साखर आणि कर्बोदके नसलेल्या भाज्या|No Sugar and No Carbohydrate essential Vegetables

साखर आणि कार्बोहायड्रेट नसलेले (No Sugar and No Carbohydrate) पदार्थांविषयी आपल्याला जाणून घेणे महत्वाचे आहे. जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर आणि मधुमेहापासून सुद्धा दूर राहायचे असेल तर अशा वेळी आपल्याला आपल्या आहारातून कार्बोहायड्रेट आणि साखर खाणे बंद करावे लागेल. परंतु आहारामध्ये आपल्या शरीराची गरज पूर्ण करणारे पौष्टीक घटक यांचा विचार करता कमी कार्बोहायड्रेट असलेले आणि साखर नसलेले पदार्थ शोधणे हे कठीण असते. म्हणून आपण येथे काही पोष्टिक आणि कोणतेही कार्बोहायड्रेट नसलेले आणि साखर नसलेले पदार्थ पाहूयात आणि ते कोणत्याही व्यक्तीसाठी उपयुक्त ठरतील.

Vegetables with No Sugar and No Carbohydrate

1. (No Sugar and No Carbohydrate Vegetable 1) अरुगुला म्हणजेच मराठीत याला गारगिर भाजी असे म्हणतात हि भाजी हिरव्यागार पानांची असते. हि भाजी सलाड किंवा पिज्जा यांच्या वरती कच्या स्वरूपात खाण्यासाठी वापरली जाते. १०० ग्राम कच्या स्वरूपात खाण्याने यातून आपल्याला ०.३ ग्राम इतके कार्ब्स आणि ०.७ ग्राम इतकी साखर मिळते. त्याचबरोबर व्हिटामिन के चा एक उत्तम स्त्रोत आहे जे आपल्या रक्ताच्या गुठळ्या तसेच हाडांच्या आरोग्यासाठी आणि अधिक रक्तस्त्राव होण्यापासून रोखण्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये ग्लूकोसाईनोलेटस असते ज्याची चव कडू असते आणि याच्या कडवटपणामुळे आपल्याला चांगले फायदे मिळतात. यकृतातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आणि कॅन्सर विरोधी गुण असल्यामुळे हि महत्वाची ठरते. जेंव्हा याची भाजी बनविली जाते तेव्हा आयसोथियोसायनेटस परिवर्तीत होतात ज्यांना प्रयोगशाळा अभ्यासात कॅन्सरच्या पेशीचा विकास रोखण्यासाठी दर्शविला गेला आहे.

2. (No Sugar and No Carbohydrate Vegetable 2) चिकरी हि एक कडू पाने असलेली भाजी आहे याची पाने लालसर असतात आणि कडू असतात. १०० ग्राम चिकरी मध्ये ३ ग्राम कार्ब्स आणि ० ग्राम साखर असते. चिकरी आपल्या उच्च फोलेट च्या कारणामुळे स्वस्थ गर्भधारणा आणि भ्रूणाच्या विकासामध्ये मदत करते. अभ्यासानुसार चिकरी मध्ये असलेल्या ल्युटीन मुळे दृष्टीविकारापासून वाचण्यास मदत होते. यामध्ये असलेल्या antioxidant मुळे सूज कमी करण्यास आणि कॅन्सर चा धोका कमी होण्यास मदत होते.

3. (No Sugar and No Carbohydrate Vegetable 3) पिवळ्या रंगाचे फुल येणारी रानटी भाजी – हि भाजी म्हणजे वनस्पतीची पाने आहेत ज्याला पिवळी फुले येतात जे जगातील खूप वेगवेगळ्या भागात मिळत असतात. या वनस्पतीमध्ये विषाहरण करण्याचे आणि मुत्रवर्धक गुण असतात. आणि हे यकृताच्या आरोग्याचे समर्थन करते. १०० ग्राम वनस्पतीमध्ये २ ग्राम कार्ब्स आणि ० ग्राम साखर असते. हे प्रीबायोटीक चे उत्तम स्त्रोत असतात जे आपल्या पोटातील चांगल्या Bacteria च्या वाढीसाठी पोषक असतात. या वनस्पतीमध्ये इन्युलीन असते जे एक कोलेस्ट्रोल कमी करणारे फायबर असते आणि पचन सुधारण्यास मदत करते.

4. (No Sugar and No Carbohydrate Vegetable 4 ) स्पेगेटी भाजी हा एक थंड वातावरणात आढळनारा एक लांब अंडाकृती आणि पिवळ्या किंवा नारंगी रंगाचा पदार्थ आहे. शिजविल्यानंतर याचे धागे वेगळे होतात आणि हा कमी कार्ब्स असणारा पर्याय आहे. हा ग्लुटेन मुक्त असतो आणि यामध्ये कॅलरीसुद्धा कमी प्रमाणात असतात तसेच साखरेचे प्रमाण सुद्धा कमी असते.

5. (No Sugar and No Carbohydrate Vegetable 5) पालक – पालक हि एक हिरवी पालेभाजी आहे जी अनेक पोषक तत्वांनी भरपूर आहे आणि बहुगुणी पालेभाजी आहे. १०० ग्राम कच्या पालक मध्ये जवळजवळ ३ ग्राम कार्ब्स आणि ० ग्राम साखर असते. पालक मध्ये उच्च प्रमाणात नाईट्रेट असते आणि ते आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी आणि रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करते. पालक चे सेवन केल्याने उच्च रक्तदाब आणि ह्र्दयरोग यांचा धोका कमी होण्यास मदत होते.

6. (No Sugar and No Carbohydrate Vegetable 6) शतावरी – शतावरी हि बाराही महिने आढळनारी वनस्पती आहे. याचे देठ हे खाण्यायोग्य असतात आणि हे पावसाळ्यामध्ये कापले जातात. १०० ग्राम शिजविलेल्या शतावरी मध्ये ३ ग्राम कार्ब्स आणि ० ग्राम इतकी साखर असते. शतावरी फोलेट चा एक उत्तम स्त्रोत असते, व्हिटामिन बी असल्यामुळे नवीन पेशी विशेषकरून लाल रक्तपेशी ज्यांचे उत्पादन करण्यास मदत करते. गर्भवती महिलांमध्ये हे महत्वाचे ठरते.

7. (No Sugar and No Carbohydrate Vegetable 7) ब्रोकोली – ब्रोकोली हि खाण्यायोग्य हिरवी भाजी आहे. ब्रोकोली हि सल्फोराफेनने समृद्ध असते आणि निसर्गामध्ये सहज आढळणारी वनस्पती आहे जी सूज कमी करण्यासाठी कॅन्सर रोखण्यासाठी मदत करते. तसेच खूप प्रकारचे आरोग्याचे फायदे यामधून मिळतात. १०० ग्राम ब्रोकोली मध्ये ६ ग्राम कार्बोहायड्रेट आणि १ ग्राम पेक्षा कमी साखर असते.

No Sugar and No Carbohydrate

8. (No Sugar and No Carbohydrate Vegetable 8) कोबी – १०० ग्राम पत्ताकोबी मध्ये केवळ ५.८ ग्राम इतके कार्ब्स आणि २.४ ग्राम इतकि साखर असते. कोबीमध्ये व्हिटामिन सी असते जे आपल्या शरीरासाठी एक निरोगी प्रतिकारशक्तीचे समर्थन करते. आपल्या त्वचेला तरुण ठेवते आणि ताजी ठेवण्यास मदत करते.

9. (No Sugar and No Carbohydrate Vegetable 9) कॉलीफ्लॉवर – १०० ग्राम कॉलीफ्लॉवर मध्ये केवळ २५ कॅलरी असतात आणि ५ ग्राम इतके कार्बोहायड्रेट तर २.५ ग्राम इतकी साखर असते. फुलकोबी मध्ये उच्च प्रमाणात फायबर असतात जे आपल्याला पचनास मदत करतात आणि बद्धकोष्टता कमी करण्यास मदत करतात. यामध्ये ग्लूकोराफेनीन नावाचा घटक असतो जो पचनसंस्थेच्या रक्षणास मदत करतो.

10.(No Sugar and No Carbohydrate Vegetable 10) कोथिंबीर – कोथिंबीर हि चविष्ट थोडीशी कडवट आणि दांडी आणि पाने असलेली भाजी आहे. १०० ग्राम कोथिंबीर मध्ये कार्ब्स चे प्रमाण २ ग्राम तर साखरेचे प्रमाण १ ग्राम इतके असते. कोथिंबीर मध्ये 3nb नामक रसायन असते ज्यामुळे रक्तवाहिन्यांचे अरोय चांगले राखण्यास मदत होते. यामधील उच्च फायबर च्या प्रमाणामुळे हे कोलेस्ट्रोल कमी करण्यास आणि साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते.

11. (No Sugar and No Carbohydrate Vegetable 11) गाजर – १०० ग्राम गाजरामध्ये ९ ग्राम कार्ब्स आणि ४ ग्राम इतकी साखर असते. गाजरामध्ये विशेष करून बीटा केरोटीन ची उच्च मात्रा असते. बीटा केरोटीन एक Antioxidant आहे जे शरीरामध्ये व्हिटामिन ए मध्ये परिवर्तीत केले जावू शकते. तसेच ते आपली दृष्टी आणि रोगप्रतिकारक प्रणाली यांच्या कार्यात महत्वपूर्ण असते.

12. (No Sugar and No Carbohydrate Vegetable 12) चार्ड – हि एक प्रकारची पालक आणि बीट यांसारखी भाजी आहे जी पोषक तत्वांनी भरपूर असते ज्यामध्ये विविध प्रकारचे Antioxidant असतात यामध्ये सूज कमी करणारे गुणधर्म असलेले घटक असतात तसेच सेल्युलर डीएनए ची क्षति कमी करण्यास बचाव करतात. १०० ग्राम मध्ये ४.७ ग्राम कार्ब्स आणि २.१ ग्राम इतकी साखर असते.

13. (No Sugar and No Carbohydrate Vegetable 13) काकडी – भरपूर प्रमाणात पाणी असलेली हि भाजी आहे यामध्ये खूप कमी कॅलरी असतात. काकडीमध्ये १०० ग्राम च्या तुलनेत २ ग्राम कार्ब्स असतात तर यामध्ये साखरेचे कोणतेही प्रमाण नसते. काकडीमध्ये अतिशय महत्वपूर्ण गुणधर्म असणारे सूजविरोधी आणि कॅन्सर विरोधी गुण असतात. याशिवाय काकडीची साल हि व्हिटामिन के चा उत्तम स्त्रोत असते जी आपल्या हाडांसाठी आणि रक्ताच्या गुठळ्या जमण्यापासून कमी करण्यासाठी आवश्यक असते.

14. (No Sugar and No Carbohydrate Vegetable 14) वांगी – वांगी हि एक लोकप्रिय भाजी आहे ज्यामध्ये आपण बटाटा, टोमाटो असे पदार्थ टाकू शकतो. १०० ग्राम वांग्यामध्ये ३.५ ग्राम कार्बोहायड्रेट, २.५ ग्राम फायबर आणि २.४ ग्राम इतकी नैसर्गिक पद्थतिने आढळणारी साखर असते. वांग्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात आणि यामध्ये नासुनीन नावाचा घटक असतो ज्याचा वापर यामधील antioxidant गुणांसाठी केला जातो. नासुनीन शरीरातील मुक्त कण हटविण्यासाठी मदत करत असते. नासुनीन शरीरातील सूज कमी करण्यासाठी आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते.

15.(No Sugar and No Carbohydrate Vegetable 15) लेट्स – लेट्स एक हिरवी भाजी आहे जी सलाड मध्ये वापरली जाते. यामध्ये कॅलरी, कार्ब्स ,साखर खूप कमी प्रमाणात असते आणि फायबर चा एक उत्तम स्त्रोत आहे त्यांमुळे पचनास अतिशय उत्तम आहे. १०० ग्राम कच्या भाजीमध्ये २.९७ ग्राम कार्ब्स आणि ०.५ ग्राम इतकी साखर असते. यामध्ये दोन antioxidant, ल्युटीन आणि जेक्सोथीन असतात जे आपल्याला डोळ्यांच्या समस्यांपासून वाचण्यास मदत करतात.

16.(No Sugar and No Carbohydrate Vegetable 16) मशरूम – मशरूम हे मासासाठी पर्याय म्हणून वापरले जातात. १०० ग्राम कच्या मशरूम मध्ये ३.२६ ग्राम कार्ब्स आणि ०.५ ग्राम साखर असते. मशरूम चा एक फायदा असा आहे कि त्यामध्ये बीटा ग्लुकेंस असतात जे आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. बीटा ग्लुकेंस पांढऱ्या रक्तपेशींच्या उत्पादनास प्रोत्साहित करण्यास मदत करतात. जे संक्रमण आणि रोगांशी लढण्यास मदत करतात.

17. (No Sugar and No Carbohydrate Vegetable 17) दोडका – दोडका हि काकडी सारखी हिरव्या रंगाची भाजी आहे जी आकाराने लांब असते. दोडका हा सूप मध्ये आणि भाजी मध्ये वापरला जातो. १०० ग्राम दोडक्यामध्ये ३.११ ग्राम कार्ब्स आणि २.२ ग्राम साखर असते. दोडक्यामध्ये उच्च फायबर असतात त्यामुळे पचन सुधारण्यास मदत करते आणि सख्रेचू पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.

18. (No Sugar and No Carbohydrate Vegetable 18) छोटे कोबी – हे भाजून किंवा शिजवून खात असतात १०० ग्राम मध्ये ५.५ ग्राम कार्ब्स आणि २.२ ग्राम साखर असते यामध्ये कॅन्सर विरोधी गुणधर्म असतात.

19. (No Sugar and No Carbohydrate Vegetable 19) करम साग – हि एक पाने असलेली भाजी आहे जी ब्रोकोली सारखीच असते हि भाजी कच्ची किंवा सूप मध्ये किंवा भाजी बनवून खाल्ली जाते. १०० ग्राम करम साग मध्ये ४.३ ग्राम कार्ब्स आणि ०.९ ग्राम साखर असते. हि एक antioxidant चा उत्तम स्त्रोत आहे विशेष करून कैरोटीनोईड, फ्लेवोनोईड आणि व्हिटामिन सी ने समृद्ध असते. तसेच आपल्या शरीराला मुक्त कणांपासून बचाव करण्यास मदत करते. यामध्ये भरपूर प्रमाणात आहारातील फायबर असते जे पचन क्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते. तसेच इतर रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करते.

https://fityourself.in/carbohydrate-effects-myth-and-essential/