वेदनादायक कानाचा संसर्ग|Ear Infection Painful

बाह्य कानाचा संसर्ग (outside ear infection):

बाह्य कानाचा संसर्ग (outside ear infection)

Ear Infection बाह्य कानाचे संक्रमण सामान्यतः बाह्य कानापुरते मर्यादित असते आणि ते जीवाणू किंवा बुरशीजन्य संसार्गामुळे होते.बाह्य कानाच्या संसर्गाची काही सामान्य कारणे आहेत.

कानामध्ये मळ जमा होणे- मळ कानामध्ये नैसर्गिक रित्या तयार होतो परंतु मळ कानात कालांतराने वाढला तर ते जंतू आणि बुरशीची वाढ होण्याची जागा बनते.जिथे जीवाणू सहज वाढू लागतात.या स्थितीला ग्रान्युलोमा म्हणतात.अशा स्थितीत कानात दुखणे आणि कानातून पाणी येऊ लागते.

ओटेसीस एकस्टर्न – बाह्य कानाचा हा संसर्ग मुख्यतः जलतरणपटू मध्ये होतो.ओटेसीस जेंव्हा कानात पाणी इत्यादींमध्ये कोणतेही द्रव प्रवेश करते तेव्हा उद्भवते.हे द्रव कानात आधीच अस्तित्वात असलेल्या जीवाणूंना आणखी सकारात्मक बनवते आणि वातावरण प्रदान करते.कानात द्रव गेल्याने कानाचे नुकसान होते आणि सूज येऊ लागते त्यामुळे संसर्ग होतो.

कानाच्या मध्य भागाचा संसर्ग – हा संसर्ग ओटेसीस द्वारे सुद्धा होतो जो बहुतेक खोकला,सर्दी आणि घसा,नाक सर्दीमुळे होतो.घसा किंवा नाक यामधील एलर्जीमुळे कानावरही परिणाम होतो.यावेळी घसा आणि नाकातील जंतू मध्य भागापर्यंत पोहोचू शकतात.आणि संसर्गास कारणीभूत ठरू शकतात.दुध पिणाऱ्या मुलांमध्ये कानाच्या संसर्ग जास्त प्रमाणात होते कारण दुध अनेकदा तोंडातून बाहेर पडते आणि कानाकडे जाते.मधल्या कानाच्या संसर्गाचे दोन प्रकार पडतात.खालीलप्रमाणे दोन प्रकार आहेत.

तीव्र मध्य कानाचे संक्रमण(Ear Infection) – या संसर्गामुळे (Ear Infection) सहसा तीव्र वेदना,जळजळ आणि ताप येतो.हा संसर्ग कमी कालावधीचा असतो आणि काळजी घेतल्याने हा बरा होतो.

तीव्र भागातील कान संसर्ग(Ear Infection)- हा संसर्ग एखाद्या व्यक्तीला आठवडे किंवा महिने त्रास देऊ शकतो.कानाचे हा संसर्ग कान दुखणे,कानातून कोणताही स्त्राव आणि चिडचिड याद्वारे ओळखले जाऊ शकतात.हे देखील तीन प्रकारचे असतात.

  • युस्टा चीयन ट्यूब द्रवाने भरलेली असते.
  • कानाच्या पडद्याला छिद्र
  • कानाच्या हाडांची झीज.

अंतर्गत कानाचे संक्रमण (Ear Infection)- आतील कानाचे संक्रमण सहसा बऱ्याच लोकांना होत नाही.हे काहीवेळा व्हायरल इन्फेक्शन मध्ये होऊ शकते ज्यामध्ये जंतू रक्ताद्वारे कानात प्रवेश करतात,ज्यामुळे कधीकधी चक्कर येते.या संसार्गाकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास कानाची श्रवणशक्ती नष्ट होऊ शकते.

कारण- कानाच्या संसार्गामुळे (Ear Infection) अनेक धोके निर्माण होतात.जर संसर्ग खोलवर गेला नसेल,तर तो काही मिनिटांच्या उपचारांनी आणि प्रक्रियेने बरा होऊ शकतो,परंतु जर तो अंतर्गत जागेला पोहोचला तर शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते.कानाच्या संसार्गामुळे,पीडित व्यक्तीला काह्लील समस्या असू शकतात.

डोके दुखी – कानदुखीमुळे अनेकदा डोक्यात तणाव निर्माण होतो.

ताप- कानाच्या दुखीमुळे तीव्र वेदना,जळजळ आणि ताप येऊ शकतो.

चक्कर येणे- कानदुखीमुळे कधीकधी चक्कर येते.

ऐकण्याची क्षमता- या संसार्गाकडे (Ear Infection) दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास कानाची श्रवणशक्ती नष्ट होऊ शकते.

लक्षणे:

  • कान दुखणे.
  • चक्कर येणे.
  • डोकेदुखी.
  • ताप.
  • ऐकणे कमी होते.

कानदुखीवर उपचार(Ear Infection):

कानदुखीवर उपचार:
  • कानात दुखत असल्यास झेंडूचे फुल बारीक करून त्याचा रस टाकल्यास आराम मिळतो.
  • मीठ गरम करून कपड्यात बांधून ठेवावे इअर कॉम्प्रेसमुळे कान दुखण्यापासूनही आराम मिळतो.
  • स्वयंपाकाच्या तेलात लसून घाला आणि तेल गरम करा.या तेलाचे काही थेंब तीन ते चार वेळा कानात टाका.
  • तुळशीच्या पानांचा रस काढून कानाभोवती चोळल्यानेही आराम मिळतो.रस कानात घालणार नाही याची काळजी घ्या.
  • apple sider vinegar समान प्रमाणात पाणी मिसळा आणि त्यात कापूस भिजवा.हा कापूस काही वेळ कानामागे ठेवा.
  • ओलिव्ह oil गरम करून कोमट तेल बनवा.कानात काही थेंब टाका.
  • गरम पाण्याच्या बाटलीने कान दाबा.
  • कांदा गरम करून मिक्सरमध्ये बारीक करून रस काढा.कांद्याच्या रसाचे काही थेंब कानात टाका.

कानाच्या संसर्गापासून बचाव (Ear Infection)

मळ साफ करणे- कानात जादा मळ साठल्याने कानात जंतू वाढतात आणि कानाला संसर्ग होतो.डॉक्टर अचूक उपकरणांसह कानातला मळ काढू शकतात.साधारणपणे लोक इअर बड्स च्या सहाय्याने कानातला मळ काढू शकतात व कान स्वच्छ करतात.पण जर खूप मळ असेल तर ते इअर बड्सने साफ करता येत नाही.

कानातील ड्रोप्स चा वापर- काहीवेळा कानातले ड्रोप्स टाकल्याने कानाच्या संसर्गापासून मुक्त होण्यास मदत होते.डॉक्टर कान दुखण्यासाठी कानातील ड्रोप्स देतात,ज्यामुळे कानाच्या दुखण्यासोबत मळही निघून जातो.

कानाचा संसर्ग टाळण्यासाठी उपाय (Ear Infection)

कानाचा संसर्ग टाळण्यासाठी उपाय-
  • सर्दी-खोकला झाल्यास हात चांगले धुतल्यानंतरच खाणे-पिणे खावे.
  • हिवाळ्यात बाहेर जाने टाळा.गर्दीच्या ठिकाणी संसर्गाचा धोका जास्त असतो.
  • धुम्रपान टाळा
  • मुलांना वेळेवर लसीकरण करा.त्यांना न्युमोकोकल लसीकरण करणे आवश्यक आहे.

कान बंद होणे- कानाचा मध्य भाग नाकाच्या मागच्या भागाला नळीने जोडलेला असतो याला युटाचीयन ट्यूब म्हणतात.या नळीच्या मार्गात काही अडथळा निर्माण झाल्यास आपला कान भरल्यासारखा किंवा कानावर दाब आल्यासारखा वाटतो.हि नळी बंद होण्याची अनेक कारणे आहेत जसे कि कानात संसार्गामुळे (Ear Infection) मळ तयार होतो.यामुळे कानाच्या दाबावर परिणाम होतो.

कानातील मळ बनण्याची कारणे- आपल्या कानाच्या बाहेरील त्वचेवर एक आवरण असते ज्यामध्ये मळ बनविणाऱ्या ग्रंथी असतात त्यातील खोल भाग उदा.कानाचा पडदा यांचे संरक्षण मळापासून तसेच बारीक केसांपासून होते जे धूळ आणि इतर बाहेरील कणांना आत मध्ये जाण्यास मज्जाव करते.जेंव्हा नवीन मळ तयार होण्यास सुरुवात होते तेव्हा काही आतील मळ कानाच्या बाहेरील छिद्रजवळ फेकला जातो.पण खूप जास्त प्रमाणात मळ तयार झाला किंवा आपलं कान स्वच्छ नाही केला तर असा मळ साठून राहतो आणि परिणामी आपलं कान बंद होतो.जो काही सूक्ष्म वस्तूंनी किनव तत्समनी साफ करतात हि समस्या बहुतांश लोकांमध्ये दिसून येते.कान बंद होण्याची काही करणे आहेत टी पुढीलप्रमाणे:

सायनस ला होणारा संसर्ग,सर्दी,एलर्जी किंवा नळीवर येणारी सूज,द्रव साचणे,कानातील संसर्ग (Ear Infection) ,गाडीमध्ये किंवा विमानात हवेच्या दाबात होणारा बदल.

कान बंद झाल्यास काही उपचार केले जातात ते पुढीलप्रमाणे-

  • कधी कधी जांभइ दिल्यामुळे मार्ग मोकळा होतो तसेच एखादी गोष्ट चघळल्याने सुद्धा मार्ग मोकळा होतो.
  • कधी कधी कानात पाणी गेल्यावर नाक आणि कान बंद करून श्वास घेतल्याने कानावर दाब येऊन मार्ग मोकळा होतो.
  • डॉक्टर क्युरेट नावाचे साधन वापरून कानातील अतिरिक्त मळ काढून टाकतात.
  • काही वेळेस प्रेशर वापरून सक्शन करून सुद्धा मळ काढू शकतात.

कानाचे दुखणे

कान दुखणे ज्याला कानदुखी असे म्हणतात. हे एक दुखण्याचे सर्वसामन्य लक्षण आहे.कानदुखी कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकते.कानदुखी हि सामान्य आहे परंतु काही विशिष्ट परिस्थितीत कानाचे दुखणे सामान्य नसून तीव्र वेदनादायी असते अशा परिस्थितीत त्याचा तपास करून उपचार करणे आवश्यक ठरते.

कानदुखीची मुख्य कारणे आणि लक्षणे- सामान्य दुखणे आणि कान दुखणे हे सहसा सामान्य असते.कान दुखणे हे कंटाळवाणे आणि गंभीर असू शकते.कानाच्या सामान्यह लक्षणांमध्ये काही लक्षणे समाविष्ट आहेत.

  • ऐकताना होणारा त्रास किंवा दुखणे.
  • समतोल राखण्यात समस्या.
  • दुखण्यामुळे झोप लागत नाही किंवा अस्वस्थता जाणवते.
  • काही सामान्य लक्षणे जरी असली तरी कानातून द्रव पदार्थ बाहेर येत असल्याची तक्रार.
  • ताप.
  • थंडी वाजून येणे किंवा खोकला लागणे.

कान दुखीची मुख्य कारणे काय आहेत.- सामान्यपणे संसर्ग ,दुखापत किंवा सूज या कारणांमुळे कानात वेदना होतात.

  • कानावरील बदलणारा हवेचा दाब.
  • कान साफ करण्यासाठी बड चा जास्त प्रमाणात केला जाणारा वापर.
  • कानात खूप जास्त मळ जमा होणे.
  • कानात द्रव पदार्थ जसे कि पाणी किंवा शाम्पू जाणे.

आणखी काही कारणामुळे कानात वेदना होतात.

  • ब्रेसेस दात असलेले.
  • जोइंट सिंड्रोम
  • कानाचे पडदे यामध्ये असलेला दोष (पडद्याला असलेले छिद्र)

कानाच्या वेदनेचे निदान आणि उपचार – जर आपल्याला वरील लक्षणांपैकी काही लक्षणे दिसून येत असतील तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.त्यावर डॉक्टर प्रभावी उपाय अथवा निदान सुचवतील.कानदुखी हि जंतू संसर्ग किंवा जीवाणू आणि विषाणू यांच्यामुळे होऊ शकते हे तपासण्यासाठी डॉक्टर कानातील द्रव नमुने घेऊन तपासणी करू शकतात.खाली काही उपाय दिले आहेत त्यांपैकी डॉक्टर कानाच्या दुखण्यावर उपाय सुचवू शकतात.

  • अचानक त्रास उद्भवत असेल किंवा सतत त्रास होणाऱ्या वेदना होत असतील तर त्या दूर करण्यासाठी मेडिकल मध्ये उपलब्ध असणारे वेदना शामक औषधे किंवा गोळी यांचा वपर आपण करू शकतो.
  • आपल्याला हिट थेरपी घेण्याचा सल्ला देखील डॉक्टर देऊ शकतात.आपण गरम कापड पाण्यात बुडवून कानाच्या प्रभावी भागावर कानाच्या बाहेरून देखील लावू शकतो.
  • कानदुखी गंभीर झाल्यास किंवा द्रवपदार्थ जास्त प्रमाणात येत असल्यास इअर ड्रोप देखील घेण्याकरिता डॉक्टर सांगू शकतात.
  • काही वेळा कानावरील दाब असमान असतो अशा बाबतीत आपणास साधारण च्युईंग गम वापरण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो यामुळे दाब मुक्त होण्यास मदत होते आणि परिणामी वेदना सुद्धा कमी होतात.

बहिरेपणा- एक किंवा दोन्ही कानांवर परिणाम होऊन आवाज ऐकू येण्याची क्षमता कमी होणे म्हणजेच ऐकण्याच्या अक्षमतेवर आधारित कमी आवाज ऐकू येणे किंवा मध्यम किंवा गंभीर अशा स्वरूपाचा असे वर्गीकरण केले जाऊ शकते.ऐकण्याची फारच कमी क्षमता म्हणजे बहिरेपणा असे आपण म्हणू शकतो. WHO या संस्थेच्या सर्वेनुसार सण २०५० पर्यंत जगात ८०-९० दशलक्ष किंवा त्याहून अधिक लोकांना बहिरेपणा असण्याची शक्यता असू शकते भारतात याचे प्रमाण खूप अधिक आहे.

बहिरेपणा याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे

  • एखाद्या ठिकाणी गोंगाट असताना सुद्धा आपल्याला ऐकण्यात त्रास होणे किंवा संघर्ष वाटणे.
  • एखाद्याशी बोलताना आपल्याकडून खराब प्रतिसाद जाने.
  • मोठ्या आवाजात संगीत आणि टी.व्ही.पाहणे.
  • एकच गोष्ट पुन्हा पुन्हा विचारावी लागणे.

बहिरेपणा वरील उपचार –

आपल्याला ऐकण्यात समस्या येत असेल तर आपलं कान स्वच्छ आहे किंवा नाही हे तपासावे तसेच ऐकण्याच्या समस्येचे व्यवस्थापन डॉक्टरांकडून करून घेणे.आवश्यक असल्यास ऐकण्याचे साधन आणि इम्प्लांट चा पर्याय असू शकतो.ओठांच्या हालचाली व सांकेतिक भाषा यांचा वापर करून आपलं संवाद सुधारू शकतो.

https://linktr.ee/thebareminimum.medic?fbclid=PAZXh0bgNhZW0CMTEAAaZpNqXRO-2H-7N-2Zs55rjSACj-fWB38uFNaxkdAd1QRx7DEdZF7eveLjQ_aem_bxUp2Ufd4TQ68dnJUsQ8DA

https://fityourself.in/1-diabetes-foul-मधुमेह/