
१.१ cholesterol म्हणजे काय?
कोलेस्ट्रोल (cholesterol) हा मेणासारखा चिवट पदार्थ असून तो शरीराच्या प्रत्येक पेशीसाठी आवश्यक घटक आहे. कोलेस्ट्रोलशिवाय शरीरामध्ये हार्मोन्स तयार होवू शकत नाहीत. कोलेस्ट्रोल हाडांच्या विकासासाठी मदत करणाऱ्या “व्हिटामिन डी” ची निर्मिती करते व स्नायुतंतूचे संरक्षण त्वचेमार्फत करते. ड जीवनसत्व,टेस्टेटेरॉन,इस्ट्रोजनसारखे हार्मोन्स यांच्या निर्मितीत शरीराकडून कोलेस्ट्रोल हा कच्चा माल म्हणून वापरला जातो.प्रत्येक पेशींचे आवरण कोलेस्ट्रोलपासून तयार केलेले असते.
कोलेस्ट्रोलची चाचणी कशी करावी? कोलेस्ट्रोल हा रक्तातील महत्वाचा घटक असल्याने याची चाचणी रक्ताच्या तपासणीतूनच होते. Cholesterol, Triglycerides, HDL, LDL या चार एकत्रित घटकांना वैद्यकीय भाषेत Lipid Profile असे म्हणतात. या Lipid Profile ची चाचणी उपाशीपोटी करावी लागते. म्हणजेच हि चाचणी करण्यापूर्वी १२ तास कि नाही हे समजते.
1 .2 CHOLESTEROL
कोलेस्ट्रोल (CHOLESTEROL) चांगले कि वाईट?
जर आपण तप गरम दुधात किंवा पाण्यात टाकले असता ते तरंगत राहते. त्याचप्रमाणे कोलेस्ट्रोल हे जर थेट रक्तात सोडले तर ते वितळत नाही.यावर उपाय म्हणून शरीरात एक प्रकिया होते. चरबी किंवा कोलेस्ट्रोल रक्तातून वाहून नेण्यासाठी ते एका बुडबुड्यासारखा आवरणात लपेटल जाते. हे आवरण प्रथिनांचे असल्याने ते रक्तात मिसळले जाते.या बुडबुड्याला लायपोप्रोटीन म्हणतात. लायपो प्रोटीन दोन प्रकार आहेत.
१. एलडीएल (लो डेन्सिटी लायपोप्रोटीन) हे वाईट समजले जाते.कारण यकृताकडून शरीरातल्या विविध पेशींकडे कोलेस्ट्रोल वाहून नेण्याची प्रक्रिया यामध्ये होत असते.
२.एलडीएल (हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन) हे चांगले समजले जाते.ते शरीरातल्या विविध पेंशीकडून यकृताकडे वाहून नेले जाते. रक्तातील एचडीएल जितके जास्त तितका हृदयविकाराचा धोका कमी संभवत.
कोलेस्ट्रोल (Cholesterol) धोकादायक केंव्हा असते?
कोलेस्ट्रोलचे योग्य प्रमाण शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते. धामण्यामध्ये जास्त कोलेस्ट्रोल साठल्यास रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात.व हृदयसंबंधी आजार उदभवू लागतात.धमण्यामधून होणाऱ्या रक्तप्रवाहात जास्त अडथळे निर्माण झाल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. कोलेस्ट्रोलचे प्रमाण वाढल्याने पित्ताच्या पिशवीत जास्त प्रमाणात खडे तयार होतात.
जास्त कोलेस्ट्रोलचे (Cholesterol) धोके:
- रक्तातील कोलेस्ट्रोल जर ठराविक पातळीपेक्षा जास्त झाले तर हृदयविकार, पक्षाघात यासारख्या विकारांची शक्यता असते.
- रक्तातल्या जास्त कोलेस्ट्रोलमुळे हृदयासकट सर्व धमन्यांची आवरणे कठीण होतात.त्यांची लवचिकता कमी होते. हळूहळू त्या अरुंद होऊ लागतात.
- धमण्या अरुंद झाल्यास संबधित अवयवाला ऑक्सिजन व ग्लुकोज यांचा अपुरा पुरवठा होतो. हृदयाचा बाबतीत हे घडले तर हृदयविकार होतो व मेंदूच्या बाबतीत घडले तर पक्षाघात (लकवा )होतो.
जास्त कोलेस्ट्रोल (Cholesterol) आणि हृदयविकार:
जास्त प्रमाणात कोलेस्ट्रोल व हृदयविकार यांचा खूप जवळचा संबध आहे. ज्याप्रमाणे पाण्याच्या पाईपमध्ये कचरा साठल्यास तो पाण्याच्या प्रवाहाला अडथळा आणतो त्याचप्रमाणे जास्त कोलेस्ट्रोलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होऊन हृदयामध्ये योग्य प्रमाणात रक्त पुरवठा अडथळा येतो. हृदयविकाराचा धोका निर्माण होतो.
वयानुसार कोलेस्ट्रोल (Cholesterol) प्रमाण :
नवजात बाळाच्या शरीरात कोलेस्ट्रोलचे प्रमाण ७० मिलिग्रॅम प्रति डेसीलिटर असते.एक वर्षाच्या वयात हे १५० मिलिग्रॅम प्रती डेसीलिटर असते.१७ वर्षापर्यंत यात वाढ होत नाही. यानंतर मात्र हे प्रमाण वाढते.वयस्कर व्यक्तीच्या शरीरात हे प्रमाण २०० मिलिग्रॅम प्रती डेसीलिटर असावे व एचडीएल कोलेस्ट्रोलचे प्रमाण ५० मिलिग्रॅम प्रती डेसीलिटर पेक्षा जास्त असावे.
रक्तात किती कोलेस्ट्रोल (Cholesterol) हे जास्त समजले जाईल?
- २०० मिलिग्रॅम प्रती डेसीलिटर पेक्षा कमी असेल तर ठीक आहे.
- २०० ते २३९ मिलिग्रॅम प्रती डेसीलिटर पेक्षा जास्त कोलेस्ट्रोल असेल तर ते उच्चपातळीवर आहे, असे समजावे.
जास्त धोका कोणासाठी?
- प्रमाणापेक्षा जास्त लठ्ठ असणाऱ्या लोकांसाठी.
- रक्तदाब व मधुमेहाचा आजार असणाऱ्या लोकांसाठी.
- एकाच जागी बसून राहणाऱ्या व पायी न चालणाऱ्या लोकांसाठी.
- अतिप्रमाणात मांसाहार,मद्यपान,धुम्रपान करणाऱ्या लोकांसाठी .
कोलेस्ट्रोल (Cholesterol)कमी कसे कराल ?
- जेवणात प्रोटीन असणाऱ्या पदार्थांचा जास्त वापर करावा.
- भाज्या शिजवण्यासाठी शेंगतेल,सरसाचे तेल, सोयाबीन तेल,तीळ तेल यांचा वापर करावा.
- आहारात मांसाहारी पदार्थ,पनीर यांचा वापर कमी करावा.
- फळे,ताज्या पालेभाज्या यांचे प्रमाण आहारात वाढवावे.
- तणावापासून दूर राहावे.
- नियमित व्यायाम करावा.
- ओटचे पीठ म्हणजे आहारात ओटचे जाडेभरडे पीठ एक वाटी असावे.ओटमध्ये फायबर असल्याने कोलेस्ट्रोल कमी करण्यास मदत करते.
- आहारात मासे घेतल्याने ह्र्दय निरोगी राहते.माश्यामध्ये ओमेगा ३ fatty acid असल्याने त्याचा ह्रदयाला फायदा मिळतो.
- आक्रोड,बदाम,काजू रक्तातील कोलेस्ट्रोल कमी करू शकतात.
- कोलेस्ट्रोलमुळे औषधांची गरज भासल्यास डॉक्टरांकडे जावून तपासणी करून घ्यावी.डॉक्टरांच्या सल्याने औषधे घ्यावीत.
घातक धुम्रपान
धुम्रपान करणे किंवा तंबाखू खाणे हे ह्रदयरोग होण्यामागचे एक प्रमुख कारण आहे.तम्बाखुमध्ये असलेली रसायने शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचित करतात. त्यामुळे ह्र्दय तसेच रक्तवाहिन्यांना त्याचा धोका पोहचू शकतो. एर्थ्रेसेलेरासिसमुळे ह्रदयाचा झटका येऊ शकतो.धूरविरहित,लो टार ,लो निकोटीन सिगारेटदेखील अप्रत्यक्ष धुम्रपानाप्रमाणेच धोकादायक असतात. सिगारेटच्या धुरातील निकोटीन रक्तनलिका व वाहिन्या आकुंचित करून ह्रदयास जास्त जोराने काम करण्यास भाग पडतात.त्यामुळे ह्रदयाचे ठोके वाढतात आणि परिणामी रक्तदाब वाढतो.तसेच सिगारेटच्या धुरातील मोनोओक्सीड रक्तातील प्राणवायूची जागा घेतात. त्यामुळे ब्लडप्रेशर वाढते आणि प्राणवायूचा पुरवठा करण्यासाठी ह्रदयाला जास्त श्रम घ्यावे लागते.त्यामुळे धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये ह्रदयविकाराचा धोका सर्वाधिक असतो.
मधुमेह आणि स्थूलता
ह्रदयरोग व मधुमेह याचा फार जवळचा संबंध. ७० टक्के मधुमेहींचा मृत्यू हा ह्रदयरोग होत असतो.मधुमेहींमध्ये रक्तदाबाचा विकार,अधिक चरबी ,लठ्ठपणा,अनियंत्रित मधुमेह,मानसिक ताण या गोष्टी आढळून येतात. यातून ह्र्दयविकाराची शक्यता बळावते. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ह्र्दयविकार यातनाविरहित असतो.म्हणजेच मधुमेह लोकांना वेदना जाणवत नाहीत. त्यामुळे ह्र्दयविकाराचा झटका आल्याचेही या रुग्नाना जाणवत नाही. यासाठी मधुमेही रुग्णांनी वर्षातून एकदा तरी इसीजी परीक्षण करून करून घ्यावे.वर्षातून किमान एकदा कोलेस्ट्रोल तपासणी करून घ्यावी.मधुमेह नियंत्रणात ठेवावा.नियमित व्यायाम करावा.धुम्रपान करू नये.रक्तदाब नियंत्रणात राहील,याची काळजी घ्यावी.
स्थूलता
ह्रदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नसा वयानुसार जाड बनतात.त्यांच्यात चरबी साठत गेल्याने रक्तपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होतो. मांसपेशींना रक्त न मिळाल्याने ह्र्द्यघात होतो.सुमारे ७० ते ८० टक्के मधुमेहींमध्ये स्थूलता आढळते.लठ्ठपना हा मधुमेह आणि ह्रदयविकार यासारख्या असाध्य रोगांना जन्म देत असतो. त्यामुळे स्वतःला लठ्ठपणापासून दर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.आपली उंची,वजन व दिनचर्येनुसार कॅलरीजचे प्रमाण निर्धारित करून आहार नियमांचे पालन करावे. नियमित व्यायाम करावा. म्हणजे शरीरातील चरबी उपयोगात येऊ शकते.व्यायामामुळे मधुमेहावर नियंत्रण राहते.
ताण- तणाव, जीवनशैली
धकाधकीचे जीवन,नोकरीतील चढाओढ,कौटुंबिक कलह,अतिव्यायाम,अनियंत्रित आहार व रोजच्या जगण्यातील ताणतणाव अशी अनेक कारणे ह्र्दयविकाराला आमंत्रण देत असतात. आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे तरुणांपासून वृद्धांपर्यंत ह्र्दयविकाराचे प्रमाण वाढत आहे.धकाधकीच्या जीवनामुळे आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो व याच दुर्लक्षामुळे ह्रदयविकाराचा झटका आलेला कळतही नाही.केवळ छातीत दुखणे म्हणजे हार्ट attack असू शकतो याकडे आपण गांभीर्याने लक्ष देत नाही.त्यामुळे हेच दुखणे पित्तामुळे असू शकते,असा समज करून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.लहान वयात हार्ट अटॅकमुळे मृत्यू झालेली कितीतरी उदाहरणे आहेत.कोणाचा झोपेतच मृत्यू होतो,कुणी ऑफिसमध्ये बसल्या जागीच कोसळते .मराठी अभिनेत्री अश्विनी एकबोटे याचा असाच अचानक रंगमंचावर सादरीकरण करताना मृत्यू झाला.अतिव्यायामामुळे हार्ट अटॅक येतो.त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता आपली जीवनशैली सुयोग्य पद्धतीने आखली तर आपल्याला ह्र्दयविकारावर मात करता येऊ शकते.
कोलेस्ट्रोल (Cholesterol) कमी करण्यासाठी काही उपाय योजना –
कोलेस्ट्रोल युक्त अन्न खाल्याने शरीराचे वजन वाढते.कोलेस्ट्रोल वाढल्याने शरीराला ह्र्दय विकाराचा धोका वाढतो.कोलेस्ट्रोल हे जीवनसत्वे आणि खानिजांसारखे असते.
अन्नाव्यतिरिक्त यकृताद्वारेही शरीरात कोलेस्ट्रोल तयार होते.शरीरातील कोलेस्ट्रोल वाढणे हे लठ्ठपणाचे मुख्य कारण आहे.पेस्ट्री,चीज,मांस,snacks,तेलकट पदार्थ यांसारखे स्निग्ध पदार्थ खाल्याने शरीरातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण वाढते.फास्ट फूड,जंक फूड आणि तळलेले अन्न यामध्ये कोलेस्ट्रोलचे प्रमाण जास्त असते.पण आहारात काही बदल करून हा धोका टाळता येऊ शकतो.
जाणून घेऊया कोलेस्ट्रोल कमी करण्याचे काही उपाय –
जंक आणि फास्ट फूड टाळा:

या व्यस्त जीवनात फास्ट फूड आणि जंक फूड हे लोकांचे सर्वात आवडते खाद्य बनले आहे.वेळेअभावी लोक त्याचा मोठ्या प्रमाणात सेवन करतात.फास्ट फूडमध्ये कोलेस्ट्रोलचे प्रमाण जास्त असते.फास्ट फूड टाळून कोलेस्ट्रोलची पातळी कमी करता येते.
कोलेस्ट्रोल युक्त अन्न खाऊ नका.कोलेस्ट्रोल जास्त असलेल्या पदार्थांचे सेवन कमी करा.किंवा त्यांचे सेवन करू नका.अंडी ,दुध,मांस ,मासे आणि chocolate मध्ये याचे प्रमाण सर्वाधिक असते.अंड्यातील पिवळा बलक मध्ये सुद्धा बहुतेक कोलेस्ट्रोल अढळतो.नाष्टा आणि दुपारच्या जेवणात या पदार्थांचा समावेश करावा परंतु रात्रीच्या जेवणात या पदार्थांचे सेवन करू नये.
कोलेस्ट्रोल कमी करणारे पदार्थ-
सोयाबीन- सोयाबीनमध्ये आयसोफ्लोवासीन नावाचे प्रोटीन असते.जे शरीरातील कोलेस्ट्रोल आणि अतिरिक्त चरबी कमी असते.याशिवाय ते चरबी वाढवणाऱ्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करते.

लिंबू- एक ग्लास पाण्यात लिंबू पिळून रोज सकाळीदात न घासता प्यावे.शरीरात चरबी आणि कोलेस्ट्रोलचे प्रमाण जास्त असेल तर दोन लिंबू पाण्यात ताजून रोज प्यावे,दररोज लिंबू वापरल्याने कोलेस्ट्रोल कमी होते.
मध- कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी दररोज साखरेऐवजी मधाचा वापर करा.एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे मध टाकून त्यात एक लिंबू पिळून रोज सकाळी आणि संध्याकाळी सेवन करा.
दही- दररोज दही खाल्याने शरीरातील कोलेस्ट्रोल आणि चरबी कमी होते.दिवसातून दोन ते तीन वेळा दही खा आणि ताक प्या.
मुळा- दोन चमचे मुळ्याच्या रसात मध मिसळून साधारण महिनाभर समान प्रमाणात सेवन करा.यामुळे कोलेस्ट्रोल कमी होईल.
पाणी- दररोज भरपूर पाणी प्यावे.यामुळे अतिरिक्त चरबी कमी होऊन लठ्ठपणा कमी होते.
शरीरात जसे कोलेस्ट्रोल (cholesterol) असणे फायदेशीर आहे त्याप्रमाणे हे ह्रदयाला धोका सुद्धा निर्माण करू शकते.
यासाठी आहारात मुळा,गाजर,मेथी,लसूण,हिरव्या आणि पालेभाज्या,सोललेली कडधान्ये,कांदा,आले,हिंग या पदार्थांचा समावेश करा.