पायी चालणे (Benefit of Walking) हि एक अशी गोष्ट आहे जी आपण दैनंदिन करत असतो. परंतु जास्त लोक चालण्याचा उपयोग हा वजन कमी करणे किंवा शरीरातील चरबी जाळणे आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी करतात आणि चालण्याला वेगळ्या प्रकारे पाहत नाहीत. आपम सुद्धा असाच विचार करत असतो कि एका परीभाषेनुसार बागेत फिरणे म्हणजे एक अशी गोष्ट आहे कि जी आपल्याला सोपी वाटते परंतु काही लोक वजन कमी करण्यासाठी धावतात आणि मशीन वर सुद्धा घाम गळताना दिसतात. पण फरक हा आहे कि सतत आणि दैनंदिन धावत असतात. म्हणून आपल्या पाहण्यामध्ये आणि प्रत्यक्षात प्रयत्न करण्यात फरक असतो.
एक गोष्ट खरी आहे कि आपण सध्या कोणत्याही प्रकारचा व्यायाम करत नाही किंवा तुम्हाला व्यायाम करण्याची प्रेरणा मिळत नाही. बरेच लोक चालण्याला तितकेसे महत्व देत नाहीत. तर आपण पाहूया कि व्यायामाचा आणि चालण्याचा आपल्या शरीरावर कसा प्रभाव पडतो.जर तुम्ही दैनंदिन ३० मिनिटे चालत (Benefit of Walking) असाल तर तुम्हाला विश्वास बसणार नाही कि त्याचे फायदे किती आहेत. कारण चालणे हा व्यायाम खूप सोपा आहे आणि धावण्याच्या तुलनेत अगदी सहज करता येणारा आहे. परंतु चालण्याला एका एरोबिक व्यायाम मानला जातो कारण तो एक मध्यम प्रकारचा एरोबिक व्यायाम आहे. तुम्ही कसे चालता हे महत्वाचे नाही कारण तुम्ही ज्या ज्या प्रकारे चालत असता तेव्हा तुम्ही शरीरातील कॅलरीज जाळत असता. त्याचप्रमाणे आपण चांगला आहार घ्यायला हवा जेणेकरून तुम्हाला अधिक उत्साहाने चालता येईल.
![](https://fityourself.in/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Image-2024-11-03-at-19.17.04-2-963x1024.jpeg)
Benefit of Walking in weight loss
तुम्ही जर चालण्यासोबत योग्य व्यायाम केला नाही तर तुम्हाला चालण्याने वजन कमी करणे शक्य होणार नाही. कारण आहाराचे महत्व व्यायामाच्या तुलनेत ८० % इतके आहे. तुम्ही जर नियमित चांगला व्यायाम आणि चांगला आहार घेत असाल तर तुमचे वजन कमी होण्यास खूप मदत होते. म्हणजे व्यायामाच्या तुलनेत योग्य आहार घेतल्याने आपल्या कॅलरीज जाळण्यास अधिक मदत होते. आहार आणि व्यायाम हे दोन्ही आपल्याला समप्रमाणात केले पाहिजेत. दैनंदिन चालणे तुम्हाला योग्य दिशेने घेवून जावू शकते. तुम्ही जर दिवसाला ३० मिनिटे चालत (Benefit of Walking) असाल तर १५० ते २०० कॅलरी जाळू शकता. त्याच वेगाने तुम्ही १ तास चालत असाल तर ४०० पर्यंत कॅलरी तुम्ही जाळू शकता. दैनदिन इतक्या कॅलरी जाळल्याने तुमच्या आरोग्यामध्ये खूप चांगला सुधार येऊ शकतो.
शरीरातील रक्तदाब आणि कोलेस्ट्रोल यांच्या पातळीमध्ये सुधार येऊ शकतो. कारण यासोबत आपले वजन आणि पोटाची चरबी सुद्धा कमी होणार असते. तसेच शरीराच्या संरचनेत सुद्धा सुधार होतो. तुम्ही जर सामान्य गतीने १००० जास्त पाऊले टाकत असाल तर आणि १० मिनिटे अधिक चालत असाल तर तुमच्या शरीरातील १ ते १.५ % शरीरातील चरबी कमी होणाय्स मदत होते. संशोधनानुसार असे लक्षात आले आहे कि चालण्याने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते त्याचसोबत इन्सुलिन प्रतिरोधकता मध्ये सुधार येण्यास मदत होते याचसोबत जर तुम्ही शरीर मजबुतीचे काही व्यायाम करत असाल तर ते अधिक फायदेशीर ठरते.
तीव्र गतीने केल्या जाणाऱ्या क्रीयांपेक्षा कमी गतीने केल्या जाणाऱ्या क्रियांमध्ये जास्त फायदे होत असल्याचे दिसून आले आहे. अधिक वेगाने जे तुम्ही क्रिया करत असता त्या १५ मिनिटांचा परिणाम तुम्ही ४५ मिनिटांच्या किंवा १ तासाच्या हळुवार गतीने केल्या जाणाऱ्या क्रियांमध्ये मिळवू शकता. चालण्याने (Benefit of Walking) तुम्ही तणावापासून सुद्धा आराम मिळवू शकता. सध्याच्या परिस्थितीत लोक जास्त प्रमाणात एकाच जागी बसून असलेले दिसून येतात. काही लोक आपल्या वयामुळे काही होण्याच्या कारणाने एकाच जागी असलेले आढळतात आणि व्यायाम करण्यापासून वंचित राहतात. चालण्याने तुम्हाला दुखापत होण्याची संभावना ५० % नी धावण्यापेक्षा कमी होते. कारण धावण्यामध्ये जमिनीची उच्च प्रतिक्रिया बल तयार होते. ज्याचा सरळ अर्थ असा आहे कि धावण्याने आपल्या सांध्यांवर अधिक तणाव निर्माण होतो आणि ज्यावेळी तुमचे पाय जमिनीवर आदळतात त्यावेळी प्रतिक्रिया बल वाढते.
Benefit of Walking and Running
चालण्याने धावण्यापेक्षा प्रतिक्रिया बल कमी असते त्यामुळे चालण्याने आपल्याला फायदा (Benefit of Walking) होतो. चालणे हे जे लोक सुरुवात करू इच्छितात त्यांच्यासाठी चांगले आहे. तसेच जास्त तीव्रता असलेले प्रशिक्षण घेतल्याने केंद्रीय तंत्रीकाना धक्का बसण्याचा संभव असतो. आणि तुम्ही दुसऱ्यावेळी व्यायाम करण्यासाठी थकवा जाणवू शकतो. जेंव्हा तुम्ही स्वतःला जास्त तीव्रतेच्या व्यायामासाठी तयार करता तेव्हा असे प्रशिक्षण तुमच्या कॅलरी जाळण्यासाठी उपयोगी ठरतात. म्हणून थोड्या थोड्या वेळाने व्यायाम करायला हवा. कोणताही ताण असणाऱ्या व्यायामापेक्षा चालणे हे अधिक चांगले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे सर्व करत असताना तुम्हाला तुमचा आहार बदलावयाचा नाही कारण नियंत्रित आहार घेणे आवश्यक आहे. आणि सर्वात कठीण गोष्ट हि आहे कि तुमचा आहार समान ठेवणे.
दिवसाला ८० मिनिटे सामान्य गतीने किंवा ४० मिनिटे तीव्र गतीने धावणे हे समान आहे परंतु यामध्ये तुमची ऊर्जा जास्त लागणार आहे आणि यामुळे कॅलरीज अधिक प्रमाणात जळणार आहेत. अशा प्रकारे व्यायाम केल्यास तुम्हाला उच्च रक्तदाब, मधुमेह प्रकार २, ह्रदयाचा झटका रोखला जातो. १४ वर्षांच्या कालावधीत पुरुष आणि महिला एका अभ्यासानुसार असे लक्षात अआले आहे कि प्रती आठवड्याला केवळ १५० मिनिटे चालण्यामुळे (Benefit of Walking) सर्व प्रकारचे रोग कमी होण्यास मदत होते तसेच यामुळे मृत्युदर हा ३१ % नी कमी झाल्याचे दिसून आले आहे. जे कित्येक लोकांना प्रेरित करण्यास उपयोगी ठरत आहे. जे लोक व्यायामापासून घाबरतात त्यांच्यासाठी हे प्रेरणादायी ठरते. तसेच सर्व कारणामुळे होणारे मृत्यू हे ३९ % नी कमी झालेले दिसून आले आहे.
![Benefit of Walking](https://fityourself.in/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Image-2024-11-03-at-19.17.04-1-1024x939.jpeg)
प्रतिदिन १०००० पाऊले चालण्याने आपल्या ह्रदयाचा धोका २१ % नी कमी झाल्याचे दिसून आले आहे. तसेच यामुळे होणारा मृत्युदर हा ३९ % नी कमी झाल्याचे दिसून आले आहे. हे फक्त भ्रामक नाही तर सत्य आहे. यासाठी फक्त चालण्यासाठी प्रेरणा असणे आवश्यक आहे. दररोज १०००० पाऊले चालण्याने (Benefit of Walking) आपल्या मेंदूला चालना मिळते. जेंव्हा तुम्ही चालत असता तेव्हा तुमच्या ह्रदयाचे ठोके वाढतात आणि रक्तदाब सुद्धा वाढतो रक्तदाब वाढल्याने अतिरिक्त रक्त हे ऑक्सिजन आणि पोषक तत्व आणते. तसेच मेंदूमध्ये एक विशेष प्रोटीन असते ज्याचा स्त्राव होत असतो आणि ते मेंदू मध्ये उत्पन्न होत असते. हे प्रोटीन न्युरोंस बनविण्यास मदत करतात. तसेच स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करतात.
चालण्यामुळे (Benefit of Walking) आपला ताण तणाव कमी होतो आणि मूड चांगला होतो. आपले शरीर हालचाल झाल्याने शरीरातून इंदोर्फीन बाहेर पडते. आणि हा हार्मोन सुखद आरामदायक अनुभव देवू शकतो. तय्च्सोबत चालण्याने सेरोटोनीन आणि डोपामाईन यांसारखे रसायने यांचा स्त्राव वाढतो. यामुळे भावनिक संतुलन वाढते, दररोज चालण्याने केवळ शरीराला लाभ होत नाही तर नैसर्गिकपणे सकारात्मक आणि शांत वाटते. जेंव्हा तुम्ही चालत असता तेव्हा तुमचे ह्र्दय, रक्तदाब आणि रक्ताचा संचार सर्व वाढतात. प्रत्येक पाऊलासोबत तुमच्या रक्तवाहिन्या आकुंचन आणि प्रसारण पावत असतात आणि त्यांना लवचिक ठेवण्यास मदत करतात ज्यामुळे ह्रदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
नियमित चालण्याने तुमची कोलेस्ट्रोल ची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते ज्यामुळे आपल्या धमण्या साफ राखण्यास मदत होते. चालण्यामुळे शरीरातील कोर्टीसोल ची पातळी कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे दिवसभर तुमचा आराम होतो.
शरीराचे तापमान कमी करण्यास आणि नियंत्रित करण्यास मदत होते त्याचबरोबर चालण्याने शांतता मिळते. चालण्याने शरीराला संदेश जातात कि शरीर थकल्याने त्याला झोपेची आवश्यकता असते.
![](https://fityourself.in/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Image-2024-11-03-at-19.17.04-1024x853.jpeg)
जेवणानंतर चालण्याने (Benefit of Walking) पचन तंत्र सुधारते आणि पचनक्रिया सुरळीत राखण्यास मदत होते. नियमित चालण्याने पोटाचे स्नायू हालचाल होते बद्धकोष्टतेचा त्रास कमी होतो.
दिवसाला १०००० पाऊले कशी पूर्ण कराल – हे लक्ष्य जरी खूप जास्त वाटत असले तरी तुम्ही ते लक्ष्य अगदी सहज पूर्ण करू शकता. काही तंत्र वापरून आणि युक्ती वापरून तुम्ही दैनंदिन हे तुम्ही पूर्ण करू शकता.
सुरुवातीला तुम्ही छोटे लक्ष आणि कमी पाऊले ठेवून सुरुवात करू शकता. तुम्ही सुरुवातीलाच १०००० पाऊले चालण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही दिवसेंदिवस पाऊले वाढवत जा आणि प्रत्येक आठवड्याला १००० पाऊले वाढवा. जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष्य साध्य करत नाही तोपर्यंत असे करत राहा. यासाठी तुम्ही थोड्या थोड्या अवधीने विश्रांती घ्या आणि पुन्हा चालण्यास सुरुवात करा. दर तासाला ५ ते १० मिनिटे चालण्याने तुमच्या पाऊलांची संख्या वाढेल.
जेंव्हा तुम्ही मोबाईल फोनवर बोलत असता त्यावेळी त्याचा वापर तुम्ही चालण्यासाठी (Benefit of Walking) करा. नंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल कि तुच्म्ही इतकी पाऊले पूर्ण झाली.
तुमचे वाहन दूर उभे करा – तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचे असेल तर वाहनाचा कमीत कमी वापर करा ज्यामुळे तुमची दैनंदिन पाऊले वाढतील. लिफ्ट ऐवजी नेहमी जिन्याचा वापर करा हा तुमच्या पायांसाठी उत्तम व्यायाम असेल.
तुमच्या जवळच्या ठिकाणी पायी चालत (Benefit of Walking) जाण्याचा प्रयत्न करा. जेवल्यानंतर चालायला जा. तुमची पाऊले मोजण्यासाठी यंत्राचा वापर करा. तुमच्या सोबत चालण्यासाठी जोडीदार सोबतीला घ्या. असे केल्याने तुमची १०००० पाऊले लवकर पूर्ण होतील.