भाज्या बनविण्याच्या चुकीच्या पद्धती | Wrong Cooking Methods of vegetables to avoid

Wrong Cooking Methods – तुम्ही आहारात भाज्यांचा समावेश करत असाल तर तुम्ही निरोगी झाला असे तुम्हाला वाटते परंतु असे नाही भाज्या नियमित जरी खात असून सुद्धा त्यापासून तुम्हाला पोषक तत्वे मिळतील असे नाही कारण तुम्ही खात असलेल्या भाज्या तुम्ही चुकीच्या पद्धतीने तयार करत आहात.आणि यामुळे भाज्यामधील विटामिन आणि फायबर तुमच्या शरीरात शोषले जात नाहीत. ज्याप्रमाणे भाज्यांचे पोषक मुल्य कमी होत असते त्याच प्रमाणे भाज्यांची चव सुद्धा कमी होत असते. जर तुम्हाला कॅलरी सोबत अधिक पोषक मुल्य प्राप्त करायचे असतील तर तुम्ही भाज्या कशा शिजविता किंवा त्या तयार करता यावर सर्व अवलंबून असते. तुमच्या भाज्या बनविण्याच्या पद्धतीमुळे खूप प्रभाव पडू शकतो.

Wrong Cooking Methods and mistakes भाज्या बनविताना होणाऱ्या चुका

1. भाज्या बनविताना वापरले जाणारे तेल (Wrong Cooking Methods -1) – भाज्या बनविण्यापूर्वी त्यावर तेल टाकणे हे चुकीचे आहे आपण भाज्या भांड्याला चिकटू नयेत म्हणून तुम्ही तेल वापरत असाल तर त्यामुळे भाज्यांचे पोषक मुल्य कमी होते. तेल अधिक गरम झाल्याने भाज्यामधील तत्वे नाहीशी होतात यासाठी तुम्ही थोडेसे ओलीव तेल भांड्यात टाका आणि यानंतर त्यामध्ये भाज्या टाका.

2. सर्व भाज्या शिजवू नका किंवा भाजू नका (Wrong Cooking Methods -2) – काही भाज्या ह्या कच्या स्वरुपात सुद्धा खाल्या जावू शकतात म्हणून त्यांना शिजविण्याऐवजी किंवा तेलात भाजण्याऐवजी कच्च्या खाण्याचा प्रयत्न करा. जसे कि बीट, ब्रोकोली, सिमला मिरची कच्ची खाल्यास त्यामधून अधिक पोषक तत्वे मिळतात. याशिवाय काही भाज्या त्यांना गरम केल्याने त्यामधील पोषक तत्वे अध्गिक वाढतात कारण त्यांना गरमी लागते. मशरूम भाजून खाल्याने तसेच पालक सुद्धा कच्चा किंवा शिजवून खाणे अधिक चांगले ठरते. यामुळे अधिक प्रमाणात लोह, कॅल्शिअम शोषले जाते. टोमाटो सुद्धा जेंव्हा भाजीमध्ये वापरले जाते तेव्हा कॅन्सर सारख्या आजारात उपयोगी असणारे लायकोपिन हा घटक शोषला जातो त्यामुळे काही भाज्या ह्या कच्च्या खाणे अधिक चांगले ठरते.

Wrong Cooking Methods

3. भाज्या बनविण्याच्या खूप वेळ आधी चिरून ठेवू नका (Wrong Cooking Methods -3) – काही लोक वेळ वाचवा म्हणून भाज्या वेळेआधीच चिरून घेत असतात हि गोष्ट काही भाज्यांच्या बाबतीत चालत असेल तरी नेहमी सर्व भाज्यांच्या बाबतीत असे करता कामा नये. जेंव्हा तुम्ही भाज्या धूत असता आणि चिरत असता तेव्हा भाज्यांमध्ये ऑक्सिडेशन सुरु होत असते. यासोबतच भाज्या कोमेजण्यास सुरुवात होते. जोपर्यंत तुम्हाला भाज्या वापरायच्या नाहीत तोपर्यंत त्या धुवायच्या नाहीत आणि चिरायच्या नाहीत.

4. भाज्या जास्त वेळ शिजवू नका (Wrong Cooking Methods -4) – भाज्या शिजविणे हा तुमच्यासाठी एक वेळ वाचविण्याचा मार्ग असू शकतो परंतु यामुळे भाज्यांमधील पोषक तत्वे आणि चव कमी होण्याचा संभाव असतो. जेंव्हा तुम्ही भाज्या शिजविता तेव्हा पाण्यात विरघळणारे जे पोषक तत्वे असतात ते पाण्यात शोषले जातात. जास्त वेळ शिजविल्यामुळे भाज्या नरम होतात आणि त्यांचे रंग बदलतात. जेंव्हा तुम्ही भाज्या शिजवून सूप बनवत असता त्यावेळी तुम्ही थोडा वेळच भाज्या शिजवायला हव्यात आणि त्यांचा रंग बदलण्याआधी तुम्ही त्या बर्फाच्या पाण्यात ठेवा. भाज्या तयार करण्याच्या आणखी काही पद्धती जसे कि भाज्या भजने, तळणे अशा पद्धतींचा वापर करा.

5. भाज्या बनविण्याची भांडी जास्त भरू नका (Wrong Cooking Methods -5) – कधी कधी भाज्या बनविण्याच्या भांड्यामध्ये तुम्ही जास्त प्रमाणात भाज्या तयार करत असतो यामुळे भाज्या सर्व बाजूने भाजल्या जात नाहीत किंवा शिजत नाहीत आणि जेंव्हा तुम्ही भांड्यात तेल टाकत असतो तेव्हा तेलाचे तापमान कमी होत जाते यामुळे भाज्या विशिष्ट तापमानावर तयार होत नाहीत. एकाच वेळी जास्त भाज्या टाकण्याऐवजी थोड्या थोड्या भाज्या भाजणे अधिक चांगले आहे. किंवा तुम्ही मोठ्या भांड्याचा वापर करा.

6. धूरापासून भाज्या दूर ठेवा (Wrong Cooking Methods -6) – तुमच्यापैकी काही जणांना भाज्या ह्या थोड्याशा स्मोकी भाज्या आवडत असतात. आणि अशा भाज्या गरम आणि कोरड्या वातावरणात बनविल्यामुळे भाज्यामधील पोषक तत्वे नष्ट होतात. जास्त वेळ भाज्या भाजायला ठेवल्याने त्यामध्ये विशिष्ट रसायने तयार होतात. भाज्या बनविण्यासाठी नेहमी मध्यम स्वरुपाची उष्णता दयायला हवी.

7.भाज्यांचा चांगला भाग काढून टाकू नका (Wrong Cooking Methods -7) – काही लोक भाज्यांचे चांगले भाग सुद्धा कापून टाकत असतात जसे कि फ्लॉवर, ब्रोकोली किंवा पालेभाज्या यांचे देठ काकडीची साल काढून टाकतात. परंतु अशा भागात अधिक चांगले भाग असतात जसे कि साल, देठ, पाने हे भाज्यांचे सर्व भाग तुम्हाला पोषक तत्वे पुरवितात. तसेच अशा भागांमध्ये उच्च प्रमाणात विटामिन असतात. म्हणून भाज्या कापून त्या थेट वापरा तसेच साल, देठ, पाने यांचा वापर सूप सारख्या पदार्थात करा.

8. अतिशय कमी तापमानाचा वापर (Wrong Cooking Methods -8) – काही वेळा तुम्ही भाज्या अतिशय कमी तापमानावर बनवत असता. परंतु तुम्ही बनविलेल्या भाज्या आतून चांगल्या पद्धतीने शिजल्या किंवा भाजल्या नसतील तर भाज्यांची चव चांगली लागत नाही. भाज्या तयार करण्यासाठी योग्य भांड्यांचा वापर सुद्धा केला पाहिजे.

9. भाज्या ओल्या असताना बनविणे (Wrong Cooking Methods -9) – भाज्या ओल्या असताना बनविणे हि चूक सु शकते कारण जेंव्हा तुम्ही कोरड्या भाज्या बनविता तेव्हा अधिक चांगल्या बनतात. तसेच पाण्यामुळे तेलात भाज्या टाकल्यामुळे त्या नरम होतात आणि पोषक तत्वे गमावतात तसेच वाफ तयार होते. म्हणून भाज्या बनविण्याआधी त्या कोरड्या करून घेणे

https://fityourself.in/healthy-budget-meals-for-weight-loss/