About Heart Attack
![About Heart Attack](https://fityourself.in/wp-content/uploads/2024/09/WhatsApp-Image-2024-09-09-at-4.00.01-PM-1024x694.jpeg)
ह्रदयाचा (Heart Attack) झटका येण्याचा धोका कमी करण्यासाठी तुमची कोलेस्ट्रोल ची पातळी नेहमी १३० mg -dl च्या खाली ठेवा: कोलेस्ट्रोलचा मुख्य स्त्रोत प्राण्यांपासून चे उत्पादित आहेत,जे शक्य आहेत तितके टाळले पाहिजेत.तुमची कोलेस्ट्रोल ची पातळी जास्त असल्यास तुम्हाला यकृतातील अतिरिक्त झालेली चरबी कमी करण्यासाठी औषधे घ्यावी लागतील.
आपण सर्व जेवण बनवताना तेलाचा वापर करतो त्यामुळे तेलाचा शक्य तितका कमी वापर करा.पण मसाल्यांचा वापर करावा मसाल्यांमध्ये बरेच औषधी गुणधर्म असतात.तेलामुळे फक्त अन्नाची चव वाढते.तेलाशिवाय अन्न तयार करण्याची पद्धत वापरा. या पद्धतीमध्ये तेलाचे प्रमाण शून्य ठेवले जाते.
तेलामध्ये triglycerides असत्तात आणि रक्तामधील कोलेस्ट्रोलची पातळी १३० mg-dl च्या खाली ठेवावी कारण यामुळे तुमचा ह्र्द्यावरील ताण ५० टक्के कमी होतो.यामुळे तुम्हाला यामुळे ह्रदयविकार टाळण्यास मदत होते.कारण मानसिक तणाव हे ह्र्दयविकाराचे मुख्य कारण आहे.हे तुम्हाला तंदुरुस्त आणि फिट राहण्यास मदत करेल.
रक्तदाब – नेहमी १२०-८० mmhg च्या आसपास ठेवा.वाढलेला रक्तदाब विशेषतः १३०-९० च्या वर अवरोध होऊ शकतो आणि दुप्पट वेगाने वाढेल यामुळे तणाव कमी करून ध्यानधारणा करून,मिठाचे सेवन कमी करून अगदी सौम्य औषधे घेऊन रक्तदाब कमी केला पाहिजे.
तुमचे वजन सामान्य ठेवा- तुमचा बॉडी मास इंडेक्स २५ च्या खाली असावा.तुम्ही तुमचे वजन किलोग्राममध्ये वजा करून तुमच्या उंचीच्या चौरस मीटरमध्ये मोजू शकता.तेल न खाऊन आणि कमी फायबरयुक्त धान्य आणि भाज्यांचे सलाड खाऊन तुम्ही तुमचे वजन नियंत्रित करू शकता.
व्यायाम- नियमितपणे अर्धा तास चालणे महत्वाचे आहे. चालण्याचा वेग असा असावा कि छातीत दुखू नये आणि धडधड होणार नाही.हे तुमचे चांगले कोलेस्ट्रोल वाढवण्यास मदत करू शकते.१५ मिनिटे ध्यान करा आणि दररोज हलका योग व्यायाम करा.यामुळे तुमचा ताण आणि रक्तदाब कमी होईल.आंनी ह्रदयविकारावर (heart attack ) नियंत्रण ठेवण्यास ते उपयुक्त ठरेल.
अन्नामध्ये फायबर आणि antioxidant जेवणांत कोशिंबीर,भाज्या आणि फळे अधिक वापर.हे तुमच्या आहारातील फायबर आणि antioxidant चे स्त्रोत आहेत आणि एचडीएल आणि चांगले कोलेस्ट्रोल वाढवण्यास मदत करतात.जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर साखर नियंत्रणात ठेवा- रक्तातील साखर १०० mmdl च्या खाली असावी आणि खाल्यानंतर दोन तासांनी टी १४० mmdl च्या खाली असावी व्यायाम करून,वजन कमी करून जास्त फायबर खावून आणि साखरयुक्त पदार्थ टाळून मधुमेहाला धोकादायक बनू देऊ नका.आवश्यक असल्यास सौम्य औषधे घेणे फायदेशीर ठरू शकते.
ह्र्दयविकाराला (heart attack ) संपूर्ण प्रतिबंध- ह्रदयविकाराचा झटका (heart attack) टाळा आणि ह्रदयात अधिक ब्लॉक निर्माण होऊ देऊ नका.जर तुम्ही हे करू शकलात तर तुम्हाला ह्रदयविकाराचा झटका येणार नाही.
ह्र्दयविकारातील फायदेशीर भाज्या (Use vegetables इन heart attack) – आपल्या आहारात अशा अनेक भाज्या आहेत ज्याचा वापर दररोज केल्याने ह्रदयाचे सर्व आजार टाळता येतात ते आहेत.
कांदा- कांदा हा सलाड म्हणून वापरता येतो.याच्या वापराने रक्तप्रवाह सुरळीत होतो.कमकुवत ह्र्द्यामुळे (heart attack) ज्यांना अस्वस्थता येते किंवा ह्रदयाचे ठोके (heart Beats) वाढतात त्यांच्यासाठी कांदा खूप फायदेशीर आहे.
tomato – व्हिटामीन सी,बीटाकॅरोटीन,लाय्कोपीन,व्हिटामिन ए,potasium मुबलक प्रमाणात आढळतात,ज्यामुळे ह्रदयविकाराचा धोका कमी होतो.
दुधी भोपळा- दुधी भोपळ्याच्या वापरणे कोलेस्ट्रोलची पातळी पूर्वपदावर येऊ लागते.ताज्या दुधी भोपळ्याचा रस घ्या,त्यात ४ पुदिन्याची पाने आणि २ तुळशीची पाने घाला आणि दिवसातून दोनदा प्या.
लसून- लसणाचा वापर जेवणात करा.दोन पाकळ्या सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत गीळल्यानेही फायदा होतो.
गाजर- ह्रदयाची धडधड (heart Beat) कमी करण्यासाठी गाजर खीप फायदेशीर आहे.गाजराचा रस प्या,भाज्या ख आणि सलाड म्हणून वापर.
ह्र्दय निरोगी ठेवण्यासाठी काही उपाय- (Prevent heart attack)
![ह्र्दय निरोगी ठेवण्यासाठी काही उपाय- (Prevent heart attack)](https://fityourself.in/wp-content/uploads/2024/09/WhatsApp-Image-2024-09-09-at-4.46.56-PM.jpeg)
ग्रीन टी चा वापर- त्यात antioxidant असतात जे तुमचे कोलेस्ट्रोल कमी करतात. आणि ते रक्तदाब नियान्त्रोत ठेवण्यासही उपयुक्त असतात.त्यात काही घटक आढळतात जे कर्करोगाच्या पेशी नष्ट करतात.हे असामान्य रक्त गोठविन्यास देखील प्रतिबंधित करते,ज्यामुळे स्ट्रोक टाळण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे.
ओलिव्ह ओईल चा वापर- घरात स्वयपाकासाठी ओलिव्ह ओईल वापरा.यामध्ये खराब fat एचडीएल कोलेस्ट्रोल कमी करण्यास मदत करते.ओलिव्ह ओईल मध्ये antioxidant देखील असतात,जे इतर अनेक रोगांशी लढण्यास मदत करतात.
पुरेशी झोप – विशेषतः ४० वर्षाच्या जास्त वयाच्या व्यक्तीसाठी चांगली झोप खूप महत्वाची आहे.पुर्शी झोप न मिळाल्याने शरीरातून स्ट्रेस हार्मोन्स बाहेर पडतात,ज्यामुळे धमण्या ब्लॉक होतात आणि चिडचिड होऊ लागते.
फायबरयुक्त आहार- संशोधनाच्या आधारे हे सिद्ध झाले आहे कि आपण जितके जास्त फायबर खावू तितके ह्र्दयविंकाराचा झटका (heart attack) येण्याची शक्यता कमी होईल.अधिक बिन्स,खूप सलाड खा.
मांस खाण्याऐवजी सीफूड खाणे उपयुक्त ठरते.न्याहारीमध्ये फळांचा रस प्या.संत्र्याच्या रसामध्ये फॉलिक acid असते ज्यामुळे ह्र्दयविकाराचा (heart attack) धोका कमी होतो.द्राक्षाच्या रसामध्ये फ्लेव्होनोईडस आणि रेझवेट्रल असतात जे धमणी-अवरोधित गुठळ्या कमी करतात.बहुतेक रस तुमच्यासाठी चांगले आहेत फक्त ते साखरयुक्त असल्याची खात्री करा.
दररोज व्यायाम करा- जर आपण दिवसातून २० मिनिटे व्यायाम करत असू तर आपल्याला ह्र्दयविकाराचा (heart attack) धोका असतो व झटका येण्याचा धोका एक तृतीयांश कमी होतो.फिरायला जाणे,एरोबिक्स किंवा डान्स क्लास करणे फायदेशीर ठरेल.
जेवणात लसणाचा वापर- तुमचा रक्तदाब वाढला असेल तर असे आढळून आले आहे कि लसून खाल्याने रक्तदाब कमी होतो.यामुळे कोलेस्ट्रोल कमी होऊन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.यामुळे आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.
आपले ह्र्दय आणि आयुर्वेद- आज जगातील सुमारे ९० टक्के लोकसंख्या ह्र्दयविकाराने ग्रस्त आहेत,ज्याचे कारण म्हणजे असिडीटी,gas,उच्च रक्तदाब,लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारख्या आजारांसोबतच अनियमित आहारासह फास्ट फूडचे सेवन,ज्यामध्ये एनजाईना वेदना,ह्र्दयविकाराचा झटका,धमणी विकार,गुदमरणे,रक्तदाब इ.
प्रथिने आणि कार्बोहायड्रेट समृद्ध अन्नपदार्थांच्या अतिसेवनामुळे कोलेस्ट्रोल तयार होते.जे रक्तवाहिन्यांच्या शिरांमध्ये मेणासारखे जमा होते,रक्तप्रवाहात अडथळा आणते आणि श्वास घेण्यास त्रास होतो,ज्यामुळे एनजाईना वेदना होतात.यामध्ये यकृताची भूमिका महत्वाची आहे,ज्यामध्ये प्रथीने,ग्लुकोज इत्यादी पदार्थ विरघळतात आणि ते आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.६० ते ८५ टक्के artery choke चे रुग्ण आयुर्वेदिक उपचार घेऊन आणि आहारावर नियंत्रण ठेवून कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय आयुष्यभर निरोगी राहू शकतात.अनियमित खाण्याच्या सवयी आणि दीर्घकाळापर्यंत बद्धकोष्टतेच्या बाबतीत,जेंव्हा अन्न पाचात नाही आणि अन्न पोटात आणि इतर पाचक अवयवांमध्ये जमा होते आणि सडून जाते,ज्यामुळे विषारी पदार्थांचे प्रमाण वाढते आणि ते शरीरात सोडले जातात,रक्तासह मुत्र आणि आम्ल मूत्रपिंडात रुपांतरीत झाल्यानंतर,ते गाळण्याची प्रक्रिया अडथळा आणते.
जेंव्हा मुत्रपिंडाची गाळण्याची प्रक्रिया पुरेशा प्रमाणात होत नाही,तेव्हा युरिया,प्रथिने आणि इतर द्रव रक्तासोबत ह्रदयापर्यंत पोहोचतात.ज्यामुळे रक्त घट्ट होते.परिणामी,सांधेदुखीसह डोळे,पाय आणि गुडघ्याखाली सूज येते आणि उच्च रक्तदाब वाढतो.अशा परिस्थितीत,alopathy डॉक्टर lasix आणि इतर उच्च डोस औषधे देतात,ज्यामुळे रुग्णाच्या लघवीचे प्रमाण वाढते,यामुळे शरीरातील प्रथिने आणि कॅल्शिअम सारखे आवश्यक घटक काढून टाकले जातात आणि रुग्ण अत्यंत अशक्त होतात.आणि त्यांनतर रुग्णाला प्रथिनेयुक्त पदार्थ आणि इंजेक्शन द्यावी लागतात.
परंतु आयुर्वेदात साधारणता २५ मिली एरंडेल तेलाने रोग बरा होतो आणि सर्व लक्षणे आपोआप नाहीशी होतात.त्याचप्रमाणे दीर्घकाळापर्यंत वाढलेल्या रक्तदाबामुळे cardiomyopathy किंवा cardiac enlargement होते,ज्यामुळे ह्रदयाच्या खालच्या भागाचा विस्तार होतो.याचा परिणाम असा होतो कि फुफ्फुस आणि मेंदूला शुद्ध रक्त पाठवणारे valve लवकर उघडत नाहीत,ज्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो.अशा स्थितीत ,रुग्णाने दोन्ही हात हळुवारपणे वर खाली हलवावेत आणि दीर्घ श्वास घ्यावा,ज्यामुळे झडपा उघडतात आणि रक्ताभिसरण सुरु होते आणि रुग्णाला आराम वाटतो.
खानपान- आले,लसून,सुंठ,मिरची,पिंपळ,लवंग,तमालपत्र,खडे मीठ यांचा आहारासोबत वापर करा,रात्री दुध उकळत असताना त्यात छोटी पिंपळ,जायफळ आणि हळद सोबत २ ग्राम केशर टाकून झोपण्यापूर्वी वापरावे.आहारात जुने गहू,बार्ली,हरभरा (देशी) अंकुरलेली कडधान्ये,मुग डाळी,मसूर,सोयाबीन,वाटण्याच्या शेंगा,बिन्स,पपई,डाळिंब,बेदाणे,द्राक्षे इत्यादी फळे पचनक्रिया मजबूत करतात.हे विरघळनारे तंतुमय पदार्थ ग्लुकोज आणि कोलेस्ट्रोल नियंत्रित करतात.सकाळी आणि रात्री अर्जुन नाग केशर,दालचिनी,पुष्कर मूळ,जटा मानसी आणि गुग्गुळ (शुद्ध) शिलाजित असलेली औषधे रुग्णाला रोगांपासून मुक्त करतात आणि दीर्घ आयुष्य देतात.
त्याग – ह्र्दय रोग्यांनी मांसाहार,धुम्रपान,मद्यपान,अति चहा,कॉफी,फास्ट फूड,जंक फूड,सोस,तळलेल्या भाज्या,चिप्स,अन्न,चीज,खवा,मलई,लोणी आणि अंड्यातील पिवळा बलक,खोबरेल तेल,chocolate खाणे टाळावे,आईस्क्रीम इ.ह्र्दय विकारापासून स्वतः चा बचाव करण्यासाठी तुम्ही तणावमुक्त आणि आनंदी राहिले पाहिजे.शाकाहार योगासने आणि प्राणायाम याद्वारे निरोगी राहू शकतो.
cardiac arrest – म्हणजे ह्रदयाच्या कार्याची अचानक होणारी हानी,ज्यामुळे शुद्ध हरपते आणि श्वास घेण्यास त्रास होतो.जेंव्हा ह्रदयाचे पम्पिंग थांबते,आणि शरीराच्या उर्वरित भागात रक्तप्रवाह होत नाही तेव्हा cardiac arrest होतो.बरेच लोक cardiac arrest आणि heart attack यामध्ये गोंधळतात.जेंव्हा ह्रदयाच्या स्नायुंना रक्ताचा पुरवठा होत नाही तेव्हा heart attack येतो पण हा attack cardiac arrest आणु शकतो आणि परिणामी रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
cardiac arrest ची मुख्यत्वे लक्षणे :
- श्वास घेण्यास त्रास होणे किंवा श्वास न घेणे.
- नाडीचा ठोका बंद होणे.
- त्वरित शुद्ध हरपणे.
- त्वचा थंड पडणे.
cardiac arrest ची मुख्य कारणे; ह्रदयाच्या ठोक्यात बिघाड झाल्यास ह्रदयाची विद्युत वाहिनी ट्रिगर होते ज्यामुळे cardiac arrest होतो.काही रुग्णांच्या बाबतीत हे काही क्षणापुरते नसून ते हानिकारक असते.
![](https://fityourself.in/wp-content/uploads/2024/09/WhatsApp-Image-2024-09-09-at-9.53.11-PM.jpeg)
सहसा मानवी ह्र्दय हे निरोगी असेल तर cardiac arrest होत नाही.हा फक्त बाह्य कारणामुळे होऊ शकतो जसे कि शॉक,ड्रगचा अतिवापर आणि आघात किंवा आधीपासून रुग्णास असलेला ह्रदयविकार.
cardiac arrest आहे हे कसे कळते हे माहिती असणे आवश्यक आहे:
- ह्रदयाची क्रिया,असामान्यता यांचे परीक्षण करण्यासाठी ईसीजी.
- खनिजे,रसायने आणि हार्मोन लेवल तपासण्यासाठी रक्ताच्या काही तपासण्या.
ह्रदयाच्या आकार,आरोग्य,नुकसानी साठी काही चाचण्या केल्या जातात.
- पंपिंग क्षमता,valve यामधील असमाण्यता साठी ईसीजी तपासणी.
- न्युक्लीयर स्कॅन,एक्स-रे इत्यादी.