवून किंवा भाजून खाल्ला जावू शकतो. बटाटा मध्ये क्षार, विटामिन सी, फायटोकेमिकल्स, स्टार्च असतात जे आपल्या पोटातील अतिरिक्त पित्त निष्क्रिय करतात. पोटातील चिकट पदार्थ तयार करण्यास सुद्धा मदत करते. दहीसोबत बटाटा एक चांगले मिश्रण ठरते.
![](https://fityourself.in/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Image-2024-11-24-at-22.55.07-2-776x1024.jpeg)
(Acid Reflux Food 7) आले – आले कित्येक पद्धतीने आपल्या शरीरात पित्त पोटातून अन्ननलिकेत येण्यापासून रोखते. आले अन्ननलिकेत सूज येण्यापासून सुद्धा रोखते. पित्त उलट दिशेने येणे रोखण्यासाठी गती वाढविते आणि पित्ताचे उत्पादन रोखण्यास मदत करते. दररोज ५ ग्राम आले खाण्याने पोटाचे अल्सर होण्याचे प्रमाण सुद्धा कमी होते आणि पित्ताचा स्त्राव ५० % कमी होतो. आले अपचनाच्या समस्या कमी करण्यास मदत करते. आल्याचा चहा, आल्याची गोळी किंवा आले चावून खाल्याने खूप फायदा होतो.
घ्यावयाची काळजी – उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी रक्त पातळ होण्याची औषधे घेत असतील तर आल्याचे सेवन अधिक प्रमाणात करणे टाळावे.