What are Helpful Antioxidants ?

Helpful Antioxidants म्हणजे एक सुपरफूड आहे जर तुम्ही लोखंडाला बाहेरच्या वातावरणात ठेवले तर त्याला गंज लागत असतो म्हणजेच हवेत असलेल्या ऑक्सिजन मुळे त्याचे oxidation होते. लोखंडाच्या वस्तूला रंग दिला जातो कारण त्याला गंज लागू नये म्हणून. ऑक्सिजन हि तर शरीरासाठी चांगली गोष्ट आहे मग Helpful Antioxidants शरीरासाठी कसे काय चांगले आहेत त्यासाठी तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे. आजकाल वातावरणातील प्रदूषण वाढत चालले आहे म्हणून हवेतील ऑक्सिजन सुद्धा त्या प्रमाणात दुषित होत आहे. त्यामुळे ऑक्सिजन मधील इलेक्ट्रोन नाहीसा होतो आणि जेंव्हा ऑक्सिजन आपल्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा ऑक्सिजन इलेक्ट्रोन मिळविण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासोबत अभिक्रिया होवून oxidation होत असते आणि विषारी पदार्थ तयार होत असतात.

ऑक्सिजन ची शरीरामध्ये होणारी हि क्रिया आपल्या शरीरासाठी खूप नुकसानदायक ठरते जसे कि कोलेस्ट्रोल आहे त्यामधील इलेक्ट्रोन काढून टाकला तर त्याचे रुपांतर सुद्धा oxidation कोलेस्ट्रोल मध्ये होते आणि शरीरातील अडथळ्यांना तीनपट वेगाने वाढवते. आपल्या शरीराच्या पेशींमध्ये अशा प्रकारच्या ऑक्सिजनचा संपर्क आला तर त्या पेशींना सुद्धा विषारी बनविते आणि त्या पेशी लवकर मारण्यास सुरुवात होते. जर आपल्या शरीरात Antioxidants नसतील तर आपण खूप लवकर आजारी पडू शकतो तसेच खूप लवकर आपले वय झाल्यासारखे वृद्धत्व आल्यासारखे वाटू लागते. आपली त्वचा, डोळे खराब होतात.

आपण पहिले असेल कि लहान मुलांच्या त्वचेत आणि वृद्ध व्यक्तीच्या त्वचेमध्ये फरक असतो परंतु जर त्या व्यक्तीला Antioxidants क्रीम किंवा खाण्यामध्ये Antioxidants दिले तर त्यांची त्वचा अधिक चांगली राहण्यास मदत होते. जर आपण Antioxidants चांगल्या प्रमाणात खात असू तर आपण ह्रदयाच्या विकारापासून वाचू शकतो, मेंदूच्या झटक्यापासून सुद्धा वाचू शकतो, डोळ्यांना सुद्धा वाचवू शकतो, त्वचेला सुद्धा वाचवू शकतो. आपली फुफ्फुसे जी खराब होतात किंवा प्रदुषणाचा जो परिणाम आहे या सर्वांना रोखण्यासाठी शरीराला Antioxidants पदार्थांची आवश्यकता आहे. Antioxidants जे असतात ते खराब असलेल्या ऑक्सिजन ला नष्ट करण्याचे कार्य करतात म्हणून Antioxidants पदार्थ जे आहेत ते आपल्या शरीरासाठी खूप चांगले कार्य करत असतात.

Helpful Antioxidants कुठे जास्त मिळतात ?

Helpful Antioxidants हे जास्त फळे आणि भाज्यांमध्ये मिळत असतात. पाने असलेल्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात असतात. खूप काही असे घटक आहेत ज्यांना आपण सुपरफूड असे म्हणतो जसे कि आवळा आहे, बेरी, जांभूळ, काळी द्राक्षे या सर्वांमध्ये खूप जास्त प्रमाणात Antioxidants असतात. ज्या ज्या पदार्थात Antioxidants आहेत ते सर्व पदार्थ आपल्या शरीराचे संरक्षण करतात म्हणून असे पदार्थ नियमित खाल्ले पाहिजेत. आजच्या काळात जे आजार वाढत होत आहेत ते सर्व oxidation या प्रक्रियेमुळे होत आहेत.

1. आवळा – आवळ्यामध्ये सर्वात जास्त Helpful Antioxidants असतात म्हणजे आवळ्यामध्ये ५० पट इतके प्रमाण असते. यामध्ये व्हिटामिन ए, व्हिटामिन ई, आणि व्हिटामिन सी, सेलेनियम, क्रोमियम, झिंक कॉपर हे सर्व Antioxidants चे कार्य करत असतात.

2. ब्रोकोली – ब्रोकोली मध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात Antioxidants असतात.

3. पालक – पालेभाज्यांमध्ये सर्वात जास्त Antioxidants आढळतात म्हणून पालक मध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणांत हे आढळून येतात.

4. काळी द्राक्षे – काळ्या द्राक्षामध्ये सर्वात अधिक प्रमाणात Antioxidants असतात.

याशिवाय प्लम, काळी बेरी, लसून मध्ये सुद्धा Helpful Antioxidants असतात. तसेच संत्र्यामध्ये, कांद्यामध्ये, लाल सिमला मिरची, मोड आलेले कडधान्य यामध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात Antioxidants असतात. म्हणून तुम्हाला स्वतःला निरोगी ठेवू इच्छिता तर त्यासाठी शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करावे तर लागेलच परंतु Antioxidants तुम्ही भरपूर प्रमाणांत खाणे आवश्यक आहे. जे लोक Antioxidants भरपूर असलेली फळे खात असतात त्या लोकांना आजार कमी होत असतात त्यांची त्वचा निरोगी राहते. Antioxidants तुम्ही खाण्याबरोबरच त्वचेला लावण्यासाठी सुद्धा वापरू शकता. आवळ्याचा रस तुम्ही पिऊ शकता किंवा सुकविलेला आवळा तुम्ही खाऊ शकता.

आवळा हा नेहमी मिळत नसला तरी ज्या मोसमात आवळा भरपूर प्रमाणात मिळतो तेव्हा तुम्ही तो सुकवून ठेवू शकता. किंवा आवळ्याचा रस तुम्ही १० ते १५ मिली पाण्यात टाकून घेतला तरी हे खूप फायदेशीर ठरते. म्हणून आवळा हे एक सुपरफूड आहे ज्यामध्ये खूप Antioxidants असतात.

 Helpful Antioxidants

10 Helpful Antioxidants नी समृद्ध असलेले पदार्थ ( वृद्धत्व कमी करणारे पदार्थ)

प्रत्येक पदार्थात Helpful Antioxidants सारख्या प्रमाणात आढळत नाहीत वैज्ञानिकांनी पदार्थांमधील Antioxidants मोजमाप करण्याची एक पद्धत शोधून काढली आहे. Antioxidants चे परीक्षण करण्यासाठी एक चाचणी केली जाते Frap ( फेरीक प्लाज्मा परीक्षण) हि एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये अन्न नष्ट करतात. जे पदार्थ अभिक्रीयेमध्ये निष्क्रिय ठरतात आणि लोह कमी करतात हा बदल मोजला जातो तुम्हाला कोणते पदार्थ घ्यायचे आहेत हे आपण पाहूया.

1 Dark chocolate – ज्यांना chocolate आवडते त्यांच्यासाठी हि चांगली गोष्ट असेल dark chocolate हे फक्त आनंद देण्यासाठी नाही तर हे पोषणामध्ये सुद्धा तितकेच चांगले आहे. नियमित chocolate च्या तुलनेत यामध्ये अधिक कोको असते त्यासोबत त्यामध्ये खनिजे आणि Helpful Antioxidants सुद्धा भरपूर प्रमाणात असते. हे फक्त एवढेच नाही तर dark chocolate हे शरीरातील सूज कमी करण्यासाठी आणि ह्रदयविकार मध्ये सुद्धा उपयोगी आहे. कोको आणि रक्तदाब यांचा सुद्धा जवळचा संबंध आहे हे कमी आणि उच्च रक्तदाब या दोन्हीमध्ये चांगल्या प्रकारे कार्य करते.

2. blueberries – blueberries या औषधी असतात आणि यांच्यामध्ये Antioxidants भरपूर प्रमाणात आढळतात. १०० ग्राम ताज्या blueberries मध्ये फळे आणि भाज्यांच्या तुलनेत पाचपट अधिक Antioxidants असतात. blueberries प्रभावी असल्याचे खूप पुरावे आहेत आणि हे सिद्ध झालेले आहे. विभिन्न रोगांमध्ये आणि सूज यामध्ये blueberries उपयोगी ठरतात.

3. हळद – आपले पालन पोषण लहानपणापासून भारतीय आहारपद्धतीत झालेले आहे आणि भारतात घराघरात जेवण बनवताना हळदीचा वापर नेहमी केला जातो. भारतात हॉटेल मध्ये मिळणाऱ्या भोजनामध्ये सुद्धा हळदीचा वापर केल्याने पदार्थ अधिक स्वादिष्ट आणि वेगळे बनतात. हळदीमध्ये करक्युमीन असते जे एक शक्तिशाली Helpful Antioxidants आहे आणि सूज कमी करणारे गुणधर्म असलेले आहे. आणि त्याचे प्रमाण ५ % आहे. करक्युमीन चे नियमित सेवन केल्याने लाभदायक आणि प्रभावी असल्याचे पुरावे आहेत. नैसर्गिक रित्या भोजनामध्ये हळदीचा वापर करण्याचा प्रयत्न करावा

4. आले – हळदी नंतर मसाल्यांमध्ये वापरला जाणारा दुसरा Antioxidants म्हणजे आले. आल्यामध्ये खूप प्रभावी Helpful Antioxidants असतात. आले हे बहुउपयोगी आहे. आल्याचा नियमित आपल्या भोजनामध्ये समावेश वेगवेगळ्या पद्धतीने करावा.

5. हिरव्या पालेभाज्या – ब्रोकोली, पालक अशा भाज्यांमध्ये Antioxidants भरपूर प्रमाणात असतात यांमध्ये व्हिटामिन सी, व्हिटामिन ई, व्हिटामिन व्हिटामिन ए भरपूर प्रमाणात असतात त्याबरोबर सल्फोराफेन असते जे कोशिकांच्या ऑक्सिडेटीव तणावापासून वाचण्यास मदत करते.

6. सिमला मिरची- हिरवी, पिवळी किंवा लाल सिमला मिरची यामध्ये संत्र्यापेक्षा ३ पट जास्त व्हिटामिन सी असते. आणि हे बऱ्याच लोकांना माहित नसते. सिमला मिरची मध्ये भरपूर प्रमाणात Antioxidants असतात तसेच त्यामध्ये बीटा केरोटीन आणि क्वाटीन समाविष्ट असते. त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारे खावू शकता.

7. सुकामेवा – विशेष करून बदाम आणि आक्रोड आपण दररोज खायला हवे, आपल्या नाष्ट्यामध्ये सुक्यामेव्याचा समावेश करावा. तसेच सुक्या मेव्यामध्ये व्हिटामिन सी, पोलीफिनोल्स यामुळे चांगल्या प्रमाणात Antioxidants असतात. कोणत्याही इतर पदार्थांच्या तुलनेत नाश्त्यामध्ये कच्चा सुकामेवा खाणे फायदेशीर ठरते. हवाबंद पाकीटामधील पदार्थ नाश्त्यामध्ये खाण्यापेक्षा सुका मेवा खाणे कधीही चांगले. कारण हवाबंद पाकिटामध्ये असलेल्या पदार्थात तेलासोबत खूप काही वाईट घटक असतात यालाच आपण जंक फूड म्हणतो.

8. ग्रीन टी – ग्रीन टी मध्ये सुद्धा Helpful Antioxidants असल्याचे समोर आले आहे नियमित स्वरूपात ग्रीन टी प्यायल्याने खूप लोकांना विविध लाभ झाल्याचे समोर आले आहे. ग्रीन टी एक काकीन आणि शक्तिशाली Antioxidants आहे.

9. इतर बेरीज – आपण याआधी blueberries बद्दल पहिले आहे.blueberries, strawberry, raspberries ज्यामध्ये खूप जास्त प्रमाणात Antioxidants असतात. anthocyanins vitamin c एक चांगला पर्याय असू शकतो. आणि हे Antioxidants वाढीचा वेग वाढवतात.

10. Tomato – Tomato हे आपल्यासाठी खूप चांगले आहे. नेहमी आपल्या आहारात Tomato चा समावेश असतो, Tomato हा आपल्या आहारातील मुख्य भोजनाचा भाग असतो तसेच Tomato आपण कच्चा खाऊ शकतो आणि सहज उपलब्ध असतो तसेच यामध्ये भरपूर प्रमाणात लायकोपीन असते जे एक शक्तिशाली Helpful Antioxidants आहे. ज्याचे नियमित सेवन केल्याने खूप काही आरोग्याचे फायदे मिळतात.

याशिवाय संत्र्यामध्ये व्हिटामिन सी आणि भरपूर Antioxidants असतात. किवी या फळामध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात व्हिटामिन सी असते. सफरचंद हे प्रीसायनिडीन बी 2 आणि एपीकैतेचीन नावाच्या पोलिफेनोल्स ने भरपूर असतात. सफरचंद मध्ये व्हिटामिन ई आणि सेलेनियम असते. तसेच लाल सफरचंद मध्ये खूप जास्त Antioxidants असतात. जसे कि बाकीच्या सफरचंदपेक्षा अधिक Antioxidants असतात. जेंव्हा तुम्ही सफरचंद खात असता तेव्हा ते सालीसहीत खाण्याचा प्रयत्न करा. कारण सालीमध्ये फक्त Antioxidants नसतात तर फायबर असतात ते सुद्धा महत्वाचे असतात. द्राक्षेमध्ये सुद्धा Antioxidants असतात तसेच ते व्हिटामिन सी णे भरपूर असतात.तसेच कॅन्सर आणि ह्रदयरोग पासून बचाव करण्यास मदत होते.

https://fityourself.in/minerals-essential-in-body/

https://ig.me/j/Abaa1lK5byvYth8N