शरीरातील उष्णता कमी करा |Important Methods to Reduce Body Heat Naturally

आपल्या शरीरात उष्णता (Methods to Reduce Body Heat) हि महत्वाची आहे कारण शरीरातील चयापचय क्रिया, पचनासाठी आणि तापमान नियंत्रित करण्यासाठी. जेंव्हा आपल्या शरीरातील उष्णता आपल्या गरजेपेक्षा जास्त प्रमाणात वाढते त्यावेळी आपल्याला काही लक्षणे दिसून येतात जसे कि तुम्हाला जास्त प्रमाणात घाम येईल, जास्त उष्ण जाणवेल, तहान जास्त प्रमाणात लागेल, चेहऱ्यावर डाग येणे, मुरुमे येणे, हातापायाची त्वचा निघणे हि सर्व लक्षणे शरीरातील उष्णता वाढल्याची असतात यासोबतच अवेळी केस पांढरे होणे, केसगळती या सर्वांचे कारण शरीरातील उष्णता हे आहे. यासोबतच शरीरातील पित्त वाढते, तोंडात फोड येतात परंतु हि सर्वच लक्षणे येत नाहीत यामधील दोन ते तीन लक्षणे असल्यावर सुद्धा शरीरातील उष्णता हे कारण असू शकते. शरीरातील उष्णता आपण सहज कमी करू (Methods to Reduce Body Heat) शकतो ते कसे ते आपण पाहूया.

Methods to Reduce Body Heat शरीरातील उष्णता कमी करण्याचे काही मार्ग

शरीरातील उष्णता वाढणे म्हणजे शरीरात पित्तदोष निर्माण झाल्यामुळे काही लक्षणे दिसणे. शरीरातील पित्त वातावरणातील बदल, अयोग्य अन्नपदार्थ खाणे, धुम्रपान करणे, मद्यपान करणे, ताणतणाव यामुळे वाढते आणि यामुळे परिणामी उष्णता (Methods to Reduce Body Heat) वाढलेली दिसून येते.

डिंक (Methods to Reduce Body Heat – 1) – शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी डिंक खूप महत्वाचा आहे. डिंक हा लाडू बनविण्यासाठी वापरला जाणारा नाही तर हा डिंक वेगळा आहे. झाडावर ओला असतो पण जेंव्हा हा खाण्यासाठी वापरला जातो तेव्हा हा कोरडा असतो. डिंक हा कोणत्याही दुकानात आपल्याला सहज मिळतो. डिंक हा भिजवून लिंबू पाण्यामध्ये टाकून प्यायल्यास खूप चांगला फायदा होतो. डिंक हा खूप शीत मानला जातो आणि थंडीमध्ये हा खाण्यास मनाई केली जाते. जर तुम्ही एक चमचा डिंक खात असाल तर तुमचे शरीर शीत होईल तसेच तुमचे यकृत चांगले राहील. शरीरात मजबुती येण्यास सुरुवात होईल आणि चेहऱ्यावर चमक येईल. डिंक आपण कोणत्याही पेयामध्ये जसे कि सरबत मध्ये किंवा पाण्यामध्ये तसेच रात्री झोपण्याआधी दुधामध्ये टाकून सुद्धा पिवू शकतो.

डिंकाला त्याची विशेष अशी कोणतीही चव नसते. डोळ्याची जळजळ होत असेल तर अशावेळी डिंक पाण्यात भिजवून लावल्यास खूप आराम मिळतो. डोळ्यांखालची काळी वर्तुळे आणि शरीरातील हाताची आणि पायांची जळजळ होत असेल तर अशावेळी डिंक भिजवून हाताला आणि पायाला लावल्यास उष्णतेपासून आराम (Reduce Body Heat) मिळतो. डिंक हा स्वस्त सुद्धा आहे आणि त्याचे फायदे सुद्धा अनेक आहेत.

तुमच्या डोक्याचे संरक्षण करा (Methods to Reduce Body Heat- 2) – डोक्याचे संरक्षण उन्हापासून केल्याने डोक्यावर उन्हाचा थेट परिणाम होत नाही आणि यामुळे उन्हापासून त्वचेला आणि शरीराला संरक्षण होते तसेच उष्णतेच्या आणखी काही समस्येपासून बचाव होतो. आपल्या देशात उष्णतेचे प्रमाण हे वाढत आहे तसेच दुपारच्या वेळी उन्हाचे प्रमाण जास्त असते अशावेळी उन्हाचा प्रभाव थेट आपल्या डोक्यावर होत असतो. आपल्याला दुपारच्या कडक उन्हात जाणे टाळले पाहिजे किंवा उन्हापासून स्वतःचे संरक्षण केले पाहिजे.

डोक्याला तुम्ही टोपी, टॉवेल, स्कार्फ, छत्री, हेल्मेट अशा वस्तूंचा वापर करू शकता. यासोबत जे लोक गरम पाण्याने अंघोळ करत असतात त्यांनी डोक्यावर जास्त प्रमाणात गरम पाण्याचा वापर कमी करायला हवा यामुळे शरीराचे तापमान आणखी वाढेल आणि केस वयाच्या आधीच पांढरे होण्यास सुरुवात होईल केसांमध्ये कोंडा होईल आणि केसगळती सुरु होईल. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी (Methods to Reduce Body Heat) थंड पाण्याचा वापर केला पाहिजे.

Methods to Reduce Body Heat

थंड पेये (Methods to Reduce Body Heat- 3) – शरीरातील उष्णता जेंव्हा वाढत असते तेव्हा एक गोष्ट होत असते कि तुम्हाला जास्त प्रमाणात तहान लागत असते. अशा वेळी तुम्हाला काही न काही पेये प्यावेसे वाटते. अशा वेळी तुम्ही विविध कोल्ड्रिंक्स घेतां ज्यामध्ये कार्बन मोठ्या प्रमाणात असते तसेच सोडा असतो हि अशी पेये आहे ज्यामध्ये कित्येक वाईट घटक असतात जे आपल्या हाडामधील कॅल्शिअम शोषून घेतात. या थंड पेयांमध्ये खूप जास्त प्रमाणात एसिड असतात आणि ते तुमच्या पोटाचा पीएच स्तर बिघडवतात. कोल्ड्रिंक पिणे म्हणजे आगीत तेल टाकल्यासारखे असते. अशी पेये पिल्याने तुम्हाला पोटाच्या समस्या होवू शकतात. त्यामुळे अशी पेये पिण्यापेक्षा आपल्याला नैसर्गिक पेये प्यायला हवी जसे कि उसाचा रस तुम्हाला सर्व जागी उपलब्ध होत असतो. उसाचा रस हा चांगले औषधी गुणधर्म असलेला आहे.

उसाच्या रसात लिंबू, पुदिना घातल्यास तो आणखी प्रभावी ठरतो. नारळ पाणी सुद्धा एक चांगला पर्याय आहे जो कि एक शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतो. नारळ पाणी प्यायल्याने मुतखडा विरघळून मुत्रावाटे बाहेर पडण्यास मदत होते, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते आणि चेहऱ्यावरील मुरुमे कमी होण्यास मदत होते. नारळ पाणी मध्ये खूप महत्वाची पोषक तत्वे असतात तसेच Antioxidant असतात त्यामुळे कोल्ड्रिंक पेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात हि पेये फायदेशीर असतात. चण्याची पावडर म्हणजे सत्तू सुद्धा तुम्ही पाण्यातून गुळ टाकून पाण्यातून पिऊ शकता.

पायाची मालिश (Methods to Reduce Body Heat – 4) – आपल्या शरीरातील उष्णता हि पायामधून बाहेर पडत असते. ज्याच्या शरीरात उष्णता जास्त असते त्यांच्या शरीरातून पायामध्ये घाम जास्त प्रमाणात बाहेर पडत असतो तसेच पाय गरम होत असतात. जसे आपण पाहतो कि झाडाच्या मुलाशी पाणी घातल्याने संपूर्ण झाड हिरवेगार होत असते त्याप्रमाणे तुमच्या शरीराचे मूळ हे पायामध्ये आहे. पायाची मालिश केल्याने शरीरातील उष्णता बाहेर काढण्यास (Important Methods to Reduce Body Heat) मदत होते.जर तुम्ही मोहरीचे तेल, खोबरेल तेल, तुप यापैकी एकाने मसाज केल्यास यामुळे तुमचे शरीर थंड होईल तसेच तुमचे मस्तक सुद्धा शांत होण्यास मदत होते.

Reduce Body Heat

रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमचे पाय थंड पाण्याने धुवू शकता आणि त्यांनतर तुम्ही तेलाने पायाला मालिश करू शकता. जर हे तुम्ही एक दिवस जरी केले तरी याचा फरक तुम्हाला दिसून येईल आणि यामुळे तुम्हाला चांगली झोप सुद्धा येईल. पायाला कांस्य थालीने मालिश केल्यास सुद्धा खूप जास्त प्रमाणात फायदा होतो. कांस्य थालीने मालिश केल्याने शरीरातील कोणत्याही प्रकारची उष्णतेची समस्या जसे कि मुळव्याध, यकृताची उष्णता, त्वचेचे विकार, राग येत असेल तर या सर्व समस्या कमी होण्यास मदत होते.

जेंव्हा तुम्ही कांस्य थालीने मालिश करता तेव्हा शरीरातील उष्णतेच्या प्रमाणात तुमचा पाय काळा होण्यास सुरुवात होते. जितका तुमचा पाय काळा होईल तितकी तुमच्या शरीरातील उष्णता जास्त बाहेर पडत असते. तुम्ही दैनंदिन असे करायला हवे ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. जर तुम्हाला कांस्य थाळी वापरणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या हाताने सुद्धा मालिश करू शकता.

मातीचा माठ (Methods to Reduce Body Heat – 5) – जेंव्हा जेंव्हा तुम्हाला तहान लागत असते तेव्हा तेव्हा किंवा शरीरात उष्णता वाढल्याचे कोणतेही लक्षण दिसून येत असेल तर अशावेळी तुम्ही मातीचा माठ विकत घ्या. कारण मातीपासून बनलेला माठ हि अशी वस्तू आहे कि जी नैसर्गिक रित्या थंड होत असते आणि ती आपल्या शरीरासाठी सुद्धा थंड असते त्याचप्रमाणे मातीमध्ये खनिजे भरपूर प्रमाणात असतात. जरी आपल्याला बर्फाचे पाणी थंड वाटत असले तरी बर्फ हा उष्ण गुणधर्म असलेला आहे. मातीच्या भांड्यामध्ये थंड केलेले पाणी हे नैसर्गिक थंडावा देणारे असते. मातीच्या भांड्यात रात्रभर पाणी ठेवले तर ते थंड होते परंतु हे पाणी प्यायल्यास तुमचा घसा खराब होत नाही.

सामान्य पाण्यापेक्षा मातीच्या भांड्यातील पाणी हे अधिक आरोग्यदायी मानले जाते. आणि मातीच्या भांड्यातील पाण्यात अधिक प्रमाणात खनिजे असतात. मातीचे भांडे हे कित्येक वर्षापासून वापरले जात आहे त्यामुळे हे अधिक फायदेशीर आहे. रात्री मातीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून प्यायल्यास तुम्हाला अपचन, एसिडीटी पोटाच्या समस्या यामध्ये औषधाप्रमाणे कार्य करते. मातीच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील उष्णता अपोआपच कमी होण्यास सुरुवात होईल. मातीचे भांडे आपण जेवण बनविण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. बाकी कोणत्याही धातूच्या भांड्यात बनविलेले अन्न तुलनेत मातीच्या भांड्यात बनविलेले अन्न हे अधिक रुचकर असते आणि यामुळे शरीरातील उष्णता बाहेर पडण्यास मदत होते. सामान्य भांडयाप्रमाणे मातीची भांडी सुद्धा वापरण्यास सोपी असतात.

Methods to Reduce Body Heat Naturally

शरीराची उष्णता वाढल्याने खूप काही समस्या निर्माण होवू शकतात म्हणून यासाठी वरील गोष्टींचा अवलंब करायला हवा. शरीरात पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवायला हवी यासाठी तुम्ही नारळ पाणी, कलिंगड, काकडी असे पदार्थ ज्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते यांचा वापर केला पाहिजे. शरीरात उष्णता वाढल्यास कोरफड सुद्धा अतिशय उपयोगी ठरते यामुळे थंडावा मिळण्यास मदत होते.

दह्यात अधिक प्रमाणात म्हणजे दुप्पट प्रमाणात पाणी मिसळून घेतल्यास आणि त्याचे ताक बनवून प्यायल्यास शरीरात उष्णता कमी होण्यास मदत होते. कारण ताक प्यायल्याने पोटातील उष्णता कमी होऊन पचन होण्यास सुद्धा मदत होत असते. पुदिन्याची पाने चहात किंवा पाण्यात किंवा सरबत मध्ये टाकून प्यायल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. शरीरात उष्णतेचा त्रास कमी करायचा असल्यास हलके आणि सुती कपडे वापरायला हवेत यामुळे तुमचाघाम बाहेर पडण्यास मदत होईल तसेच तुमच्या त्वचेला मोकळी हवा मिळाल्याने शरीरातील उष्णता बाहेर पडण्यास मदत होईल व तुमचे शरीर थंड होईल.

थंड पाण्यात पाय ठेवल्यास सुद्धा शरीरातील उष्णता पाण्यात शोषून घेण्यास मदत होईल. अधिक प्रमाणात पाणी असलेल्या भाज्या आणि फळे यांचा आहारात वापर केला पाहिजे. प्रक्रिया केलेले पदार्थ आणि अधिक उष्णता (Methods to Reduce Body Heat) असलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

https://fityourself.in/sunlight-powerful-and-healing/