Stomach Fat Loss and Wellness remedies

आपल्या शरीरात सर्व काही ठीक आहे असे आपल्याला वाटते परंतु तुमचे पोट पुढे आले असेल तर सर्व कसे ठीक असेल. पोटावरची चरबी (Stomach Fat Loss) सर्वांनाच कमी करायची असते. पोटाची वाढलेली चरबी हि सर्वात मोठी समस्या बनत चालली आहे. त्यासाठी आपल्याला काही नैसर्गिक गोष्टी माहित असणे आवश्यक आहे त्यासोबत पोटाच्या चरबीसंदर्भात असलेले विज्ञान तुम्हाला माहित असायला हवे. काही सोप्या कृती आहेत ज्या तुम्ही केल्या तर पोटाची चरबी कमी होण्यास सुरुवात होईल.

पोटावरील भागात चरबी (Stomach Fat Loss) वाढणे म्हणजेच तुमच्या ओटीपोटावरील चरबी अंतर्गत भागात वाढणे होय. ओटीपोटातील चरबी हि वाढलेली असताना बाकी पोटातील अवयवांना झाकत असते. यामुळे तुमचे यकृत, मूत्रपिंडे, आतडे यावर सुद्धा चरबी साठण्यास सुरुवात होते. पोटावरची चरबी दिसण्यास खूप खराब दिसते त्यासोबतच तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा हि चरबी वाईट असते. अंतर्गत भागात जी चरबी साठलेली असते त्यामुळे शरीराच्या आतील भागातील अवयवांचे कार्य सुद्धा बिघडू शकते ज्यामुळे यकृताचे विकार, मधुमेह -२ प्रकार, ह्रदयाचे विकार आणि उच्च रक्तदाब यासारखे विकार होण्यास सुरुवात होते.म्हणून पोटावरची चरबी कमी करणे अतिशय महत्वाचे असते म्हणून याविषयी आपण काही उपाय जाणून घ्यायचे आहेत.

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी काही उपाय.

१.भरपूर पाणी पिणे (Stomach Fat Loss remedy – १ ) – विज्ञानानुसार आणि संशोधनानुसार असे लक्षात आले आहे कि शरीरातील चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला भरपूर प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. कारण चरबी कमी करण्यासाठी पातळ पदार्थ आवश्यक असतात. म्हणून पाणी हे एक अतिशय उत्तम पेय आहे म्हणून तुम्हाला सकाळी दाट घासण्याआधी कोमट पाणी प्यायला हवे. कोमट किंवा गरम पाणी प्यायल्याने शरीराची चयापचय क्रिया वाढते. जेंव्हा शरीरातील चयापचय वेग वाढतो तेव्हा शरीरातील चरबी अपोआपच कमी होण्यास सुरुवात होते. गरम पाणी प्यायल्याने पचनशक्ती चांगली होते आणि सकाळी सकाळी तुमचे पोट साफ होण्यास सुरुवात होते. जेंव्हा तुमचे पोट व्यवस्थित साफ होते तेव्हा शरीरात बरेच दिवस साठलेली घाण हळूहळू बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे पोटावरची चरबी (Stomach Fat Loss) कमी होण्यास मदत होते. पाणी पिण्याचे प्रमाण किती असावे हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. कमीत कमी १ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

यासोबतच तुमच्या दोन आहाराच्या मध्ये जसे कि नाष्टा, दुपारचे जेवण रात्रीचे जेवण यामध्ये जेंव्हा जेंव्हा तुम्हाला असे वाटेल कि भूक लागली आहे अशा वेळी तुम्ही गरम पाणी प्यायला हवे. बऱ्याच वेळा तुम्हाला भूक लागलेली नसते तुमच्या शरीरात फक्त पाण्याची कमतरता असते अशा वेई तुम्ही पाणी प्याल तेव्हा पोट भरल्यासारखे वाटते. आणि जेंव्हा पोट भरल्यासारखे वाटेल तेव्हा तुम्ही अति प्रमाणात अन्न पदार्थ खाणार नाही. जास्त प्रमाणात पदार्थ न खाल्याने शरीरात अतिरिक्त कॅलरी जाणार नाहीत ज्यामुळे तुमच्या शरीरातील चरबी कमी होण्यास सुरुवात होईल.

२. साखर खाणे बंद करा किंवा कमी करा (Stomach Fat Loss remedy – २ ) – रिफाईनड केलेली साखर तुम्ही बंदच केली पाहिजे. गुलाबजामून हे बऱ्याच लोकांना आवडतात आणि ते चवीला सुद्धा चांगले असतात. परंतु गुलाबजामून मध्ये कोणतीही आरोग्यास चांगली असणारी गोष्ट नाही. गुलाबजामून मध्ये अतिशय उच्च प्रमाणात साखर असते, उच्च प्रमाणात तेल असते, मैदा असतो आणि यामध्ये खूप उच्च कॅलरी असतात. पोटावरची चरबी वाढण्याचे सर्वात मोठे कारण साखर खाणे आहे. साखरेमध्ये आरोग्यास चांगले असे कोणतेही घटक नसतात. उलट केमिकल प्रक्रियेने बनल्यामुळे साखर आरोग्यास हानिकारक असते. त्यामुळे ज्या पदार्थात साखरेचे प्रमान अधिक आहे असे पदार्थ खाणे टाळा.

३. आहारात प्रथिनांचा वापर (Stomach Fat Loss remedy – ३) – चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला आहारात प्रथिनांचा अधिक वापर करणे आवश्यक आहे . प्रथिने हि तुमच्या शरीरात अतिशय हळूवार पचन होत असतात. या कारणामुळे तुमचे पोट अधिक काळ भरलेले राहते. यामुळे अधिक वेळा खाण्याची तुमची जी इच्छा आहे ती कमी होते. प्रथिनामुळे शरीरातील चयापचय वेग वाढतो आणि त्यामुळे तुमचे शरीर अधिक प्रमाणात कॅलरी जाळण्याचे कार्य करते. नैसर्गिक पद्धतीने मिळणारे प्रथिने तुम्हाला घ्यायला हवेत जसे कि डाळी, अंडी, राजमा, दुध, पनीर असे पदार्थ. शाकाहारी पदार्थ जरी तुम्ही घेतले तरी त्यामध्ये तुम्हाला चागली प्रथिने मिळतात आणि शरीर अशा पदार्थांना सहज शोषण करते.

Stomach Fat Loss

४. तळलेले पदार्थ टाळा (Stomach Fat Loss remedy – ४) – तळलेले पदार्थ खाल्याने पोट वाढलेले दिसते कारण यामुळे तुमची चयापचय क्रिया मंद होते. बाहेरचे तळलेले पदार्थ खाल्याने अधिक प्रमाणात समस्या निर्माण होतात. बाहरेचे पदार्थ हे एकापेक्षा अधिक वेळा एकाच तेलात तळलेले असतात. आणि यामधील ट्रांस fat पोटाच्या चरबीच्या स्वरुपात बाहेर येतात.

५. संपूर्ण धान्य खाण्याचा प्रयत्न करा (Stomach Fat Loss remedy – ५) – मैदा पासून बनलेले पदार्थ खाणे टाळा यापेक्षा तुम्ही मिश्र धान्य, कडधान्य खाण्याचा प्रयत्न करा. ब्रेड, बिस्कीट असे पदार्थ खाणे टाळा.

https://fityourself.in/struggle-to-lose-belly-fat-fast-in-marathi/ पोटाची चरबी कमी लवकर कमी करणे| Struggle T