आपल्या रोजच्या दैनंदिन आहारात भाज्यांचे महत्व आणि फायदे (Benefits of vegetables ) खूप आहे. भाज्यांमधून आपल्याला शरीरास आवश्यक पोषक घटक मिळत असतात. भाज्या या पालेभाज्या असू शकतात किंवा फळभाज्या असू शकतात. निसर्गात खाण्यायोग्य अशा खूप भाज्या आहेत ज्या आपण शिजवून खाऊ शकतो कच्या खाऊ शकतो किंवा भाजून घेऊ शकतो. जरी भाज्या चवीला वेगळ्या असल्या तरी आपण पोषक तत्वे मिळविण्याच्या दृष्टीने त्या बनवत असतो आणि आहारात त्यांचा समावेश करत असतो. अशाच काही भाज्यांबाद्द्ल आपण थोडक्यात माहिती घेवूयात. भाज्यांचा समावेश आहारात केल्याने आपल्याला कोणते फायदे (Benefits of vegetables) होणार आहेत किंवा आरोग्यामध्ये भाज्यांचे महत्व आपण जाणून घेवूया.
![Benefits of Vegetables](https://fityourself.in/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Image-2024-11-09-at-13.30.39-776x1024.jpeg)
Benefits of vegetables which are used in daily Meal
(Benefits of Vegetables – 1) भेंडी – ह्र्द्यासाठी भेंडी हि अत्यंत चांगली आहे कारण भेंडीमधील पेक्टिन हे कोलेस्ट्रोल कमी करण्यास मदत करते. भेंडीमध्ये फायबर असते ते आपल्या शरीरातील रक्त आणि कोलेस्ट्रोल नियंत्रित करते ज्यामुळे सुद्धा ह्र्दयविकार कमी होतात. मधुमेहासाठी सुद्धा भेंडी फायदेशीर ठरते कारण यामधील युगेनोल रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. रक्तदोष मध्ये भेंडी खूप फायदेशीर असते कारण यामधील लोह हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते तसेच रक्तस्त्राव कमी करण्यास सुद्धा मदत होते. भेंडीमध्ये फायबर भरपूर असल्यामुळे पचनक्रियेसाठी भेंडी फायदेशीर ठरते त्यामुळे बद्धकोष्ट तेचा त्रास सुद्धा होत नाही. भेंडीमध्ये व्हिटामिन के आढळते जे हाडांसाठी उपयुक्त असते.
नियमित आहारात भेंडी घेतल्याने कॅन्सर दूर ठेवण्यास मदत होते कारण यामधील कोलेन कॅन्सरला दूर ठेवण्यात महत्वपूर्ण ठरते तसेच विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी मदत करते. आतड्यांच्या आरोग्यातसुद्धा भेंडी फायदेशीर ठरते.
(Benefits of Vegetables – 2) तोंडली – तोंडलीची भाजी बरेच जण आहारात समाविष्ट करत नसतात कारण त्याची चव बऱ्याच जणांना आवडत नाही परंतु तोंडली खाण्याचे खूप फायदे आहेत. शरीरात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते म्हणून याचा आहारात समावेश केला पाहिजे. सर्दी, खोकला आणि फुफ्फुसांच्या विकारावर तोंडली उपयुक्त आहेत. रक्ताचे शुद्धीकरण करण्यासाठी तसेच रक्तातील कावीळ पासून बचाव होण्यसाठी तोंडलीचा वापर केला जातो. साखरेची पातळी नियंत्रित करत असल्याने मधुमेह असलेल्या व्यक्तींना खूप फायदेशीर अशी हि भाजी आहे. शरीरातील Inflammation कमी करण्यासाठी तोंडलीचा वापर होतो. व्हिटामिन के असल्यामुळे हाडांच्या आरोग्यात तोंडली महत्वाची असतात. त्वचेच्या विकारापासून संरक्षण करण्यासाठी हि महत्वाची ठरते. ताप आल्यावर हि भाजी खाल्याने ताप कमी होतो.
(Benefits of Vegetables – 3 ) मटार ची भाजी – मटार मधील घटकांमुळे शरीरातील कोलेस्ट्रोल नियंत्रित होण्यास मदत होते त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. मटार खाल्याने रक्तदाबाचा त्रास कमी होण्यास मदत होते. हाडांच्या मजबुतीसाठी व्हिटामिन के महत्वाचे असते आणि मटार मध्ये ते असल्याने फायदेशीर ठरते. मटार मध्ये फायबर असल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि बद्धकोष्टतेचा त्रास होत नाही. मटारचा वापर खाण्यासोबत त्वचेसाठी सुद्धा केला जातो. यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते.
(Benefits of Vegetables- 4) कोबीची भाजी – व्हिटामिन ए आणि व्हिटामिन सी ने भरपूर असलेली कोबी खाल्याने खूप फायदे होतात. कोबी फायबरने समृद्ध असते त्यामुळे भूक क्षमवण्यासाठी आणि वजन नियंत्रणासाठी कोबी नक्की खाऊ शकता. कोबीमध्ये अगदी कमी प्रमाणात कार्ब्स आणि साखरेचे प्रमाण असल्याने कोबी फायदेशीर आहे. कोबीमध्ये भरपूर जीवनसत्वे आल्याने आरोग्यासाठी चांगला आहे. कफ होण्यापासून सुटका होण्यास कोबी फायदेशीर आहे. पोट साफ ठेवण्यास कोबी फायदेशीर आहे पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत होते.
![](https://fityourself.in/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Image-2024-11-09-at-13.30.40-1.jpeg)
कोबीमध्ये असलेल्या फायबर मुळे कोलेस्ट्रोल कमी होण्यास मदत होते परिणामी रक्तवाहिन्या प्रवाही राखण्यास मदत होते आणि यामुळे ह्र्दयविकाराचा धोका टळतो. कोबीमुळे शरीरातील मज्जातंतू आणि मेंदूचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते. कोबी आपण सलाड मध्ये किंवा कच्चा खाऊ शकतो याचसोबत सूप मध्ये आणि भाजी मध्ये याचा वापर करू शकतो. कोबीमध्ये अमिनो आम्ल सुद्धा असतात.
(Benefits of Vegetables- 5) कारल्याची भाजी – रक्तशुद्धीसाठी कारल्याच्या रसाचा वापर केला जातो. कारले कडू असल्याने यामध्ये औषधी गुणधर्म आढळतात त्यामुळे पोटातील कृमींचा त्रास कमी करण्यासाठी कारल्याचा उपयोग होतो. सर्दी, खोकल्याचा त्रास असल्यास कारले आणि तुळशीचा रस सोबत घेतल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्वचेच्या विकारांसाठी कारले हे खूप फायदेशीर ठरते. यकृत आणि पोटाच्या विकारात सुद्धा कारले आणि त्याचा रस फायदेशीर (Benefits of Vegetables) ठरते. तुम्ही कारल्याचा वापर शिजवून, भाजून किंवा कच्चा देखील करू शकता. कारल्याच्या रसात मध मिसळून देखील घेऊ शकता.
(Benefits of Vegetables- 6) सिमला मिरची – इंद्रधनुष आहारामध्ये असणारी सिमला मिरची हि वेगवेगळ्या रंगाची असली तरी ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ह्रदयरोग,पोटाचे विकार,मधुमेह यांसारख्या आजारात हि फायदेशीर ठरते. व्हिटामिन सी ने युक्त असल्याने तसेच antioxidant असल्याने रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यात मदत होते. पोटातील हानिकारक जंतूपासून संरक्षण करण्यासाठी आणि पचन सुधारण्यामध्ये सिमला मिरची महत्वाची असते. चयापचय क्रिया सुधारण्यात आणि वजन कमी करण्यामध्ये सिमला मिरचीचा चांगला उपयोग होतो त्यामुळे सिमला मिरचीचा आहारात समावेश जरूर करायला हवा. स्मरणशक्ती सुधारण्यात सुद्धा मदत होते. नाकातील मार्ग साफ करण्यासाठी आणि नाकाचा त्रास कमी करण्यासाठी सिमला मिरची फायदेशीर ठरते.
(Benefits of Vegetables- 7) फरसबी – फरसबी हि भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही तसेच बरेच जन हि भाजी कधीच आणत नाहीत. फरसबी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात तसेच शक्ती प्रदान करण्यास चांगले असतात. ह्रदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरते त्यामुळे या भाजीचा आहारात नियमित वापर करू शकता. फरसबीमध्ये असलेल्या फ्लेवोनोईडस मुळे ह्रदयरोग कमी होण्यास मदत होते. हे मुख्यत्वे फळे आणि भाज्यांमध्ये असते. रक्तातील गुठळ्या कमी करण्यास मदत होते. फरसबी च्या भाजीमध्ये कॅल्शिअम चे प्रमाण असते त्यामुळे हे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक ठरते. फरसबीमध्ये व्हिटामिन के, व्हिटामिन ए आणि सिलिकॉन सारखे घटक असतात. या व्हिटामिनच्या कमी मुळे हाडांची झीज होते.
हाडांच्या आरोग्यामध्ये फरसबी मधील घटक खूप महत्वाची भूमिका बजावतात, हाडे बळकट करण्यासाठी फरसबीच्या शेंगा महत्वाच्या आहेत. डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे महत्वाचे आहे यामुळे डोळ्यांच्या आतील भागावर आणि डोळ्यांच्या शिरांवर येणारा ताण कमी होतो. त्यामुळे फरसबीचा आहारात समावेश करणे महत्वाचे आहे. पचनाच्या समस्या कमी करण्यामध्ये फरसबी त्यामध्ये असलेल्या फायबर मुळे उपयुक्त ठरते. यामधील फायबर मुळे मुळव्याध आणि बद्धकोष्टतेचा त्रास कमी होतो आणि शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण तसेच कोलेस्ट्रोल ची पातळी नियंत्रणात राखण्यास मदत होते.
शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास जसे कि फरसबी मध्ये मूत्र विसर्जनास मदत होत असते. विषारी द्रव्ये मुत्रावते बाहेर पडण्यास फरसबी मुळे मदत होते. फरसबी मध्ये असलेल्या Potassium मुळे नवीन पेशींची शरीरात निर्मिती होते आणि पाण्याचे प्रमाण शरीरात नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
(Benefits of Vegetables- 8) बीट – बीट एक आरोग्यदायी फळभाजी म्हणली जावू शकते याचा वापर सलाड मध्ये तसेच पराठा, सूप, भाजी बनविण्यासाठी ज्यूस बनविण्यासाठी केला जातो. बीटमध्ये अनेक आरोग्यदायी गुण असतात. बीटमुळे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते त्यामुळे गाजर आणि बीटचा ज्यूस प्यायल्याने फायदा होतो. रक्तदाब असलेल्या व्यक्तींना याचा मोठा फायदा होतो. रक्त वाढीमध्ये बीटचा रस रस प्यायल्याने खूप फायदा होतो. मुतखड्याची समस्या असलेल्या व्यक्तींना सुद्धा फायदा होतो. यकृताची सूज कमी करण्यासाठी देखील बीटचा वापर होतो. कफची समस्या दूर होण्यास देखील मदत होते, बीटचा रस आणि मध एकत्र लावल्याने शरीरावरील खाज येण्याची समस्या दूर होते.
![](https://fityourself.in/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Image-2024-11-09-at-13.30.40-1-1-1024x821.jpeg)
सांध्यांच्या दुखण्यामध्ये बीटचा उपयोग होतो कारण यामध्ये सोडीअम, पोटाशीअम, कॅल्शिअम, सल्फर, क्लोरीन,लोह, व्हिटामिन बी- १२ मोठ्या प्रमाणात असते. बीटचा रस आणि मध एकत्र घेतल्याने पोटात वायू निर्माण होण्याची समस्या दूर होते तसेच बीटमध्ये खूप कमी कॅलरी असतात. रोज बीटचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या निर्माण होतात. बीटमध्ये फॉलिक एसिड असते जे गरोदर महिला आणि त्यांच्या बाळासाठी महत्वाचे असते त्यामुळे महिलांना ऊर्जा मिळण्यास मदत होते.मासिक पाळीच्या त्रासात सुद्धा बीट चांगल्या प्रकारे कार्य करते तसेच रक्त वाढविण्यात बीट फायदेशीर ठरते.
(Benefits of Vegetables- 9) दुधी भोपळा – दुधी भोपळा आपल्या शरीराला फायदेशीर असणारी एक फळभाजी आहे. हि भाजी सुद्धा बरेच जन खात नाहीत किंवा त्यांना टी आवडत नाही. आयुर्वेदिक औषधीमध्ये दुधी भोपळ्याचे महत्व खूप आहे. दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. अनेक आजारांमध्ये दुधी भोपळ्याचा रस फायदेशीर असतो. शरीरातील जडत्व, उच्च रक्तदाब, पित्ताचा त्रास, ह्रदयाचे विकार यामध्ये दुधी भोपळा फायदेशीर असतो. वजन नियंत्रणात आणण्यासाठी दुधी भोपळ्याचा रस पिला जातो कारण हा रस प्यायल्याने लवकर भूक लागत नाही तसेच यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या व्यक्तींसाठी हा अतिशय फायदेशीर असतो तसेच रक्तातील कोलेस्ट्रोल ची पातळी कमी करण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काकडीप्रमाणे दुधी भोपळा सुद्धा थंडावा देण्याचे कार्य करते. लघवीमध्ये होणारी जळजळ यामुळे थांबण्यास मदत होते.
केस गळती आणि केस पांढरे होण्याच्या समस्येवर उपाय म्हणून दुधी भोपळ्याचा रस प्यायला जातो किंवा तिळाच्या तेलात मिसळून केसांच्या मुळात लावल्यास केसांची गळती कमी होते. आवळ्याच्या रसात सुद्धा दुधीचा रस मिसळून प्यायला जातो. पचनाच्या विकारात सुद्धा दुधी महत्वाचा आहे कारण यामध्ये फायबर असतात आणि त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.