
१.१ मानवी हृदय /human heart आपल्या हाताच्या मुठीच्या आकारचे असते . हृदयाच्या जास्तीत जास्त भाग डाव्या बाजुला आहे.2/3 अंश हृदय माणसाच्या डाव्या बाजूला असत आणि १/३ अंश हृदय उजव्या बाजूला असत हृदय हे बरकड्या च्या आतल्या बाजूला असत.बरकड्या हे हृदयाचे PROTECTION साठी असतात.त्याच्या आतमध्ये हृदय आणि फुफुस हे असत. मानवी हृदयाच्या मार्फत blood च pumping केल जात. मानवी हृदय (Human heart) याला इंग्रजीमध्ये ‘कार्डियाक’ असे म्हणतात.मानवी हृदय प्रामुख्याने हृदयाच्या स्नायूंनी बनलेले असत.मानवी हृदय दर मिनिटास ७२ वेळा आकुंचन पावते.स्त्रियांमध्ये हृदयाचे वजन २५०-३०० gram असते.
मानवी गर्भामध्ये २१व्या दिवसापासून हृदय कार्य करण्यास प्रारंभ करते. गर्भहृदय साधारणपणे दर मिनिटास ७५-८० वेळा आकुंचन पावते. गर्भावस्थेमध्ये पहिल्या महिन्यात हृदयाचे ठोके मिनिटास सरासरी १०० असतात.सातव्या आठवड्यात ते सर्वाधिक म्हणजे १६५-१८५ एवढे होतात. हृदयाचे ठोके वाढण्याचा वेग दररोज ३.३ एवढा वाढतो. नवव्या आठवड्यापासून ह्रदयाचा वेग १५२ पर्यंत कमी होतो. जन्मापूर्वी मुलगा मुलीच्या ह्रदयाच्या वेगामध्ये फरक आढळून येत नाही.मानवी ह्रदयाचा (Human heart) आकार हाताच्या वळलेल्या मुठीएवढा असतो.
१.२ मानवी ह्रदय Human heart याचे महत्वाचे कार्य म्हणजे त्याच्याकडे आलेले रक्त आत घेणे आणि बाहेर टाकणे होय.ह्रदयाला चार कप्पे असतात. वरच्या बाजूला दोन कर्णिका आणि खालच्या बाजूला दोन जवनिका असतात.उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असते व डाव्या बाजूला शुद्ध रक्त असते.
ह्र्दय हे सतत आकुंचन व प्रसरण पावत असते. उजव्या बाजूला शरीराकडून आलेले रक्त फुफ्फुसाकडे पाठवले जाते. फुफ्फुसामध्ये रक्तातील कार्बनडायऑक्साईड बाहेर फेकला जावून प्राणवायू शोषला जातो.हे रक्त ह्रदयाच्या डाव्या कर्णिकेत आणले जाते आणि तेथून ते डाव्या जवनिकेतून शरीरभर पोहोचवले जाते. शरीराची विविध कामे करण्यासाठी प्राणवायू ,साखर व इतर मूलद्रव्ये हि रक्तामार्फत शरीरात सर्वत्र पोहोचवली जातात. शरीर लागेल त्याप्रमाणे ओक्सिजेन व इतर पौष्टिक पदार्थ घेते व परत अशुद्ध रक्त ह्रदयाकडे पोहचवते.
१.३ रक्त जेंव्हा धमन्यातून वाहते, तेव्हा धमण्यांचा त्याच्यावर दाब पडतो त्याला रक्तदाब असे म्हणतात. ह्रदयाला चार झडपा (volve) असतात. यातील दोन झडपा डाव्या तर दोन झडपा उजव्या बाजूला असतात . यातील दोन झडपा डाव्या बाजूला तर दोन झडपा उजव्या असतात. डाव्या बाजूचे दोन कप्पे फुफ्फुसाकडून ओक्सिजेन घेऊन आलेल्या रक्ताचे नियोजन करतात. तर उजव्या बाजूचे दोन कप्पे शरीराला ओक्सिजेन पुरवून आलेले व फुफ्फुसाकडे नेण्यासाठी कार्बनडायऑक्साईड सोबत आणलेले रक्त सांभाळतात. या प्रक्रियेत बिघाड झाल्यावर ह्र्दयविकाराला सुरुवात होते. ह्रदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या तीन प्रमुख रक्तवाहिन्या असतात. या धमन्यांमध्ये कोलेस्ट्रोल,कॅलशीअम,रक्तातल्या लघुपेशी,पांढऱ्या रक्तपेशी काही ठिकाणी जमा होऊन रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतात.
१.४ मानवी ह्र्दय Human heart तीन थरांनी बनलेले असते. ह्र्दयालगतच्या ह्र्दयावरण थर हे ह्रदयाचे पहिले आवरण असते. त्याला बाह्य ह्र्दयावरण असे म्हणतात. ह्र्द्यालगत एक आवरण असते. या ह्र्दयवरणात एक जलील पदार्थ असतो. त्यामुळे ह्रदयाची हालचाल होताना घर्षण होत नाही. ह्रदयाचा मधला थर ह्र्दयस्नायुनी बनलेला असतो. ह्रदयाचा सर्वात आतील थर एक पेशीय रक्तवाहिन्यांच्या अन्तःस्तराशी संलग्न असतो. हा थर ह्रदयाच्या झडपा आणि ह्रदयाच्या पोकळ्या यांच्यावर असतो.रक्तवाहिन्यांच्या अंतःस्तराशी संलग्न असतो. हा थर ह्रदयाच्या झडपा आणि ह्रदयाच्या पोकळ्या यांच्यावर असतो.
ह्रदयाला काम करण्यासाठी आतील स्नायुंना शर्करा व प्राणवायू या मुलभूत ऊर्जा निर्माण करणाऱ्या घटकांचा सतत पुरवठा होणे आवश्यक असते. शर्करा आणि प्राणवायू हे रक्तातूनच मिळतात आणि ते रक्तवाहिन्यांद्वारे ह्रदयाच्या सर्व भागांत पोहोचविले जातात. या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला तर ह्रदयाचे विकार उद्भवतात.
मानवी ह्दय (Human heart)महत्वाच्या गोष्टी

- मानवी ह्रदयाच्या (Human heart) पंपाची क्षमता हि 0.२ HP एवढी असते.
- ह्रदयातून जवळपास १ मिनिटाला ५ लिटर म्हणजेच तासाला ३४० लिटर व एका वर्षात १५ लाख लिटर रक्त पंप केले जाते.
- साधारणत माणूस झोपेत असताना ठोके कमी असतात तसेच RBC चे प्रमाणही कमी असते.
- लहान बाळाचे ह्रदयाचे ठोके हे प्रौढ माणसापेक्षा जास्त असतात,परंतु रक्तदाब लहान बाळाचा कमी असतो.
- डोक्याच्या स्पंदनाचा आलेख काढण्यासाठी ECG – Electro cardiograph चा वापर केला जातो याचा शोध Einthoven या शास्त्रज्ञानी १९०३ मध्ये लावला.
- पहिले ह्र्दय प्रत्यारोपण १९६७ साली ख्रिस्तीन बर्नार्ड यांनी केले व भारतात वेणुगोपाल यांनी प्रयत्न केले.
- देवमासा (blue whale ) या प्राण्याचे ह्र्दय हे सर्वात मोठे असते.
- जिराफ या प्राण्याचे ह्र्दय जमिनीवरील सर्व प्राण्यांपेक्षा मोठे असते.
- नवजात बालकात ह्रदयाचे ठोके १५०/minute पर्यंत असतात. तर रक्तदाब ७५/४५ mmhg असतो.
- चालीसेमिया हा अनुवांशिक बरा न होणारा रोग आहे.ज्यामध्ये RBC कमी तयार होतात. या रोगात ह्रदयाचा आकार वाढतो याचे प्रमाण गुजराती,सिंधी,पंजाबी लोकांत जास्त आहे.
- RBC ला केंद्रक हे फक्त सस्तन प्राण्यांमध्ये नसते. परंतु उंट हा सस्तन प्राणी असून RBC ला केंद्रक असते. उभयचर व सरपटनाऱ्या प्राण्यात RBC ला केंद्रक असते.
- कॅल्शियम,व्हिटामिन K आणि C रक्तपट्टिका,फाय्ब्रीनोजेन,प्रोथ्रोम्बीन हे सर्व रक्त गोठवण्याच्या क्रियेत भाग घेतात.
- रक्त गोठण्यासाठी मानवी शरीरात एकूण १३ घटक (१३ Factors ) असतात.
- मानवी ह्र्दय (Human heart) आणि रक्ताभिसरण संस्थेला CARDIVASCULAR SYSTEM म्हणतात.
- साधारणतः RBC WBC हे गुणोत्तर ६००;१ एवढे असते.
- ठोक्याच्या आवाजाची तीव्रता १५db एवढी असते.
- जन्मताच ह्रदयात दोष असणाऱ्या मुलांना blue baby असे म्हणतात.
- सरपटणारे प्राणी संपूर्ण ३ कप्याचे किंवा त्यांना ४ था अपूर्ण कप्पा असतो.
२ .१ मानवी ह्रदयाचे ठोके (heart beat)
लयबद्ध अशा आकुंचन व प्रसरण पावण्याच्या व त्यातून बाहेर पडणाऱ्या आवाजाला ह्रदयाचे ठोके असे म्हणतात. साधारणतः १ मिनिटाला ७२ ठोके पडतात म्हणजेच प्रतीठोका हा ०.८ सेकंदात होतो.ह्रदयाच्या ठोक्याचा लबडब असा आवाज असतो,जो कि झडपाच्या उघड बंद होण्यामुळे असतो.स्तेथस्कोप (stethoscope) या उपकरणाने ह्रदयाचे ठोके ऐकता येतात.साधारणतः ठोके जाणण्यासाठी (to feel the pulse ) मनगटाजवळील राडीअल धमनी चा वापर करतात ह्रदयाचे ठोके वाढणे म्हणजे tachycardia होय तर कमी होणे म्हणजे bradycardia होय.
२.२ मानवी ह्रदयाच्या (Human heart) ठोक्यात होणारे बदल :
- जेवताना,अतिउत्साह,व्यायाम,ताप,गर्भधारणा इत्यादी परिस्थितीत ह्रदयाचे ठोके वाढतात.
- झोपेत असताना व शाकी मध्ये ह्रदयाचे ठोके कमी होतात.
- पुरुषांमध्ये ह्रदयाचे ठोके स्त्रियांपेक्षा जास्त असतात.
- जसे जसे उंचीवर जाईल तस तसे ह्रदयाचे ठोके वाढतात.
- जेवढा सजीवाच्या शरीराचा आकार जास्त तेवढे ह्रदयाचे ठोके कमी व याउलट (उदा.उंदीराचे ह्रदयाचे ठोके हे हत्तीपेक्षा जास्त असतात.)
मानवी ह्रदय (Human heart) व त्याचे कार्य :-

ह्रदयामध्ये (In Human Heart) एकूण चार कप्पे असतात.त्यापैकी प्रत्येकाचे कार्य वेगळे आहे आणि अशुद्ध व शुद्ध रक्त एकत्र मिसळते.
अलिंद (Atrium) : ह्रदयाचे वरचे दोन कप्पे म्हणजे अलिंद होय.ह्रदयाचा जो कप्पा रक्त ह्रदयामध्ये स्वीकारतो त्यास अलिंद म्हणतात.
निलये (ventricle) :- ह्रदयातील खालचे दोन कप्पे म्हणजे निलय होय.ह्रदयाचा जो कप्पा रक्त ह्रदयाच्या बाहेर घेऊन जातो त्यास निलये म्हणतात.
a) उजवे अलिंद किंवा कर्णिक (Right atrium /Auricle) : उजव्या अलिंदामध्ये एकूण तीन रक्तवाहिन्या अशुद्ध रक्त घेऊन येतात.i) अधोमहाशीर (Inferior venacava ) : ह्रदयाच्या खालच्या भागतील म्हणजेच डोके व हात सोडून शरीरातील सर्व अशुद्ध रक्त या महाशिरेद्वारे एकत्र केले जाते व ते उजव्या अलींदात सोडले जाते,हि महाशीर युष्टचीयान झडपानी रक्षित केली जाते.
ii)उर्ध्वमहाशीर : ह्रदयाच्या (Human Heart) वरच्या भागातील म्हणजेच डोके व हाताच्या अशुद्ध रक्त या महाशिरेद्वारे एकत्र केले जाते व उजव्या अलींदात सोडले जाते.
iii) परीह्र्दयशीर : ह्रदयाला (Human Heart) रक्त पुरवठा करणाऱ्या धमनीला परीह्र्दय धमनी म्हणतात आणि ह्रदयाचे अशुद्ध रक्त उजव्या अलींदात sinus या छिद्राद्वारे सोडले जाते हेच ते परीह्र्दयशीर होय. अशाप्रकारे उजव्या अलींदात शरीरार्तील सर्व अशुद्ध रक्त एकत्रित केले जाते. जेंव्हा उजव्या अलिंदाचे स्नायू आकुंचन (Contraction) पावतात तेंव्हा ते रक्त उजव्या निलयात(right ventricles) सोडले जाते. परिहृदयशिर हि ‘थिबॅशियन झडपनी'(Thebasian valve) रक्षित केलेली असते.
b) उजवे निलय (right ventricles )किंवा जेवनिका: उजव्या अलिंदातील अशुद्ध रक्त उजव्या निलयात जाते.उजव्या निलयात रक्त फुफ्फुसभिगा धमणी (Pulmonary Artery) द्वारे हृदयाच्या बाहेर म्हणजेच रक्त शुद्धीकरणासाठी (Oxygenation) फुफ्फुसाकडे पाठवले जाते.उजव्या निलायातील रक्त फुफ्फुस धमणी (Pulmonary artery) मध्ये ढकल्याण्यासाठी निलये आकुंचन (Contraction) पावतात.म्हणजेच आपण असे म्हणू शकतो कि हृदयाच्या उजव्या भागात अशुद्ध रक्त असते.
c) डावे अलिंद (left Atrium /Auricle) डावे कर्णिक :
जे रक्त फुफ्फुसाकडे शुद्धीकरणासाठी पाठवले होते ते पुन्हा हृदयात डाव्या अलिंदाद्वारे येते. म्हणजेच डाव्या अलिंदात दोन फुफ्फुसाकडून (Lungs) फुफ्फुसाद्वारे (Pulmonary vein) शुद्ध (Oxygenated) रक्त येते.डाव्या अलिंदात एकूण ४ फुफ्फुसशिरा (Pulmonary veins) येतात.डावे अलिंद आकुंचन पावून (Contraction) यातील शुद्ध रक्त डाव्या निलयात आणले जाते.
d)डावे निलय (left Ventricle )किंवा जेवनिका :
हा कप्पा हृदयातील मोठा कप्पा व जाड भित्तिका असलेला कप्पा (Chamber) आहे. कारण या कप्प्यात संपूर्ण शरीराचे रक्त पोहचविण्याची क्षमता असते. डाव्या अलिंदातून आलेले शुद्ध रक्त डावे निलय (Ventricle) संपूर्ण शरीराला पोहचविते. महाधमणी (Aorta) हि रक्तवाहिनी डाव्या निलयातून बाहेर निघते व हिच्या फाट्या म्हणजेच धमण्या शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करतात.