मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी सामान्य व्यक्तींप्रमाणे प्रोटीन (High Protein Diet) असलेला आहार महत्वाचा असतो. कारण बऱ्याच प्रोटीन असलेल्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण समाविष्ट असते. प्रोटीन असलेला आहार घेतल्याने शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करण्यामध्ये मदत होत असते. यासाठी तुम्हाला कोणता आहार घ्यावयाचा आहे आणि त्यामध्ये प्रोटीनचा कोणता चांगला स्त्रोत आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. मधुमेह हि तुमच्या जीवनशैलीतील एक नियमित बनलेली समस्या आहे. याचे कारण सुद्धा तुमच्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या पद्धती किंवा वाईट जीवनशैली यामुळे निर्माण झालेली समस्या आहे. म्हणून तुम्हाला सर्वात जास्त सुधारणा या तुमच्या आहारात कराव्या लागतील त्यासोबतच तुमच्या दैनंदिन सवयी तुम्हाला बदलाव्या लागतील.
![High Protein Diet](https://fityourself.in/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Image-2024-10-15-at-21.48.51-1-1004x1024.jpeg)
Relation of High Protein Diet and Sugar
तुमचा आहार तुमचा मधुमेह नियंत्रित करण्यामध्ये प्रमुख भूमिका निभावत असतो. भारतीय आहारपद्धतीत जेवणामध्ये किंवा खाल्ले जाणारे पदार्थ हे कार्बोहायड्रेट ने भरपूर असतात आहारात ८० ते ९० % इतके कार्बोहायड्रेट असते किंवा चरबीयुक्त पदार्थ आहारात समाविष्ट असतात. भारतीय आहारपद्धतीत चपाती, रोटी, भात,बऱ्याच प्रमाणात खाल्या जाणाऱ्या भाज्या यामध्ये प्रोटीनचा समावेश अतिशय कमी प्रमाणात होत असतो. यामुळे आहारात प्रोटीनची कमतरता जाणवते. तुम्ही खाणारे कार्बोहायड्रेट आणि मधुमेह यांचा खूप जवळचा संबंध आहे. तुम्ही आहारात जे कार्बोहायड्रेट घेत आहात ते तुमच्या शरीरात पचन होत असतात आणि ग्लुकोज मध्ये रुपांतरीत होत असतात ज्याला आपण साखर असे म्हणू शकतो. जेंव्हा शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढत असते त्यावेळी तुमची रक्तातील साखर वाढल्याचे दिसून येते.
![](https://fityourself.in/wp-content/uploads/2024/12/WhatsApp-Image-2024-12-03-at-21.29.01-1024x670.jpeg)
Reduce Sugar levels by taking High Protein Diet
जर तुम्हाला तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या आहारातून कार्बोहायड्रेट कमी करायला हवेत आणि याच्याऐवजी तुम्हाला उच्च प्रमाणात प्रोटीन आहारात घ्यायला हवेत. तुमच्या आहारात उच्च प्रमाणात प्रोटीन असतील आणि नियंत्रित प्रमाणात कार्बोहायड्रेट असतील तर तुमची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात येण्यास मदत होईल आणि तुम्हाला विशेष औषधाची गरज पडणार नाही. तुम्ही आहारात प्रोटीनचा चांगला उपयोग केला तर तुम्हाला चालू असलेली औषधे हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते.
जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही चपाती, रोटी, भात या पदार्थाना पनीर, दही, ताक यासोबत बदलू शकता यासोबत तुम्ही काही प्रमाणात सुकामेवा घेऊ शकता. तसेच तुम्ही चणे, मोड आलेली कडधान्ये, सोया असे पदार्थ आहारात समाविष्ट करू शकता. तुमच्या नियमित जेवणामध्ये सलाड अवश्य असले पाहिजे. त्यामध्ये तुम्ही मोड आलेली कडधान्ये खाऊ शकता. यामुळे तुम्हाला उच्च प्रमाणात तंतुमय पदार्थ आणि प्रोटीन मिळत असते आणि त्यामुळे तुमची साखर नियंत्रित करण्यास मदत होते. तुम्ही आहारात चपाती, रोटी, भात कमी करून सलाड आणि प्रोटीनयुक्त आहार घेतला पाहिजे.
जेंव्हा तुम्ही आहारात उच्च प्रमाणात प्रोटीन (High Protein Diet) घेत असता त्यावेळी तुमच्या शरीरात ऊर्जा टिकून राहण्यासाठी मदत होते. प्रोटीन आपल्या शरीरात महत्वाची भूमिका विविध पद्धतीने बजावत असते. प्रोटीन शरीरात स्नायूंची वाढ करण्यासाठी कार्य करत असते. स्नायूंची वाढ करण्यासोबतच शरीरातील जे हार्मोन्स आणि एन्झाइम असतात त्यांच्या निर्मितीसाठी, इन्सुलिन प्रतिरोध कमी करण्यासाठी प्रोटीन महत्वाचे असते. म्हणून अशा पद्धतीने आहार घेतल्याने तुमच्या इन्सुलिनची पातळी नियंत्रणात येईल आणि मधुमेह नियंत्रित होईल. ज्या लोकांना बाहेरून इन्सुलिन इंजेक्शन च्या स्वरुपात घ्यावे लागते अशा लोकांची समस्या हळूहळू कमी होताना दिसून येईल. ज्यावेळी शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होत जाईल त्यावेळी डॉक्टर तुमची औषधे कमी करण्यास सुरुवात करतील.
![](https://fityourself.in/wp-content/uploads/2024/09/WhatsApp-Image-2024-09-22-at-7.12.17-PM-898x1024.jpeg)
Non Veg High Protein Diet
जर तुम्ही मांसाहार करत असाल तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये अंडी आणि मासे यांचा समावेश जरूर करावा. कारण शाकाहारी जे पदार्थ असतात अशा पदार्थानामध्ये जसे कि दुध, दही, लस्सी, पनीर, ताक अशा पदार्थांमध्ये तुम्हाला प्रोटीन मिळेल परंतु संपूर्णपणे प्रोटीन म्हणजे अमिनो एसिड मिळू शकत नाही. परंतु जेंव्हा तुम्ही मांसाहार करत असता तेव्हा तुम्हाला त्यामधून अमिनो एसिड आणि ते एक प्रोटीनचाउत्तम स्त्रोत असतात. यामुळे जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुम्ही दोन्ही पद्धतीचा आहार घेतला पाहिजे.
Quantity of High Protein Diet
वरीलप्रमाणे तुम्ही उच्च प्रथिने (High Protein Diet)असलेला आहार घेत असाल आणि तरीसुद्धा तुमची शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित होत नसेल तर तर असे होवू शकत नाही कारण यामध्ये तुमच्याकडून कोणती चूक होण्याची संभावना आहे. जर तुम्हाला मधुमेह प्रकार २ असेल तर अशा वेळी तुम्हाला प्रोटीन घेतल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. उच्च प्रमाणात प्रोटीन घेतल्याने ५ ते ६ तासांच्या अंतराने तुमची रक्तातील साखर हळूहळू वाढल्याचे दिसून येते. अतिप्रमाणात प्रोटीन घेणे जसे कि १०० ग्राम इतके प्रोटीन हे २० ग्राम इतक्या साखरेच्या प्रमाणाइतके असते. परंतु हि साखर पहिल्या १ ते २ तासात वाढत नाही. यामुळे तुम्ही दिवसाला ३० ते ४० ग्राम इतके प्रोटीन घेत असाल तर अशावेळी तुमची साखर तितकी वाढणार नाही कारण प्रोटीनचा १/५ इतका हिस्सा हि साखर असते.