सकाळी लवकर उठण्यासाठी टिप्स| Healthy Tips to Wake up early in the Morning

तुम्ही पण या समस्येने ग्रस्त आहात कि सकाळी लवकर (Wake up early) कसे उठावे ? कारण आपण रोज हा निर्णय घेतो कि उद्या आपल्याला लवकर उठायचे आहे आणि त्यासाठी आपण अलार्म लावतो आणि जेंव्हा अलार्म वाजतो तेव्हा आपण तो एकतर पुढे ढकलतो जसे कि ५ मिनटे १० मिनिटे ३० मिनटे असे करत करत आपण आपल्या नेहमीच्या वेळीच उठत असतो हे बऱ्याच जणांच्या बाबतीत होत असते. कारण आपण बरीच वर्षे जी गोष्ट करत आलेलो नाही टी एका दिवसात कशी होईल, आपल्या मेंदूमध्ये एक घट्ट गोष्ट बसलेली असते आणि आपले शरीर सुद्धा त्याला प्रतिसाद देत असते.

बऱ्याच ठिकाणी आपण ऐकत असतो कि यशस्वी होण्यासाठी लवकर उठणे (Wake up Early) गरजेचे आहे. आपण येथे याविषयी जाणून घ्यायचे आहे कि लवकर उठण्यासाठी काय करावे आणि त्यामुळे काय होते.

Why Wake up early in the morning ? (सकाळी लवकर उठणे का आवश्यक आहे)

(Success way of Wake up early) यशस्वी होण्याचा एक मार्ग लवकर उठणे – एका अभ्यासानुसार असे लक्षात आले आहे कि जे लोक लवकर उठतात ते अधिक कार्यक्षम असतात, ते चांगले नियोजन करणारे असतात कारण त्यांच्याकडे समस्यांचे समाधान करण्यासाठी वेळ असतो. सकाळी लवकर उठणाऱ्या (Wake up Early) व्यक्तींमध्ये एक आशावादी दृष्टीकोन आणि सकारात्मक ऊर्जा असते.सकाळी लवकर आपले शरीर अल्फा तरंगामध्ये असते तर दिवसभर बीटा अवस्थेत असते. सकाळी आपल्या मेंदूमध्ये रचनात्मक कल्पना असतात. कारण दिवसभर आपल्या मेंदूमध्ये अनेक विचार असतात.

असा विचार करा कि तुम्ही रेल्वे स्टेशन वर अभ्यास करत आहात आणि तोच अभ्यास तुम्ही सकाळी करत आहात यामध्ये खूप फरक आहे. सकाळी तुमचे मन एकाग्र असते. विद्यार्थ्यांसाठी सकाळचे २ तास हे खूप महत्वाचे असतात कारण त्यावेळी मेंदूमध्ये कोणतेही विचार नसतात आणि त्यामुळे २ तासातील अभ्यास हा दिवसाच्या ८ तासांच्या बरोबर असेल. परंतु सकाळी लवकर उठणे हे खूप लोकांना जड जाते याचे कारण आहे कि त्यांच्या शरीराचे एक दिवसाचे चक्र आहे ते निश्चित असते आणि त्यामध्ये व्यक्ती गुरफटलेला असतो. आपल्या शरीरात एक घड्याळ असते जसे भिंतीवरील घड्याळ असते त्यामध्ये आपल्या वेळा आपण स्वतःच निश्चित करून घेतलेल्या असतात. त्यामधील क्रिया ह्या सुर्यासोबत चालणाऱ्या सुद्धा असतात.

जेंव्हा खूप वर्षांपूर्वी गावागावात विजेची उपलब्धता नव्हती त्यावेळी लोक सूर्य उगवल्यावर उठत होते आणि सूर्य मावळन्यासोबत त्यांचा दिवस संपायचा यामुळे लोक लवकर झोपायचे आणि त्यामुळे ते लवकर उठायचे (Wake up Early) सुद्धा त्यांना कोणत्याही अलार्मची आवश्यकता नसायची. सध्या आपल्याकडे वीज आल्यापासून टी,व्ही., मोबाईल,संगणक यासारखी उपकरणे आली आहेत आणि त्यामुळे रात्री उशिरापर्यंत आपण त्यांच्यामध्ये गुंतलेलो असतो. तसेच वीज २४ तास असल्यामुळे आपल्याला सूर्याचे उगवणे आणि मावळणे याबद्दल काही घेणे देणे नसते. निसर्गतः तुम्ही जर रात्री उशिरा झोपत असाल तर स्वाभाविक आहे कि तुम्ही उशिरा उठाल कारण तुमचे चक्र बदलत चालले आहे ते सूर्याप्रमाणे न चालता तुमच्या एका वेगळ्या जीवनशैलीवर अवलंबून होत आहे.

Wake up early

Sleep and Wake up Early

रात्रीच्या १० वाजण्याच्या दरम्यान तुमचा मेंदू झोपेसाठी प्रेरित करणारे रसायन मेलेटोनीन स्त्रवत असते त्यामुळे तुम्हाला झोप येत असते परंतु तुम्ही त्याचा फायदा करून घेत नाही उलट तुम्ही ते टाळत असता आणि तुम्ही झोपी जाण्याच्या ऐवजी इतर काही उपकरणे वापरता किंवा आणखी काही कार्ये करत राहता असे केल्याने मेलेटोनीन तयार होऊन सुद्धा फायदा होत नाही. याउलट तुम्ही जर नियमित त्या वेळेस झोपी गेलात तर मेलेटोनीन चे स्त्रावण्याचे प्रमाण वाढत जाते आणि तुम्हाला एक चांगली सवय लागते आणि सकाळी तुम्हाला लवकर जाग येते.

तुमच्या झोपेची गुणवत्ता सुद्धा अतिशय महत्वाची आहे म्हणून झोपेच्या आधी तुमची उपकरणे जसे कि मोबाईल, टी.व्ही., संगणक हे सर्व बंद केले पाहिजे आणि आराम करण्यास सुरुवात केली पाहिजे यामुळे तुमचा मेंदू स्थित व्हायला सुरुवात होईल आणि तुम्ही झोपेच्या स्थितीमध्ये यायला सुरुवात होईल. असे केल्याने तुम्हाला झोपेमध्ये कोणताही अडथळा येणार नाही आणि तुम्हाला जी झोप लागेल त्याची गुणवत्ता अतिशय चांगली असेल. झोपेची गुणवत्ता हि एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे तुमच्या सकाळी लवकर उठण्यासाठी. तसेच झोपण्यापूर्वी आपल्या प्रगतीविषयी आपण विचार केला पाहिजे आणि आत्मपरीक्षण केले पाहिजे. जेंव्हा तुम्ही सकाळी लवकर उठाल तेव्हा तुम्ही प्रेरित झाले असले पाहिजे काहीतरी नवीन करण्यासाठी.

Activities after Wake up Early and time for Wake up Early

बहुतांश लोक सकाळी उठल्यावर मोबाईल हातात घेवून त्यामध्ये सोशल मिडिया तसेच संदेश बघणे, व्हिडीओ पाहणे हि कार्ये करतात यामुळे तुम्ही लवकर उठून सुद्धा काही फायदा होणार नाही. म्हणजेच तुमच्या मेंदूमध्ये पुन्हा गोंधळ निर्माण होणारी गोष्ट तुम्ही करत असता यापासून तुम्हाला सावध राहिले पाहिजे. आपले पूर्वज पहिले तर ते खूप काळापासून सकाळी लवकर उठताना आपल्याला दिसतील का बरे ते असे करत असतील ? याचा विचार आपण कधीच केलेला नाही. शास्त्रांमध्ये पण असे लिहिलेले आढळून आले आहे कि ब्राम्ह मुहूर्त म्हणजे पहाटेची वेळ (time of Wake up Early) जी आपली झोपेतून उठायची वेळ असली पाहिजे.

पहाटे ४ ते ६ पर्यंतची जी वेळ असते ती अगदी पहाटे उठण्याची सुवर्णवेळ असे म्हणले तरी हरकत नाही. जेंव्हा वातावरण शांत असते, हवेत कोणतेही प्रदूषण नसते, निसर्गाचा आनंद तुम्ही घेऊ शकता, तुमचे मन कुठेही भरकटलेले नसते या सर्वाचा वापर आपण आपल्या शरीरासाठी तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी केला पाहिजे, आत्मपरीक्षणासाठी केला पाहिजे. सकाळी उठल्यावर तुमचे पोट रिकामे असते त्यामुळे शरीरातील स्नायू, मासपेशी, ऊती या सर्वांना उत्तेजित करण्यासाठी हि खूप चांगली वेळ ठरते म्हणून यावेळी तुम्ही व्यायाम करू शकता जसे कि योगासने, प्राणायाम, चालणे, धावणे असे व्यायाम करू शकता. वरील सर्व गोष्टी करणे तुम्हाला तेव्हाच शक्य आहे जेंव्हा तुम्ही सकाळी लवकर उठता.

लवकर उठणे (Wake up Early) तुम्हाला एक बुद्धिमान, निरोगी आणि धनवान सुद्धा बनवू शकते कारण जो व्यक्ती लवकर उठतो तो खूप काही गोष्टी करू शकतो. तुम्ही लगेच हे सर्व आत्मसात करू शकत नसाल तरी हळूहळू तुमच्या जीवनशैलीत बदल नक्कीच करू शकता. यासाठी तुम्ही एक तंत्र अवलंब करू शकता जसे कि १५ मिनिटे आधी उठण्याची सवय करून घ्या मग पुन्हा १५ मिनिटे असे करत करत तुम्ही तुमचे ध्येय नक्की गाठू शकता. ज्यावेळी तुम्ही तुमचे ध्येय गाठाल त्यावेळी तुम्ही ते नियमित करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला हे सर्व तुमच्यासाठी खूप कठीण जाईल परंतु तुमच्या शरीराचे अंतर्गत चक्र जेंव्हा कार्य करण्यास सुरुवात करेल त्यावेळी तुम्हाला झोप अपोआपच यायला सुरुवात होईल तसेच तुम्हाला जाग सुद्धा वेळेवर यायला सुरुवात जोईल.

आपण ज्या आधुनिक जगातील जीवनशैलीत गुंतलेलो आहे त्यामधून तुम्ही हळूहळू बाहेर पडायला सुरुवात होईल. आणि तुम्ही हळूहळू निसर्गाने ज्या क्रिया सामान्यपणे ठरवून दिलेल्या असतील त्या होण्यास सुरुवात होईल. त्याचसोबत तुम्हाला उत्तम झोपेचा अनुभव सुद्धा घेतां येईल. सकाळी लवकर उठलेले १ किंवा २ तास तुम्ही तुमच्या शरीरासाठी आरोग्यासाठी वापरू शकाल ज्यामुळे दिवसभर तुम्ही उत्साही राहाल कामामध्ये तुम्ही प्रगती कराल तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल तुम्हाला स्वतःला दिसून येईल.

Night Sleep is importance to Wake up Early

सकाळी लवकर उठण्यापेक्षा रात्री लवकर झोपणे अधिक कठीण आहे यासाठी तुम्हाला रात्री मंद उजेडात पुस्तक वाचणे किंवा गाणी ऐकणे किंवा थंड पाण्याने अंघोळ करणे तसेच तुम्ही तुमच्या पायाला तेलाने मसाज करू शकता, तुम्ही मेडीटेशन करू शकता, झोपण्यापूर्वी श्वासाचा व्यायाम करू शकता जे तुमच्या मेंदूला शांत करेल अशा गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत.

झोपायला जाण्यापूर्वी तुम्ही एक तास आधीचा अलार्म लावू शकता. लवकर झोपण्यासाठी तुम्हाला लवकर बेडवर जाणे महत्वाचे आहे आणि हे तेव्हाच घडेल जेंव्हा तुम्ही रात्रीचे जेवण लवकर कराल. म्हणून रात्रीचे जेवण लवकर करा आणि हलके करा. रात्रीच्या जेवणात अपचन होणारे अन्न तसेच जंक फूड टाळायला हवे. जेंव्हा तुम्ही रात्री अधिक अन्न खाता तेव्हा तुम्ही तुमच्या झोपेच्या वेळेनंतर सुद्धा झोपू शकत नाही कारण याला प्रतिकार होण्यास सुरुवात होते. कारण तुमची जास्तीत जास्त शक्ती हि तुम्ही खाल्लेले जड अन्न पचविण्यात वाया जात असते . रात्री झोपू न शकल्याने सकाळी तुम्ही लवकर उठू शकत नाही. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी ३० मिनिटे कोमट दुध पिऊ शकता यामध्ये तुम्ही केसर, अश्वगंधा, हळद, दालचिनी असे पदार्थ टाकू शकता यामुळे दुधाचा परिणाम चांगला होईल.

संध्याकाळी चहा, कॉफी असे पदार्थ टाळा. रात्री उशिरा व्यायाम करणे सुद्धा टाळा. झोपण्यासाठी पूर्व दिशेला डोके करणे उत्तम असते तसेच डाव्या कुशीवर झोपणे अधिक चांगले असते कारण यामुळे पचन सुधारते. या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करतात. तुमच्या मेंदूला सकाळी लवकर उठण्यासाठी जागरूक करा. जसे तुम्ही सकाळी ट्रेन, बस, फ्लाईट पकडण्यासाठी अलार्म च्या आधी उठता तसेच मेंदूला जागरूक करू शकता. तुम्ही झोपण्याच्या मनातल्या मनात ५ ते १० वेळा म्हणू शकता कि तुम्हाला किती वाजता उठायचे (Wake up Early) आहे ते. तुमच्या मेंदूला सकाळी लवकर उठण्यासाठी काहीतरी योग्य कारण माहित असले पाहिजे जेणेकरून आपल्याला सकाळी आपला मेंदू जागरूक करेल. तुमचा अलार्म जेंव्हा वाजतो तेव्हा ती १० मिनिटे तुमच्यासाठी महत्वाची असतात म्हणून या वेळेत उठण्याचा प्रयत्न करा.

https://fityourself.in/sunlight-powerful-and-healing/

https://linktr.ee/thebareminimum.medic?fbclid=PAZXh0bgNhZW0CMTEAAaZpNqXRO-2H-7N-2Zs55rjSACj-fWB38uFNaxkdAd1QRx7DEdZF7eveLjQ_aem_bxUp2Ufd4TQ68dnJUsQ8DA