रोजच्या आहारात भात खाणे (Eating Rice) योग्य आहे कि अयोग्य आहे. कारण बरेच लोक असे म्हणताना तुम्ही ऐकले असेल कि भात खाल्याने तुमचे वजन वाढेल परंतु असे काही ठिकाणी घडताना दिसून येत नाही जसे कि दक्षिण भारतात लोक सर्व तांदळाचे पदार्थ खात असतात परंतु त्यांचे वजन क्न्त्याही प्रकारे वाढल्याचे दिसून येत नाही. तसेच अनेक देशांमध्ये लोक जास्त भाताचे सेवन करतात त्या देशांमध्ये सुद्धा लोकांचे वजन वाढल्याचे दिसत नाही. तुमच्या मनात भात खाण्याबद्दल (Eating Rice) किंवा तांदूळ आणि बटाटा यांचे पदार्थ खाण्याबदल खूप काही गैरसमज आहेत. याबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे. तुम्हाला असे वाटत असेल कि तांदूळ किंवा बटाटा खाणे रोगास कारणीभूत ठरते किंवा वजन वाढण्याची समस्या निर्माण होते.
![](https://fityourself.in/wp-content/uploads/2024/12/WhatsApp-Image-2024-12-02-at-22.04.54-1024x875.jpeg)
भात खाण्याच्या समस्या (Problems with Eating Rice)
खूप लोक असे म्हणत असतात कि मधुमेहाचा त्रास किंवा इतर काही वजनाच्या समस्या निर्माण झाल्यास भात खाणे (Eating Rice) बंद केल्याचे सांगतात. उत्तर भारतीय लोक तर आहारात भाताचा समावेश करत नाहीत. सर्व धान्यामध्ये सर्वात चांगले धान्य हे तांदूळ असू शकते कारण पुरातन काळात अनेकजन आपल्याला तांदळाचा वापर करताना दिसून येतात. भारतीय संस्कृतीमध्ये नारळ किंवा तांदूळ हे शुभ मानून पूजेमध्ये वापरले जातात कारण यांचा आहारात वापर केला जावा यासाठी ते महत्वाचे मानले जातात. भात हा पदार्थ आहारात सहज बनला जाणारा आणि सहज पचणारा पदार्थ आहे. जोपर्यंत तांदूळ हा शेतामधून पोलिश न होता वापरला जात होता तोपर्यंत कोणालाही भात खाण्याबद्दल समस्या निर्माण झालेली नव्हती. जो तांदूळ पोलिश केलेला नसतो तो तांदूळ हल्ली मधुमेहासाठी वापरला जात असतो ज्याला ब्राऊन राईस असे सुद्धा म्हणतात.
दक्षिण भारतात तांदूळ हा आंबवून खाल्ला जातो कारण तांदूळ आंबवून त्याचे इडली डोसा असे पदार्थ बनविल्याने त्याचे पौष्टिक गुणधर्म आणखी वाढतात. जगामध्ये इडली हा पदार्थ अतिशय पौष्टिक असणाऱ्या पदार्थांमधील एक पदार्थ मानला जातो. तुम्ही आहारात जर भातासोबत चांगले फायबर असणारे किंवा विटामिन असणारे, खनिजे असणारे पदार्थ खात असाल तर अशावेळी भात खाण्यामुळे तुम्हाला कोणतीही समस्या होणार नाही. ब्राऊन राईस हा सर्व ठिकाणी उपलब्ध होईल असे नसते. भातामध्ये असणारे पाणी तुम्ही त्यामध्ये ठेवून भात शिजविला पाहिजे. भातामुळे अपचनाची समस्या होवू शकत नाही तर ती त्यासोबत खाल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे होते जसे कि पिठले, छोले, आमटी, वाटाणे यासारख्या पदार्थांमुळे.
![Eating Rice](https://fityourself.in/wp-content/uploads/2024/12/WhatsApp-Image-2024-12-02-at-22.04.23-1024x694.jpeg)
भात तुम्ही भाज्यांसोबत खाल्ला पाहिजे याशिवाय मुग डाळीसोबत तुम्ही भात खाऊ (Eating Rice) शकता. आजारी पडल्यावर सुद्धा बरेच लोक डाळखिचडी किंवा डाळ भात खात असतात याचे कारण ते पचनास हलके असते. दक्षिण भारतीय लोक भाताचा योग्य प्रमाणात वापर करत असतात. भात खाताना ज्या दली तुम्ही वापरणार आहात त्यामध्ये तुम्ही भाज्यांचा वापर करू शकता.चीन किंवा जपान सारखा देश जिथे लोक जास्त प्रमाणात भात खात असतात परंतु तिथे लठ्ठ लोक जास्त प्रमाणात नाहीत. भात आणि वजन वाढण्याचा कोणताही संबंध असल्याचे दिसून येत नाही. आजारामध्ये सर्वात हलका पदार्थ हा भात असतो म्हणून डॉक्टर सुद्धा डाळ भात रुग्णांना देण्याचे सुचवितात. भात हा तुमचा मेंदू कार्यक्षम करण्यामध्ये मदत करत असतो.
पांढरा तांदूळ जो असतो त्यामधून फायबर काढून घेतलेले असतात. यासोबतच भाताला कार्बोहायड्रेट चा स्त्रोत मानला जातो कारण भातामधून खूप पोषक तत्वे काढून घेतलेली असतात.
![](https://fityourself.in/wp-content/uploads/2024/12/WhatsApp-Image-2024-12-02-at-22.04.26-1024x837.jpeg)
वजन कमी करण्यामध्ये भात किती परिणामकारक आहे (Eating Rice for Weight loss and Weight gain)
काही अभ्यासानुसार भात हा परिष्कृत पदार्थांमध्ये गणला जातो. काही वेळा भात हा वजन वाढविण्यास मदत करणारा मानला जातो कारण भात हे बऱ्याच लोकांचे प्रमुख अन्न असते. भाताला असलेल्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांपेक्षा पांढरा भात हा अधिक चांगला मानला जातो. यामुळे पांढरा भात हा तुमचे वजन वाढविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी सुद्धा अनुकूल नाही. परंतु जेंव्हा तुम्ही ब्राऊन राईस खात असता तेव्हा तुमचे वजन कमी करण्यास मदत मिळत असते तसेच नियंत्रणास मदत होते. कारण ब्राऊन राईस हा अधिक पौष्टिक आणि फायबर असलेला असतो. खूप लोक अधिक प्रमाणात दैनंदिन भात खात असतात आणि भात हा पारंपारिक उर्जेचा स्त्रोत असतो. परंतु तुम्ही भातामधून कोणतीही पोषक द्रव्ये मिळवत नाही त्याऐवजी भातामधून तुम्हाला फक्त कॅलरी मिळत असतात.
वजन कमी करण्यासाठी पांढरा भात हा चांगला पर्याय नाही. तुम्हाला कोणतीही प्रक्रिया न केलेला भात खाल्ला (Eating Rice) पाहिजे. कारण यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असतात जे तुम्हाला अधिक काळ पोट भरलेले ठेवण्यास मदत करतात आणि पोषक तत्वे प्रदान करतात. यासाठी तुम्हाला पांढरा भात खाणे बंद करण्याची आवश्यकता नाही.