Need of Best Oil for hair growth कित्येक लोकांमध्ये केसांची समस्या हि दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. काही जणांचे कमी वयातच केस गळत आहेत किंवा तुटत आहेत तर काही जणांचे केस हे कमी वयातच पांढरे होत आहेत. केस गळतीमुळे तुम्ही निराश आणि चिंताजनक होवू शकता यासोबतच काहीना केसांच्या समस्या जसे कि केसांमध्ये कोंडा होणे, केस चिकट होणे अशा समस्या सुद्धा उदभवू शकतात. बरेच शाम्पू आणि तेल वापरून तुम्ही थकला असाल परंतु बाहेर बाजारात मिळणारी कृत्रिम पद्धतीने किंवा रसायने वापरून बनविलेली तेले तुमच्यासाठी फायदेशीर नसतात आणि त्यामुळे उलट केसांचे नुकसान होते म्हणून तुम्ही घरी किंवा नैसर्गिक पद्धतीने बनलेली तेले (Best Oil for hair growth) तुमच्या केसांसाठी वापरली पाहिजेत.

तुमच्यासाठी घरच्या घरी बनविलेले तेल (Best Oil for hair growth) हे उत्तम आहे ते कसे बनवावे याबद्दल आपण जाणून घेवूया. हे तेल केस गळतीपासून वाचण्यासाठी आणि केस पांढरे होण्यापासून वाचविण्यासाठी उपयुक्त आहे. तेल कसे तयार करावे आणि त्याचा वापर कसा करावा याबद्दल आपण कृती आणि उपयोग जाणून घेवूया.हे तेल तुम्ही जर वापरले तर तुमचे केस काळे होण्यास मदत होईल तसेच तुमचे केस मजबूत होण्यास सुरुवात होईल यासाठी या तेलाचा वपर तुम्ही निश्चित करा.
(Best Oil for hair growth) तेल बनविण्यासाठी तुम्हाला कांदा आणि तिळाचे तेल आवश्यक आहे. तुम्हाला थोडेसे सुके असलेले ४ कांदे घ्यायचे आहेत.तसेच जे कांदे घेतले आहेत ते लाल असावेत. कारण लाल कांद्यामध्ये सल्फर असते जे केसगळती कमी करण्यासाठी फायदेशीर असते केस पांढरे होण्यापासून रोखते आणि केस दाट आणि मजबूत होण्यास मदत होते. ४ लाल कांदे तुम्हाला बारीक चिरून घ्यायचे आहेत.
दुसरा पदार्थ तुम्हाला घ्यायचा आहे तो म्हणजे तिळाचे तेल. तिळाच्या तेलाला आयुर्वेदात तेलांचा राजा असे संबोधले जाते जे तेल तुमच्या केसांच्या मुळामध्ये खूप सहजपणे मुरते. तिळाचे तेल संसर्ग कमी करते तसेच बुरशी होण्यापासून रोखते यामुळे कोंड्याच्या समस्येपासून मुक्ती मिळण्यासाठी फायदेशीर आहे. तेल बनविण्यासाठी gas वर लोखंडाची कढाई ठेवा. लोखंडाची कढाई वापरण्याचे कारण म्हणजे यामुळे केसांना लोह मिळते आणि केस मजबूत होण्यास सुद्धा मदत मिळते. जेंव्हा कढाई गरम होईल तेव्हा त्यामध्ये ५०० मिली इतके तिळाचे तेल टाका मंद आचेवर हे तेल ठेवा आणि यामध्ये बारीक चिरलेला कांदा घाला. यामध्ये कांदा २० मिनिटे व्यवस्थित परतून घ्या. २० मिनिटांमध्ये कांदा चांगल्या प्रकारे भाजला जाईल आणि तेलाचा रंग गडद होईल. आता हे तेल ४ तासांसाठी झाकून ठेवा.
जेंव्हा तेल थंड होईल त्यावेळी कांद्याचे गुणधर्म तेलामध्ये उतरतील. नंतर तेल गळून एका बाटलीमध्ये भरून ठेवा. उरलेला भाग फेकून द्या. यानंतर तुमचे नैसर्गिक कांद्याचे आणि तिळाचे तेल तयार होईल. परंतु हे तेल कसे वापरायचे याबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे.

Benefits of Best Oil for hair growth तेलाचा उपयोग आणि फायदे
हे तेल (Best Oil for hair growth) तुम्ही दोन प्रकारे वापरू शकता जसे कि अंघोळी केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी. अंघोळ केल्यानंतर तुम्ही जसे आवर्त असताना केसांना तेल लावत असता त्याप्रकारे थोडेसे तेल हातांवर घेवून तुम्ही तुमच्या केसांना लावू शकता. रात्री झोपण्यापूर्वी आठवड्यातून २ ते ३ वेळा तुम्ही केसांना मसाज करू शकता. बोटांनी हलक्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मुळाना मालिश केली पाहिजे. पूर्ण रात्र हे तेल लावून तुम्ही झोपू शकता कारण रात्रभर तुमच्या केसांचे पोषण होण्यास मदत होईल. सकाळी तुम्ही अंघोळी करताना तुमचे केस शाम्पू वापरून धुवू शकता.
(Best Oil for hair growth) तेल तुम्ही १ महिना वापरले तर तुम्हाला या तेलाचा फायदा नक्की दिसण्यास सुरुवात होईल. लाल कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण असते त्यामुळे हे केसगळती रोखण्यास मदत करते तसेच नवीन केस निर्माण करणे आणि केसांची वाढ यामध्ये सुद्धा मदत करते. आधुनिक विज्ञानाने सुद्धा हे मान्य केले आहे. कांद्याचा रस कोलेजन बनविण्यास मदत करतो ज्यामुळे नवीन केसांची मुळे उघडतात. तसेच मुळामध्ये रक्तप्रवाह वाढविण्यास सुद्धा मदत होते.
कांद्याचा वापर केलेले तेल बाजारात उपलब्ध असते परंतु तरीसुद्धा ते घरी का बनवायचे ? जेव्हापासून विज्ञानाने कांद्यामुळे केसांना होणारे फायदे प्रकाशित केले आहेत तेव्हापासून बाजारात मिळणाऱ्या कांद्यापासून बनणाऱ्या तेलांमध्ये वाढ झाली आहे. परंतु बाजारात मिळणाऱ्या तेलांमध्ये काही समस्या असतात त्या म्हणजे ते महाग असतात. त्या तुलनेत घरी बनविलेले कांद्याचे तेल हे स्वस्त असते. तसेच बाजारात मिळणाऱ्या पदार्थात कांद्याचे प्रमाण हे कमी असते आणि केमिकल चे प्रमाण जास्त असते. काही कंपनी त्यांचा खप वाढविण्यासाठी तेलात कांद्याचा समावेश असल्याचे सांगतात. घरी तयार केलेले तेल हे नैसगिक असते आणि सहज तयार होणारे तसेच त्याचे कोणतेही दुष्परिणाम नसतात. बाजारात मिळणाऱ्या तेलांमध्ये वास येण्यासाठी काही पदार्थ मिसळले जातात. परंतु घरी बनलेले तेल हे आपण स्वतः बनविलेले असल्याने कोणत्याही चिंतेशिवाय तुम्ही वापरू शकता.