Important 8 Superfoods in winter

हिवाळ्याचा ऋतू आला कि तब्येत बिघडण्याची शक्यता असते. हिवाळ्यामध्ये काही सुपरफूड (Superfoods in winter) खाणे आवश्यक असते. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये तुमचे शरीर सुद्धा बदलत असते हिवाळ्यामध्ये तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा कमकुवत होण्यास सुरुवात होते. तुमच्या शरीरामध्ये सर्दी, कफ, खोकला अशी लक्षणे निर्माण होण्यास सुरुवात असते. यासोबतच तुमचे शरीर विविध संसर्गाला बळी पडत असते. परंतु अशा काही युक्ती किंवा काही पदार्थ खाल्याने तुम्ही हिवाळ्यात तुमचे आरोग्य सुधारू शकता. म्हणून आपण असे पदार्थ पाहूयात जे हिवाळ्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

list of Superfoods in winter

आले (Superfoods in winter -1) – आले हे सर्वजण चहा बनविण्यासाठी वापरत असतात. आले तुमच्या शरीरात उष्णता निर्माण करण्याचे कार्य करत असते. आल्यामध्ये संसर्गविरोधी गुण असतात तसेच सूज कमी करण्यासाठी सुद्धा आले महत्वाचे असते. या गुणधर्मांमुळे आले हे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करते. यामुळे थंडीमध्ये होणारे सर्दी, खोकला, कफ यांसारखे आजार कमी होण्यास मदत होते. अपचन आणि मळमळ यामध्ये सुद्धा आले हे फायदेशीर असते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी सुद्धा आले फायदेशीर असते. आल्याचा वापर तुम्ही चहामध्ये करू शकता किंवा गरम पाण्यामध्ये लिंबू, मध, आले टाकून घेऊ शकता. यासोबत तुम्ही आले भाज्यांमध्ये सुद्धा वापरू शकता.

गुळ (Superfoods in winter -2) – गुळाचा वापर आहारात करणे फायदेशीर ठरते. गुळ हा हिवाळ्यात जास्त प्रमाणात केला जातो. गुळामध्ये महत्वाची खनिजे समाविष्ट असतात यासोबत संसर्गविरोधी गुणधर्म सुद्धा असतात. गुळामध्ये लोह, झिंक, कॅल्शिअम सारखी खनिजे आढळतात. या सर्वांमुळे तुमचे शरीर गरम ठेवण्यास मदत होते यासोबतच शरीराला ऊर्जा देण्याचे कार्य करते. शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचे कार्य सुद्धा गुळ करत असतो यामुळे संसर्ग कमीत कमी होतात. रक्त शुद्धीकरणासाठी गुळ महत्वाचा असतो आणि रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये सुद्धा महत्वाचा ठरतो. ज्या लोकांना पचनाची समस्या असते त्या लोकांसाठी गुळ फायदेशीर आहे. दररोज जेवणानंतर गुळाचा एक छोटा खडा तुम्ही खाऊ शकता.

सुकामेवा (Superfoods in winter -3) – बदाम, काजू, शेंगदाणे, पिस्ता यासारख्या पदार्थात ओमेगा – ३ Fatty acid असतात यासोबत विटामिन आणि कॅल्शिअम सुद्धा असतात जे तुमची शरीराची ऊर्जा टिकवून ठेवतात तसेच भूक टिकविण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतात. सुकामेव्यामधील पदार्थ हे उष्ण गुणधर्म असणारे असतात जे तुमच्या शरीराला गरम ठेवतात तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात. सुकामेवा खाल्यानंतर पाणी पिता कामा नये कारण यामुळे कफची समस्या होवू शकते. सुकामेवा तुम्ही दोन जेवणांच्या मध्ये घेऊ शकता. एक मुठभर सुकामेवा तुम्ही दिवसाला खाऊ शकता. हिवाळ्यात तुम्ही शेंगदाणे चिक्की जी गुळापासून आणि शेंगदाण्यापासून बनलेली असते ती खाऊ शकता.

तीळ (Superfoods in winter -4) – तिळाचा वापर हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात केला जातो कारण तीळ हे उष्ण गुणधर्म असणारे आहेत. म्हणून हिवाळ्यात तिळाचे लाडू किंवा तीळ, गुळ, शेंगदाणे यांची चिक्की खाल्ली जाते. तीळ मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात antioxidant असतात तसेच हे तुमच्या प्रतिकारशक्तीमध्ये सुद्धा फायदेशीर असतात.

रताळे (Superfoods in winter -5) – रताळे हे पोषक तत्वांनी भरलेले असतात यामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन्स, फायबर, खनिजे असतात. शरीरातील मुक्त तंतूपासून संरक्षण मिळविण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. यामध्ये फायबर असल्याने बद्धकोष्टता पासून सुद्धा आराम मिळतो.जे लोक बटाटा खात नाहीत त्या लोकांनी रताळे आहारात समाविष्ट करावेत.

विटामिन सी असलेली फळे (Superfoods in winter -6) – सिट्रस फळे ज्यामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. हिवाळ्यात खाण्यासाठी हि फळे अतिशय फायदेशीर आहेत. संत्री, लिंबू यामध्ये विटामिन सी भरपूर असते. याशिवाय आवळासुद्धा तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता. या सर्व फळांमध्ये antioxidant भरपूर प्रमाणात असतात तसेच खनिजे सुद्धा असतात. या सर्वांमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी फायदा होतो.

हळद (Superfoods in winter -7) – हळदीचे गुण सर्वाना माहित असतात. आहारातील एक महत्वाचा पदार्थ हळद आहे. हळदीमध्ये सूजविरोधी आणि संसर्गविरोधी गुण असतात. हळदीमध्ये असणाऱ्या कर्क्युमीनमुळे हळदीमध्ये महत्वाचे गुण आढळतात. यासोबतच हळद टाकून दुध प्यायल्याने शरीराला खूप फायदा होत असतो. रात्री झोपण्यापूर्वी दुध हळद पिणे फायदेशीर ठरते. हळदीमुळे सुद्धा प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

Superfoods in winter

तुप (Superfoods in winter -8) – तुप हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुपामध्ये आवश्यक fatty acids आढळतात यासोबत त्यामध्ये antioxidant असतात. तुप तुमची प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. शरीराला गरम ठेवण्यास मदत करते. त्वरित ऊर्जा देण्याचे कार्य शरीरात करते. हाडांच्या आरोग्यामध्ये तुप महत्वाचे असते सांध्यांच्या जोडांमध्ये वंगण म्हणून तुप कार्य करते. मेंदूच्या आरोग्यासाठी सुद्धा तुप महत्वाचे आहे. शरीरात विटामिन च्या शोषणासाठी तुप महत्वाचे ठरते यासोबतच थंडीमुळे हिवाळ्यात त्वचा कोरडी पडलेली असते त्यामुळे त्वचेमध्ये ओलावा निर्माण करण्यास तुप कार्य करत असते. दिवसाला ३ चमचे तुप तुम्ही वापरू शकता. कोणत्याही प्रकारच्या आहारात तुम्ही तुप वापरू शकता.

https://fityourself.in/healthy-evening-snacks-in-marathi/