खूप जास्तकाळ एका जागी बसणे टाळा | Avoid Too much sitting

आपण ज्या जागी जास्त बसत (Too much sitting) असतो ते आपल्याला आरामापेक्षा अधिक त्रासदायक ठरू शकते. जसे कि आपण खुर्चीवर बसत असतो तर ते आपल्यासाठी खूप काही चांगले ठरत नाही. विज्ञानानुसार हे सिद्ध झाले आहे कि तुमची बैठी जीवनशैली (Too much sitting) आणि कोणतीही हालचाल न करण्याची सवय हि समस्या बनू शकते. खूप जास्त काळ एका जागी बसून राहणे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. आपण काही अशा यंत्रणा पाहूया ज्यामुळे आपल्या शारीरिक स्थितीवर परिणाम होतो. अशा काही यंत्रणा आहेत ज्या आपल्याला टिकून राहण्यासाठी मदत करत असतात. शारीरिक व्यायाम न केल्याने व शरीराची कोणतीही हालचाल न झाल्याने (Too much sitting) या यंत्रणांना नुकसान पोहोचते. शरीराची हालचाल न झाल्याने होणारे नुकसान म्हणजे विविध प्रकारचे आजार आपल्याला जडत असतात.

Too much sitting

Impact of Too much sitting on Body System

पहिली यंत्रणा जी आहे त्यामध्ये आपल्या मासपेशी, हाडे, त्वचेच्या आतील थर हे सर्व समाविष्ट असते. वाढत्या वयानुसार आपल्या मासपेशी, हाडांची गुणवत्ता आणि त्यांचा आकार हळूहळू कमी व्हायला लागते हि एक सामान्य गोष्ट आहे परंतु हि स्थिती शारीरिक दुखापत किंवा हालचाल न झाल्याने सुद्धा होवू शकते जेंव्हा आपण मासपेशी आणि हाडे यांचा वापर करत नाही तेव्हा हे खराब व्हायला सुरुवात होते आणि ते व्यवस्थित कार्य करू शकत नाहीत. मासपेशींचा वापर न केल्याने त्यांचे वजन कमी होते. छोटीशी दुखापत किंवा मोठी दुखापत झाली तर ते बरे होण्यास बराच कालावधी लागत असतो किंवा तो स्नायू व्यवस्थित बरा होवू शकत नाही.

बराच काळ एका जागी बसून (Too much sitting) काम करण्यामुळे किंवा हालचाल न करण्यामुळे मानेचे दुखणे, पाठीचे दुखणे अशा व्याधी जडण्याची संभावना असते. दिवसाला फक्त ३० मिनिटे व्यायाम केल्याने किंवा हालचाल केल्याने तुम्ही तुमच्या मासपेशी आणि हाडांची गुणवत्ता आणि आकार नियंत्रित ठेवू शकता. हे फक्त आपल्या मासपेशी आणि हाडांसाठी नाही तर याचे आणखी काही तोटे आहेत.

तुमची बैठी जीवनशैली (Too much sitting) आणि कमी हालचाल ह्र्दय विकारास सुद्धा आमंत्रण देवू शकते आणि ह्र्दय हे आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. एका अभ्यासानुसार असे सांगण्यात आले आहे कि तुमची शारीरिक हालचाल जितकी जास्त असेल तितके तुमच्या शरीरासाठी ८ ते १० वर्षातील ह्र्दय विकार कमी करण्यास मदत करते. म्हणजेच तुमचे आयुष्य ८ ते १० वर्षांनी वाढण्यास मदत होते.

आपले ह्र्दय हे सुद्धा एक मासपेशी आहे जर तुम्ही हालचाल केली नाही (Too much sitting) तर ह्रदयाचे वजन आणि आकार सुद्धा कमी होवू शकतो. विशेषतः ह्रदयाचे जे डावे अलिंद असते ज्यामध्ये ऑक्सिजन ने समृद्ध रक्ताचा पुरवठा केला जातो आणि पूर्ण शरीरामध्ये रक्त पुरवठा केले जाते आणि हालचाल कमी असल्यामुळे आपले ह्र्दय आवश्यक त्या प्रमाणात शरीराला रक्ताचा पुरवठा करू शकत नाही आणि मेंदूसारख्या महत्वाच्या अवयवांना सुरळीत रक्तपुरवठा केला जात नाही. आपण जेंव्हा शरीर्रिक हालचाल करत नाही तेव्हा शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रोलची पातळी देखील कमी होते आणि हे आपल्या ह्र्द्यासाठी खूप वाईट गोष्ट आहे कारण ह्रदयाच्या विकारापासून दूर राहण्यासाठी आपल्याला चांगल्या कोलेस्ट्रोलची आवश्यकता असते. यासाठी तुम्ही चालणे, धावणे, नाचणे, पोहणे असे सोपे व्यायाम करून सुद्धा खूप चांगले परिणाम दिसू शकतात.

श्वाशोश्वास यंत्रणा – जसे नियमित व्यायामाने आपले स्नायू आणि मासपेशी मजबूत राहतात तसेच व्यायाम केल्याने आपली फुफ्फुसे सुद्धा मजबूत राहतात. जेंव्हा आपण अधिक सक्रीय नसतो तेव्हा आपल्या फुफ्फुसाची क्षमता कमी होते आणि हवेची अदलाबदली जशी हवी तशी होत नाही. आपण जर व्यवस्थित श्वास घेऊ शकत नसू तर आपल्या शरीरात रक्ताचा पुरवठा सुद्धा सुरळीत होणार नाही. जे लोक जास्त काळ हालचाल (Too much sitting) न करता राहतात त्या लोकांचे वजन वाढते आणि शरीरातील चरबीचे प्रमाण सुद्धा वाढते, लठ्ठपणा वाढतो. याच कारणामुळे फुफ्फुसे चांगल्या प्रकारे फुलणार नाहीत यामुळे व्यायाम हा उत्तम श्वासाच्या यंत्रणेसाठी महत्वाची आहे.

पचनक्रिया – आपल्या शरीराचे आरोग्य राखण्यासाठी अन्नाच्या पचनातून ऊर्जा मिळत असते. परंतु जर आपली पचनक्रिया सुरळीत कार्य करत नसेल तर खाल्लेले अन्न पचणार नाही आणि शरीराला ऊर्जा मिळणार नाही. व्यायाम न केल्याने (Too much sitting) पचनसंस्थेवर दोन प्रकारे दुष्परिणाम होत असतात. पहिला म्हणजे रक्ताचे पचन संस्थेच्या मार्गातील वहन म्हणजेच नियमित व्यायाम केल्याने रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि अधिक चांगल्या रीतीने रक्त शरीरातील विविध भागांना पोहोचविले जाते. आपली हालचाल कमी प्रमाणात झाल्याने रक्तप्रवाहात अडथला येतो आपला पचनाचा मार्ग हा मासपेशींनी बनलेला असतो आणि मासपेशी वाढण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. हालचाल न करण्याने (Too much sitting) मासपेशीमध्ये अडथळा येवून त्यामुळे अन्न सहजपणे जाण्यास शक्य होत नाही आणी यामुळे खूप प्रकारचे पचनाचे विकार होवू शकतात.

मंद चयापचय – चयापचय हि अशी नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये आपले शरीर खाल्लेल्या अन्नाचे उर्जेत रुपांतर करते. शरीरातील चयापचय क्रिया तेव्हा वाढते जेंव्हा आपले शरीर जास्त प्रमाणात कॅलरी जाळत असते. ज्या लोकांच्या शरीरात जास्त प्रमाणात मासपेशी आणि स्नायू असतात ते लोक जास्त प्रमाणात कॅलरी जाळू शकतात. शरीरात अधिक अधिक स्नायू आणि मासपेशी तेव्हा तयार होतात जेंव्हा जास्त व्यायाम केला जातो. जास्त काळ व्यायाम किंवा हालचाल न केल्याने शरीरातील एसिड उलट्या दिशेने सुद्धा शरीरात जावू शकतात यामुळे ह्रदयाची जळजळ, अपचन अशा समस्या निर्माण होवू शकतात. अधिक प्रमाणांत व्यायामाने खूप काही समस्या कमी होवू शकतात. बद्धकोष्टता, डायरिया, अपचन अशा प्रकारच्या समस्या किंवा अधिक तीव्र समस्या निर्माण होवू शकतात. आपल्या आतड्यांचे आरोग्य सुद्धा चांगले राहण्यास मदत होते.

मेंदूचे आरोग्य – नियमित व्यायाम न केल्याने (Too much sitting )आपल्या मेंदूमधील कार्यामध्ये बिघाड होवू शकतो. जर आपण बटाटा बरेच दिवस तसाच ठेवला तर त्यावर कोंब येण्यास सुरुवात होतात. एका अभ्यासानुसार असे लक्षात आले आहे कि बरेच दिवस व्यायाम न केल्यास आपल्या मेंदूमध्ये शाखा निर्माण होण्यास सुरुवात होते आणि या शाखा निर्माण झाल्यामुळे अशी यंत्रणा जी तणावाच्या परिस्थितीत कार्य करते ती अचानक अधिक सक्रीय होते.

आपल्या शरीरात कोणत्याही ताणतणावाशिवाय तंवाची परिस्थिती निर्माण होते आणि या तणावामुळे रक्तदाब, ह्रदयाचे विकार या समस्या निर्माण होवू शकतात. दुसरे कारण असे आहे कि मेंदूशी निगडीत आजार कारण बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे कि व्यायाम फक्त शरीरयष्टी चांगली बनविण्यासाठी केला जातो परंतु असे नाही कारण आपण व्यायाम करत आहात कि नाही याचा परिणाम आपल्या विचार करण्याच्या आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो यामुळे मेंदूचे विकार होण्याची शक्यता निर्माण होते. हालचाल न करणारी जीवनशैली (Too much sitting) अशा आजारांना आणखी निमंत्रण देते. म्हणून अशा समस्यांपासून दूर राहण्यासाठी व्यायाम मदत करू शकतो यामुळे आपली नवीन विचार करण्याची क्षमता नवीन कौशल्य शिकण्याची कला अवगत होईल, मेंदूची स्मरणशक्ती वाढेल.

वागण्यातील बदल आणि दुखणे सहन करण्याची क्षमता – एका जागी जास्त वेळ बसल्याने (Too much sitting) तणाव आणि चिंता वाढते. व्यायाम केल्याने एक अनुभव येतो कि एका जागी नसून असलेल्या लोकांची दुखणे सहन करण्याची शक्ती हि व्यायाम करणाऱ्या लोकांपेक्षा कमी असते. म्हणजे आपल्या शरीरात जास्तीत जास्त आपण किती प्रमाणात दुखेन सहन करू शकतो याची क्षमता या लोकांमध्ये कमी असते. जर हि क्षमता शरीरात कमी झाल्यास अशा लोकांना मायग्रेन, अर्थ्रायटीस , पाठीचे दुखणे, मानेचे दुखणे अशा समस्या निर्माण होतात. नियमित व्यायाम केल्याने आपल्या मेंदूला पुन्हा सुरळीत चालण्यासाठी ताणतणाव यासारखी परिस्थिती यापासून दूर ठेवण्यासाठी आणि जास्त रोधक बनविण्यासाठी मदत होते. आपण पाहिल्यानुसार जर आपण नियमित व्यायाम केला नाही तर आपल्या शरीरातील यंत्रणा योग्य प्रकारे कार्य करू शकत नाहीआणि आपण विविध आजारांनी ग्रस्त होतो.

सर्वात मोठा आणि महत्वाचा परिणाम हा आपल्या रोगप्रतिकारक शक्ती वर होत असतो – आपली प्रतिकारशक्ती अशी आहे कि हि औषधांच्या आधी स्वतः विविध संसर्गापासून लढण्याचा प्रयत्न करते. परंतु शारीरिक दृष्ट्या हालचाल न केल्याने ते रोगप्रतिकारक शक्ती आणि शरीर या दोन्हींसाठी धोकादायक ठरू शकते. याची दोन मुख्य कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे प्रतिकारक शक्ती मध्ये टी सेल्स म्हणून पांढऱ्या पेशी असतात ज्यांचे कार्य असते कि शरीरातील संसर्गापासून लढणे आणि रोगांना दूर ठेवणे परंतु जर हे हालचाल न होण्यामुळे वाढण्याचे बंद झाले तर वाढत्या वयानुसार पूर्ण रोग प्रतिकार शक्ती कोसळण्याची शक्यता असते.

दुसरा दुष्परिणाम असा हे कि आपली प्रतिकार शक्ती इतकी नाजुक होते कि कोणताही संसर्ग आपल्याला होवू शकतो तसेच सूज येऊ शकते. यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची दुखापत किंवा संसर्ग झाल्यास त्यापासून बरे होण्यास खूप कालावधी लागू शकतो.

एकदा आपली प्रतिकारशक्ती कमजोर झाली तर आपले शरीर तर्हेतर्हेच्या आजारांचे घर बनते. व्यायामाच्या कमतरतेमुळे ह्रदयविकार, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रोल पातळी, मधुमेह प्रकार -२ ,लठ्ठपणा आणि जीवनशैली मधील रोगांचा धोका वाढतो. अनेक लोकांना व्यायाम करण्यास वेळ मिळत नाही परंतु व्यायाम केल्याने आपण आपल्या रोगप्रतिकारशक्तीला आणि शरीरातील उर्जेला वाढवत असतो कि आपली जीवनशैली उच्च प्रतीची होते. एक निरोगी शरीर, निरोगी ह्र्दय, निरोगी फुफ्फुसे तेव्हाच बनतील जेंव्हा आपण आपल्या शरीराला त्याच्या नैसर्गिक पद्धतीने वापरायला शिकू.

https://fityourself.in/struggle-to-lose-belly-fat-fast-in-marathi/

https://fit.sushildhanawde.com/marathiworkshop?fbclid=PAZXh0bgNhZW0CMTEAAaYJr1-jJ0wlq_PXFpUmRVDPYIfNEZAOBOfq50Bk8fhsCNa2dtE8Vjo7oQ0_aem_e48A-THRbXBvpa85rGk4ww