Health benefits of Safe Trekking or Hiking

Health benefits of Safe Trekking or Hiking

ट्रेकिंग (Trekking) आणि हाईकिंग म्हणजेच गिर्यारोहण किंवा चढ असलेल्या ठिकाणी उंच उंच डोंगर किंवा गडकिल्ले यांवर चढणे होय.यामुळे आपल्याला शारीरिक स्वास्थ्य लाभते तसेच याबरोबर आपल्या शरीराला मजबुती मिळते तसेच आपली कुवत वाढते आपली दम धरण्याची किंवा तग धरण्याची शक्ती वाढते.कारण उंच उंच ठिकाणी जाण्याने आपली श्वासोश्वास घेण्याची ताकद सोबतच शरीराची मजबुती वाढते.तसेच मानसिक आणि भावनात्मक रित्या आपण सदृढ बनतो तसेच आपला आत्मविश्वास वाढण्यास मदत होते,निसगार्चा एक वेगळा अनुभव येतो.ट्रेकिंग किंवा हाईकिंग केल्याने आपण विचार करतो त्यापेक्षा अधिक फायदे देतात.

ट्रेकिंग (Trekking) करणारे लोक इतर लोकांच्या तुलनेत सदृढ असतात आणि आनंदी असतात.लांब लांब चालत जाणे किंवा उंच ठिकाणे चढणे हा एक उत्तम व्यायाम आहे.

आपण येथे काही ट्रेकिंग चे फायदे जाणून घेऊया.(Trekking Benefits)

  • तुमचे स्नायू मजबूत होतात तसेच शरीरयष्टी सुधारते- ट्रेकिंग केल्याने आपले स्नायू मजबूत तसेच लवचिक बनतात तसेच स्नायूंच्या मांसपेशींना टोन करण्यास मदत होते आणि त्या मजबूत होतात.स्नायूंची शक्ती वाढते,विशेषतः तुमच्या पायांची म्हणजेच मांडीचे स्नायू,पोटरी चा भाग,गुडघे,आणि पायाचे सर्व स्नायू मजबूत होतात,आतील आणि बाहेरील मांसपेशी मजबूत होतात.तसेच आपले खांदे,कंबर हात यांचे स्नायू,हाडे सर्व लवचिक आणि मजबूत होण्यास सुरुवात होते.मोकळ्या सूर्यप्रकाशात बाहेर राहिल्याने शरीरातील व्हिटामिन डी चे प्रमाण वाढते.
  • हाडांची घनता वाढते.ज्यांना हाडांचे दुखणे आहे किंवा जोडांमध्ये दुखणे आहे अशा लोकांसाठी ट्रेकिंग हे अतिशय उत्तम आहे.पाठ,घोटा,गुडघा अशा सांध्यांमध्ये असणारी वेदना कमी करण्यास मदत करते.सपाट रस्तावर चालून आपल्याला सवय असते पण डोंगर किंवा ओबडधोबड ठिकाणी चालल्याने आपल्याला वेगळा अनुभव मिळेल आणि स्नायुंना चालना मिळेल.असमान पृष्ठभागावर चालल्याने आपली एकाग्रता सुधारते. ट्रेकिंग साठी जाताना आपण सोबत जी backpack म्हणजे पाठीला जी पिशवी घेवून जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त भार उचलण्याची सवय लागते आणि पाठीला आधार मिळतो आणि याचा फायदा होतो.
  • कमरेपासून वरचे शरीर सुद्धा ट्रेकिंग (Trekking) मुळे सदृढ आणि मजबूत होते.शरीर मजबूत आणि सुडौल होते.तसेच शरीराचे संतुलन सुधारते तसेच ट्रेकिंग केल्याने वजन खूप वेगाने कमी होण्याची शक्यता जास्त आहे.
  • शरीराची साखरेची पातळी आणि शरीरातील अतिरिक्त वजन घटवते- शरीरातील क्रिया नियंत्रित करण्यासाठी याचा खूप मोठा फायदा होतो.ट्रेकिंग मुळे शरीरातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत होते आपले शरीर मधुमेह प्रकार -२ यापासून लढण्यास सक्षम होते.आपले शरीराचे स्नायू ट्रेकिंग (Trekking) दरम्यान खूप तीव्रतेने काम करत असल्याने अशा वेळी त्यांना उर्जेची गरज भासते त्यावेळी शरीर रक्तातील साखरेचे ऊर्जा मिळविण्यासाठी इंधन म्हणून वापर करते यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते.
  • शरीरातील खूप वेगाने होणाऱ्या क्रियांमुळे शरीराची इन्सुलिन सहनशीलता वाढते.जेंव्हा शरीरातीलसाखरेचे उर्जेत रुपांतर होते ते संपुष्टात आल्यास शरीर ऊर्जा मिळविण्यासाठी चरबीचा वापर करते.खूप जास्त व्गाने होणाऱ्या हालचालींमुळे शरीर असे इंधन प्राप्त करते आणि ते २०० कॅलरीज प्रती तास इतक्या कॅलरीचे ज्वलन करते जेंव्हा तुमच्या पाठीवर ३० पौंड ची पिशवी असेल.
  • आठवड्याचे जे ट्रेकिंग असतात त्यामध्ये १२ ते १५ तास एवढे चालणे असते.आपण ३-४ तास यापासून सुद्धा सुरुवात करू शकतो.
  • तुमच्या शरीरातील किती चरबी बर्न झाली हे मोजायला सुरुवात करा- तुम्ही किती कॅलरी बर्न करता हे तुम्ही किती वजन घेवून जाता याच्याशी समान गुणोत्तर आहे.आणि तुम्ही १० % तिरक्या भागावर चढत आहात असे समजले पाहिजे कि यामुळे तुमच्या ३० ते ३५ टक्के कॅलरी बर्न होणार आहेत आणि त्यामध्ये वाढ होत असते.तसेच आपल्या पाठीवरील वजन १० ते १५ % fat बर्न करण्यास मदत करत असते.परंतु असे असल्याने पाठीवर जास्त वजन ठेवू नका.आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार वजन घेवून जा.
  • ह्रदयाची आणि फुफ्फुसाची क्षमता वाढवते- नियमित ट्रेकिंग आणि हाईकिंग केल्याने आपल्या शरीराचा रक्तदाब १० पोइंट नी कमी करते.तसेच शरीरातील कोलेस्ट्रोल आणि ट्राईग्लीसरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते.ट्रेकिंग आणि हाईकिंग मुळे रक्ताभिसरण आणि श्वसन प्रणाली सुधारण्यास मदत होते आणि नियंत्रणात ठेवते.तसेच ह्रदयविकार,फुफ्फुसाचे विकार,ह्रदयाचा झटका,श्वसनाचे आजार यापासून संरक्षण करण्यास मदत करते.आपल्या शरीराला जितकी शुद्ध हवा मिळेल तितके आपले फुफ्फुस सक्रीय बनते फुफ्फुस आणि ह्रदयाची रक्त पंप करण्याची क्षमता सुधारते आणि ह्र्दय निरोगी बनते.
  • ट्रेकिंग (Trekking) करताना चालण्यासाठी काठीचा वापर करा- तुमच्या हातात जमिनीला टेकेल अशी काठी घ्या आणि तिला जमिनीला दाब देवून आपल्या शरीराला पुढे नेण्याचा प्रयत्न करा यासाठी तुम्ही काठीचा वापर करा.काठीच्या सहाय्याने शरीराला पुढे ढकलल्याने आपले स्नायू आणि ह्र्दय यांवर कार्य होते.
  • आपली सुप्त कौशल्ये वाढतात – तुमचे नियंत्रण किंवा नियोजन करण्याचे कौशल्य यावर प्रभुत्व मिळविण्यासाठी ट्रेकिंग अभियान एक उत्तम अभियान ठरू शकते.ट्रेकिंग मध्ये तुमचे नियोजन,संघ बांधणी,संवाद,संभाषण यामध्ये परिवर्तन येते.यामुळे मानसिक शक्ती वाढते आणि एक दृढ संकल्प करतो यामुळे आपल्याला आपले जे ध्येय आहे त्याकडे पोहोचण्यासाठी मदत होते.एक प्रकारे आपल्याला आत्मविश्वास मिळतो.
  • तुम्ही मानसिक दृष्ट्या सदृढ झाल्याने खूप काही बदल तुमच्या दैनदिन कामात दिसून येतील आणि त्याचे परिणाम तुमच्या प्रगतीवर दिसून येतील.तुमची वैयक्तिक वाढ होईल आणि ध्येय पूर्ण होतील तसेच व्यक्तिगत विकास होईल.
  • तणाव विरोधी आणि मूड बदलणे – जेंव्हा तुम्ही ट्रेकिंग (Trekking) करत असता तेव्हा आपल्याला कशाचीही चिंता वाटत नाही किंवा कसलेही विचार मनात नसतात आणि आपण आनंदी असतो.कारण त्यावेळी आपण निसर्गाचा अनुभव घेत असतो तसेच निसर्गातील विविध आवाजांचा तसेच कलाकृतींचा अनुभव आपण घेत असतो.आपण निसर्गातील मैदाने,जीवजंतू आणि विविध रचनात्मक गोष्टींचा अनुभव घेत असतो.यामुळे आपण अधिक उत्साही आणि तणावमुक्त होतो आणि चांगली झोप घेतो आणि आनंदी जीवन जगू शकतो.
  • कॅन्सर सारख्या दुर्मिळ आजारांपासून लढण्यास मदत होते – एका संशोधनानुसार ट्रेकिंग (Trekking) केल्यामुळे तुम्ही दुर्मिळ आजारांपासून बचाव करू शकता जसे कि फुफ्फुस,छाती,त्वचा आणि इतर कॅन्सर पासून वाचू शकता.International Journal of Sports medicine च्या अहवालानुसार कॅन्सर चे रुग्णामध्ये antioxidant चे प्रमाण कमी असते परंतु ट्रेकिंग किंवा हाईकिंग केल्याने त्यांच्या शरीरातील antioxidant चे प्रमाणामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.शरीरात antioxidant चे प्रमाण जास्त असल्याने आपल्या शरीराची संसर्ग आणि आजारांपासून लढण्याची क्षमता वाढते.
  • ट्रेकिंग (Trekking) आणि हाईकिंग केल्यामुळे निसर्गच तुम्हाला आजारांपासून लढण्यासाठी प्रभावीपने मदत करणार आहे.ट्रेकिंगशी संबंधित खूप काही शारीरिक फायदे आहेत जे म्हणजे ताजा ऑक्सिजन शरीरामध्ये जाणे,इंडोर्फीन हार्मोन मुळे सकारात्मक मानसिक भावना ,आनंद,सामाजिक संपर्क,भ्रम,चिंता आणि राग कमी होतो,शरीरातील उर्जा वाढवते.एड्रेनाईल हार्मोन वाढवते आणि त्यामुळे चांगली जीवनपद्धती आणि अनुकरण करतो.

ट्रेकिंग (Trekking) कोणत्या वयोगटातील लोक करू शकतात- ट्रेकिंग हे आपल्या क्षमतेवर अवलंबून असते तरुण ते वृद्ध वयोगट अशा कोणत्याही गटातील लोक ट्रेकिंग करू शकतात परंतु ट्रेकिंग करण्याआधी स्वतःला तंदुरुस्त ठेवणे अतिशय आवश्यक आहे.तुम्ही चालायला जाण्यापासून सुरुवात करू शकता .रोज सकाळी ३० मिनिटे चालू शकता.तुमच्या चालण्यामध्ये सावकाश तसेच मध्यम आणि जोराने असे तीन प्रकार असावेत असे केल्याने तुम्हाला एक सवय लागेल नंतर तुम्ही हळूहळू धावू शकता जेणेकरून तुमची कुवत वाढेल श्वास घेण्याची क्षमता वाढेल.

ट्रेकिंगला (Trekking) जाण्यासाठी किंवा धावण्यासाठी पायामध्ये चांगले बूट असणे आवश्यक आहे यामुळे पायाला चांगली ग्रीप मिळेल आणि तुम्हाला चालण्याचा त्रास होणार नाही.तसेच तुम्ही जे कपडे परिधान करता ते सुद्धा हलके आणि ढिले असावेत.जास्त वयोगटातील लोकांनी छोटे छोटे ट्रेक करावेत त्यांनी जास्त उंचीवर जाता कामा नये म्हणजेच वयोमानानुसार किंवा आपल्या कुवतीनुसार ट्रेक करावेत.किंवा जंगल मध्ये ट्रेक करावेत.कारण जंगल ट्रेक मध्ये ऑक्सिजन चांगल्या प्रकारे मिळेल आणि फक्त पायी चालण्याचे असल्याने उपयुक्त ठरेल.

ट्रेकिंगमध्ये (Trekking) खाण्यापिण्याचे विशेष लक्ष द्यावे लागते कि काय खायला हवे आणि काय नको याबद्दल.ट्रेकिंग करण्यासाठी मार्गदर्शक असतात ते सर्व गोष्टी तुम्हाला शिकवितात तसेच ते सर्व व्यवस्थापन सुद्धा करतात.ट्रेकिंगला जाण्याआधी तुम्हाला योगासने,श्वासाचा व्यायाम किंवा शारीरिक व्यायाम या गोष्टी नियमित करणे आवश्यक आहे.किमान एक महिना आधी तुम्ही तयारी करायला हवी.कारण तुम्हाला ट्रेक पूर्ण करायची असते आणि जेंव्हा तुम्ही ते पूर्ण करता तेव्हा तुम्हाला मानसिक आणि शारीरिक समाधान मिळते.

हल्ली लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ट्रेकिंगचे वेड लागले आहे.दर आठवड्याच्या शेवटी बरेचजन गडकिल्ले, डोंगर, टेकडी परिसरात लोक ट्रेकिंगसाठी बाहेर पडत आहेत.ट्रेकिंगला जाण्यासाठी शहरातून ग्रुप तयार होत आहेत.आणि ट्रेक चे आयोजन करणारे सुद्धा त्या प्रमाणात वाढत आहेत.कारण ट्रेकिंगमुळे विरांगुळ्यासोबत व्यायामसुद्धा होतो.परंतु काही वेळा आपण अतिउत्साहाने शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करतो पण असे करताना काळजी घ्यायला हवी.

ट्रेकिंग करताना घ्यावयाची काळजी (Care While Trekking)

  • आपण ज्यांच्यासोबत जात आहोत त्यांनी याआधी या ठिकाणी ट्रेक केला आहे का किंवा हे ठिकाण पहिले आहे का हे तपासून पहा.
  • ट्रेकिंगचे ठिकाण किती लांब आहे किंवा कसे आहे याची माहिती घ्या.
  • ट्रेकिंग च्या ठिकाणापासून काही गाव किंवा वस्ती आहे का हे पहा.
  • ट्रेकिंगमध्ये किंवा जवळ वैद्यकीय सेवा आहे का हे पहा.
  • अत्यावश्यक वस्तू सोबत घेत आहोत याची खात्री करा,
  • ट्रेक साठी मिळणारे सूट,शूज,काठी सोबत घ्या.
  • ट्रेकिंग करणाऱ्या ठिकाणी सामाजिक भान ठेवा आणि मदतीची भावना ठेवा.
  • कोणत्याही प्रकारचे वेगळे धाडस करू नका.
  • विचित्र प्रकारे फोटो,व्हिडीओ बनवणे टाळा.
  • आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असे वर्तन करू नका.

https://fityourself.in/top-foods-essential-to-eat/

https://linktr.ee/thebareminimum.medic?fbclid=PAZXh0bgNhZW0CMTEAAaZpNqXRO-2H-7N-2Zs55rjSACj-fWB38uFNaxkdAd1QRx7DEdZF7eveLjQ_aem_bxUp2Ufd4TQ68dnJUsQ8DA