वृद्धत्व कमी करणारे पदार्थ| Best Anti aging Food

(why Anti aging Food) प्रत्येक व्यक्ती हा आपण कसे तरुण दिसू याबाबत विचार करत असतो तसेच वृद्धत्व कमी करणारे क्रीम किंवा सिरम आणि खूप पैसा अशा गोष्टींवर खर्च करत असतो. बाजारात असे खूप काही पदार्थ (Anti aging Food) असतात जे आपल्याला असे सांगतात कि त्यांचा वापर केल्याने आपण अधिक अधिक तरुण दिसू शकू परंतु असे काही घडताना दिसून येत नाही. आणि त्यांचे काहीच परिणाम आपल्या त्वचेवर किंवा शरीरावर झालेले दिसत नाहीत त्यामुळे अनेकजण निराश होतात तसेच त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही व्यर्थ जातात. परंतु आपल्याला माहित आहे का कि फक्त अशा गोष्टी वापरण्यापेक्षा आपल्या आहारात बदल केल्यास सुद्धा किंवा काही पदार्थ वापरून आपण वृद्धत्व कमी करू शकतो.

Anti aging Food

काही पदार्थ आपण रोजच्या वापरामध्ये समाविष्ट केल्यास तुम्हाला परिणाम दिसून येतील. असे पदार्थ आपल्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असतात. असे लक्षात आले आहे कि काही खाद्य पदार्थामुळे आपल्याला छोटे दिसण्यास मदत होते. अभ्यासानुसार असे लक्षात आले आहे कि वृद्धत्व कमी करणारे पदार्थ शरीरावरील सुरकुत्या कमी करतात आणि त्वचेच्या पोत मध्ये सुधारणा करतात. तर आपण आज अशाच वृद्धत्व कमी करणाऱ्या पदार्थांविषयी जाणून घेवूया.

10 Anti Aging Foods Which are easily Available

१. Berries (Anti Aging Foods -1) – बेरी या विविश प्रकारच्या असतात आणि औषधी असतात जेंव्हा तुम्ही बेरी खाता तेव्हा antioxidant आपल्या त्वचेला हानिकारक मुक्त कणांपासून वाचविण्याचे कार्य करतात ज्यामुळे वेळेच्या आधी आलेले वृद्धत्व कमी होण्यास मदत होते. परंतु एवढेच नाही तर बेरी मध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते जे कॉलेजन च्या उत्पादनासाठी महत्वपूर्ण असतात. कोलेजन आपल्या त्वचेला दृढ आणि लवचिक बनविते आणि जसेजसे आपले वय वाढत जाईल तसे तसे आपल्या शरीरातील नैसर्गिक कोलेजन चे प्रमाण कमी कमी होत जात असते. बेरी खाल्याने आपल्या शरीराला जे आवश्यक आहे ते देत असतो. त्याचसोबत ते आपल्या शरीराला पाण्याचा पुरवठा करणारे असतात आणि कोलेजन चे उत्पादन सुरु ठेवण्यासाठी महत्वपूर्ण असतात त्यामुळे त्वचा नाजुक आणि मुलायम राहण्यास ते आवश्यक ठरतात.

बेरी मध्ये साखरेचे प्रमाण कमी असते आणि फायबर ची मात्रा अधिक असते जे आपल्या त्वचेचा रंग साफ आणि डाग यापासून मुक्त ठेवण्यास मदत होते.

२. Tomato (Anti Aging Foods -2) – Tomato हा लायकोपीन नी समृद्ध असतो . हा एक शक्तिशाली antioxidant आहे जो आपल्या त्वचेची हानी होण्यापासून वाचवतो आणि आपल्याला जसे कि माहित आहे कि जेंव्हा आपल्याला वेळेच्या आधी वृद्धत्व येत असते त्याचे सगळ्यात मोठ्या कारणांपैकी एक कारण हे सूर्याचे अतिनील किरण आहेत म्हणून तुम्हाला उन्हामधील सूर्याच्या अतिनील किरणापासून तुमच्या त्वचेला वाचवायचे असेल तर तुमच्या आहारात Tomato चे सेवन करायला हवे. Tomato हा विटामिन सी चा सुद्धा एक समृद्ध स्त्रोत आहे. तसेच Tomato हा आपण आधी पाहिल्याप्रमाणे कोलेजन च्या उत्पादनासाठी महत्वपूर्ण आहे.

याचा कोणता पुरावा आहे का हा प्रश्न आपल्याला नेहमी पडलेला असतो त्याचे समाधान असे आहे कि वैज्ञानिक अभ्यासानुसार लायकोपीन हे त्वचेला सूर्याच्या अतिनील किरणापासून वाचवते. आणखी एका अभ्यासानुसार ज्या लोकांच्या आहारात Tomato अधिक प्रमाणात खाल्ला गेला आहे अशा लोकांमध्ये इतर सामान्य लोकांच्या तुलनेत त्वचेवर कमी सुरकुत्या आणि कमी कोरडेपणा आढळून आला आहे कारण Tomato मध्ये असलेल्या विटामिन सी मुळे.

३. गाजर (Anti Aging Foods -3) – गजरामध्ये बीटा केरोटीन असते ज्यामुळे गाजराला नैसर्गिक गडद केसरी रंग आलेला असतो आणि जेंव्हा आपण गाजर खात असतो त्यावेळी आपले शरीर बीटा केरोटीन पासून विटामिन ए मध्ये परिवर्तीत करते आणि हे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. अभ्यासातून असे लक्षात आले आहे कि विटामिन ए त्वचेच्या सुरकुत्या, त्वचेवरील रेषा कमी करण्यास मदत करते. तसेच त्वचेच्या निर्मितीमध्ये सुद्धा मदत करते आणि सूर्याच्या अतिनील किरणापासून सुद्धा वाचवते. म्हणून तुम्ही नियमित स्वरूपात गाजर खाण्याने आपण आपली त्वचा अधिक तरुण आणि चमकदार ठेवू शकते.

गाजर हे antioxidant ने सुद्धा भरपूर असतात जे आपल्या त्वचेला मुक्त कणांपासून हानी होण्यास आणि वातावरणातील तणावांशी बचाव करण्यास मदत करते. गाजरामध्ये भरपूर प्रमाणात फायबरचे प्रमाण असते जे आपल्या चांगल्या पचनासाठी उत्तेजना देते आणि बद्धकोष्टतेचा त्रास होण्यापासून रोखते. कारण वाढलेल्या पोटावरून आपले वाढलेले वय सुद्धा दिसून येते.

४. लसूण (Anti Aging Foods -4) – लसूण हे केवळ आपल्या अन्नामध्ये चव आणत नाही तर आपल्याला छोटे सुद्धा दिसण्यास मदत करते. याचे कारण हे आहे कि लसणामध्ये समाविष्ट असलेल्या सल्फर च्या प्रमाणामुळे आहे. लसणाचे याप्रकारचे खूप फायदे आहेत यामधील एक फायदा असा आहे कि लसूण कोलेजन चे उत्पादन वाढविण्यास मदत करते. यामुळे त्वचेच्या लवचिकपणा मध्ये सुधार होतो आणि त्वचेच्या सुरकुत्या आणि रेषा कमी करण्यास मदत होते. लसून हे antioxidant ने समृद्ध असते आणि आपल्या त्वचेला Oxidative तणावापासून आणि इतर वातावरणातील घटकांपासून वाचण्यास मदत करते. लसून एक नैसर्गिक संसर्ग रोखणारा पदार्थ आहे ज्यामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या जंतू पासून रक्षण करण्यास मदत होते ज्यामुळे आपली त्वचा साफ आणि नितळ राहण्यास मदत होते.

लसून आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढविते आणि यामुळेच आपले आरोग्य चांगले ठेवण्यास आणि तरुण ठेवण्यासाठी मदत होते. यामुळे निश्चित स्वरूपात आपल्या आहारात लसणाचा उपयोग केला पाहिजे. लसून वापरल्याने चेहऱ्यावरील सूज आणि सुरकुत्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. जर आपल्याला दहा वर्षांनी छोटे दिसायचे असेल तर आपल्या आहारात लसणाचा वापर करण्यास सुरुवात करा. परंतु लसणाचे सेवन केल्यानंतर दातांना ब्रश करणे विसरू नका कारण लसणाचे पदार्थ खाल्याने तोंडाचा उग्र वास येण्याची शक्यता असते.

५. ऑलिव ऑईल (Anti Aging Foods -5) – ऑलिव ऑईल मध्ये Monosaturated fatty Acids असतात आणि आपल्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. परंतु ह्रदयाचे निरोगी असल्याने आपल्या त्वचेसाठी काय फायदा होईल. तर याचा फायदा असा आहे कि ह्रदयाचे आरोग्य चांगले असणे म्हणजेच शरीरातील रक्तप्रवाह सुधारणे होय. याचा अर्थ तुमची त्वचा अधिक चांगली आणि चमकदार राहण्यासोबत त्वचेला आवश्यक ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळत असतात. याशिवाय ऑलिव ऑईल मध्ये विटामिन ई आणि पोलीफिनोल्स असतात जे शरीरातील मुक्त कणांच्या हानिकारक प्रभावापासून लढण्यास मदत करतात. मुक्त कण आपले वय वाढविण्यास अधिक सक्रीय असतात जे आपल्या त्वचेवरील सुरकुत्या, डाग आणि सुस्ती आणतात आणि हानी पोहोचवितात.

एका अभ्यासानुसार असे लक्षात आले आहे कि ऑलिव ऑईल आपल्या त्वचेचे फोटोएजिंग रोखण्यास मदत करते. फोटोएजिंग मध्ये आपल्या त्वचेचे सूर्याच्या अतिनील किरणापासून खूप काळ संपर्कात आल्यास होणाऱ्या हानीपासून वाचविण्यासाठी फायदेशीर आहे.

६. मासे (Anti Aging Foods -6) – चांगले fats असलेले मासे जसे कि सुरमई, पापलेट किंवा इतर खी मासे हे Omega – ३ Fatty acids नी समृद्ध असतात. या माश्यांमध्ये चांगले Fats असतात जे आपल्या शरीराचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करतात. त्वचेचे आरोग्य सुधारण्यास सुद्धा मदत होते. जसे जसे आपले वय वाढत जाते तसे तसे आपली त्वचा निस्तेज आणि पातळ होत जाते. Omega – ३ Fatty acids त्वचेमधील पाण्याचे प्रमाण राखण्यास मदत करते तसेच सूर्याच्या किरणापासून होणारी हानी रोखते.

७.ग्रीन टी (Anti Aging Foods -7) – ग्रीन टी शरीरातील सूज कमी करते तसेच शरीरातील संसर्ग या समस्यामध्ये मदत करते. ग्रीन टी सुद्धा पोलीफिनोल्सनी भरपूर असतात कैटेचीन नावाचे antioxidant सुद्धा ग्रीन टी मध्ये असतात जे आपल्याला अतिनील किरणापासून होणाऱ्या हानीपासून वाचवितात. तसेच खराब झालेली त्वचा सुधारण्यास मदत करतात. म्हणून नियंत्रित स्वरुपात ग्रीन टी प्यायल्याने चांगला फायदा होतो.

८. अवोकाडो (Anti Aging Foods -8) – अवोकाडो मध्ये Monosaturated fats अधिक असतात हे एक प्रकारचे चांगले fats असतात आणि त्यामुळे त्वचेला अधिक तरुण आणि चमकदार बनण्यास मदत होते. त्वचेच्या आरोग्यासाठी अवोकाडो मध्ये खूप लाभदायक घटक आहेत. अवोकाडो चेहऱ्यासाठी मास्क बनविण्यासाठी वापरतात जे आपली त्वचा ओलसर ठेवते आणि त्वचेला पोषण प्रदान करते.

९. हळद (Anti Aging Foods -9) – हळदीमध्ये करक्युमीन असते ज्याच्यामध्ये antioxidant असतात तसेच सूज कमी करणारे गुणधर्म असतात. तसेच शरीरातील मुक्त कणांपासून होणारे नुकसान टाळतात ज्यामुळे आपले वय वाढण्याच्या प्रक्रियेमध्ये हळदीचे योगदान आहे. याशिवाय हळद शरीरात कोलेजन निर्माण करण्यास उत्तेजना देते आणि त्वेचेवारी रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. अमेरिकेच्या त्वचेच्या अकादमी मध्ये असे सांगण्यात आले आहे कि हळदीचा अर्क असलेली क्रीम १० आठवड्यापर्यंत वापरल्याने त्वचेवरील रेषा आणि सुरकुत्या मध्ये खूप सुधार होतो.

१०. डार्क chocolate (Anti Aging Foods -10) – हे कोको च्या बियांपासून बनलेले असते ज्यामध्ये फ्लेवोनोल्स असतात आणि हा एक प्रकारचा antioxidant असतो जो त्वचेला सूर्याच्या अतिनील किरणापासून वाचविण्यास मदत करते तसेच रक्तप्रवाहात सुधारणा करते त्यामुळे त्वचेमध्ये ओलावा टिकून राहण्यास मदत होते. ज्या डार्क chocolate मध्ये ७० % पेक्षा जास्त कोको चे प्रमाण असते त्यामुळे त्वचेस खूप फायदा होतो. यामधील फ्लेवोनोल्स हे रक्तप्रवाहामध्ये सुधारणा करण्यास मदत करतात आणि तुम्हाला तरुण त्वचा प्रदान करतात. यामध्ये कॅलरी आणि चरबी सुद्धा भरपूर प्रमाणात असते म्हणून याचे सेवन नियंत्रित प्रमाणातच करायला हवे.

https://fityourself.in/what-are-healthy-fats/