योग्य वजन आणि उंची किती आहे | What is an Unique & ideal weight and height

एक प्रश्न प्रत्येकाला नेहमी असतो कि तुमचे आदर्श वजन आणि उंची ( ideal weight and height) किती असावी. किती वजन असने चांगले आहे किंवा किती जास्त किंवा कमी वजन असणे वाईट आहे. बर्याच जणांना खूप जास्त झालेले वजन कमी करायचे असते तर बऱ्याच जणांचे वजन काही केल्याने वाढत नाही. म्हणून स्वतःला हा प्रश्न पडला पाहिजे कि आपल्या वयानुसार किंवा उंचीनुसार आपले आदर्श वजन (ideal weight and height) किती आहे ?

वजन कमी करण्यासाठी तुम्ही व्यायाम किंवा आहार घेत असता तसेच वाजण वाढविण्यासाठी सुद्धा तुम्ही खूप काही गोष्टी करत असता. आपण बॉडी मास इंडेक्स हि संज्ञा ऐकली असेल. बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येक घरात आरोग्यविषयक समस्या दिसून येतात. असंतुलित आहारामुळे कुणाचे वजन कमी तर कुणाचे जास्त असते. एखाद्या निरोगी व्यक्तीचे वाजण आणि उंची किती असावी हे आपल्याला माहित असावे त्यामध्ये कमी जास्त आढळल्यास तुमच्यासाठी ते धोक्याचे ठरू शकते.

What is an ideal weight and height यामध्ये काही घटक असू शकतात जसे कि

  • सध्याचे वजन
  • वय
  • उंची
  • स्नायूंचे वजन
  • शरीरातील चरबीचे प्रमाण.
  • अवयवांचे मोजमाप.

What is Body Mass Index in ideal weight and height ?

What is Body Mass Index in ideal weight and height ?

कित्येक दशके किंवा त्याहून जास्त हे एक मानक आहे ज्याचा उपयोग करून आपण आपले आदर्श वजन किंवा उंची ( ideal weight and height) यांचा अभ्यास करत आहोत. हि पद्धत जरी जुनी असली तरी याचा वापर आपण आजपर्यंत करत आहे. बॉडी मास इंडेक्स हि एक मोज्माप्नाची पद्धत आहे ज्यामध्ये उंचीच्या आधारावर यांच्या तुलनेने निकष ठरविले जातात. आणि त्यानुसार निकष ठरविले जातात कि उंचीनुसार तुमचे आदर्श वजन किती असले पाहिजे. बॉडी मास इंडेक्स थोडासा कधी कधी चुकीचा ठरू शकतो कारण व्यक्तिपरत्वे होणारे बदल.

दुसरा भाग एक सुचक अंक आहे जो बॉडी मास इंडेक्स पेक्षा वेगळा आहे तो म्हणजे एक आरोग्याचा एक भाग आहे आपली कंबर आणि पृष्ठभाग यांचे गुणोत्तर. तुम्ही हे गुणोत्तर एका सोप्या पद्धतीने मोजू शकता यासाठी तुम्हाला मोजणीसाठी फ्लेक्सीबल असलेला टेप घ्यावा लागेल. आणि हा टेप तुम्हाला कंबरेभोवती गुंडाळायचा आहे. म्हणजे एक वेळा कंबरेचे माप घ्यायचे आहे तर एक वेळा तुम्हाला तुमच्या पृष्ठभागाचे माप घ्यायचे आहे.

कंबर = ……… आणि पृष्ठभाग = …….. असे माप तुम्हाला घायचे आहे.

यानंतर तुम्हाला याचे गुणोत्तर घाय्यचे आहे कंबर / पृष्ठभाग = ……. असे.

पुरुषांसाठी हे गुणोत्तर ०.९५ पेक्षा कमी आहे तर तुम्ही निरोगी असाल तसेच ते १.० पेक्षा जास्त असेल तर तुम्ही थोडे धोकादायक असू शकता. तसेच महिलांसाठी हे गुणोत्तर ०.८ इतके आहे हि एक उत्तम पातळी आहे तर ०.८६ हि एक धोक्याची पातळी असू शकते. हि पद्धत तुम्ही पहिली तर अतिशय सोपी पद्धत आहे कारण तुमच्या शरीरातील चरबी हि सर्वाधिक कंबरेच्या आसपास च्या भागात साठलेली असते.जरी त्या भागात जास्त चरबी जरी नसली तरी या मासपेशींच्या आकारामधील वाढ हि कंबरेच्या आकाराला प्रभावित करते.

Ideal weight and height Ratio

शरीरातील माप घेण्याचे खूप अवयव असतात परंतु वजनाचा आणि कंबरेचा संबंध आपल्या उंचीशी सुद्धा असतो. कारण आपली उंची हि आपल्या कंबरेच्या मापाच्या दोनपट जास्त असते. म्हणजेच यांचे गुणोत्तर हे २ : १ असे असेल. परंतु कंबर हि उंचीच्या निम्यापेक्षा कमी इंच असता कामा नये. म्हणून तुम्हाला काही बदल करावे लागतील. बऱ्याच वेळा आपण वजन किंवा उंचीबद्दल डॉक्टरांकडे जातो आणि खूप लोकांची तक्रार असते कि ते दुबळे आहेत, सडपातळ आहेत. म्हणून त्यांच्यासाठी काही उपाय आहेत कारण कोणासाठी वजन हे परिपूर्ण नसते. आपल्यापैकी बरच लोक दुसऱ्या लोकांचे वजन किंवा उंची ( ideal weight and height) पाहून त्यांच्याशी तुलना करतात आणि फसतात.

What is Actual Ideal weight and height in Genetics

तुम्ही कितीही व्यायाम करा किंवा शरीरातील चरबी कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तरी सुद्धा तुमच्या शरीराची जी ठेवण आहे ती स्वीकारायला हवी तुम्हाला ज्या गोष्टी करायला जमतात त्यांवर भर द्या. कधी कधी तुम्हाला तुमच्या अनुवांशिकतेवर अवलंबून राहावे लागते त्यामुळे तुमची उंची कमी किंवा जास्त हे त्यावर सुद्धा ठरत असते. कधी कधी तुम्हाला कंबर आणि पृष्ठभाग यांचे गुणोत्तर तुम्हाला हवे असताना सुद्धा नियंत्रित ठेवता येत नाही. कारण काही वेळा गोष्टी पूर्व निर्धारित असतात आणि तुम्हाला त्या ठीक करण्याच्या संधी सुद्धा मिळतात. जेंव्हा तुम्ही खूप मेहनत करता किंवा खूप व्यायाम करता किंवा चांगला आहार घेत असता तेव्हा.

आणखी एक चांगला उपाय म्हणजे तुम्हाला जेंव्हा परिणाम पहायचे असतील तेव्हा तुम्ही तुमच्या कपड्यावरून ठरवू शकता जसे कि तुमचे वजन कमी होत असल्यास तुम्हाला कपडे ढिले व्हायला सुरुवात होईल त्यामुळे त्यांचे मोजमाप कमी करून घ्या. तुम्हाला आरामदायक असतील असे आणि शरीराबरोबर बसणारे कपडे वापरण्यास सुरवात करा. जेंव्हा तुम्ही वजन कमी करण्याच्या मार्गावर असता तेव्हा तुम्ही चांगले कपडे जे तुमचा आत्मविश्वास वाढवतील असे कपडे वापर ते तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरतील. तसेच तुम्ही इतर लोकांचा विचार करू नका.दुसऱ्या कोणाचेही मट लक्षात घेऊ नका, तुम्हाला जी गोष्ट आनंददायी ठरणार आहे ती गोष्ट करा त्यामुळे तुम्हाला फायदा होईल त्यामुळे तुमच्या बाजूचे लोक सुद्धा आपोआपच आनंदी होतील.

असे काही लोक असतात ज्यांचे शरीर अविश्वसणीय असते आणि बराच कालावधीपर्यंत ते जसेच्या तसे दिसत असतात अशा लोकांना चांगले प्रशिक्षक सुद्धा असतात. आपण नेहमी टेलिव्हिजन आणि मोबाईल इत्यादींमध्ये बघत असतो कि एखाद्याचे शरीर अतिशय पिळदार आणि उत्तम असते आणि तुम्हाला त्याचे शरीर पाहून प्रशंसा करावीशी वाटते. जेंव्हा तुम्ही सुद्धा स्वतःला आरशामध्ये पाहता तेव्हा तुम्हाला सुद्धा तुमच्या शरीरावर वाढलेले मास, चरबी किंवा तुमचे वाढलेले वजन जाणवेल. म्हणून तुम्हाला तुमच्या शरीराच्या वजनावर लक्ष केंद्रित करायला हवे. वजन नियंत्रणात ठेवणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे हा तुमचा प्रवास आहे त्यामध्ये तुम्हाला इतरांवर लक्ष केंद्रित करणे बंद करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा.

वजन आणि उंची (( ideal weight and height)) नियंत्रित करणे हे तुमच्या मेंदू आणि शरीरातील बंध आहे. मोजमाप करण्याची साधने फक्त उपकरणे आहेत परंतु त्यापासून तुम्हाला फक्त अंक दिसतात म्हणून तुम्हाला फक्त वजन कमी किंवा नियंत्रित करण्याकडे भर दयायला हवा. आणि तुम्हाला तुमच्या शरीरापासून काय वाटते हे महत्वाचे आहे म्हणजे तुम्ही कसे दिसत आणि किती आनंदी असता हे महत्वाचे आहे.तुम्हाला तुमचे मांसपेशींचे वजन वाढविणे आणि चरबी करणे हा प्रयत्न तुमचा असला पाहिजे. मोजमापावर अवलंबून राहण्यापेक्षा तुमच्या शरीराच्या ठेवणीवर किंवा अनुवांशिकतेवर बरेच काही अवलंबून असते.

ideal weight and height आपले वजन किती आहे आणि वजनाच्या ideal weight and height प्रमाणात आपली उंची किती आहे हे प्रत्येकाला जाणून घेण्याची इच्छा असते. यासाठी आपणाला Puberty. सामान्यतः आपल्या वाढीचे अंक हे आपला वाढदिवस मानला जातो. म्हणजेच दोन असे लोक ज्यांची उंची समान आहे आणि परंतु वजन वेगळे आहे हि गोष्ट सामान्य आहे. हे जरुरी नाही कि त्यांच्या वाढीचा अंक सारखा नाही. काही लोकांचा Puberty अंक वयाच्या आठव्या वर्षापासून सुरु होतो तर काही लोकांमध्ये अगदी १४ वर्षाच्या वयामध्ये वाढ सुरु होते.

महिलांमध्ये हे थोडे लवकर सुरु होते तर पुरुषांमध्ये ते थोडे उशिरा सुरु होते. Puberty च्या वेळी आपले शरीर काही हार्मोन्स बनविण्यास सुरुवात होते. तसेच काही हार्मोन्स जसे कि टेस्टेस्टेरोन किंवा इस्ट्रोजेन त्यामुळे शारीरिक बदल घडून येतात. जसे कि आपले स्नायू वाढतात आपली उंची वाढते, वजन वाढते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळे बदल घडून येऊ शकतात हे अवलंबून असते कि एखाद्या व्यक्तीमध्ये किती हार्मोनल बदल झाले आहेत.

तुम्ही आहार कोणता घेत आहात, तुमची झोप कशी आहे, तुमची अनुवांशिकता यावर सुद्धा बरेच काही अवलंबून आहे. BMI हे अगदी अचूक असू शकत नाही परंतु डॉक्टर याचा वापर रुग्णाचे वजन अति प्रमाणात तर वाढले नाही न हे तपासण्यासाठी वापरतात म्हणजे अशी परिस्थिती कि ज्यामुळे आजार येऊ शकतात. आजच्या काळात वजन वाढणे हे वाढत चालले आहे हि समस्या बैठी जीवनशैली, व्यसन, अति खाणे त्यामुळे फक्त खाण्यावरून नाही म्हणू शकत कि तुमचे वजन जास्त आहे. आजच्या काळात BMI वरून फक्त तुलनात्मक आकडेवारी मिळते. BMI मध्ये फक्त प्रकार माहित होतात कि तुमचे वजन कमी आहे किंवा मध्यम आहे किंवा अतिशय जास्त आहे.

तुम्हाला लठ्ठपणा असेल तर हे तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. डॉक्टर तुमच्या वयावरून, लिंगावरून, खाण्यापिण्याच्या सवयीवरून किंवा कुटुंबाच्या इतिहासावरून किंवा अनुवांशिकतेवरून ठरवितात कि तुमचे वजन किती असावे तसेच तुमचे आरोग्य, शारीरिक हालचालीवरून तुमची उंची आणि वजन जसे कि तुम्ही किती उंच आहात (ideal weight and height) किंवा ठेंगणे आहात तुम्ही किती जाड आहात तसेच किती सडपातळ आहात यावरून ठरत असते. तुमचे वजन जास्त असेल तर तुम्हाला आहारतज्ञाकडे पाठविले जाईल किंवा व्यायाम करण्यासाठी जिमला जाण्याचा सल्ला दिला जाईल. तुमचे वजन कमी किंवा उंची ideal weight and height कमी असेल तर तुम्हाला काही सहाय्य करणारी औषधे दिली जातील.

https://fityourself.in/omega-3-fatty-acids

https://hyaluxe.com/?fbclid=PAZXh0bgNhZW0CMTEAAaam8aVG3gME6aIjkJoRLEoJ537R3nlHyb0Zli5nVXIKqTkt8TVwYeZX4F0_aem_RjjOhZfSk3KxGd_NfLvzHQ