Muscle Memory is it Genuine ?

Muscle Memory – आपल्याला काही लोकांना किंवा अभिनेत्यांना बघून वाटत असेल कि त्यांनी ३० दिवसात किंवा ६० दिवसात एखाद्या सिनेमासाठी वजन वाढविले किंवा घटविले. त्यांची शरीरयष्टी लगेच कधी काय पिळदार बनते हे सर्व प्रश्न आपल्याला पडणे साहजिकच आहे. तसेच बरेच लोक फोटो पोस्ट करताना दिसतात कि मी आधी असा होतो आता बघा कसा आहे. त्यामध्ये आधीचे आणि नंतरचे फोटो दाखविले जातात. आपण त्यातून उत्साहित होऊन म्हणतो कि आपल्याला सुद्धा असेच काही तरी करायचे आहे. त्यावेळी आपण कुठेतरी शोधत असतो कि त्यांनी कसे काय असे केले किंवा जिम मध्ये जावून आपण ट्रेनर ला विचारतो कि अशी बॉडी कशी बनेल आपल्याला पण तसेच करावेसे वाटते.

अभिनेते किंवा जे लोक प्रसिद्ध झाले आहेत त्यांच्यासारखे होण्यासाठी आपण जे सांगेल ते खायला सुद्धा तयार होतो. परंतु हे सत्य नसते ते कसे आपण पाहूया. कारण इतक्या कमी वेळात असे होणे तितके सोपे नाही.तर आपण इथे Muscle Memory बद्दल जाणून घेणार आहोत स्नायूंची लक्षात ठेवण्याची क्षमता हि काही मेंदूची क्षमता असते तशी नसते. स्नायूंची क्षमता हि फक्त मेंदूशी जुळलेली असते तुम्ही पूर्णपणे वाचल्यास तुम्हाला हे लक्षात येईल, कारण असे होवू शकते आत्ता हे तुमच्या कमी पडत नसले तरी भविष्यात निश्चित हे तुमच्या कमी येईल.

Muscle Memory is it Genuine ?

What is Muscle Memory ?

कोणतीही अशी गोष्ट जी आपल्या मेंदूमध्ये घट्ट बसते किंवा आपल्या नेहमी लक्षात राहते त्याला आपण स्मरण किंवा मेमरी असे म्हणतो. म्हणजेच लहान पाणी तुमच्या सोबत काही अपघात झाला असेल किंवा काही घटना घडली असेल तर त्याबद्दल आपल्याला नेहमी आठवत राहते. याचप्रमाणे स्नायू किंवा मसल ची अशी स्वतःची काही मेमरी नसते परंतु ते मेंदूशी संलग्न असतात त्यामुळे तुमचे स्नायू तुम्ही आधी केलेल्या गोष्टींबाबत जागरूक असतात आणि त्याप्रमाणे ते तयार होत असतात.

तुम्ही असे कित्येक लोक पहिले असतील जे पूर्णपणे तंदुरुस्त असतात जसे कि खेळाडू जे स्वतःला अतिशय तंदुरुस्त ठेवतात परंतु खेळात त्यांना काहीतरी दुखापत होते आणि त्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात किंवा त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे त्यांचे शरीर हळूहळू कमजोर होण्यास सुरुवात होते. त्यामुळे त्यांना पुन्हा तितका व्यायाम आणि आहार घ्यावा लागतो.

जर पुन्हा आपण व्यायाम किंवा तत्सम गोष्टी करण्यास सुरुवात केली तर तुम्हाला त्वरित तुमच्या शरीरामध्ये सुधारणा झालेली दिसेल. हि सुधारणा तुम्हाला वाटेल लगेच झाली असेल परंतु यासाठी ७ ते ८ वर्षे मेहनत घेतलेली असते. ज्या लोकांनी ५ ते ७ वर्षे खूप मेहनत करून आपली शरीरयष्टी बनवलेली असते परंतु काही कारणाने ते तेवढी मेहनत किंवा व्यायाम करू शकत नाहीत त्यानंतर जेंव्हा ते सुरुवात करतात त्यांना एवढा जास्त वेळ लागत नाही. २ ते ३ महिन्यात वयोमानानुसार त्यांना चांगले परिणाम दिसतात आणि हे सर्व त्यांच्या Muscle Memory मुळे घडते.

Muscle Memory How to Build

Muscle Memory – मसल बनविण्यासाठी आपण आपण आपल्या मसलवर ताण टाकतो आणि त्यासोबत आपल्या मसल मधील जे तंतू असतात ते तुटतात त्यामुळे त्याच्यामधील न्युक्लिया वेगळा होतो तसेच नवीन तंतू तयार होतात हे जास्तीचे तंतू शरीरात निर्माण होण्यास सुरुवात झाल्यामुळे ते जागा निर्माण करत असतात म्हणून तुमचे स्नायू वाढण्याची जागा वाढते आणि आपले स्नायू मोठे होतात. काही कारणामुळे तुम्ही व्यायाम किंवा मेहनत करणे सोडून देता त्यावेळी आपल्या शरीरातील विविध स्नायू असतात ज्यांची शरीराला आवश्यकता नसते आणि त्यामुळे शरीर त्यांना आपल्यापासून वेगळे करण्यास सुरुवात करते. पहिल्या २ ते ३ आठवड्यात आपल्या शरीरात जे ग्लायकोजेन साठविलेले असते ते आपले शरीर सोडून देते. ग्लायकोजेन म्हणजे साठविलेले कार्बोहायड्रेट शरीर बाहेर टाकते.त्यामुळे तुमची शक्ती कमी होते.

शरीराची मजबुती सुद्धा कमी होते, कार्बोहायड्रेट मुळे शरीरात साठविलेले पाणी निघून जाते आणि आपल्याला वाटते आपण कमजोर होत आहे. त्यानंतर ४ ते ६ आठवड्यात किंवा २ ते ३ महिन्यात आपल्या शरीराचे जे वजन आहे ते कमी होणाय्स सुरुवात होते.

जर तुम्ही १५ ते २० वर्षांचे असाल तर तुमचे स्नायूंचे वजन कमी होणार नाही पण तुम्ही जर ३० वर्षांच्या वरील असाल तर तुमच्या शरीरातील स्नायूंचे वजन ते जास्त कमी होईल १८ ते ३० वर्षांच्या व्यक्तीच्या तुलनेत. परंतु तुमचे स्नायूंचे वजन नक्कीच कमी होईल जेंव्हा तुम्ही योग्य आहार आणि व्यायाम किंवा मेहनत सोडून द्याल. म्हणजेच तुम्ही व्यायाम करण्याचे सोडून दिल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमच्या स्नायूंचे वजन राखण्यासाठी तुम्हाला हलका व्यायाम करावा लागतो.

तुम्ही इतका व्यायाम करा कि ज्यामुळे तुमच्या स्नायूंचा आकार तेवढाच राहील. कारण यामुळे स्नायूंचा आकार वाढत राहतो. जेंव्हा तुम्ही व्यायाम करणे सोडता किंवा जिम करणे सोडता तेव्हा तुमच्या शरीराची स्थिती पुन्हा सामन्य होईल. तुम्ही जर कोणत्याही खेळाडूला पहिले तर जोपर्यंत व्यायाम करत आहे तोपर्यंत तो खेळाडू तुम्हाला तंदुरुस्त आणि आकर्षक वाटेल परंतु व्यायाम बंद केल्यानंतर त्याचे शरीर सामान्य स्थितीत येईल.

कारण आपल्या शरीराला इतक्या स्नायूंच्या वजनाची गरज नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्नायुंना ताण देवून व्यायाम करत नाही तोपर्यंत. त्याचप्रमाणे ज्या अभिनेत्यांना पाहतो त्यांच्या बाबतीत सुद्धा आहे म्हणजे त्यांनी आधी खूप व्यायाम करून चांगली शरीरयष्टी बनवलेली असते त्यामुळे ते वजन वाढवू शकतात किंवा कमी करू शकतात.

Muscle Memory Fact – जर एखादा अभिनेता तरुण वयापासून म्हणजे १५ ते २० वर्षापासून व्यायाम करत असेल तर त्याच्यासाठी हे सोपे ठरते तसेच असे लोक त्यांच्यासोबत चांगले व्यावसायिक ट्रेनर ठेवतात तसेच आहारतज्ञ त्यांच्या सोबत असतात. म्हणून आपली स्वतः ची कोणाशीही तुलना करता कामा नये. जेंव्हा तुम्ही व्यायाम करण्यासाठी जाता तेव्हा कोणाकडे पाहून व्यायाम करू नका म्हणजे एखाद्याने ३ महिने किंवा ५ महिन्यात चांगली बॉडी बनविली कारण त्याच्या परिणामामागे खूप दिवसाची मेहनत लपलेली असते.

त्यामुळे वय हे फक्त एक संख्या आहे म्हणून वयाचे बंधन नसते त्यामुळे तुम्ही सुद्धा नियमित आहार घेतल्याने आणि व्यायाम केल्याने चांगल्या प्रकारे स्नायूंचे वजन मिळवू शकता. आपल्याला Muscle Memory हि नैसर्गिक रित्या मिळालेली आहे.

Tips to improve Muscle Memory

तुम्ही सुद्धा तुम्हाला हवी तशी शरीरयष्टी मिळवू शकता त्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत करावी लागेल जसे कि Muscle Memory मुळे.

  • तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार अचूक वजन उचलावे लागेल.
  • दुसरी गोष्ट आहे कि तुम्हाला आहारात ज्या कॅलरी घेत आहात त्या नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात घ्याव्या लागतील. जसे कि वजन वाढविण्यासाठी आहार घेतला जातो.
  • तुम्हाला प्रत्येक स्नायूचा व्यायाम करायचा आहे.
  • तसेच तुमच्या स्नायुंना जी सवय असते ती तुम्हाला स्नायूंचे वजन (Muscle Memory) वाढविण्यास अपोआपच मदत करेल.

समजा १० वर्षे आधी तुम्ही गाडी चालवत असाल किंवा तुम्ही पोण्यास शिकला असाल, तुम्ही एखादा खेळ खेळत असाल याप्रकारची कोणतीही क्रिया असेल हे तुम्ही जरी करायचे सोडून दिले तरी तुम्ही ते परत करायला गेल्यास तुमची कार्य करण्याची गती कमी किंवा जास्त असू शकते किंवा ते काम आपण करण्यास नकार देवू हेच व्यायामाच्या बाबतीत घडते.

प्रत्येक वेळी तुम्ही व्यायाम करताना सुरुवातीला तुम्हाला जर तुम्ही नवीन असाल तर खूप अडचणी येतात परंतु तुम्ही आधी ते कार्य केले असल्याने त्याच्या शरीराला सर्व क्रियांची आधीपासून जाणीव असते म्हणून त्याच्या मेंदूचे आणि मसलचे जे संबंध असतात त्यामुळे त्याला ते खूप सोपे जाते आणि त्यामुळे परिणाम अधिक वेगाने दिसून येतात.म्हणून अशा व्यक्तीला चांगले परिणाम पाहायला मिळतील तुलनेने नवीन व्यायाम करणाऱ्या किंवा क्रिया करणाऱ्या व्यक्तीला कमी परिणाम किंवा हळू गतीने परिणाम पाहायला मिळतील.

वरीलप्रमाणेच जे काही शरीराच्या स्नायूंच्या बाबतीत घडते यालाच म्हणतात Muscle Memory म्हणून जे कोणी म्हणत असतात की कोणी ३ महिन्यात तर कोणी ४ महिन्यात चांगली शरीरयष्टी बनवली त्यामागे हि काही कारणे लपलेली असतात. यामुळे कोणालाही असे म्हणणे चुकीचे होईल कि चुकीच्या पद्धतीने शरीर बनविले आहे कारण प्रत्येक जन मेहनत करून शरीर चांगले ठेवत असतो आणि त्यांच्या या रूपांतरनामध्ये खूप वर्षांची मेहनत असते. म्हणजेच खूप वर्षांच्या त्यांच्या मेहनतीला आठवून ते नव्याने शरीरयष्टी बनवीत आहेत. कोणाशीही तुलना करण्याची काहीच गरज नसते कारण प्रत्येकाची जीवनशैली, आहार, शरीराची ठेवण हे पूर्णतः वेगळे असतात. परंतु जे लोक आधी खूप जास्त मेहनत करत होते त्यांच्यासाठी शरीरातील स्नायूंचे वजन वाढविणे हि गोष्ट सोपी असते.

Muscle Memory हि तुमच्या मेंदूच्या नियंत्रणाशी सुद्धा निगडीत असते. यामध्ये तुमचा मेंदू आणि स्नायू, मासपेशी या एकत्रितपणे काम करत असतात जसा जसा अधिक वेळ तुम्ही नियंत्रणावर भर द्याल तसेतसे तुमची गती नियंत्रित होईल. तसेच यामुळे तुमची संपूर्ण निरोगी राहण्याची क्षमता वाढेल. तुमच्या शरीरातील चरबी कमी होईल आणि वेगाने शरीर सुधारण्यास मदत होईल तसेच तुमची शरीराची ध्येये पूर्ण होतील.यामुळे तुम्हाला स्वतः ला प्रेरित करून अधिक अधिक व्यायाम करून पुन्हा तुमची आदर्श असणारी शरीरयष्टी बनविण्यास मदत होईल. जितके तुम्ही निरंतर असाल तेवढे तुम्ही यामध्ये यशस्वी व्हाल.

https://fityourself.in/rich-healthy-fruits/

https://ig.me/j/Abaa1lK5byvYth8N