सूर्यप्रकाश शक्ती देण्यासाठी आणि आजार बरे करण्यासाठी|Sunlight – Powerful and Healing

सूर्यप्रकाश (Sunlight) हा आपल्या शरीराला कार्यक्षम बनविण्यासाठी महत्वाचा घटक ठरू शकतो हे कोणालाही पटणार नाही. जे लोक जुन्या जमान्यातील आहेत त्यांना याचे पूर्णपणे महत्व माहित आहे. तसेच प्राचीन काळापासून उगवत्या सूर्याकडे पाहण्याचा एक अभ्यास असल्याचे दिसून येत आहे. शरीराच्या अधिक अधिक भागासाठी हा सुर्याप्रकाशाचा एका अन्नाप्रमाणे उपयोग होत असतो. आपल्यातील ९० % लोक सकाळच्या वेळी घरी बसून असतात. त्याचप्रमाणे सूर्यप्रकाश हा कृत्रिम असल्याप्रमाणे बनला आहे. आपण सकाळी उठल्यापासून एका बंद जागेत असतो जसे कि घरी, बाथरूम मध्ये, कार मध्ये, ऑफिस मध्ये म्हणजेच एका बंद जागेत आपण दिवसभर काम करत असतो.

General thinking about Sunlight

जेंव्हा जेंव्हा आपण बाहेर पडत असतो तेव्हा तेव्हा आपले शरीर उन्हामध्ये कसे कमी येईल याची काळजी आपण घेत असतो आपल्याला ताणतणाव, औषधे, श्वास घेण्याच्या समस्या , मेंदूच्या समस्या यांची एकप्रकारे सवय झालेली आहे. आपल्या शरीरामध्ये हाडांचे विकार निर्माण होण्यास सुरुवात झालेली आहे, पाठदुखी सुरु झालेली आहे या सर्व गोष्टी फक्त सूर्यप्रकाशामुळे कमी होतील का ? याचे उत्तर आहे होय कारण सूर्यप्रकाशाची शरीराला आवश्यकता असते हे आपल्याला लहानपणापासून शाळेत शिकविले जाते. सूर्य हा उर्जेचा स्त्रोत आहे. सकाळचे कोवळे ऊन हे आपल्यासाठी शक्तिवर्धक आणि बरेच आजार बरे करणारे ठरत असते. याच्या कमतरतेमुळे बऱ्याच अवयवांचे नुकसान जसे कि ह्र्दय, स्वादुपिंड, त्वचा होवू शकतात आणि आपल्याला मधुमेह, थायरोईड, हार्मोनचे असंतुलन, उच्च रक्तदाब अशा समस्या होत आहेत.

सर्व समस्यांचे समाधान सूर्यप्रकाश (Sunlight) आहे कारण हजारो वर्षापासून माणूस हे औषधासारखे वापरत आलेला आहे. बंद जागेतून बाहेर पडून आपल्याला मोकळ्या हवेत आणि ऊर्जा देणाऱ्या सूर्यप्रकाशात येणे आवश्यक आहे. जर्मनी सारख्या देशात सैनिकांच्या जखमा भरण्यासाठी सूर्यप्रकाशाचा वापर केला गेल्याचे सुद्धा दिसून आले आहे. सूर्यनमस्कार हे नाव सुद्धा व्यायामाला दिले गेले आहे त्याचे कारण सुद्धा हेच आहे कि त्यामधून आपल्या शरीराला अनेक फायदे होणार आहेत.

Taking Sunbath In Sunlight

सनबाथ म्हणजेच सूर्यासमोर आपले पूर्ण शरीर आणणे जसे आपण दररोज पाण्याने शरीराचे बाह्य अंग अंघोळ करून स्वच्छ करत असतो त्याचप्रमाणे सूर्यासमोर आपले शरीर २० मिनिटापर्यंत ठेवल्याने एक प्रकारची अंतर्गत अंगांची अंघोळ होत असते. जसे कि आपण आपल्या घरातील धान्य किंवा काही वस्तू ज्यांचा वास यत असतो किंवा खराब होणाऱ्या वस्तू सूर्याच्या प्रकाशामध्ये ठेवल्यामुळे त्या पुन्हा चांगल्या होतात याचे कारण हे आहे कि सूर्यप्रकाश हा एक नैसर्गिक जंतुनाशक आहे.म्हणून आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी सूर्यप्रकाश महत्वाचा आहे.

जेंव्हा आपल्या त्वचेवर सूर्यप्रकाश (Sunlight) पडत असतो त्यावेळी आपली त्वचा गरम होत असते आणि आपले रक्ताभिसरण चांगले होण्यास मदत होत असते, जे रक्त थांबलेले असते ते वाहण्यास सुरुवात होते त्याचसोबत रक्तामधील विषारी घटक आणि घाण सुद्धा वाहण्यास सुरुवात होते आणि घाम किंवा लघवीवाटे शरीराच्या बाहेर टाकण्यास मदत होते. काही जणांची लघवी पिवळी पडल्याचे दिसून येते याचा अर्थ असा आहे कि त्यांच्या शरीरात अधिक प्रमाणात विषारी द्रव्ये आहेत आणि ती बाहेर पडत असतात. आपल्या त्वचेच्या खाली छिद्रे असतात टी धूळ किंवा प्रदूषण यामुळे बंद झालेली असतात किंवा इतर काही कारणाने बंद होतात त्यामुळे यामधून पाणी बाहेर पडत नाही आणि त्वचेचे बऱ्याच समस्या होतात. सूर्यप्रकाशामुळे हि छिद्रे उघडतात आणि यामधील घाण बाहेर पडण्यास मदत होते.

तुमचे पाणी दुषित असू शकते, हवा दुषित असू शकते, अन्न दुषित असू शकते परंतु सुर्याप्रकाश (Sunlight) हा दुषित असू शकत नाही. सूर्य हा प्रकाशाचा एकमेव स्त्रोत आहे जो १०० % शुद्ध आहे. तुम्हाला इतकेच करायचे आहे कि सकाळच्या ८ ते ९ वाजता च्या दरम्यान जे कोवळे ऊन असते त्यामध्ये जावून बसायचे आहे आणि अशा प्रकारे बसायचे आहे कि तुमच्या पूर्ण शरीरावर सूर्याची किरणे थेट पडतील मग तुम्ही तुमच्या गच्चीत बसू शकता किंवा बागेत बसू शकता, मैदानात बसू शकता. उत्तम वेळ हि सकाळी किंवा संध्याकाळी असू शकते. तुम्हाला सूर्याची उष्णता न घेतां सूर्याचा प्रकाश आपल्या शरीरावर पडू द्यायचा आहे. तुम्ही जास्तीत जास्त ३० मिनिटे त्यामध्ये बसू शकता, जेंव्हा तुम्हाला घाम येण्यास सुरुवात होईल त्यावेळी तुम्ही पुन्हा आतमध्ये येऊ शकता.

Sunlight – A part of our life

सूर्यप्रकाशात जाणे हा तुमच्या जीवनशैलीचा एक भाग बनवायला हवा सुर्याप्रकाशामध्ये (Sunlight) जाताना तुम्ही हलके सुती कपडे घालू शकता. काचेतून सूर्यप्रकाश घेणे परिणामकारक ठरू शकत नाही. सूर्यप्रकाश घेतेवेळी तुम्ही इतर गोष्टी सुद्धा करू शकता जसे कि पुस्तक वाचणे, व्यायाम करणे, गाणी ऐकणे. सूर्यप्रकाशात जाताना तुम्ही काळे पडाल याचा विचार नका करू कारण सकाळचे कोवळे ऊन आपल्यासाठी फक्त ऊर्जा देत असते यामुळे त्वचेचा रंग बदलणार नाही. सूर्यप्रकाश हा सर्वांसाठी आहे जसे कि तरुण, वयोवृद्ध, लहान मुले या सर्वांसाठी. आपण सूर्याला घाबरत आहोत कारण दिवसेंदिवस वाढणारी उष्णता आणि येणारा घाम यामुळे आपल्याला त्याची भीती वाटत आहे आणि लोक सनस्क्रीन वगैरे रसायने त्वचेवर लावत आहेत.

Amazing Benefits of Sunlight

आपले पूर्वज सुद्धा उन्हामध्ये कित्येक तास काम करत होते. जिम मध्ये जावून ट्रेडमिल वर धावण्यापेक्षा तुम्ही कोवळ्या उन्हात धावल्यास ते अधिक चांगले ठरेल. मोकळ्या हवेत आणि सूर्यप्रकाशात (In Sunlight) सूर्यनमस्कार केल्यास याचे कित्येक फायदे आपल्या शरीरासाठी आहेत. जर सकाळच्या वेळी सूर्याची किरणे तुमच्या घरात येत असतील तर अशा वेळी तुमची दारे किंवा खिडक्या उघड्या ठेवा, पडदे सुद्धा उघडे ठेवा यामुळे तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा जाणवेल. सूर्याचा प्रकाश आणि मानसिक स्वास्थ्य यामध्ये एक चांगला संबंध आहे. आपण जर अधिक चांगला आहार घेत आहात तरीसुद्धा आपल्याला शरीरात कॅल्शिअम, लोह यांची कमतरता जाणवत असेल तर त्याचे कारण आपले शरीर जीवनसत्वांचे शोषण योग्य प्रकारे करत नाही. तसेच आपली हाडे कमकुवत होत आहेत तर त्यासाठी सूर्यप्रकाश फार महत्वाचा ठरतो.

तुम्ही उन्हामध्ये शेकल्याने तुम्ही हाडे पुन्हा मजबूत होण्यास सुरुवात होते तसेच शरीरात जीवनसत्वे शोष्ण्यास सुद्धा मदत होते. तुमच्या शरीराचा कोणताही भाग ज्यामध्ये समस्या निर्माण झाली आहे असा भाग तुम्ही सूर्यप्रकाशात नियमित ठेवल्यास तो भाग बरा होण्यास सुरुवात होते. आपल्या सांध्यांच्या दुखण्यासाठी सुद्धा सूर्यप्रकाश अतिशय महत्वाचा आहे. जर तुम्ही विटामिन बी १२ ची गोळी घेत असाल तर यानंतर ती घेण्याची गरज पडणार नाही. त्याचसोबत विटामिन डी जे एक अतिशय महत्वपूर्ण जीवनसत्व आहे त्याची कमतरता सुद्धा कधीही भासणार नाही. शरीराची पचनक्रिया उत्तम होण्यास सूर्यप्रकाशामुळे (Because of Sunlight) मदत होते. पचनाच्या समस्या दूर होतात जसे कि आम्लता, अल्सर, पचन अशा प्रकारच्या सर्व समस्या. वायुमार्गातील दोषांसाठी सुद्धा कोवळा सूर्यप्रकाश हा महत्वाचा असतो. स्वादुपिंडातील इन्सुलिन संवेदनशीलता वाढविण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो.

Sungazing in Sunlight

सूर्याकडे पाहणे – हि सुद्धा एक प्राचीन काळापासून वापरली जाणारी पद्धत आहे.यामध्ये सूर्याकडे १५ मिनिटे पाहण्याचा अभ्यास केला जातो. परंतु याचा वापर खूप कमी लोक करतात. आपल्या डोळ्यांद्वारे सुर्याप्रकाश आपल्या मेंदूपर्यंत खूप वेगाने पोहोचत असतो आणि त्याला उत्तेजित करत असतो. डोळे हे आपल्या मेंदूशी जोडलेले असतात तसेच डोळे हा एक नाजुक अवयव असल्याने यामध्ये काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु हा अभ्यास तुम्ही अगदी कमी सूर्यप्रकाश असतो तेव्हा करू शकता आणि मध्ये मध्ये तुम्ही डोळे उघड झाक सुद्धा करू शकता. १५ मिनिटे हा अभ्यास तुम्ही करू शकता. सूर्यप्रकाश हा आपल्या पेशींना उत्तेजित करत असतो. वनस्पती सुद्धा सूर्याकडून ऊर्जा घेत असतात त्याप्रमाणे आपलं सुद्धा उर्जेचा मूळ स्त्रोत हा सूर्य असला पाहिजे.

Sunlight

Other Benefits of Sunlight

ताण तणाव कमी करण्यासाठी सुद्धा सूर्यप्रकाशाचा वापर केला जातो. दररोज सुर्याप्रकाश घेतल्याने सेरोटोनीन आणि डोपामीन हे जे हार्मोन असतात त्यांची पातळी वाढते यामधील सेरोटोनीन तुमचा मूड ठीक करण्यासाठी प्रोत्साहित करत असते तर डोपामिन तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रवृत्त करत असते.

ज्या देशांमध्ये कमी सुर्याप्रकाश पडत असतो त्या लोकांमध्ये हंगामी आजार निर्माण होत असतात. स्त्रियांमध्ये हार्मोनचे संतुलन राखण्याचे कार्य सुद्धा सूर्यप्रकाशामुळे होत असते.

झोपेची गुणवत्ता वाढवते – रोज २० ते ३० मिनिटे सूर्यप्रकाशात राहिल्याने आपले शरीर उत्तेजित होते आणि आपल्या मेंदूमध्ये एक विचार तयार होतो आणि यामुळे तुम्हाला वेळेवर झोप येण्यास मदत होते तसेच झोपेची गुणवत्ता सुधारते.

रोग प्रतिकार शक्ती – आपल्या लक्षात आले असेल कि आपण उन्हाळ्यात कमी आजारी पडत असतो याचे कारण हे आहे कि उन्हाशी आपलं संपर्क उन्हाळ्यात जास्त प्रमाणात असतो. सूर्यप्रकाशामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती अधिक चांगली होण्यास मदत होते.

रोग बरे करण्याची क्षमता – विज्ञानामुळे हे सिद्ध झाले आहे कि सूर्यप्रकाशामध्ये रोग बरे करण्याची तसेच आजार कमी करण्याची क्षमता असते.

प्रत्यक्ष वापर कसा करायचा – सूर्यासमोर आपल्याला सकाळचा पहिला तास शक्यतो पोटाचा भाग आणि पाठीचा भाग येईल अशा प्रकारे थांबायचे आहे जर तुमचा एखादा भाग दुखत असेल तर अशा भागाला सूर्यप्रकाशत ठेवले पाहिजे. चेहऱ्यावर सुद्धा तुम्ही ऊन घेऊ शकता. तुमचे पाणी पिण्याचे प्रमाण आणि विटामिन सी चे सेवन योग्य प्रमाणात असेल तर तुम्ही व्यवस्थित सूर्यप्रकाशामध्ये बसू शकाल.

https://fityourself.in/vitamin-d-essential-and-deficiency-in-marathi/

https://fit.sushildhanawde.com/marathiworkshop?fbclid=PAZXh0bgNhZW0CMTEAAaYJr1-jJ0wlq_PXFpUmRVDPYIfNEZAOBOfq50Bk8fhsCNa2dtE8Vjo7oQ0_aem_e48A-THRbXBvpa85rGk4ww