
(Our teeth)आपले दात व त्यातील संक्रमण म्हणजे काय ?
आपले दात (Our teeth) व त्यामधील संक्रमण आणि फोड म्हणजे दातांचा संसर्ग. हा दातांच्या मुलापर्यंत पोहोचून त्यामध्ये पस संचय होतो.हा संसर्ग वेदनादायी असू शकतो आणि त्यासाठी दंतवैद्याची गरज पडू शकते. दातांभोवतालच्या अस्थिबंध आणि उतीना झालेल्या संसर्गास Periodontists म्हणतात.
(Our teeth infection)दाताच्या संक्रमणाची चिन्हे आणि लक्षणे आहेत?:
दातांच्या संसर्गाचे स्पष्ट चिन्ह म्हणजे सतत होणारी दातदुखी,जी वाढल्याने हिरडयामधील ग्रंथी ज्यांना लसिका ग्रंथी म्हणतात त्यांना सूज येते. दातांच्या संसर्गाची काही लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
गरम अथवा थंड कोणत्याही वस्तूची संवेदनशीलता.
ताप वाटत असल्याची भावना.
चावताना वेदना किंवा अडचण येणे.
तोंडाचा कसातरी घाण वास येणे.
१.१ (Our teeth)दाताच्या संसर्गाचे निदान आणि उपचार
मुख्य चिन्हे आणि लक्षणे दिसल्यास सर्वात आधी दातांच्या डॉक्टरकडे जाऊन संसर्गाची तपासणी करून हिरडीला फोड आला असल्यास तो बाकी भागात पसरतो का हे तपासणे आवश्यक आहे दातांचे डॉक्टर आपल्याला काही चाचण्या सांगू शकतात. त्यापैकी काही चाचण्या खालीलप्रमाणे आहेत :
एक्सरे – एक्सरे हा संसर्ग कोठे झाला आहे ते शोधण्यासाठी काढला जातो.
ओपिजी – सर्व दातांचे आणि जबड्याचे निरीक्षण करून संसर्ग किती प्रमाणात आहे हे निश्चित केले जाते.
सर्वात प्राथमिक व सामान्य काळजी म्हणजे आपले दात नेहमी स्वछ ठेवणे.दंतवैद्य कोणताही संसर्ग किंवा प्लाक टाळण्यासाठी दिवसातून दोन वेळा ब्रश आणि गुळण्या करण्याचा सल्ला देतात.
जर संसर्ग पसरत असेल किंवा झाला असेल तर antibiotics सोबत पुढील काही उपचार केल्या जातात.
फोड कोरून काढणे – जर फोड आला असेल तर दातांचे डॉक्टर आराम मिळण्यासाठी फोड फोडून स्वछच करतात.
रूट कॅनॉल उपचार – जर संसर्ग हिरडयांच्या मुळापर्यंत पोहोचला असेल तर दातांचे डॉक्टर रूट कॅनल करून साठलेला पस काढून टाकतात.
संसर्ग झालेला दात काढून टाकणे – जर रूट कॅनल संसर्ग रोखण्यासाठी पुरेसा नसेल तर अशा वेळी प्रभावी उपाय म्हणून दात काढून टाकला जातो. तसेच संसर्ग थांबविण्यासाठी antibiotics चा उपाय दातांचे डॉक्टर सुचवितात.
हिरड्यांना आलेली सूज

हिरड्यांना आलेली सूज हा दातावरील प्लाक तयार झाल्याने होणारा आजार आहे. प्लाक हा नैसर्गिक चिकट द्रवपदार्थ आहे. ज्यामध्ये bacteria असतात व जो दाताच्या पृष्ठभागावर जमा होतो. प्लाक हा दाताच्या मधल्या भागात जमा होऊ शकतो.जर योग्य काळजी घेतली नाही तर ह्यामुळे हिरड्यांना धोका निर्माण होतो व दातांना नुकसान होते.
हिरड्यांना सूज आलेली असल्यास तुम्हाला खालील लक्षणे असू शकतात
लाल व सुजलेल्या हिरड्या.
हिरड्या मधून रक्तस्त्राव
हिरड्या दुखू शकतात.
श्वासातून घाण वास येणे
थंड किंवा गरम खाद्य पदार्थांबद्दल संवेदनशीलता
दात खिळखिळे होणे.
हिरड्या सुजण्याची मुख्य कारणे काय आहेत
प्लाक तयार होणे हे जीजीव्हायटीसचे मुख्य कारण आहे. प्लाक मध्ये असणारा bacteria हिरड्यांवर परिणाम करून त्यांना संसर्गित करतो व त्यामुळे रक्तस्त्राव होतो. हा प्लाक घट्ट होऊन एक पदार्थ तयार करतो त्याला टारटार म्हणतात,जो प्लाक पेक्षाही घट्ट असतो.
हिरड्या सुजविन्याला कारणीभूत व धोका वाढवणारे घटक खालीलप्रमाणे :
तोंडाची योग्य स्वच्छता न राखणे
धुम्रपान व तंबाखू सेवन
गर्भधारणा
चुकीचा आहार
ताण
मधुमेह,एचआयव्ही संक्रमण,कर्करोग या सारखे आजार.
anti epileptik drug ,कर्करोगाची औषधे,तोंडावाटे गर्भ निरोधक व steroid औषधांचे सेवन.
हिरड्यांच्या सूज वरील निदान व उपचार कसे केले जातात :
(Our teeth)तुमच्या दातांच्या डॉक्टर कडून नियमित तपासणी करून घेतल्यास हिरडयांवरील सुजेचे निदान वेळेआधीच म्हणजे जेव्हा ते वेदनाविरहित असते तेव्हा केले जाते. उपचारामध्ये प्लाक एका विशिष्ट उपकरणाने काढून टाकला जातो.
जर हिरडी दुखत असेल तर दुखणे कमी होण्यासाठी डेनटिस्ट तोंडावाटे पेनकिलर घेण्याचा सल्ला देतात.काही बाबतीत antibiotic सुधा दिले जाते.जर जास्त प्रमाणात संसर्ग झाला असेल तर दात काढून टाकणे गरजेचे असते.
खालील गोष्टी करून आपण जीजीव्हायटीस रोखू शकतो
दिवसातून दोनदा दात घासले पाहिजे
दिवसातून एकदा नीट फ्लासिंग करावे.
मौउथवाश नित्यामित वापरा
रंग बदल असल्यास हिरड्या नेहमी तपासा.
दातांची नियमित तपासणी करा.
दाढ दुखणे म्हणजे नेमके काय ?
जबडा आणि दाताच्या मध्ये यांच्या सभोवतालच्या वेदना यालाच दात दुखणे म्हणतात. हि समस्या दात किड्ल्यामुळे होते.तोंडाच्या मागच्या बाजूला चार दाढा असतात. त्यामधले दोन खालच्या जबड्यात आणि दोन वरच्या जबड्यात असतात. काही लोकांमध्ये काहीच नाही किंवा कमी दाढा असतात. काही लोकांचे दाढा एका कोनावर येऊन आसपासच्या दात किंवा हिरडयाला धक्का देतात. हि प्रक्रिया खूप वेदनादायक असते आणि (Our teeth)दातांच्या सभोवताली चा भाग स्वछच ठेवणे कठीण होऊन जातो.
आपल्या दातांच्या दुखणे संबंधित मुख्य चिन्ह आणि लक्षणे : (symptoms of our teeth pain)
- दाढेच्या जवळील जबडा वेदनादायक आणि कडक होणे.
- गिळणे ,दात घासणे आणि तोंड उघडणे यात अडचणी येणे.
- दातांमधील कीड.
- दातांची गिचमिड.
- हिरड्यांमध्ये पस होणे.
- दुखणाऱ्या दातांच्या आजूबाजूला असणाऱ्या हिरड्यांना संक्रमण किंवा स्य्ज.
- श्वासाची दुर्गंधी.
- अस्वथता .
- अक्कल दाढ आणि इतर दातांमध्ये अन्न आणि bacteria संचय.
- लीम्फ नोड्स मधील सूज.
- दाढ चुकीच्या कोनात दाढ आल्यामुळे जीभ,गाल,तळ किंवा वरच्या तोंडात जळजळ किंवा वेदना होणे.
- हिरड्यांचा रोग.
- ताप.
दाढ दुखीची मुख्य कारणे आहेत.
- दातांच्या सर्वात आतला थर मध्ये सूज.
- दातात फोड येणे (दातात जीवाणू आणि दाताच्या मध्यभागी संक्रमित सामग्री)
- दाढेचे मुळ संवेदनशील असणाऱ्या हिरड्यांना मागे टाकणे.
- अपूर्ण स्वछचता
- पस रचना
दाढ दुखीचे निदान व उपचार कसे करतात.
एक दातांचा डॉक्टर दाढे मधील वेदनेचे निदान करतील, निदान केल्यानंतर कोणती दाढ वेदनेस कारणीभूत ठरत आहे हे निर्धारित करण्यासाठी एक्सरेचा संदर्भ देऊ शकतात.
दाढ दुखीमध्ये खालील उपचार पद्धती वापरली जाते.
डॉक्टरनी सांगितलेली औषधे जसे कि antibiotics
संक्रमित क्षेत्र साफ करणे.
जास्त गंभीर संसर्ग झाल्यास दात काढून टाकणे.
मीठ टाकून कोमात पाण्याने गुळण्या करणे.
रूट कॅनल
दातांवरचे कीटन काय आहे (Our teeth plak)

आपल्या दातांवरचे (our teeth) किटन हा दात आणि आसपासच्या भागात जमा होणारा मऊ आणि चिकट पदार्थ साठलेला असतो.हे दातांचे किडणे आणि हिरड्यांचे सर्वात सामान्य कारण आहे. हा पदार्थ पांढऱ्या रंगाचा असल्याने,प्रथम हा दिसणे कठीण असते.मात्र एकदा साचायला सुरुवात झाली कि दाताना डाग पडतात,आणि ते पिवळसर व्हायला सुरुवात होते. तेंव्हा कीटन स्पष्टपणे दिसू लागते आणि तुमच्या हास्याचे स्वरूप बिघडवते.
दातांवरचे कीटन याची मुख्य लक्षणे
दातांवरचे कीटन असा एक पांढरा चिकट पदार्थ जो सहजासहजी दिसत नाही. पण जर एखाद्याने दातच घासले नसतील तर आपल्याला तो उघड्या डोळ्यांनी दिसू शकतो.दररोज सकाळी दात निट घासत नसल्यास काही काळानंतर कीटन स्पष्टपणे दिसू लागते.हिरडयालगत दात घासण्यास पांढऱ्या पेस्टसारखे साहित्य निघते.
दातांमध्ये कीटन होण्याची कारणे काय आहेत
तोंडामध्ये शर्करा इत्यादी चे विभाजन झाल्यानंतर bacteria मुळे कीटन तयार होते आणि दातावर ते जमतात आणि चिकट दात होन्यास सुरुवात होते. जेंव्हा कार्बोहायड्रेट्सयुक्त अन्नपदार्थ तोंडातून योग्य प्रकारे साफ केले जात नाहीत तेंव्हा ते तयार होतात. तोंडातील उर्वरित शर्करा bacteria च्या वाढीला प्रोत्साहित करतात.कार्बोहायड्रेट्सचे ब्रेकडाउन झाल्यावर असीड बायप्रोड्क्ट बनतात.ज्यामुळे दातावरील एनमल्चे/आवरणाचे दीर्घकालीन नुकसान होऊ शकते.
दातांमधील किटनवरील निदान आणि उपचार
घरांमध्ये दातावरचे कीटन सहजपणे दिसू शकते .म्हणून निदान करणे सोपे शकते. किटनाचे डाग कुठे आहेत आणि कुठे जमा झाले आहेत शोधून काढण्यासाठी घरामध्ये एक सोपी चाचणी केली जाऊ शकते .हे करण्यासाठी बरयाच किरकोळ दुकानात असलेल्या लाल सुट्ट्या गोळया खरेदी करता येतील.यांपैकी गोळी चावून खाल्यास कीटनाचे डाग सुस्पष्ट उघड्या डोळ्यांना दिसतात.
दातांचे डॉक्टर देखील कीटनाचे निदान करण्यासाठी या चाचणीचा वापर करतात.
दातांवरचे कीटन सहजपणे घरच्याघरी काढून टाकले जाऊ शकतात आधी दातांवर फ्लासिंग करून आणि नंतर व्यवस्थित ब्रश करून यापासून मुक्तता मिळवता येते. जेंव्हा दातांवरचे कीटन कमी होते तेव्हा साधे ब्रशिंग देखील त्यातून मुक्त होण्यास मदत करते.
कीटनाच्या प्रतिबंधकमध्ये खालील उपायांचा समावेश आहे.
दिवसातून दोनवेळा दात ब्र्शनी घासा
फ्लोरिड बेस्ट तुथपेस्त वापरावी .
antibacterial मौउथवाश वापरावा.
आपल्या दातात (Our teeth) अडकलेले अन्न कण काढण्यासाठी फ्लासचा वापर करावा.
नियमित दातांची तपासणी करावी.
आहारामध्ये साखरेचे प्रमाण कमी करावे.
दातदुखीची कारणे (Our teeth pain reasons )
दातदुखीची अनेक कारणे आहेत.दातात जखमा होणे,दातात पोकळ्या होणे,दातांवरील आवरनांची झीज होणे,दाटला दुखापत होणे,दातांचा चुरा होणे,दातांमध्ये फोड येणे,दातांमधील संवेदनशीलता वाढणे,दाट तुटणे,हिरड्यांचे आजार हि करणे आहे. तीव्र दातदुखीच्या कारणांची शहानिशा डॉक्टरांकडून करून घ्यावी आणि स्वतः निदान करू नये.
दात दुखीचा प्रतिबंध (Our teeth pain remedy)
दातांची होत असलेली झीज,पल्प विकार,पेरीडेन्तल विकार कमी करून दातदुखीपासून सुटका मिळू शकते.
आहारातील साखरेचे प्रमाण कमी करणे.
दोन जेवनामधील खाण्याच्या सवयी कमी करा.
दिवसातून दोनवेळा ब्रश करा.
तोंड धुण्यासाठी जीवनुनाशक द्रव्ये वापरा.
तंतुमय पदार्थांचे सेवन करा.
अन्न बारीक चावून खा आणि व्यवस्थित गिळा.
वेदना नाशक औषधे घ्या.
बर्फ कपड्यात घालून काही वेळापर्यंत आपल्या गालांवर ठेवा.जर गालाला सूज आली असेल तर जिथे वेदना होत आहेत तिथे बर्फाने शेक द्या.
जर दोन दिवसात वेदना कमी नाही झाल्या तर डॉक्टरांना दाखवा.डॉक्टर जंतुनाशक औषधे देतील किंवा आवश्यकतेनुसार आपल्या दातावर (on Our teeth) उपचार करतील