Benefits of Turmeric for Healthy Body

हळद हि प्रत्येक घरातील मसाल्यांच्या स्वरूपात वापरला जाणारी वस्तू आहे. हळद ही सर्वगुणसंपन्न (Benefits of Turmeric) आहे आणि सर्वत्र उपयोगात येणारी आहे. हळद हि आल्यासारखी असते परंतु ती वाळवून तिची पावडर केली जाते. हळद ओली सुद्धा फायदेशीर असते तसेच कोरडी सुद्धा. हळदीमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असतात. जमिनीच्या खाली उगवीनाऱ्या हळदीचे उत्पादन सर्वत्र होत असते. तुमच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वपूर्ण असणारा पदार्थ म्हणजे हळद आहे.१०० ग्राम हळदीमध्य ३०० ते ३५० इतक्या कॅलरी असतात. हळदीमध्ये फायबर सुद्धा असते.

Benefits of Turmeric

हळदीमध्ये antioxidant भरपूर प्रमाणात असतात जे तुम्हाला वृद्धत्व येण्यापासून रोखतात. हळद ह्रदयरोग, मधुमेह, हाडांचे विकार या सर्वांमध्ये फायदेशीर (Benefits of Turmeric) असते.

सूज विरोधी म्हणून हळद कार्य करत असते तसेच दुखण्याचे विकार जसे कि गुडघेदुखी किंवा तुमच्या शरीरातील सूज किंवा दुखणे कमी करण्याचे कार्य हळद करत असते.

यकृतातून विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे कार्य हळद करत असते.

मेंदूचे आरोग्य आणि त्वचेच्या समस्या यामध्ये सुद्धा हळद अतिशय गुणकारी (Benefits of Turmeric) ठरते. हळदीचे त्वचेच्या विकारात विशेष महत्व असते कारण बऱ्याच त्वचेच्या प्रसाधनामध्ये किंवा सौंदर्य प्रसाधने बनविताना हळदीचा वापर केला जातो.

कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी सुद्धा हळदीचा वापर केला जातो. जंतूसंसर्ग कमी करण्यासाठी सुद्धा हळद महत्वपूर्ण आहे.

Benefits of Turmeric and use of Turmeric हळदीचा वापर कसा करावा

  • हळद हि कोरड्या भुकटी च्या स्वरूपात तुम्ही भाजी, आमटी मध्ये वापरू शकता.
  • दुधामध्ये हळद टाकून बरेच लोक हळदीचा वापर करत असतात.
  • सलाड किंवा लोणचे बनवून ओल्या हळदीचा तुमच्या आहारात तुम्ही वापर करू शकता.
  • चहा मध्ये सुद्धा हळदीचा वापर केला जातो. हळदीचा चहा सुद्धा बाजारात उपलब्ध आहे.
  • बऱ्याच औषधांमध्ये हळदीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
  • तुमच्या आहारात वापरल्या जाणाऱ्या हळदीचे शरीरात शोषण खूप कमी वेगाने होत असते त्यामुळे हळदीसोबत काळी मिरी घेतल्याने शरीरात हळदीचे शोषण होण्याचा वेग वाढतो.
  • एक व्यक्ती दिवसाला ८ ग्राम इतकी हळद खाऊ शकतो.
  • हळदीमध्ये करक्युमीन नावाचे द्रव्य असते जे शरीरात संचय केले जावू शकते. हे करक्युमीन तुमच्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असते.
  • हळद हि नैसर्गिक पद्धतीने खाणे तुमच्यासाठी फायदेशीर असते. म्हणून तुम्ही ओली हळद खाणे चांगले आहे.
  • हळदीमध्ये विविध रंग मिसळल्याने किंवा स्टार्च मिसळल्याने त्याचा तुमच्या आरोग्याला धोका होवू शकतो म्हणून नैसर्गिक हळद वापरणे महत्वाचे आहे.

Benefits of Turmeric and Turmeric Water हळदीचे पाणी पिण्याचे फायदे

शरीराच्या विविध भागात सूज येण्याचे प्रमाण वाढले आहे जसे कि हाडामध्ये, मासपेशीमध्ये, शिरांमध्ये होवू शकते ज्यामुळे शरीरात विविध आजार जसे ह्र्दयरोग, हाडांचे विकार, उच्च रक्तदाब, मधुमेह अशा समस्या वाढत असतात अशा समस्यांपासून वाचण्यासाठी हळदीचे पाणी अतिशय फायदेशीर आहे.

ज्यांचा त्वचेचा रंग फिकट झाला असेल किंवा चेहऱ्यावर सुरकुत्या येत असतील किंवा अशक्तपणा असेल तर अशा लोकांसाठी हळदीचे पाणी फायदेशीर ठरते. जे लोक निरोगी असतात त्यांनी सुद्धा हळदीचे पाणी प्यायल्यास त्यांना सुद्धा भविष्यात अशा समस्या उद्भवण्याचा धोका टळतो.

हळदीचे पाणी प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे तुमच्या शरीराचे संसर्गापासून, विषाणू पासून संरक्षण होते. हळदीमधील कर्क्युमीन हा घटक सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास फायदेशीर असतो.

पचनक्रिया सुधारण्यासाठी सुद्धा हळदीच्या पाण्याचा वापर होत असतो. चांगली पचनक्रिया तुमचे संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करत असते. हळद पचनक्रियेच्या आतड्यांची सूज कमी करते आणि पचनाच्या समस्या कमी करण्यास मदत करते.

हाडांच्या सांध्यामधील दुखणे कमी करण्यासाठी सुद्धा हळदीच्या पाण्याचा उपयोग (Benefits of Turmeric) होतो.

यकृताच्या आरोग्यामध्ये सुद्धा हळदीचे पाणी उपयोगी ठरते. यकृताच्या संरक्षणासाठी हळदीचे पाणी फायदेशीर आहे. तसेच यकृताचे कार्य सुधारण्यासाठी सुद्धा महत्वाचे आहे.

वजन कमी करण्यासाठी सुद्धा हळदीचे पाणी प्यायले जाते. तुम्ही जर लठ्ठ आहात आणि शरीरातील चरबी कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हळदीचे पाणी फायदेशीर ठरेल. हळदीचे पाणी पिणे हे लठ्ठपणाशी संबंधित आहे.परंतु फक्त हळदीचे पाणी प्यायल्याने वजन कमी होत नाही यासोबत तुम्हाला पुरेसा व्यायाम सुद्धा करायला हवा. यासोबतच चांगली जीवनशैली आणि निरोगी आहार घेणे सुद्धा महत्वाचे आहे.

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी हळदीचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. यामुळे मधुमेहाची समस्या सुद्धा कमी होते. हे इन्सुलिन संवेदनशीलता सुद्धा कमी करते यामुळे तुमचा मधुमेह नियंत्रणात आनणे शक्य होते. ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे त्या लोकांनी हळदीचे पाणी नियमित प्यायल्याने खूप फायदा होतो.

Benefits of Turmeric for Heart – ह्रदयाच्या आरोग्यासाठी हळद खूप महत्वाची ठरते. हळद शिरांच्या आतील भाग निरोगी ठेवण्यास मदत करते आणि रक्तदाब नियंत्रण करण्यास मदत करते. रक्तवाहिन्या पातळ होण्यास सुद्धा यामुळे मदत होत असते.शरीरातील रक्तातील कोलेस्ट्रोलची पातळी कमी करण्यास सुद्धा मदत करते.

https://fityourself.in/best-anti-aging-food/