प्रत्येक घरामध्ये असणारा वादाचा मुद्दा म्हणजे कोणते खाद्य तेल (Cooking oil) चांगले आहे आणि कोणते वाईट. अन्न तयार करण्यासाठी वापरले जाणारे खाद्यतेल हे फक्त अन्न बनविण्यासाठी नाही तर ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. आपण या विषयी काही गुपित जाणून घेणार आहोत जी तुम्हाला चांगले खाद्यतेल निवडण्यासाठी मदत करेल तसेच तुम्हाला माहित होईल कि कोणते खाद्यतेल तुमच्यासाठी चांगले आहे आणि तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहे.

(Cooking oil Used Daily) आपण सर्व खाद्यतेलाविषयी विस्तृतपणे जाणून घेवूया.
1 .रिफाईन्ड तेल (Cooking oil) – रिफाईन्ड तेलाचे नाव ऐकून तुम्हाला वाटेल कि हे तेल एक आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले तेल आहे आणि या तेलामधील अशुद्धी किंवा वाईट असणाऱ्या गोष्टी काढून टाकल्या आहेत आणि हे आरोग्यासाठी चांगले असेल हि समज आहे. परंतु वास्तविक वस्तुस्थिती खूपच वेगळी आहे.रिफाईन्ड तेल हि अशी तेले असतात जी बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये या तेलामधील काही घटक काढले जातात जसे कि या तेलांना स्वच्छ केले जाते तसेच या तेलांचा वास काढून घेतला जातो, चव काढून घेतली जाती आणि खूप काळ टिकण्यासाठी प्रक्रिया केली जाते. आणि या तेलांना अशा काही प्रक्रियेमधून गेल्यामुळे त्यांच्यामधील पोषक तत्वे नाहीशी होतात.
हि प्रक्रिया अशी असते कि ज्यामध्ये उष्णता, केमिकल ब्लीच, डीओडोराइजिंग केले जाते या प्रक्रियेमध्ये तेलामध्ये असलेले नैसर्गिक Vitamins, antioxidants, essential fatty acids असतात ते नष्ट होतात आणि यामुळे हि तेले कोणत्याही उपयोगाची राहत नाहीत.संशोधनानुसार रिफाईन्ड तेलांमध्ये खूप जास्त उष्णता दिल्यामुळे Trans fats वाढतात आणि हे Trans fats आपल्या शरीरासाठी आणि ह्र्द्यासाठी खूप हानिकारक असतात. यामुळे आपल्याला वाटते कि रिफाईन्ड तेल हि आपल्यासाठी वाईट आहेत परंतु मग कोणती तेले वापरायची हा प्रश्न पडतो ?
बाजारात मिळणारी सर्वच तेले हि रिफाईन्ड तेल (Cooking oil) असतात आणि भारतीय आहारपद्धतीत तेलाशिवाय पदार्थ बनणे कठीण आहे.म्हणूच आपण यावर उपाय पाहूया. आणि रिफाईन्ड तेलाचे पर्याय कोणते असतील याबद्दल पाहूया.
1. कोल्ड प्रेस तेल – यालाच कच्या घाण्याचे तेल Cooking oil) असे म्हणतात.तर हे कच्या घाण्याचे तेल काय आहे हे जाणून घेवूया. कच्या तेलाचे घाणे हे भारतामध्ये खूप पुरातन पद्धत आहे तेल काढण्याची.अजूनही काही छोटे छोटे गाव आहेत किंवा काही ठिकाणी अशा प्रकारचे घाणे पाहायला मिळतात आणि त्या प्रक्रियेपासून तेल काढण्याची पद्धत अवलंबली जाते. या प्रक्रियेमध्ये बियांना कमी तापमानावर प्रेस म्हणजे दाब देवून तेल काढले जातात.
या प्रक्रियेमध्ये कोणतेही उच्च पद्धतीची रसायने केलेला नसतो ज्यामुळे तेल आपल्या नैसर्गिक पोषक तत्वांना मिळवीत असते आणि त्यामुळे ते निरोगी ठरते अशी तेले आपल्या ह्र्द्यासाठी चांगली असतात शरीरातील वाईट कोलेस्ट्रोल कमी करतात. आणि या तेलांमध्ये Trans fats खूपच कमी प्रमाणात असतात किंवा नसतात आणि दुसरीकडे Trans fats आपल्याला रिफाईन्ड तेल (Cooking oil) मध्ये खूप प्रमाणात मिळत असते.
जर तुम्ही विचार करत असाल कि तुमच्या आहारात सर्वात मोठा कोणता बदल कराल तर तुम्हाला आधी तुम्ही वापरत असलेले खाद्य तेल (Cooking oil) बदलले पाहिजे. आणि असे केल्याने तुम्हाला खूप मोठा बदल दिसेल.कच्या घाण्याच्या तेलामध्ये काही तेले आहेत ज्यामध्ये खालील तेले समाविष्ट आहेत.
शेंगदाणे तेल – भारतामध्ये शेंगदाणे तेल २१ % लोक वापरत आहेत. शेंगदाणे तेलामध्ये Monosaturated, Polysaturated fats असतात आणि हे fats आपल्या ह्रदयाला निरोगी ठेवतात. त्याचसोबत यामध्ये व्हिटामिन इ असते जे एक चांगले antioxidant आहे जे वृद्धत्व कमी करते.शेंगदाणे तेलाचा smoke Point जास्त असल्याने अन्नपदार्थ बनविण्यात हा फायदेशीर ठरतो.smoke Point कमी असल्याने गरम केल्यावर तेलामध्ये निळा रंग तयार होतो म्हणून शेंगदाणे तेल हे फायदेशीर ठरते.
आपल्याला बाजारातून लगेच शेंगदाणे तेल Cooking oil) विकत घ्यायचे नाही कारण बाजारात मिळणारे शेंगदाणे तेल हे सुद्धा रिफाईन्ड तेल असतात आणि बाजारामध्ये कंपनी वेगवेगळ्या प्रकारे प्रकारे प्रलोभने दाखवून तुम्हाला अशा प्रकारची तेले खरेदी करण्यास भाग पडतात.म्हणून तुम्हाला खूप पाहून हि तेले खरेदी करावी लागतील अथवा तुम्हाला गावामध्ये जावून नैसर्गिक पद्धतीने बनविलेले तेल घ्यावे लागेल. अन्वेषण हि एक अशी कंपनी आहे जी भारतातील शेतकर्यांसोबत जोडली गेली आहे आणि त्यांच्यामार्फत आरोग्यासाठी चांगले असणारे पदार्थ पुरवितात.

सुर्यफुल तेल – सुर्यफुल तेल हे हलके असते आणि याचा सुद्धा smoke Point जास्त असतो. सुर्यफुल तेल हे तुम्हाला चांगली गुणप्रत,चव देते. यामध्ये व्हिटामिन इ असते आणि आपल्या त्वचेला चांगले बनवते. संशोधनानुसार सूर्यफुलाच्या वापराने ह्रदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.तसेच यामध्ये असणारे fat हे कोलेस्ट्रोल वाढून देत नाहीत. असे आहे म्हणून याचा वापर प्रमाणाबाहेर करता कामा नये कारण कोणत्याही गोष्टीला प्रमाण ठरलेले असते.म्हणून कोणतेही तेल चांगले आहे म्हणून त्याचा अतिवापर धोकादायक ठरू शकतो.
मोहरीचे तेल – मोहरीचे तेल हे सामन्यपणे वापरले जाणारे तेल आहे जे जवळ जवळ १८ % भारतातील लोक वापरतात. मोहरीचे तेल शुद्ध असेल रिफाईन्ड तेल नसेल तर ते आपल्या रोजच्या वापरासाठी अतिशय चांगले आहे.परंतु मोहरीच्या तेलाबद्दल खूप सारे वाद आहेत युरोपियन देशांमध्ये हे तेल बंद करण्यास सांगितले आहे. कारण मोहरीच्या तेलामध्ये आढळणारे इरुसिक असिड आरोग्यासाठी धोकादायक आहे म्हणून.परंतु बऱ्याचशा संशोधनात असे आढळून आले कि मोहरीचे तेल हे धोकादायक नाही.मोहरीचे तेल आपल्यासाठी चांगले आहे कारण याचा सुद्धा smoke Point उच्च आहे आणि म्हणून अन्न बनविण्यासाठी हे एक आदर्श तेल आहे.तळलेले पदार्थ खाणे योग्य नाही परंतु कधी वेळ पडल्यास तुम्ही मोहरीचे तेल वापरू शकता.
नारळाचे तेल – आयुर्वेदानुसार नारळाचे तेल खूप शक्तिशाली मानले जात आहे. यामध्ये पचणारे ट्राइग्लीसराइडस असतात आणि यामुळे ते पचनास हलके असतात आणि शरीरास ऊर्जा प्रदान करतात. नारळाचे तेल खाल्याने कोलेस्ट्रोल चे नियोजन करण्यास हे मदत करते. तव्चेचे आरोग्य सुद्धा राखते. नारळाच्या तेलाचा वापर बहुधा दक्षिण आशिया मध्ये होतो. अन्न बनविण्यासाठी याचा वापर करणे चांगले ठरू शकते परंतु हे नैसर्गिक रित्या बनलेले असले पाहिजे आणि प्रक्रिया केलेले नसले पाहिजे.
कोणतेही तेल कितीही चांगले असले तरी ते ठराविक प्रमाणातच घेतले पाहिजे. कारण याच्या जास्त वापरणे उलट परिणाम सुद्धा होवू शकतो.म्हणून अशी तेले कमी प्रमणात वापरल्यास फायदेशीर ठरतात तर जास्त प्रमाणात वापरल्यास तोटा होवू शकतो.एका व्यक्तीला २० ते २८ ग्राम पर्यंत fat घेतले पाहिजे म्हणजे यामध्ये तेल ४ ते ६ चमचे एवढे पुरेसे आहे. म्हणून आपल्या दैनंदिन तेलाच्या वापराला या मर्यादेतच ठेवले पाहिजे.म्हणून तुम्ही कोणते तेल वापरावे याबद्दल जागरूक राहिले पाहिजे आणि निरोगी राहिले पाहिजे.

तेल नसलेला स्वयपाक (Cooking oil Zero) – आपण जे अन्न बनवतो ते बनविण्यासाठी आपण तुप, तेल यांचा वापर करत असतो.हे सर्व आपल्या उच्च रक्तदाब,मधुमेह आणि इतर रोगांसाठी कारणीभूत ठरत असते.म्हणून आपण शून्य तेल असलेले पदार्थ किंवा तेल न वापरता स्वयपाक करतो आणि त्याचे फायदे काय आहेत आणि त्याची चव कशी असेल याबाबत आपण २१ फायदे पाहूया.
- ट्राइग्लीसराईड – जेंव्हा आपण ह्रदयाच्या रक्तवाहिन्या बंद किंवा ब्लॉक विषयी विचार करतो तेव्हा कोलेस्ट्रोल आणि ट्राइग्लीसराईड या दोन्ही गोष्टी समोर येतात आणि या गोष्टी तेलामुळे घडतात.जेंव्हा तुम्ही तेल बंद करता तेव्हा या दोन्ही गोष्टी अपोआपच कमी होतात.
- ट्राइग्लीसराईड असलेल्या तेलाची कॅलरी खूप जास्त असते.आणि म्हणून जर तुम्ही तेलाचा वापर कमी केला तर वजन कमी होण्यास मदत होईल.
- तेल Cooking oil) जास्त पप्रमाणात खरेदी केले नाही तर तुमचे खुप पैसे वाचतील कारण तेल खूप महाग असतात.
- भांडी धुण्यास सोपे होईल कारण तेलाचे चिवट डाग भांड्यांवर पडत असतात यामुळे ती साफ करण्यास अवघड असते.
- तुमच्या किचन मध्ये तेलामुळे लागणारे ग्रीस जमा झालेले असते ते होणार नाही.
- तेलCooking oil) कमी केल्यामुळे तुमचे वजन कमी होईल परिणामी तुमच्या गुडघ्यावरील वजन कमी होईल तसेच चरबी कमी होईल तसेच वजन कमी झाल्यामुळे शरीरातील विविश आजार कमी होण्यास मदत होईल आणि औषधे सुद्धा कमी होतील.
- आपल्याला तेल,तुप यापासून बनविलेले अन्न खाल्याने आपल्याला पोटाचे विकार होतात आणि अपचन सुद्धा होते.आणि तेल न घालता बनविलेले अन्न खाल्याने या तक्रारी कमी होतात.
- कोणतीही भाजी तेल घालून बनविल्याने कधी कधी भाज्यांची जी मूळ चव आहे ती नष्ट होते. आणि तेल न घातल्याने भाजीची मूळ चव आपल्याला मिळते.
- तेल न घालता अन्न खाल्याने आपली आजारांपासून बरी होण्याची क्षमता वाढते जे ह्रदयाचा धक्का बसण्याचा धोका टळतो.तेल हे निसर्गाच्या विरुद्ध आहे कारण तेल हे नैसर्गिक बनत नाही ते शेतातील बियांपासून बनते.म्हणून तेल हा कृत्रिम पदार्थ आहे.
- जेंव्हा आपण तेलCooking oil) न वापरता अन्न खाऊ तेव्हा आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
- कोलेस्ट्रोल बनण्याचे महत्वाचे कारण सुद्धा तेल आहे जेंव्हा तुम्ही तेल न वापरता पदार्थ खाता तेव्हा तुम्हाला चांगली भूक लागेल.बधकोष्टतेचा त्रास कमी होईल.कारण यामध्ये तुम्ही फळे,पालेभाज्या, सलाड यांचा वापर करत असता.
- तेल Cooking oil) नसलेले अन्नपदार्थ खूप सहज पचतात.
म्हणून तेल न वापरता पदार्थ तयार करण्याचे तुम्ही शिकायला हवे.
https://fityourself.in/calorie-count-easy-or-not/
https://www.instagram.com/getsculptedx?igsh=MXgzNTdvY3g3YnB5MQ==