
infection (संसर्ग) मानवी शरीरात विविध कारणामुळे आजर निर्माण होतात त्यामधील एक म्हणजे शरीराच्या विविध भागांना होणारा संसर्ग (infection) .त्यापैकी काही रोग जीवाणूंच्या तर काही रोग विषाणूंच्या संसार्गामुळे होतात. आपण येथे संसार्गामुळे होणाऱ्या आजारांची व त्याचबरोबर त्यांची लक्षणे आणि त्यावरील उपचार यांची सविस्तर माहिती घेऊयात. (bacterial and Viral infection)
1.1 जिवाणूमुळे होणारा संसर्ग (Bacterial Infection)
निसर्गतः काही जीवाणू आपल्या शरीरात असतात ते आपल्या शरीरास हानिकारक नसतात. याशिवाय बाहेरच्या वातावरणात काही जीवाणू असतात जे शरीराच्या बाहेर असतात. जेंव्हा असे काही जीवाणू आपल्या शरीरात प्रवेश करतात तेव्हा आपल्याला संसर्ग झला असे म्हणतात आणि अशा जीवाणूंना आपण रोग निर्माण करणारे जीवाणू असे म्हणतो. काही विशिष्ट स्थितीमध्ये सिम्बायोटिक जीवाणू आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी करून शरीरात संसर्ग निर्माण करतात. मानवी अवयव जसे कि घसा,आंत्र आणि त्वचा हे सुद्धा बाकीच्या अवयवांप्रमाणे संसर्गित होऊ शकतो.जीवाणूंचा संसर्ग एका आजारी व्यक्तीपासून दुसऱ्या आजारी व्यक्तीपर्यंत पसरू शकतो. म्हणून वैयक्तिक आणि सामुदायिक स्वच्छता राखण्यासाठी आणि या संसर्गास प्रतिबंधित करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी आपण घेतली पाहिजे.
जिवाणूमुळे होणाऱ्या संसर्गाची प्रमुख लक्षणे आणि चिन्हे कोणती आहेत.(bacterial infection symptoms)
जीवाणूंच्या संसर्गाची लक्षणे त्याचे क्षेत्र आणि संसर्गाची तीव्रता या सर्वांवर अवलंबून असते.त्याची काही लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.
- खोकला
- ताप.
- डोकेदुखी.
- सर्दी.
- घाम येणे.
- स्नायू वेदना.
- थकवा.
- श्वास घेण्यात अडचण.
- प्रभावित असलेल्या भागात वेदना आणि अस्वस्थ वाटणे.
- प्रभावित क्षेत्रात सूज आणि लालसरपणा असणे.
- भूक कमी लागणे.
जीवाणूंच्या संसर्गाची मुख्य कारणे काय आहेत :(Reasons of Bacterial infection):

- स्त्रेप्तोकोकस
- स्तफिलोकोकस
- इ कोलाई
- क्लेब्सिला
- मायको bacteriam
- स्युडोमोनास.
जीवाणूंमुळे होणाऱ्या संसर्गाचा (Infection) धोका वाढविणारी प्रमुख काही लक्षणे.
- कापल्यामुळे जखम होणे.
- जीवाणूजन्य संसर्ग असलेल्या व्यक्तीचा संपर्क.
- दुषित पाणी आणि अन्न वापरणे.
- संसर्गित व्यक्तीच्या मलाचा संसर्ग.
- जीवाणू संसर्ग असलेल्या व्यक्तीच्या खोकल्यातून सोडलेल्या श्वासामुळे संसर्ग.
- अप्रत्यक्ष जसे दुषित पृष्ठांना स्पर्श करणे.
जीवाणूजन्य रोगाचे निदान आणि उपचार कसे करतात. (Cure Of Bacterial Infection)
डॉक्टर खालीलप्रमाणे निदान करतात.
व्यक्तीच्या आधीच्या आजाराबद्दल माहिती घेतात.
व्यक्तीची शारीरिक तपासणी.
रेडीओग्राफ चा काढून शोध घेणे.
मुत्र,रक्त इत्यादी संबंधी च्या चाचण्या.
जीवाणूंच्या संसर्गाचा उपचार हा जीवाणूचा प्रकार आणि प्रभावित भाग यावर अवलंबून असतो.डॉक्टर ओरल किंवा सूक्ष्मजीवांना नष्ट करणारे औषधे देतास्त. जर आधी सांगितलेल्या औषधांनी bacteria नष्ट झाले नसेल तर डॉक्टरांनी औषधे बदलणे आवश्यक होते.
पायाला होणारा संसर्ग (Infection):
अथेलिट फुट हे पायात होणारे फंगल इन्फेक्शन आहे. जो पायांमधील बोटांच्या त्वचेवर प्रभाव पाडतो. हे सामान्यतः खेळाडूंच्या शारीरिक व्यायायामुळे घडून येते. या रोगांच्या संसार्गासाठी टीनिया हि बुरशी जबाबदार आहे.
पायाच्या संसर्गाची (Infection) मुख्य चन्हे आणि लक्षणे काय आहेत
या रोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला अंगठ्या दरम्यान खाज आणि जळजळ होते.
त्वचा कोरडी होऊन लाल होते, तसेच प्रभावित झालेली त्वचा भयानक दिसते.
कधी कधी पायांवर अल्सर,फोड तर कधी रक्तस्त्राव होतो.
नखे काही कालावधीनंतर ठिसूळ आणि खराब होतात.
काही प्रभावित क्षेत्रांवर वारंवार स्पर्श केल्याने हाताला आणि इतर भागांमध्ये पसरतो.
पायांवर होणाऱ्या संसर्गाची मुख्य करणे काय आहेत. (Athlete Feet Infection)
- बुरशीमुळे होणारा संसर्ग हा पायांच्या संसार्गासाठी जबाबदार आहे. हा एक संसर्गजन्य रोग आहे जो स्पर्शाने किंवा संसर्गित मोजे,बिछाने इत्यादी च्या माध्यमातून पसरू शकतो.
- क्वचितच,bacteria आणि सोरायसिस हा संसर्ग करू शकतात.
- अशुद्ध पाय, ओलावा,नखात असलेली घाण यामुळे संसर्ग होऊ शकतो.
- सार्वजनिक ठिकाणी पायात चप्पल न घालता किंवा दुसर्याचे मोजे हे धोक्याचे ठरू शकते.शक्यतो सार्वजनिक जागा जसे कि जिमखाना,स्विमिंग पूल,ऑफिस अशा भागात इन्फेक्शन होऊ शकते.
- मधुमेह आणि एड्स सारख्या रोगांमध्ये रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे अशा प्रकारचा संसर्ग होऊ शकतो.
निदान आणि उपचार कसे करतात.(Cure of Infection)
पायाची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना रोगाचे निदान करण्यास मदत होते.कारण निश्चित नसल्यास पायांमधील बायोप्सी केली जाते.
पुढील काही उपचार समाविष्ट आहे.
anti fungal औषधे या रोगावर औषधोपचरानुसार उपलब्ध आहेत. औषधाचे प्रमाण हे रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून आहे.
bacteria मुळे रोग झाला असेल तर antibacterial औषधे देतात.
दररोज पाय स्वच्छ ठेवणे आणि सार्वजनिक ठिकाणी पायांची काळजी ठेवणे महत्वाचे आहे.कारण जर फंगस आणि बुरशी पूर्णपणे नष्ट नाही झाली तर त्याची पुनरावृत्ती होईल.
स्वतः घ्यावयाची काळजी
ओलसर किंवा घाणेरडे मोजे घालणे टाळा.
घरात येताच आपले हात पाय स्वच्छ करा. खासकरून सार्वजनिक ठिकाणी जाऊन आल्यावर.
टॉवेल,रुमाल,मोजे वगैरे दुसऱ्या बरोबर वापरू नये.
आपल्या पायांचे संरक्षण करण्यासाठी पायांना झाकलेले शूज घाला.
1.3 जनुकीय संसर्ग (viral infiction):

कांजण्या जनुकीय संसर्ग Infection आहे आणि हा असल्यास तपासारखी लक्षणे दिसतात. पुरळ उठतात आणि शरीरावर खाज येणारे डाग तयार होतात. वेरीसेला लसीच्या वापरणे हा आजार कमी झाला आहे. जंतू शरीरात प्रवेश केल्यावर १० ते २१ दिवसात लक्षणे दिसतात. तसेच टी लक्षणे तशीच दिसतात.पुरळ येण्याआधी डोकेदुखी आणि ताप अशी लक्षणे दिसतात.
पुरळ आल्यानंतर तीन अवस्था येतात आधी लागण झालेल्या जागेवर गुलाबी उन्च्वता आणि लाल टेंगुळ येईल मग त्याचे फोडत रुपांतर होते.आणि खपली बनते. हा एक सौम्य आजार आहे.परंतु त्याचे परिवर्तन न्युमोनिया,इंसेफ्लैतीस रेयेज सिंड्रोम मध्ये होते.जे लोक यावेळी अस्प्रीन घेतात त्यांना अधिक धोका संभवतो.अधिक धोका असेल तर मृत्यू सुद्धा संभवतो.
सदृढ बालकांना औषधोपचाराची गरज नसते. खाज किंवा allergy कमी करण्यास्तही प्रतिबंधात्मक औषधे देतात.तसेच कांजिण्याची लस टोचून घेण्याचा सल्ला देतात.लस घेतलेल्या व्यक्तीला याची सौम्य लक्षणे दिसतात.कांजिण्याची लस तीव्र कांजीण्याचा सर्व घटनांपासून बचाव करते.
कांजण्या रोगाची लक्षणे :
ज्या व्यक्तींनी कांजिण्या रोगाची लस टोचून घेतली नसेल त्यांना कांजण्या होऊ शकतो.कांजण्या झाल्यावर ५-७ दिवस त्त्याचे आजार राहतात.
पहिले गुलाबी किंवा लाल टेंगुळ सदृश्य ज्याला पाप्युल्स म्हणतात. पुढील काही दिवसात याचा उद्रेक होतो.
नंतर हे टेंगुळ छोट्या फोडांमध्ये,ज्यांना वेसिक्ल्स म्हणतात.रुपांतरीत होतात. एक दिवसानंतर ते फुटून व्यायला लागतात.सर्वात शेवटी फुटलेल्या फोडांना खपल्या येतात आणि त्या भरायला वेळ घेतात. नवे टेंगुळ बरेच येत राहतात.त्यामुळे एखद्याला पुरळ आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून तिन्ही पुरळीच्या तिन्ही पायऱ्या असू शकतात.एकदा संसर्ग पसरल्यावर जंत सगळीकडे पसरतात. सर्व डाग निघून जाईपर्यंत संसर्ग संक्रामक अवस्थेत असतो. पुरळ आधी छाती,पाठ आणि चेहऱ्यावर येतात. नंतर सगळीकडे पसरतात.सगळ्या फोडी एक आठवड्यात खपली बनतात.याची काही लक्षणे पुढे आहेत.
डोके दुखणे
ताप येणे.
भूक न लागणे किंवा भूक कमी होणे.
थकवा जाणवणे.
लस टोचलेल्या व्यक्तींना कांजण्या होऊ शकतात.लस टोचलेल्या वाक्तींमध्ये लक्षणे सौम्य दिसतात. अशा लोकांना ताप असतो किंवा नसतो.फोडी पण कमी किंवा लाल डाग कमी असतात. पण लस न टोचलेल्या रुग्णांना गंभीर आजार असतात.
कॉलरा (पटकी):
कॉलरा (पटकी) हा एक जीवाणू संसर्ग आहे जो प्रदूषित पाणी आणि अन्नाचे सेवन केल्याने होतो.हा संसर्ग एक चिंताजनक बाब आहे आणि तो सामाजिक विकास झाला नसल्याचे दाखवितो. हा आजार शक्यतो अशा भागात होतो जिथे स्वच्छ पाणी इतर स्वच्छता सुविधांचा अभाव असतो. हा कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो.या आजाराने भारतात १.५ ते ४ लाख लोक बळी पडतात.
कॉलरा या रोगाची मुख्य लक्षणे
शौचाला पाण्यासारखे होणे
मळमळ आणि उलट्या
शरीरातील पाण्याचे अत्यल्प प्रमाण होणे.
शरीरात इलेक्ट्रोलाईटचा समतोल बिघडणे.
स्नायूंचे दुखणे.
मानसिक धक्का बसने.
याबाबत वेळीच उपचार न मिळाल्यास शरीरातील पाणी याचे प्रमाण खूपच कमी होऊन मृत्यू होऊ शकतो.
तसेच शुद्ध हरपणे कोमा,अपस्मार यासारखी लक्षणे लहान मुलांमध्ये दिसून येतात.
याची मुख्य कारणे
हा पचनसंस्थेचा संसर्ग आहे तो व्हीब्रियो या जिवाणूमुळे होतो.यामुळे जुलाब होतात परिणामी शरीरातील पाण्याची पातळी खालावते. शरीरातील सोडियम आणि क्लोराईड ह्या विषारी द्रव्यांमुळे असंतुलन निर्माण होते. ज्यामुळे पाणी अतिप्रमाणात बाहेर फेकले जाते.
धोकादायक घटकांमध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहेत.
अस्वच्छता ,पोटातील आम्ल कमी होणे.संसर्गित व्यक्तीचा संपर्क.कच्चे किंवा न शिजविलेल आन खाणे.
निदान आणि उपचार
संसर्गाच्या तीव्रतेनुसार खालील काही चाचण्या करण्याचा सल्ला देतात.
रक्त चाचण्या – पांढऱ्या पेशींची संख्या इलेक्ट्रोलाईटची पातळी.
रक्तातील ग्लुकोज : हे खूप कमी झाल्यास आजारपण लांबते.
मलाची तपासणी : मालाच्या नमुन्यातून ओळखणे
मूत्रपिंडाची कार्यशक्ती तपासणे – मुत्रपिंडाच्या कार्यक्षमतेत काही बिघाड आहे का तपासणे.
उपचारात खालील बाबींचा समावेश असतो.
ओरल रीहायड्रेशन किंवा तोंडावाटे शरीरातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी उपाय.
शिरेतून द्रवपदार्थ पुरवठा – कमी झालेले इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण आणि द्रवाचे प्रमाण वाढविणे.
प्रतीजैवके -गंभीर रुग्णांच्या बाबतीत आजार आटोक्यात आणण्यासाठी आणि मलाचे प्रमाण कमी करण्यासाठी.
झिंक स्प्लीमेटस – याच्या वापरणे याची लक्षणे कमी होतात.
लसीकरण – सर्वसाधारणपणे प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींना दिली जाते.
जर आपण कॉलरा ग्रस्त ठिकाणी राहत असाल किंवा अशा ठिकाणी प्रवास करत असाल तर या पद्धतींचे अनुसरण करा.
- अन्न हाताळण्यापूर्वी आणि शौचालय वापरल्या नंतर साबण आणि पाण्याने हात धुणे.
- उकळलेले आणि शुद्ध पाणी प्या.
- रस्त्यावर विकले जाणारे पदार्थ खाणे टाळा.
- द्राक्षे आणि बेरी सारखी फळे टाळा.
- सुशी आणि शेलफिश यांसारखी कच्चे आणि अर्धे शिजवलेले सीफूड खाणे टाळा.
https://fityourself.in/1-spondylosis-painful-in-marathi-मणक्यातील-संधिवात