रक्ताची तपासणी (Important Blood Tests) हि आपण नेहमी फक्त आजारी पडल्यावर करत असतो. जेंव्हा आपल्याला डॉक्टर सांगतात कि एखाद्या रोगाचे निदान करण्यासाठी तुम्हाला हि रक्ताची चाचणी आवश्यक आहे त्यावेळी आपण तपासणी करण्यासाठी जात असतो. जेंव्हा आपण रक्ताची तपासणी करतो तेव्हा आपल्या लक्षात येते कि आपल्या शरीरात ठराविक विटामिन आणि खनिजे तसेच यांची कमतरता आहे किंवा ठराविक पेशी वाढल्या आहेत. हे एक चिंतेचे कारण ठरू शकते म्हणून आपल्याला (Prevention is important than cure) असे करावे लागेल म्हणून आपण अशा काही रक्ताच्या तपासण्या करू शकतो ज्यामुळे आपण नियमित सतर्क राहू शकतो आणि वेळच्या वेळी उपचार घेऊ शकतो किंवा आहारात आवश्यक गोष्टींचा समावेश करून ते गंभीर आजार टाळू शकतो.
![WhatsApp-Image-2024-11-18-at-20.18.24](https://fityourself.in/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Image-2024-11-18-at-20.18.24.jpeg)
काही महत्वाच्या चाचण्या (Some Important Blood Tests)
लिपोप्रोटीन (Important Blood Tests – 1) – हि एक महत्वाची चाचणी आहे जी नियमित केल्याने आपण अधिक सतर्क होवू शकतो. लिपोप्रोटीन हे शरीरात सर्वत्र कोलेस्ट्रोलच्या वाहनाचे कार्य करत असतात आणि लिपोप्रोटीन हे ह्र्दयविकाराच्या झटक्याशी निगडीत आहे. सर्व प्रकारच्या मृत्यूदराशी निगडीत सुद्धा आहे. लिपोप्रोटीन ची पातळी हि आपल्या शरीरात विशेषकरून अनुवांशिक किंवा जीवनशैलीशी निगडीत असतात. म्हणून डॉक्टर लिपोप्रोटीन ची चाचणी करण्याचे निर्देश डॉक्टर देत असतात म्हणून किमान एकदा तरी हि चाचणी करणे आवश्यक आहे. लिपोप्रोटीन ची पातळी सामान्यतः ३० मिलीग्राम प्रती डेसीलिटर च्या खाली असली पाहिजे. बऱ्याच लोकांची हि पातळी यापेक्षा कमी असते परंतु ज्यांना ह्रदयविकार असतो अशा लोकांची हि पातळी वाढून ५० ते ७० mg/dL इतकी असते. ह्र्दयविकार टाळण्यासाठी किंवा इतर समस्या टाळण्यासाठी लायपोप्रोटीनची पातळी नियंत्रित करणे आवश्यक असते.
लायपोप्रोटीनची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला हव्या.
- तुम्हाला योग्य पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे.
- नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.
- रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
- मद्यपान आणि धुम्रपान अशा गोष्टी टाळायला हव्यात.
- ताणतणाव यांचे नियोजन करायला हवे.
- शरीरातील कोलेस्ट्रोल ची पातळी नियंत्रित करायला हवी.
सामान्य कोलेस्ट्रोलची तपासणी (Important Blood Tests – 2) – सामान्य कोलेस्ट्रोल ची तपासणी हा रक्तातील एक समूह आहे. कारण यामध्ये संपूर्ण कोलेस्ट्रोल, एचडीएल कोलेस्ट्रोल, एलडीएल कोलेस्ट्रोल आणि ट्राईग्लीसरोईडस अशा गोष्टी समाविष्ट असतात. रक्तातील कोलेस्ट्रोल बाबत बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित नसतात. कोलेस्ट्रोल हा घटक आपल्या शरीरासाठी महत्वाचा आहे आणि याच्याशिवाय आपण जगू शकत नाही.
कोलेस्ट्रोल आपल्या शरीरात टेस्टेस्टेरॉन, पित्ताचे उत्पादन आणि हार्मोन बनविण्याचे महत्वाचे कार्य करत असतात. ज्यामुळे आपण चरबीचे पचन सहज करू शकतो. परंतु जसे आपल्याला माहित आहे कि आपल्या शरीरातील पेशी स्वतः कोलेस्ट्रोल उत्पादन करत असतात. परंतु काही पेशींना अधिक प्रमाणात कोलेस्ट्रोलची आवश्यकता भासते. यामुळे यकृता सारखे अवयव अतिरिक्त कोलेस्ट्रोलचे उत्पादन करू शकतात आणि शरीराच्या सर्व भागात कोलेस्ट्रोलचे वहन करतात. कोलेस्ट्रोलच्या वहनासाठी लिपोप्रोटीन ची गरज असते आणि हे आपण रक्ताचे परीक्षण करून करू शकतो. आपण शरीरातील कोलेस्ट्रोलचा थोडासा भाग मोजत असतो.
जेंव्हा आपण कोलेस्ट्रोल मोजत असतो तेव्हा आपल्याला विशेष करून एलडीएल मोजत असतो कारण एलडीएल ची पातळी वाढल्यास ते आपल्या रक्तवाहिन्यांच्या बाजूला भित्तिकामध्ये जावून जमा होते आणि या कारणामुळे रक्तवाहिन्या हळूहळू बंद होण्यास सुरुवात होते. युरोप मधील २०१९ च्या अभ्यासानुसार असे सांगण्यात आले आहे कि ह्र्दयविकार रोखण्यासाठी एलडीएल कोलेस्ट्रोल रोखण्यासाठी त्याची पातळी जितकी कमी करता येईल तितके चांगले आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी कोलेस्ट्रोल तयार करत असतात आणि ज्या लोकांच्या शरीरात एलडीएल कोलेस्ट्रोल ची पातळी कमी असते त्यांना धोका कमी असतो. याची पातळी हि प्रत्येक व्यक्तीनुसार कमी जास्त असू शकते. जर तुम्हाला आधीसुद्धा ह्रदयाचा झटका आला असेल तर तुम्हाला शरीरातील एलडीएल ची पातळी कमी करणे गरजेचे आहे.
![WhatsApp-Image-2024-11-18-at-20.18.23-2 Important blood Tests](https://fityourself.in/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Image-2024-11-18-at-20.18.23-2.jpeg)
कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी तुम्ही आहारामध्ये बदल करून, व्यायाम करून, कोलेस्ट्रोल कमी करण्याची औषधे घेवून कोलेस्ट्रोल कमी करू शकता यामुळे मासपेशींच्या दुखण्यामध्ये कमी होण्यास मदत होते. स्टेटीन सारखी औषधे १०० मधील २ रुग्णांना प्रभावित करत असतात. याचसोबत शरीरातील टेस्टेस्टेरोन च्या पातळीला सुद्धा प्रभावित करत असतात. जर तुम्ही कोलेस्ट्रोल कमी करत नसाल तर उच्च रक्तदाब आणि मधुमेह याची समस्या होवू शकतात. एलडीएल कोलेस्ट्रोल ची पातळी हि ५० mg/ dL यापेक्षा कमी असायला हवे याचे कारण असे आहे कि वयाची ५० ते ७० वर्षे पार केल्यानंतर ह्र्दयविकाराचा धोका अधिक असतो. यासाठी तुम्हाला उत्तम आहार, व्यायाम आणि काही औषधे तुम्ही घेऊ शकता.
HbA1c (Important Blood Tests – 3) – रक्तातील साखरेचे प्रमाण मोजण्यासाठी हि एक अतिशय आवश्यक चाचणी आहे. कारण या रक्ताच्या चाचणीमध्ये मागील दोन ते तीन महिन्यातील सरासरी रक्तातील साखरेची पातळी दर्शविली जाते. आपल्याला रक्ताची सामान्य पातळी नियंत्रित ठेवायची असते. मधुमेह नसलेले रुग्ण निरंतर ग्लुकोजची पातळी मोजण्यासाठी खर्च करत असतात. यापेक्षा HbA1c हि चाचणी तुमच्यासाठी अतिशय योग्य ठरू शकते.
Sodium, Potassium आणि Creatine (Important Blood Tests – 4) – या चाचण्या केल्याने तुम्हाला तुमच्या किडनी योग्य प्रकारे कार्य करतात कि नाही हे निश्चित करणे सोपे जाते.
Complete Blood Count (CBC) (Important Blood Tests – 5)- संपूर्ण रक्ताची चाचणी केल्याने आपल्याला बऱ्याच घटकांची माहिती मिळते जसे कि लाल रक्त पेशींची तपासणी करने आणि प्रमाण तपासणे शक्य होते. रक्तदोषांच्या आजारांमध्ये सुद्धा या चाचण्या महत्वपूर्ण असतात. याचबरोबर पांढऱ्या रक्तपेशीची सुद्धा तपासणी CBC मध्ये केली जाते. यामधील एक सुद्धा घटक शरीरात कमी जास्त असेल तर हे प्राथमिक रोगाची तपासणी करणे शक्य होते. म्हणून प्रत्येकाला या रक्ताच्या तपसण्या करणे आवश्यक असते आणि त्यामध्ये कोणताही बदल दिसून यायला नसला पाहिजे.
१८ ते ३५ वयोगटांच्या लोकांमध्ये कमीत कमी एक वेळा तुम्ही रक्ताच्या तपासण्या केल्या पाहिजेत. वय वर्षे ३५ च्या वरील वयोगटातील व्यक्तींनी दर ५ वर्षांनी लिपोप्रोटीन ची तपासणी करणे आवश्यक आहे. लिपोप्रोटीन हि रक्ताची तपासणी आयुष्यात एकदा करायची आहे.
यकृताची आणि थायरोईड ची चाचणी (Important Blood Tests – 6) – वर्षातून एकदा यकृताची तपासणी केली पाहिजे आणि निरोगी व्यक्तीने हि चाचणी करायला हवी यासोबतच जे लोक व्यसन करतात, मद्यपान करतात, ज्यांचे वजन वाढलेले असते, जे औषधे घेत असतात अशा लोकांनी नियमित यकृताची कार्य करण्याची तपासणी केली पाहिजे. याच प्रमाणे थायरोईड ची चाचणी सुद्धा केली पाहिजे कारण एखादा व्यक्ती ज्याचे केस पातळ होत आहेत किंवा वजन वाढत आहे अशा लोकांनी थायरोईड ची चाचणी केली पाहिजे. थायरोईड हि ग्रंथी शरीरातील विभिन्न प्रक्रियेमध्ये भाग घेत असतात.
![WhatsApp-Image-2024-11-18-at-20.18.23-1-1](https://fityourself.in/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Image-2024-11-18-at-20.18.23-1-1.jpeg)
जर तुमची थायरोईड ग्रंथी व्यवस्थित कार्य करत नसेल तर अशा वेळी शरीरात विविध आजार होवू शकतात. थायरोईड साठी विशेष करून TSH हि चाचणी केली जाते. यासोबत थायरोईड मधील हार्मोन ची पातळी असामान्य होत असेल तर अशा वेळी T ३ आणि T ४ या चाचण्या केल्या जातात.
Hs CRP – शरीरातील सूज असण्याविषयी रक्तातील परीक्षण करण्यासाठी ही चाचणी केली जाते. हि चाचणी सुद्धा नियमित तुम्ही करू शकता.
CMP चाचणी – या चाचणीमध्ये चयापचय क्रियेची संपूर्ण तपासणी केली पाहिजे यामध्ये बऱ्याच तपासण्या केल्या जातात जसे कि विटामिन, कॅल्शिअम आणि प्रोटीनचे स्तर हे सुद्धा तपासले जातात.
उपाशी इन्सुलिन ची पातळी – शरीरातील ग्लुकोज ची पातळी नियंत्रित राहण्यासाठी उपाशी पोटी रक्तातील ग्लुकोजची पातळी नियमित तपासायला हवी. उपाशी पोटी ग्लुकोज आणि उपाशी पोटी इन्सुलिन ची पातळी यांचे मोजमाप करायला हवे.
विटामिन डी परीक्षण चाचणी (Important Blood Tests – 7) – विटामिन डी शरीराच्या मजबुतीसाठी आवश्यक असते. आपली चयापचय क्रिया तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विटामिन डी अतिशय महत्वपूर्ण आहे. म्हणून शरीरातील विटामिन डी ची पातळी नियमित तपासणे महत्वाचे आहे.
शरीरातील लोहाची चाचणी (Important Blood Tests – 8) – खूप लोकांमध्ये हल्ली रक्तामध्ये लोहाची कमतरता आढळते. विशेषकरून महिलांमध्ये लोहाची कमतरता आढळते आणि यामुळे रक्तदोषाची समस्या निर्माण होते लोहाच्या कमतरतेमुळे रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी होते आणि शरीरात रक्ताद्वारे ऑक्सिजन चा पुरवठा कमी होतो आणि इतर समस्या सुद्धा निर्माण होतात. यासोबतच रक्तातील Magnesium आणि Phosphorous अशा चाचण्या केल्या पाहिजेत कारण खूप लोक जे Magnesium आणि Phosphorous कमी स्तरासोबत जगत आहेत. त्यांच्यासाठी काही लक्षणे लक्षात घेवून या चाचण्या केल्या पाहिजेत.
टेस्टेस्टेरोन – पुरुषांमध्ये टेस्टेस्टेरोन ची पातळी अतिशय आवश्यक ठरते कारण त्यांच्यामध्ये हि पातळी पर्यावरणातील घटक, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ अशा गोष्टींमुळे टेस्टेस्टेरोन ची पातळी कमी होत असते त्यामुळे पुरुषांनी याची चाचणी(Important Blood Tests) करणे महत्वाचे आहे.
जर आपल्याला आपल्या एखाद्या आजाराचे निदान होत नसेल तर अशा वेळी सर्व चाचण्या करणे आवश्यक आहे का ?
आपल्याकडे सर्वच्या सर्व चाचण्या (Important Blood Tests) करण्याइतके पैसे नसतात किंवा प्रत्यक्षात ते आपल्याला शक्य नसते. ज्यांच्याकडे पैसे असतात त्या लोकांना हे सर्व शक्य असते परंतु सर्वांनाच हे शक्य नसते. काही रक्ताच्या चाचण्या ह्या सकारात्मक असू शकतात आणि काही रक्ताच्या चाचण्या ह्या नकारात्मक असतात. कारण सकारात्मक चाचण्या ह्या चुकीच्या असू शकत नाही त्या सकारात्मकच असायला हव्यात. बऱ्याच वेळा ज्यांच्या रक्ताच्या चाचण्या (Important Blood Tests ) सकारात्मक असतात त्यामुळे वास्तविक खूप काही फरक पडत नसतो.