आपल्यातील प्रत्येकाला दीर्घायुषी होण्याचा आशिर्वाद दिला जातो परंतु आपल्या ज्या काही दैनंदिन वाईट सवयी असतात त्या आपल्याला दीर्घायुषी होण्यापासून रोखत असतात. म्हणून आपण दैनंदिन (Live Longer Habits) अशा काही चांगल्या सवयी अवलंबल्या पाहिजेत ज्या आपले आयुष्य वाढविण्यास मदत करतील. या काही सवयींमुळे तुम्ही अधिक उर्जेचा अनुभव घेऊ शकता आणि दिघायुशी बनू शकाल.
![](https://fityourself.in/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Image-2024-11-26-at-08.39.15-1024x933.jpeg)
some of Live Longer Habits below
Live Longer Habits -१ (नियमित आरोग्याची तपासणी) – आपण नियमित आरोग्याची तपासणी कधीच करत नाही उलट आपण फक्त आजारी पडल्यावरच आरोग्याची तपासणी करण्यासाठी जात असतो. कारण निरोगी राहण्यासाठी कोणतीही आरोग्याची समस्या निर्माण होण्याआधी रोखणे महत्वाचे आहे. कारण तुम्ही समस्या झाल्यावर त्याच्यावर उपचार शोधत असता. परंतु समस्या निर्माण झालीच नाही तर किती चांगले होईल म्हणून नियमित आरोग्याची तपासणी करायला हवी. जसे तुमची गाडी जास्त काळ तिची देखभाल केली नाही तर ती हळूहळू खराब होण्यास सुरुवात होईल त्याचप्रमाणे तुमच्या शरीराची नियमित तपासणी केली पाहिजे. तुमच्या शरीरातील समस्या जितक्या लवकर तुमच्या लक्षात येतील तितक्या लवकर तुम्ही त्याचे निदान आणि उपचार करू शकता.समस्यांचे निदान तुम्ही तुमच्या आहारात बदल करून किंवा तुमच्या जीवनशैलीत बदल करून करू शकता.
Live Longer Habits -२ (तुमचा मेंदू सक्रीय ठेवा) – जगात असे कित्येक लोक आहेत ज्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता त्यांच्याहून २० वर्षे कमी असणाऱ्या व्यक्तींपेक्षा कितीतरी अधिक आहे. अशा लोकांमध्ये मेंदूच्या कोणत्याही समस्या कमीत कमी असतात किंवा नसतात. ज्याप्रमाणे शारीरिक दृष्ट्या सदृढ राहण्यासाठी तुम्ही व्यायाम करत असता त्याप्रमाणे मानसिक दृष्ट्या सदृढ राहण्यासाठी तुम्हाला काहीतरी आव्हानात्मक गोष्टी करायला हव्यात, काही नव्या गोष्टी करायला हव्यात यामुळे तुमच्या मेंदूमध्ये नवीन न्युरोन बनत असतात हि प्रक्रिया मेंदूला उत्तेजना देते आणि वयाच्या वाढीनुसार त्याचे कार्य सुधारते. मेंदूला सक्रीय ठेवण्यासाठी नवीन नवीन कौशल्ये शिकायला हवी. तुम्ही न वाचलेले वाचा. ज्या गोष्टीत मेंदूचा अधिक अधिक वापर होतो अशा नवीन गोष्टी करायला हव्या. तुम्ही तुमच्या मोबाईल मधील नंबर किंवा काही गोष्टी मेंदूमध्ये साठवण्याचा प्रयत्न करा.
Live Longer Habits -३ (शारीरिक सदृढता) – निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करणे अतिशय महत्वाचे असते. नियमित ५० ते ६० मिनिटे व्यायाम करणे महत्वाचे असते परंतु काही लोकांकडे वेळ नाल्याने ते करू शकत नाहीत म्हणून जितके शक्य आहे तितका व्यायाम करायला हवा जसे कि ३० मिनिटे १५ मिनिटे. जर तुम्ही दिवसभर निष्क्रिय असाल आणि जर तुम्ही १५ मिनिटे व्यायाम करत असाल तर १५ मिनिटे व्यायाम करत असलेल्या व्यक्तीचे आयुष्य अधिक असेल. नियमित तुम्ही व्यायाम करत असाल तर तुम्हाला ह्रदयाचे विकार, मधुमेह, कॅन्सर अशा समस्या तुम्हाला होणार नाहीत. जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर तुमची हाडे आणि मासपेशी अधिक मजबूत होतील. सक्रीय जीवनशैलीचा स्वीकार करणे हे अधिक महत्वाचे असते तुमचे दीर्घायुष्य प्राप्त करण्यासाठी.
![Live Longer Habits](https://fityourself.in/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Image-2024-11-26-at-08.39.19-1024x877.jpeg)
Live Longer Habits -४ (तुमच्या पाठीचे आरोग्य) – तुमची पाठ नेहमी ताठ ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. तुमची पाठ हि लवचिक असली पाहिजे त्यासोबत पाठीजवळ असलेले स्नायू सुद्धा सक्रीय असले पाहिजेत. पाठीचा कणा हा तुम्ही जसे वलवाल तसे वळत असतो. यासाठी तुम्ही बसताना आणि उभे राहिल्यावर नेहमी ताठ बसले पाहिजे. यासोबत पोट थोडे आतमध्ये खेचलेले हवे आणि खांदे आराम अवस्थेत असावेत. जेंव्हा तुम्ही एखादी जड वस्तू उचलत असता तेव्हा पाठीचा कणा न वाकवता सरळ रेषेत ठेवावे. तुमच्या आहारात पाने असलेल्या हिरव्या भाज्या, पपई असे पदार्थ समाविष्ट करायला हवे. हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला कॅल्शिअम, मागनेशीअम, विटामिन डी-३ मिळणारे पदार्थ घेतले पाहिजेत. जर तुम्ही जास्त वेळ एका जागी बसून काम करत असाल तर थोड्या थोड्या वेळाने तुम्ही विश्रांती घेतली पाहिजे.
Live Longer Habits -५ (ताणतणाव व्यवस्थापन) – जेंव्हा तुम्हाला ताण येत असतो तेव्हा तुमचे ह्र्दय अधिक वेगाने धडधडत असते आणि ह्रदयाची गती वाढते. ताणतणाव फक्त आपल्या ह्रदयाची गती वाढवत नाही तर आपली वृद्ध होण्याची प्रक्रिया सुद्धा वेगाने होते. जेंव्हा तुम्ही ताणतणाव मध्ये असता तेव्हा शरीरात कोर्टीसोल सोडले जाते जे तुमच्या ह्रदयविकार, मधुमेह, चयापचय क्रिया यावर परिणाम करत असते. ताणतणाव तुमच्या रोग प्रतिकारक शक्तीला कमजोर बनवते. तुम्हाला काही संसर्ग होवू शकतात. ताणतणाव व्यवस्थापन करण्यासाठी व्यायाम, प्राणायाम,मेडीटेशन अशा क्रिया करायला हव्या. रोज रात्री दैनंदिनी लिहिल्याने सुद्धा यामध्ये फायदा होत असतो.
Live Longer Habits -६ (तुम्ही काय खात आहात) – तुम्ही काय खाता यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात जसे कि तुम्ही साखर किती खाता प्रक्रिया केलेले पदार्थ किती खाता, कॅफिन किती प्रमाणात घेता कारण तुम्हाला असे पदार्थ टाळले पाहिजेत. तुम्ही असे पदार्थ खाल्ले पाहिजेत कि जे खाल्यावर तुमच्या शरीराला आतून चांगले वाटले पाहिजे. तुम्ही फळे खायला हवी, भरपूर पाणी प्यायला हवे, सुकामेवा खायला हवा, सलाड खायला हवे, ८ ते ९ तासाची चांगली झोप घेतली पाहिजे. तुमच्या शरीरात कमी झोपेमुळे ताणतणाव वाढत जाईल.